Submitted by deepac73 on 18 September, 2014 - 12:01
चाळिशीनंतर चेहेर्यावर येणार्या सुरकुत्य कमी करायला काय करावे? Olay, Lakme, Himalaya, which cream is better?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
vlcc
vlcc
काहीही करू नये. योग्य आहार,
काहीही करू नये. योग्य आहार, व्यवस्थित व्यायाम, योग्य झोप आणि तणावरहित मन हे बाळगावं. बाकी कुठलीही अॅन्टीरिंकल क्रिमं लावायला जाऊ नये.
हौसच असेल तर दुधाची साय चोळावी चेहर्यावर अंघोळीच्या आधी थोडीशी.
चाळीस म्हणल्यावर थोड्या सुरकुत्या सुरू होणारच की. it is wisdom!
No vlcc please. Lootatat te.
No vlcc please. Lootatat te. Personal exp.
बोटॉक्ष. किम कार्दाशिअन आणी
बोटॉक्ष. किम कार्दाशिअन आणी तिची आई नेहमी वापरतात.
Ama, now day botox and
Ama, now day botox and fillers r in.even common people r also spending thousands n more fr it.it gives temporary effect for 6 mnths.
बोटॅक्स आणी तत्सम सौ. प्र.
बोटॅक्स आणी तत्सम सौ. प्र. ने त्वचेचे कायमचे विकार होतात. ते डेन्जरस आहे. हे माझे मत नाही तर मागे एका त्वचा आणी त्यासम्बधीत तज्ञ डॉकने लोकसत्तात पानभर लिहीले होते. लिन्क नाहीये माझ्या जवळ.
पाणी आणी ज्युस वगैरे भरपूर
पाणी आणी ज्युस वगैरे भरपूर घ्या. मन प्रसन्न ठेवा. फेशीयल पेक्षा क्लिन्जीन्ग व मसाज वर भर द्या. फेशीयल क्रीम फार फायदेशीर नसतात. त्वचा कोरडी ठेऊ नका.
फेशीयल क्रीम फार फायदेशीर
फेशीयल क्रीम फार फायदेशीर नसतात.>>>>>>>. मी माझं फेशियल घरी करते. पपई + केळं + मध एका वाटीत घेउन कुस्करुन त्याचा गिळगिळीत लगदा करुन ते अॅज अ क्रीम घेउन पार्लर मधे करतात तसा मसाज करुन मग स्टीम घेते..मसाज करताना समजा हात सुकले तर बर्फ ठेवावा बाजुला त्याला हात चोळुन मग परत मसाज चालु करायचा..सुका सुका हात घेउन मसाज नाही करायचा....
नंतर हळुवार हात आणि मौ रुमाल युज करुन पिंपल्स काढुन टाकते.. जास्त पिंपल्स असतील तर बाजारात एक स्टील चं पिंपल रिमुव्हर मिळतं ते वापरायचं. आणी मग कडुनिंब + अंबेहळद + मुलतानी माती + चंदन चा फेसपॅक लावायचा. अर्ध्या तासाने चेहरा धुवायचा.
फेशियल मसाज करताना मसाज कसाही वेडावाकडा करु नये...आधी नीट गुगलुन बघा...तिथे फेशियल मसाज चे विडिओ असतात. ते बघुन घरी ट्राय मारा.
मला मसाज मावशीने शिकवला. तीने सांगितलं होतं कसाही मसाज केला तर स्किन चं नुकसान होउ शकते
बोटॉक्स वगैरेच्या भानगडीत न
बोटॉक्स वगैरेच्या भानगडीत न पडलेलं बरं. एक तर चेहरा खोटा दिसायला लागतो आणि कालांतरानं चेहरा तुकतुकीत आणि बाकी मान, हात सुरकुतलेले दिसत राहतात.
चाळीशीनंतर सुरकुत्या आल्या तर काय काळजी करायची? वय वाढणार तसं सगळेच म्हातारे होणार त्यातच आपण. तब्येत एकदम निरोगी ठेवा. खा, प्या, भटका, आनंदात रहा आणि आयुष्य एंजॉय करा. त्या सुरकुत्यांची काळजी करून आणखी लवकर म्हातार्या दिसायला लागाल.
आणि हो, age gracefully!
