जीवनात टाळा आटापिटा लवकरात लवकर सद्गुरू चरण गाठा

Submitted by विनायक. दि.पत्की. on 29 December, 2013 - 10:35

(सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या दृष्टीक्षेपातुन )

मानवी जीवनात अन्न,वस्त्र,निवारा या मुलभूत गरजा मानल्या जातात पण त्या शिवाय एक अत्यंत महत्वाची गरज असते ती सद्गुरू चरणां पाशी आश्रयाची. ती आधी प्राप्त झाली कि काहीही मिळवायचे रहात नाहीच तसेच या शिवाय जीवनात काहीही खरे समाधान मिळत नाही हेही तितकेच खरे|

जन्मत:च जीव सर्वस्वी असमर्थ/असहाय/परावलंबी असतो.तो जीवन व्यवहाराचे ज्ञान तो हळूहळू अनेक व्यक्ती व अनुभव यातून गोळा करतो.व आपली विचार सारणी बनवतो.म्हणजेच गुरु करत असतो तद्वतच जीवनात जे आपण करणार ज्या मार्गाने जाणार तो बरोबर कि चूक हे ठरवणारे कोण ? कारण आपली वृत्ती मी बरोबर इतरांचे चूक अशीच असते. मग हि वृत्ती गेल्या शिवाय ,आपल्या चुका सुधारण्यासाठी व भविष्यात चुका टाळण्यासाठी कोणीतरी पाठीशी असल्या शिवाय आपल्याला आत्म विश्वास येणार नाही .आपले जीवन व पर्यायाने आपले अध्यात्म यशस्वी होणार नाही.म्हणजे अध्यात्मात जास्तीतजास्त उंची आपल्या परीने गाठल्याशिवाय आपल्याला संसारातून (स्वार्थातून) परमार्थ गाठता येणार नाही.माणूस हा शरीर +मन+आत्मा असा बनतो .त्यापैकी शरीर व मन याचे कल्याण विज्ञानाने होते त्याने संसार करावा मात्र आत्म्याचे कल्याण होण्यास अध्यात्मच आवशक आहे. तेव्हा याचे मार्गदर्शन फक्त सद्गुरुच करू शकतात. परलोक साधून देणार्‍याला सद्‍गुरु म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो, त्यालाच सद्‍गुरुकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.

प्रत्येकजण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो. परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का ? नाही. म्हणून, सांगायचे कारण असे की, जर आपण विषयांकरिता इतके झटतो, तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का ?

एखाद्या दारू बाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळते, पण वळत नाही. एकीकडे स्वतःला तो परमात्म्याचा अंश म्हणवितो, आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. खरोखर, भक्ती शिवाय सर्व काही वाया आहे. संता जवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते, ते न वाटू लागले, म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे. भगवंताची भक्ती घडायला गुरू सेवा हे एक मुख्य साधन आहे.

एका गावात एक वैद्य राहात होता. त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावरून समजत असे. त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले. वैद्याने त्या माणसाला सांगितले की, " तुला एक भारी रोग झाला आहे; पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन तसे पथ्य पाळ म्हणजे तुझा रोग बरा होईल." वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्या वैद्याचे काही नुकसान होते का ? त्या प्रमाणेच संत लोक जे आपल्याला करायला सांगतात, त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का ? आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो. ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्या करिता संतसंग करा आणि नामात रहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात.

शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य, आणि जो शिकवितो तो गुरू. मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरू करील. मी 'राम राम' म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरू कशाला हवा, असे काहीजण म्हणतात. 'मी' केले ही जाणीव आड येते, म्हणून सद्‍गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला ? अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंतांनी त्याला 'गुरू कर' म्हणून सांगितले.

अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते, आणि ते साधन गुरू सांगत असतात. म्हणून, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते. ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही. ते आपल्या जवळच असते; पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते. हेच काम सद्‌गुरू करीत असतात. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म, अवतार घेऊन वसुदेवाच्या पोटी आले. परंतु, वसुदेव त्यांना आपला मुलगाच समजत होते तोपर्यंत, प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही. तेच, नारदांनी जेव्हा सांगितले की, 'श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असे समजा म्हणजे तुमचे हित होईल, ' तेव्हा खरी ओळख पटली. तसेच, राम अवतारी असूनही, वसिष्ठांनी जेव्हा सांगितले की, 'तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, ' तेव्हाच त्याला ते ज्ञान झाले. आता हे जरी केवळ आपल्याला दाखविण्याकरिता असले, तरी त्याचा अर्थ हा की, गुरूने दाखविल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही. गुरू तरी काय सांगतात ? नामस्मरण हेच साधन म्हणून् ते सांगतात. ते (नामस्मरण)दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण असते; ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये. आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावे, म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो.

