Submitted by इब्लिस on 19 September, 2014 - 02:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मध्यम आकाराचे सफरचंद. कोअर काढून डाईस करून.
अर्धा चमचा तूप वा बटर
जिरे चिमूटभर
अर्धा इंच आलं किसून
तिखट, मीठ चवीप्रमाणे.
ग्रीन चिली सॉस ऑप्शनल.
क्रमवार पाककृती:
नॉनस्टिक फ्राईंग पॅनमधे बटर वा तूप-जिर्याची फोडणी तयार करा.
त्यात सफरचंदाच्या फोडी व आलं एकत्र घालून सॉटे करा.
दोन मिनिटं झाकण ठेवून सफरचंद मऊ पडलीत, की चिमूटभर तिखट मीट वा चमचाभर चिलीसॉस टाका.
पुन्हा थोडं परतून घ्या.
भाजी तय्यार!
वाढणी/प्रमाण:
एका माणसासाठी.
अधिक टिपा:
थोडं क्रीम टाकून अधिक शिजवलं, तर तिखट-आंबट-गोड अॅपल सॉस/चटणी होईल जी ब्रेडवर/पोळीवर लावून खायला छान लागेल.
माहितीचा स्रोत:
पेरूच्या भाजीवरून मला सुचलेली आयडिया.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा ! मी करणार !!
वा ! मी करणार !!
टमाटो महाग झाले म्हणून की
टमाटो महाग झाले म्हणून की काय?
इब्लिसभाऊ, आयडिया चांगली आहे,
इब्लिसभाऊ, आयडिया चांगली आहे, नक्कीच करुन खाण्यात येईल.
मस्त लागत असणार हे ईब्लिस,
मस्त लागत असणार हे ईब्लिस, माझा सफरचंदावर एक प्रयोग करून झालाय, मायबोलीवर एका धाग्यात १२ ऑगस्टला पोस्टलेही होते, तेच खाली कॉपीपेस्ट करतो
___________
रविवारी मी पुरी आणि सफरचंद खाल्ले ... अर्थात किडा म्हणून .. पण आश्चर्यचकितपणे पहिल्याच घासाला चांगले लागले, तसे प्रयोगात सुधारणा करत सफरचंद किसून त्यात गूळ मिसळला आणि तो किस पुरीमध्ये रोल करून खाल्ला.
अर्थात गोड रोल झाल्याने फक्त ३ पुर्याच खाता आल्या. पण जे खाल्ले ते अहाहा लाजवाब !!!
___________
छान
छान
संजीव कपूरला competition
संजीव कपूरला competition ?
भारीये
छाणे सध्या कामानिमित्त
छाणे
सध्या कामानिमित्त बेंगलुरू ला मुक्काम आहे ३ आठवडे. त्यानंतर घरी गेले की करून बघणार नक्की.
सफरचंदाची खीर पण मस्त लागते .
सफरचंदाची खीर पण मस्त लागते .
उपासाला चालू शकेल जर चिली सॉस
उपासाला चालू शकेल जर चिली सॉस बिस नाही वापरलं तर.
माबोवर संफरचंदाच्या झटपट
माबोवर संफरचंदाच्या झटपट लोणच्याची कृतीही उपलब्ध आहे. शिजलेल्या सफरचंदाची चव आवडत नसेल तर तो पाच मिनिटांत होणारा, चटपटीत आणि फ्रीजमध्ये २-३ दिवस आरामात टिकणारा तोंडी लावायचा पदार्थ आहे.
तोंफाडू रेसिपी आहे
तोंफाडू रेसिपी आहे
सफरचंदाचा सामोसा पण छान
सफरचंदाचा सामोसा पण छान लागतो, ट्राय केला आहे का कोणी?
माहेरी गेली का
माहेरी गेली का बायको?
सफरचंदाच्या भाजीवर आये कायको?
आत्तापर्यंत दोन रेस्पी वाचल्या तुमच्या दोन्ही छान होत्या.
सफरचंदाचे थालिपिठ पण २०१२
सफरचंदाचे थालिपिठ पण २०१२ च्या गणेशोत्सव स्पर्धे मधे अगोने दिलेले
सफरचंद पोटात जाण्यासाठी
सफरचंद पोटात जाण्यासाठी वेगवेगळे प्रकार हवेतच ,
अश्याने डॉक्टर हद्दपारच होतील !!
ग्रीन चीली सॉस वापरल्या बद्दल
ग्रीन चीली सॉस वापरल्या बद्दल णिशेढ.. आम्ही रेड वापरणार..
सफरचंदाचे थालिपिठ पण २०१२
सफरचंदाचे थालिपिठ पण २०१२ च्या गणेशोत्सव स्पर्धे मधे अगोने दिलेले>>>
म्हणुनच सफरचंदाचा सामोसापण उल्लेखलाय,
रच्याकने, सफरचंदासारखे उत्कृष्ट फळ, जे की निसर्गाने/देवाने (ज्याला जो पर्याय आवडेल्/पटेल तो घ्यावा) कमीत कमी कष्ट करुन खाण्यासाठी (साल न काढता, कमी बिया, न कापताही खाउ शकतो इ इ) बनवलेल आहे, त्याला शिजवुन त्याचा अपमान का करताहेत.
मस्त भाजी दिसतेय!
मस्त भाजी दिसतेय!
डॉ. कसे हद्दपार होतील ?
डॉ. कसे हद्दपार होतील ? शेवटी राम म्हणाल तेंव्हा सर्टिफिकेट मंदाबै जोशी देणार का ?
लगोबै, संमि म्हणजे 'संघ
लगोबै, संमि म्हणजे 'संघ मित्र' का?
बाप्रे! या रेस्पीला इतक्या
बाप्रे!
या रेस्पीला इतक्या प्रतिक्रिया येतील असे वाटले नव्हते. सर्व प्रतिसाददात्यांचे आभार!
*
पंखोबा,
शिजवून खाऊन पहा. वेगळी चव लै भारी लागते.
उदा. तुपावर फ्राय केलेली पिकलेली केळी खाल्लीत का कधी?
अश्याने डॉक्टर हद्दपारच होतील
अश्याने डॉक्टर हद्दपारच होतील !!
<<
"Medicine is the only profession that strives to eradicate the very cause of its own existence."
ओन्ली? रिअली? हाऊ अबाउट लॉ
ओन्ली? रिअली?
हाऊ अबाउट लॉ एन्फोर्समेन्ट?
उदा. तुपावर फ्राय केलेली
उदा. तुपावर फ्राय केलेली पिकलेली केळी खाल्लीत का कधी?>>>. राजाळी केळ्यांचा असा तुपावर परतून +साखर+ ओले खोबरे घालून केलेला हलवा मस्त लागतो.अहा!
स्वाती, लॉ
स्वाती, लॉ एन्फोर्समेंटवाल्याना शासन पैसे देतं.
डॉक्टर स्वतः पैसे मिळवत असतो.
अरे बापरे डॉक्टरांनी.
अरे बापरे डॉक्टरांनी. 'सफरचंदाची' भाजी टाकलीय.
भाजी मस्त दिसतीय. आमच येड (
भाजी मस्त दिसतीय.:स्मित: आमच येड ( मुलगी ) सफरचन्द खात नाही, पण भाज्या खाते, तेव्हा आता तिला करुन देईन. तसेही सफरचन्द आम्बट-गोडच छान लागते. तेला ऐवजी बटरचा पर्याय आवडला.