बोटॉक्स वगैरेच्या भानगडीत न
बोटॉक्स वगैरेच्या भानगडीत न पडलेलं बरं. एक तर चेहरा खोटा दिसायला लागतो>>>>>>>>>. अनुश्का शर्मा नॅचरली सुंदर असताना कशी होती आणि आता तीचा कसा डोनाल्ड डक झालाय ते आठवल उगाच मामी....
दुधात आंबेहळद उगळून लावायची .
दुधात आंबेहळद उगळून लावायची . महिन्याभरात चेहरा बघा कसा होतो ते. उगळूनच लावायची. पावडर नाही वापरायची . तसेच बाहेर जाताना केस आणि चेहरा झाकून जाईल असा स्कर्फ बांधायचा . pollution हे सुरकुत्या आणि केस गळण्याच सगळ्यात मोठं कारण आहे .
टॉमेटो, काकडी किंवा
टॉमेटो, काकडी किंवा ॲव्हॅकॅडो, पपई, कॅन्टीलूप वगैरची फोड चेहर्यावर फिरवली आणि १५ - २० मिनिटांनी धुवून टाकली तरी खूप फरक पडतो. स्वयंपाक करताना वरीलपैंकी जे काही आपण त्यावेळेस वापरत असू त्याचा वापर करावा :-). आणखी प्रभावी मार्ग म्हणजे कॅस्टर ऑईल (एरंडेल) आठवड्यातून दोन वेळा रात्री झोपताना लावणे.
कोणतेही उपाय करण्याआधी
कोणतेही उपाय करण्याआधी वापरणार असाल त्या गोष्टी आपल्या त्वचेला चालत आहेत ना हे चेक करा. फळांवर मारल्या जाणार्या पेस्टीसाईड्समुळे अश्या फळांच्या साली आपल्या त्वचेवर घासल्यास काहीवेळा त्वचा लाल होणे, पुरळ येणे असे प्रकार होऊ शकतात ( स्वानुभव
)
मोहना कॅस्टर ऑईल (एरंडेल)
मोहना
कॅस्टर ऑईल (एरंडेल) आठवड्यातून दोन वेळा रात्री झोपताना लावणे.>> चेहेर्याला मसाज करायचा?
आणि हो, age gracefully!>>>>>
आणि हो, age gracefully!>>>>> अगदी!
एज ग्रेसफुली! म्हणायला काहीच
एज ग्रेसफुली! म्हणायला काहीच हरकत नाही.
पण सुंदर आणि तरूण दिसण्याची इच्छा बर्याचदा फार प्रबळ असते.
आजकाल झालंय काय की तणाव आणि धावपळ यांनी आम्ही आमची आई या वयात दिसत होती त्यापेक्षा खूप म्हातार्या दिसतो.
वर नीधपच्या प्रतिसादात आहेत त्या सगळ्या गोष्टी म्हणजे योग्य आहार, व्यायाम, फळे, तणावरहित मन अत्यावश्यक आहेच.
याशिवायही चेहरा /शरीराची त्वचा सुंदर ,तुकतुकीत रहावी म्हणून काही गोष्टी करता येतील.
मूळात सुरकुत्या का येतात तर त्वचेची इलॅस्टिसिटी (तन्यता) कमी होते म्हणून.
म्हणजे काय होतं तर त्वचेची आर्द्रता कमी होते , कोलॅजेन हा इलॅस्टिक तंतू कमी होतो आणि सूर्यप्रकाशाचा अतिरिक्त त्रास होतो.
मग काय करावं
१. आर्द्रता वाढविणे-योग्य प्रमाणात पाणी पिणे. त्वचा ओलसर असतानाच एखादं आपल्याला सहन होणारं मॉईस्चरायजर लावणे,
अगदी वर लिहिलंय तसं कॅस्टर ऑईलही. रात्री झोपताना चेहरा नीट स्वच्छं करून मग मॉईस्चरायजर लावणे
२. कोलॅजेन वाढविणे- यात अनेक रासायनिक आणि नैसर्गिक घटक येतात.
पूर्वी अगदी डॉक्टरही असे मानत की बाहेरून काही लावल्याने त्वचेतलं कोलॅजेन वाढणार नाही.
पण आता काही अभ्यासानंतर बाहेरून लावलेल्या काही घटकांमुळे कोलॅजेन सिंथेसिस वाढते हे सिद्ध झाले आहे.
उदा. अल्फा हायड्रॉक्सीअॅसिडस, विटॅ ए, विटॅ सी इ.