संत आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात. तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखविला. समर्थांनीही ती स्थिति सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले. आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही. म्हणून, ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदात राहतात, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे; म्हणजेच गुरुआज्ञेप्रमाणे वागावे. आपल्याला वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो, त्याप्रमाणे गुरुंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते.

.अपरिचित ठिकाणी जाताना जसा मार्ग विचारावा लागतो ,खात्री करून घ्यावी लागते म्हणून अनुग्रह घ्यावा. ज्ञानेश्वर, रामदास स्वामी सारखे सिद्ध अवतार झाले. पण त्याना देखील गुरू करावा लागला. मग आपल्याला गुरूची किती जरूरी असेल? आपण गुरुने सांगितलेले आचरण करत राहिल्यास आपणास वरचा पल्ला गाठता येतो. गुरू शिवाय कर्म करत राहिल्यास पदरी फळ पडत नाही.गुरू: साक्षात परब्रह्म असे आपण रोज म्हणतो, पण तसे वागत नाही. तेव्हा आपला परमार्थ केवळ बोलका नसावा, कृतीचा असावा! आपले कर्म करताना सद्गुरुणी दिलेले नाम निष्ठेने घ्यावे. ते नाम त्यानी आपले पुण्य कर्म आणी अध्यात्मिक शक्तीने सिद्ध केलेले असते! म्हणून कोणतेही कर्म करण्यापूर्वी ते मनोमन सद्गुरूच्या कानावर घालावे. त्यामुळे परिणामच्या सुख दुखची धार बोथट होईल!

पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे. मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच; निदान पाट्या तरी आढळतात. . जिथे दोन वाटा फुटतात तिथे एक पंढरपूरची आणि एक गोंदवल्याची पाटी असते, तसे साधनात राहून, जिथे त्या दोन वाटा फुटतात, तिथ पर्यंत या म्हणजे तिथे गुरू उभाच आहे. पण उगीच काही न करता 'पुढे काय आहे ?' हे विचारण्याने काय होणार ?
आम्ही परमार्थमार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार् ? परमार्थ मार्गावर गुरू खास भेटेलच. म्हणूनच रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागू या.

व्यवहारात सुद्धा आपल्याल गुरू करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरू नको असे म्हणून कसे चालेल ? प्रपंचात सुखदुःख झाले, सामाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील, अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरू करील. प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्यास प्रश्न.

सद्‍गुरूची कामगिरी कोणती ? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्‍गुरू सांगतात; आपले चुकते कुठे ते सद्‍गुरू सांगतात. सद्‍गुरू आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला ! सद्‍गुरू जागे करण्याचे काम करतात. मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले, त्याने सद्‍गुरू खरोखर केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तू गृहस्थ 'मी स्वस्थ आहे' असे म्हणतो, पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते तो पर्यंत तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार.

एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवीत होता. बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोट्या ‍इतक्या पाण्यात आणले, नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणले, नंतर आणखी पुढे आणले; आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले. त्या प्रमाणे आपले गुरू आपल्याला परमार्थ शिकवीत असतात. आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे.

एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती. 'ती काढण्याकरिता मी आत उडी मारतो,' असे तो म्हणू लागला. त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला, 'तू असे करू नकोस, आत पडून बुडून जाशील.' तरीपण तो ऐकेना, एवढ्यात त्याचा बाप तिथे आला. त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले, पण तो ऐकेना, मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले. आता, मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का ? "एकुलता एक मुलगा, नवस करून झालेला, त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते ?" असे म्हणाल का ? नाही ना ? तर मग गुरू करी काय करीत असतो ? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असते; म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकले, तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो. आपण तर चांगले शिकले-सवरलेले; त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर; तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरूने सांगितले, 'लग्न करू नकोस', तर आपण 'लग्न कधी होईल' म्हणून त्याच्या पाठीस लागत असतो. आणि शेवटी तर 'गुरूला समजतच नाही' असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते ! सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानीत असतो. पण अंतिम सुख काय, हे गुरूला कळत असते. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो. गुरु आपल्याला विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवितो. म्हणून, गुरु जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणाला तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा. आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळविण्यासाथे धडपड करतो, तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही.

