गुगल वर मराठी टाईप करण्या संबधीत प्रश्न

Submitted by प्रिया.. on 19 September, 2014 - 06:52

गुगल होम पेज वर मराठी सिलेक्ट केल्यावर मराठी ऑप्शन न येता ईग्लिश येते. मराठी तुन काही शोध ताना अडचण येते याव र काही उपाय कोणाला माहित आहे का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवर मराठी टाईप करून ते कॉपी पेस्ट करून गूगलवर सर्च करता येते. मायबोलीवर मराठी टाईप करणे खुपच सोपे आहे. इतर वेबसाईटवर तेवढे सोपे वाटत नाही.. सवयीचा भागही आहेच यात.

हि साइट वाचनखुण म्हणुन साठवुन ठेव. एकीकडे टाइप करून कॉपी पेस्ट करून दुसरीकडे (गुगलवर) शोध घ्यायचा.
गुगलवर मराठीतुन शोध घ्यायला मी हि पध्दत वापरते. यापेक्षा सोप्पी पध्दत समजल्यास वापरायला आनंदच होईल.

मराठीतून टाईप करण्यासाठी मायबोली हून सोप्पी website आहे tamilcube.com. link खाली देत आहे. एकदा try करून पहाच. नक्की फरक जाणवेल. आशा करतो की मायबोली ने पण असा converter आणावा.

http://tamilcube.com/marathi/

Jar mobile varin type laraycha asel tar google hindi input ha keyboard download kara aani setting madhe jaun keyboard change karun tumhi type karu shakta

१. http://www.google.co.in/intl/mr/inputtools/try/ वर मराठीमध्ये आपल्याला काय शोधायचे आहे तो किवर्ड टाईप करा

२. https://www.google.co.in/ ला सर्च बॉक्स चा खाली "Google.co.in offered in: मराठी" वर क्लिक करा आणि मग मराठीमध्ये टाईप केलेला किवर्ड पेस्ट करा

http://tamilcube.com/marathi/ हे google transliteration सारखंच आहे. दोन्ही नवशिक्यांना चांगली. पण एकदा का कीबोर्डावर हात बसला की मायबोलीसारखं दुसरं काही नाही. तिथे प्रत्येक शब्द रोमन लिपीत टाइप केल्यावर आपल्याला हवा तो मराठी शब्द निवडावा लागणार. इथे आपण अक्षरंच टाइप करत जातो. इथे टाइप करायला आता तिथल्या तुलनेत कमी वेळ लागतो.

सर्वाना धन्यवाद.
आपण दिलेले पर्याय वापरून बघते. सध्या मी गुगल इनपुट टूल्स वापरते आहे. कॉपीपेस्ट करणेच चालू आहे .
पण आधी "Google.co.in offered in: मराठी" वर क्लिक केल्या नंतर मराठी टाइप केले असता खाली मराठी पर्याय (like word auto complete ) यायचे पण आता तसे येत नाहीत त्याऐवजी इंग्लिश पर्याय येतात. कॉपीपेस्ट करावे लागायचे नाही.
"Google.co.in offered in: मराठी" वर क्लिक केल्या नंतर direct मराठी पर्याय येण्यासाठी काही उपाय आहे का ? ते विचारायचे होते.

Back to top