यातले बरेच घटक वेगवेगळ्या फ्रूट फेशीयल्सनी मिळू शकतात.उदा. केळे, पपया, लिंबू, संत्र.
बाजारात मिळणार्या क्रिमांत हे घटक तसेच काही केमिकल्स असतात. ते आपल्या त्वचेला सहन होतात का पहा.
काहींत अगदी कोवळ्या प्राण्याना मारून मिळवलेले कोलॅजेन असते, ते तुमच्या एथिक्समध्ये बसते का तेही पहा.(माझ्या बसते)
३.सूर्यप्रकाशाचा जास्त त्रास टाळणे- योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळणे ही त्वचेची आणि शरीराची अत्यावश्यक गरज आहे.
अतिरिक्त सूर्यप्रकाश टाळण्यासाठी स्कार्फ, सनस्क्रीन वापरावे.
याखेरिज वरिल प्रतिसादात आलेले प्रदूषण टाळणे, आंबेहळद इ उपायही उपयुक्त आहेत्च.
मात्रं तशीच व्यावसायिक किंवा वैद्यकीय कारणे नसतील तर बोटॉक्स, फिलींग इ करू नये.
एकतर त्याचे साईड इफेक्ट असतात दुसरे म्हणजे त्याचा ठराविक कालावधी ओसरल्यावर चेहरा एकदम भयाण वाटतो.
ही एक मस्तं लिंक आहे. वाचा,
ही एक मस्तं लिंक आहे.
वाचा, आणि काही प्रश्नं असल्यास विचारा.
वेळ मिळताच उत्तरं देईन.
http://www.m.webmd.com/healthy-beauty/features/23-ways-to-reduce-wrinkles
आणि मोअर प्रॅक्टिकली- टवटवीत
आणि मोअर प्रॅक्टिकली-
टवटवीत चेहरा असणे ही डॉक्टर लोकांची व्यावसायिक गरज आहे आणि माझी व्यक्तिगत आवडही आहे.
त्यामुळे आहार, व्यायाम, कमी तणाव, योग्य झोप यांपैकी काहीच नसतानादेखिल चेहरा टिकवावा लागतो.
मला महिन्यातून एकदा स्वतःला ब्युटिशीयनच्या हवाली करून तासभर मोबाईल बंद करून पडून रहायला आवडते.
त्यात ती चेहर्यावर कायकाय थापून मसाज करते (ते ब्रँड मी सिलेक्ट केलेत पण इथे लिहिणार नाही-फुकटची जाहिरात)
त्याने पस्तिशीतही चेहरा बराच बरा आहे.
हो पटले. पण मला तेवढे कळत
हो पटले.
पण मला तेवढे कळत नाही आणि अॅन्टीरिंकल क्रीम्सबद्दल जरा भितीच वाटते.
वयापेक्षा लहान दिसायला मलाही आवडेलच की. अगदी ५-६ वर्षांपर्यंत मी वयापेक्षा लहानच दिसत होते. आता वयापेक्षा बरीच मोठी दिसते. त्याला कारण मधल्या काळात घडलेल्या घटना, ताण हे सगळं आहे. त्याचे तुम्ही काहीही करू शकत नाही.
बाकी आहार, व्यायाम हे एकवेळ तुम्ही मॅनेज कराल पण चाळीशीच्या आसपास तुम्ही करीअर-घर रिलेटेड ताणांमधून मोकळे झालेले असणे ही तशी रम्य कल्पना होईल. त्या तणावांचे काय करायचे?
टवटवीत दिसणे, फ्रेश दिसणे ही
टवटवीत दिसणे, फ्रेश दिसणे ही माझ्याही प्रोफेशनची गरज आहेच.
Im practicing as a
Im practicing as a cosmetologist doctor now.want to write many things about new cosmetic procedures but not able to write in marathi.
But i wud def suggest treatments like chemical peel,mda etc for clean n clear n young skin.they have beautiful results n as costly as facials.
अँटिरिंकल क्रीमविषयी
अँटिरिंकल क्रीमविषयी भिती-
मलाही वाटते.
म्हणून ओव्हर द काऊंटरपेक्षा स्कीन स्पेश्यालिस्टकडे जाऊन योग्य मेडिकेटेड अँटिरिंकल क्रीम घेऊ शकता.