आता हे पहा रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल, तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ 'गाडी माझी आहे' म्हणून ती मालकाला चालविता येणार नाही. साधी बैलगाडी सुद्धा चालविता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवितो, आणि खड्ड्यामध्ये पडतो. सद्‍गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे, मग कसलाच धोका उरणार नाही; आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार, अशी वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल.मनाची ही वृत्ती झाली की, जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल. असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळे होण्यासठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे.

आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील; पण गुरू हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला, तरी तो नाही असे समजू नका. तुम्ही दुश्चित्त झाला म्हणजे तोदुश्चित्त होतो. म्हणून तुम्ही केव्हांही दुश्चित्त होऊ नका

ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज, सद्‍गुरू त्याचे 'नाम' देऊन भागवितात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो, भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळते, आणि जन्माला आल्याचे सार्थक होते.गुरूवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नामघ्यावे.जय श्री राम

एकदा असे झाले, की एका साधूकडे चोरांनी चोरी केले. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. हे त्यांचे करणे गुरूला समजले, तेव्हा त्या चोरांना आणून, गुरूने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले, आणि त्यांना पंचपक्वान्नांचे भोजन दिले. हे असे काय करता ? म्हणून शिष्यांनी गुरूला विचारले, तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की, "तुम्ही तरी काय करता ? सर्वचजण देवाच्या घरी चोरी करीत आहेत; कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्याकरिता म्हणून दिला, परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोच की नाही ! म्हणून, विषयात आसक्ति न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ति करावी.
भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्‍न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्‍न चालू ठेवला तर सद्‌गुरूकृपा झाल्याशिवाय राहात नाही. अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्‌गुरूने सांगितले, आपण ते अट्टाहासाने करू लागलो, पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले, तर भगवंताचे प्रेम येणार कसे ? चारपाच वर्षे खूप कष्ट केले, विषय बाजूला ठेवले, पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो, तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते. जे काही होणार ते सद्‌गुरूच्याच इच्छेने, त्याच्याच प्रेरणेने होते, अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. साधनाचे प्रेम तो भगवंतच देतो, हे आपण विसरून जातो. आपण पूर्वी काही साधन करीत नव्हतो, ते आता करू लागलो, असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग ? सद्‌गुरूच्या पायावर एकदा डोके ठेवले की काहींचे काम होते, यात सद्‌गुरू पक्षपात करतात असे कसे म्हणता येईल ? आपलेच कुठेतरी चुकत असले पाहिजे याचा विचार करावा. आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत होते, परंतु घ्यायचे काही जमले नाही; ते आता घेऊ लागलो हे त्याच्या कृपेने घेऊ लागलो हे नाही का समजू ?

गुरूच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो, म्हणजे माझी इच्छा नाहीशी च नाही का झाली ? या मध्ये अभिमान अनायासे मारला जातो. मी पणा टाकल्या शिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत. गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपले डोके मधूनमधून वर काढतेच. पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही, की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्या पर्यंत मजल आली, तरी गुरु आज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला, गुरुआज्ञेप्रमाणे वागणे या परते दुसरे काय आहे ? 'मी देही नाही' असे म्हणत राहिला, तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल.

सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही; त्याप्रमाणे गुरूवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे. लाभ-हानी देव जाणे, जबाबदारी गुरूवर; आणि तोच हे साधन करवीत असल्याने कर्तेपणही त्याच्यावरच असणार. त्याच्याही पुढे म्हणजे, जे जे काही घडते ते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते, अशी दृढ भावना असली, म्हणजे कर्तेपण सोडून अजिबात मोकळे होता येते. असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते, ती त्याचीच सेवा होते. मुख्य गोष्ट ही की, परमात्मा आपल्या हृदयात आहे, आपण त्याच्यात आहोत, आपण तोच आहो, अशी दृढ भावना पाहिजे. याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली, तो पाहात असताना, आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे. यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न गळला, तरी आपल्या हातून वाईट कृत्ये तरी घडायची नाहीत.

काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली. त्यांना मराठी येत नव्हते. त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ हिंडली. त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाष्यावर पडली. तशी आपण दुभाष्याची म्हणजे सद्‍गुरूची संगत केली पाहिजे. तो म्हणेल तिथे जावे, तो सांगेल तसे करावे, मग परमात्मा मिळेलच. शास्त्रे आणि वेद अनंत आहेत; ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे ? सद्‍गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले, ते आपण करावे, म्हणजे भगवंताचेप्रेम लागेलच.. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते.जय श्री राम .
आपण गुरूने सांगितलेले साधन करीत जावे, म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो

(महाराज म्हणतात ...........व्यवहार करावा व्यवहारज्ञानाने । परमार्थ करावा गुरूआज्ञेने ॥
रामनाम जाणा अक्षरे दोन । गुरूमुखे करावी ओळखण ॥जय श्री राम
सद्‌गुरूसी झाला जो अनन्य । त्यास दुजें करणे नाही अन्य ॥
सद्‌गुरुआज्ञा प्रमाण । हेंच साधनांतील साधन जाण ॥
जो जो प्रसंग येईल जैसा । तो तो सान्निध्य जाणावे रघुपतीचा ॥
शरीर आहे दों देवसांचे । वायां न जाऊं द्यावें साचे ॥
रामकृपा त्याजसी होई । ज्यानें नांव ठेवले हृदयी ॥
मुखीं नाम, हृदयीं राम, । त्याने जोडला आत्माराम ॥
गुरुचरणी ठेवावा विश्वास । निर्भयता त्यानें येते खास ॥
तुम्हाला आता करण्याचेंच नाही काही । भाव ठेवा रामापायीं ॥
सद्‍गुरुआज्ञाप्रमाण । हेच साधनांतील साधन जाण ॥जय श्री राम )

काही लोक सर्व पटून सुद्धा अनुग्रह घेण्यास धजावत नाहीत कारण त्यांच्या अज्ञाना मुळेच त्यांच्या कल्पनाच विचित्र असतात.विशेष म्हणजे अनुग्रह म्हणजे बंधन असे ते मानतात व मुक्त रहाण्यासाठी अनुग्रह नको असा त्यांचा विचार असतो.ह्या लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे कि अनुग्रह काही बाजारात विकत मिळणारी वस्तू नाही .ती मिळण्यास महान भाग्यच लागते.पूर्व सुकृत चांगले असेल तरच अनुग्रह होतो .इतिहासात असे अनेक उदाहरणे आहेत कि महान सत्पुरुषांना देखील अनुग्रहासाठी अनेक खास्ता खाव्या लागलेल्या आहेत जिज्ञासूनी प.पु.ब्रम्हचैतन्य महाराज गोन्दावलेकर महाराजांचे चरित्र जरूर वाचावे थोडक्यात हे बंधन जरूर आहे पण प्रेमाचे बंधन आहे.गुरु तुम्हाला बंधन करण्यासाठी नसतात तर तुमची योग्यता वाढवून तुम्हाला त्यांच्या पेक्षा मोठे करावे या प्रेमळ उद्देशाचे असतात आणि आपल्याला जे अनावशक आहे ते टाळण्याकडेच त्यांचा कटाक्ष असतो आपण मात्र अज्ञानाने नको त्याच गोष्टी करून स्व:तची फसवणूक करून घेण्यातच स्व:तला धन्य मानण्याचा पराक्रम करत असतो.गुरुमाउलीचे एकच एक बंधन असते ते म्हणजे फक्त त्यांचे आज्ञा पालन. कारण गुरूच्या नकारात हि शिकवणच असते तर ज्ञान त्यांच्या चरण कमलात असते. आणि आज्ञा पाळणे अंगवळणी पडले पाहिजे त्याचा कधीच प्रश्न न वाटावा असी वागणूक झाली कि आपण सदशिष्य होतो. संत कर्माने जनकल्याण करतात. अन सद्गुरूच्या नुसत्या अस्तितवाने कल्याण होते. तेव्हा त्यांच्या अस्तित्वाचा भाव असावा! आपण सद्गुरुनी दिलेले नाम मनापासून घेतो, तेव्हा ते सत्तारुपाने आपल्या जवळ असतात आणि आपला प्रपंच, परमार्थ दोन्ही गोड करतात .त्यांची आठवण सार्वत्रिक ठेवणे म्हणजे सद्गुरूंचे होणे त्या शिवाय ते तुमचे होणार नाहीत. कुठेतरी आपली भावना चिकटवल्या शिवाय माणसाला समाधान नाही. ती इतरत्र न लावता सद्गुरू जवळ लावल्यास खरे समाधान मिळेल. अध्यात्म मार्ग पाहिल्यास हे माझ्या साठी आहे की नाही असे अनेकाना वाटते. पण सद्गुरुनी दिलेले नाम श्रद्धेने घेतल्यास सर्व साधते गुरु माउली असणे म्हणजे आईने मुलाचे बोट धरून चालवण्या सारखे होते. त्यामुळे वाट चुकण्याचा प्रश्नच येत नाही. आईचे प्रेम देहबुद्धीचे खरे, पण ते शुद्ध अन निस्वार्थी असते. तसे किंबहुना त्याहून अलौकिक असे प्रेम सद्गुरू जवळ मिळते म्हणून सद्गुरू म्हणजे असे काही कि जे सर्वस्वाची प्राप्ती करून घेउन फक्त तुम्हाला देण्यासाठीच असतात .त्यांना तुमच्याकडून काहीही अपेक्षा नसते म्हणून ते सुद्धा सद शिष्य शोधतच असतात