कींवा सोप्यात सोपे. आपले ट्रॅदिशनल एज ओल्ड फ्रूट मसाज करावेत.
माझ्या मैत्रिणीला ओले चे
माझ्या मैत्रिणीला ओले चे क्रीम वापरून रॅश आली होती तीन दिवस तिचा चेहरा प्रचंड सुजला होता. पहिल्या दिवशी तर बिचारीला डोळे उघडून पाहायलाही त्रास होत होता.. सो कोणतीही क्रीम्स वापरण्यापूर्वी स्कीन स्पेशालिस्ट इत्यादींचा सल्ला घेणे किंवा कमीत कमी पॅच टेस्ट तरी करणे महत्वाचे आहे.
बोटॉक्स बद्दल मी अगदी
बोटॉक्स बद्दल मी अगदी गंंमतीने लिहीले होते. म्हणूनच किम कार्दाशिअन व तिच्या आईचा उल्लेख आहे. मी काहीच वापरत नाही. ओले ने पण रिअॅक्षन येते का? बापरे.
दुनियादारी सिनेमात शेव्टच्या काही सीन्स मध्ये श्रेयस व त्याची आई वर्षा उसगावकर यांचे चेहरे एकसारखे बत्थड सुरकुत्या विरहीत दिसतात ते बोटॉक्स मुळेच असेल असे वाट्ते. सिगरेट स्मोकिन्ग व त्याच्या धुरा च्या एक्स्पोजरने पण अकाली सुरकुत्या येतात. स्किनचा तजेलदार पणा पण मावळतो.
काहींत अगदी कोवळ्या प्राण्याना मारून मिळवलेले कोलॅजेन असते>> क्रुएला डेव्हिलच्या कोट सारखे.
मात्रं तशीच व्यावसायिक किंवा
मात्रं तशीच व्यावसायिक किंवा वैद्यकीय कारणे नसतील तर बोटॉक्स, फिलींग इ करू नये.>>> पुर्ण मान्य
आंबेहळदीचा उपाय नक्की करणार
माझा अनुभव पेप्टाइड असलेले
माझा अनुभव पेप्टाइड असलेले आन्टय रीन्कल क्रीम्स सेन्सेटीव्।अ स्कीन ला चालते.
माझा अशातला सन्शोधान . फरकही पडतो.
age gracefully! >> हे खरेच
age gracefully! >> हे खरेच
मला डोळ्याखाली जास्त सुरकुत्या जाणवतात. डार्क सर्कल्स पण आहेत. आता पतंजलीच्या अॅलोव्हिरा जेलने बराच फरक पडलाय.
रात्री झोपतांना बदाम तेलाने डोळ्याखाली हळूवार मसाज देते.
काही नॅचरल उपाय सांगा.
आता पतंजलीच्या अॅलोव्हिरा
आता पतंजलीच्या अॅलोव्हिरा जेलने बराच फरक पडलाय.
>>>
डार्क सर्कल्स वर?
डार्क सर्कल्स वर? >> हो, हळू
डार्क सर्कल्स वर? >> हो, हळू हळू इफेक्ट होतोय. पण होतोय
बरं झालं सांगितलंस...
बरं झालं सांगितलंस... माझ्याकडे आहे अलोवेरा जेल
त्यात दोन प्रकार आहेत रिया.
त्यात दोन प्रकार आहेत रिया. एक सोनेरी व दुसरे हिरवे. मी हिरवे वापरते.
हिरवंच आहे माझ्याकडे
हिरवंच आहे माझ्याकडे
गुड
गुड
Sunder disnyasati khup hasa,
Sunder disnyasati khup hasa, barbur pani pya, je je awadat te te kara
Smile pls
पतंजली anti rikal विषयी
पतंजली anti rikal विषयी कोणाला माहिती आहे का? वांग काळे डाग पण जातात म्हणे.
रोज भरपूर पाणी प्यावे व
रोज भरपूर पाणी प्यावे व आहारात फळे, सूप, ताजे ताक घ्यावे.
Me geli kityek varsh
Me geli kityek varsh sabanaevaji utane vaprat ahe. Khup faydeshir ahe.
Ajikadun aai ani aai kadun amhala milaleli bhet.
Ingredients have asatil tar nakki sangin. mail kara. ethe jahirat nako.
Tumacha email address deu
Tumacha email address deu shakata ka? Mala ingredients ani praman pahije aahe