सद्गुरूंची भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे कारण ते नामस्मरणच आपल्याला सदगुरूची भेट करवून देईल. तसे पाहता आधी संताची भेट होणे कठीण; समजा भेट झाली तरी त्याच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते. म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे. खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळयांना आमंत्रण करावे लागत नाही ते आपोआप तिचा शोध काढीत येतात. तसे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील. खडीसाखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा. संतांना काय आवडते ? भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवत ठेवा. सदगुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील.

आपल्याजवळ राहणारे असे भगवंताचे नाम घ्यावे. तुम्ही नेहमी नाम घेत गेलात, तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता, संतच - अगदी हिमालयातले संत, तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील. तुम्ही म्हणाल, 'आम्हाला ते करता येत नाही.' पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो, आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला, तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही ? त्याला एखादी विद्या आली नाही, तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही ? आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही ? तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का ? तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरू प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहात असतो.

गुरूने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे, आणि तो करतो ही ही गोष्ट तितकीच सत्य आहे. पण आपण खरोखर सच्छिष्य आहोत की नाही हे पाहावे. देहातीत व्हायला, गुरूआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे ? 'मी देही नाही' असे म्हणत राहिलो तर केव्हातरी देहातीत होईन. दुसरा मार्ग म्हणजे 'भगवंत माझा' म्हणावे, म्हणजे देहाचा विसर पडतो. संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा.

(महाराज म्हणतात ----------नामांतच राहे समाधान । ही सद्‍गुरूची आहे खूण ॥
नामाचें चिंतन, भगवंताचें ध्यान, गुरुआज्ञा प्रमाण ।
तीच गुरुपुत्राची आहे खूण । नाहीं यावांचून दुसरें स्थान । जिथें राहे समाधान ॥
रामापायीं व्हावें लीन । याहून नाहीं दुसरें लिहिणें जाण ॥)

.पण त्यांची (गुरूंची) मात्र एक अट असते ती म्हणजे त्यांच्या साठी आपल्या अन्तकरणातील बिछाना सजवलेला असावा . हा बिछाना सत्संग/सद्ग्रंथ वाचन/ सद्वर्तन यानेच सजतो. मग एकदा का स्वामी विराजमान झाले कि आपले एकच काम उरते ते म्हणजे अनैतिक कृत्ये टाळणे व सद्गुरूंचे आज्ञा पालन.या वितिरिक्त काहीही बंधन नसते कारण सद्गुरुंच्या आज्ञेतच सर्व काही बंधने असतात ती आपल्याला हितकारक अशीच असतात.

आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्यच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरू आज्ञा करतो म्हणजे काय करतो ? तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्‍न करतो.
जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरूला भागच पडते. वास्तविक, गुरू मनात काही इच्छाच येऊ देत नाही; म्हणून कामधेनू पेक्षाही गुरू श्रेष्ठ आहे.

(महाराज म्हणतात ------ 'आमच्या हातून वारंवार चुका होतात' असे तुम्ही म्हणता.लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो, किंवा बोलताना बोबडे बोलतो. त्याचे आई बापांना कौतुकच वाटते, त्या प्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते. चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्‍नांचे ही तसेच कौतुक वाटते. म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणण्याचे कारण नाही. गुरूने एकदा सांगितले की, 'तुझे मागचे सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस,' तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे. आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते.)

गुरूने सांगितलाशिवाय जे जे साधन कराल, ते ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले, तरी ते व्यर्थ जातील. कारण, गुरू व्यतिरिक्त जी खटपट, ती फरशी उपयोगी नसते. गुरूने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते, म्हणजे गुरूला गौणपणा दिल्यासारखे झाले ! वास्तविक पाहता गुरू हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे, ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो, आणि गुरू सांगेल तेच साधन खरे वाटू लागते . गुरू तरी नाम हेच सत्य असे सांगतो, आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो . नाम हेच साधन आणि, होय तेच साध्य आहे हे अक्षरशः खरे आहे .गुरूने सांगितलेले साधन आपण पतिव्रते सारखे निष्ठेने जपले पाहिजे ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो, त्यानेच गुरुआज्ञा प्रमाण मानली असे होते, आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते.

गुरुआज्ञेप्रमाणे वागणार्‍याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते. तसे, गुरूचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणार्‍याला कसली नड असणार ? लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते, परिसापाशी सोने व्हायला रुप्याचे लोखंड व्हावे लागते; तसे, गुरूचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते, ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच होय. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवीत असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्यला बुडू देणार नाही, तसा आपल्याला सद्‍गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी.

( महाराज म्हणतात --------जे जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना. तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा. गुरुभक्ति करायची म्हणजे काय ? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरूची सेवा असे तुम्हाला वाटते का ? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरूचे खरी सेवाच होत नसते. गुरू सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा होय. माझ्याजवळ जे येतात, ते कुणी मुलगा मागतो, कुणी संपत्ती मागतो, कुणी रोग बरा व्हावा म्हणून मागतो; तेव्हां माझी सेवा करायला तुम्ही येता, का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता ? माझ्याजवळ येऊन, मनुष्यदेहाचे खरे सार्थक होईल असे करा. तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही; पण ते काढा घेण्याकरिता गुळाचा खडा देण्यासारखे आहे.)

गुरूने जे नामस्मरण करायला सांगितले असेल तेच करीत राहावे. आणि त्यातच त्याला पाहावे, म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागते. असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरू दिसू लागतो; चांगल्या दिवाणखान्यात असलो म्हणजे गुरू दिसतो आणि वाईट ठिकाणी असलो तर तो दिसत नाही असे नाही. सर्व ठिकाणी गुरुरूप दिसू लागल्यावर जगात वाईट असे काहीच राहात नाही, कारण मग वाईटाला जागाच राहात नाही. नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही तेच आहे. दुसर्‍या कुणीही काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नये. नामस्मरण हेच सत्य. त्यावर इतका विश्वास ठेवा, की त्याशिवाय जगातदुसरे काही नाही. एवढा विश्वास अंगी बाणल्यावर देव काही लांब नाही, तुमच्याजवळ आहे. प्रपंचावर जी आसक्ति करता ती तिथून काढून परमार्थावर ठेवा, म्हणजे परमार्थ कठीण नाही. गुरूला अनन्य शरण जाणे म्हणजेच आपला मीपणा नाहीसा करणे होय. मी पणा समूळ मेल्याशिवाय अनन्य शरण जाता येणार नाही. मीपणा हा गुरूने सांगितलेले नामस्मरण करीत राहिल्याने जातो. म्हणूनच सतत नामस्मरण करीत असावे.

भगवंताची सेवा एक परी सोपी आहे. पण गुरूची सेवा करणे फार कठीण आहे. नाथांनी खरी गुरूची सेवा केली. कल्याणांनी खरी गुरु सेवा केली. स्पष्ट सांगावयाचे म्हणजे खरा शिष्य मिळणेही कठीण गोष्ट आहे. देह बुद्धी नाहीशी झाल्या शिवाय पूर्ण गुरु सेवा घडत नाही, आणि गुरु सेवेत देह झीजल्या वाचून देह बुद्धी पूर्ण नष्ट होत नाही. '

प्रत्येक शरीराचे काही विशिष्ठ कंपने असतात व त्या नुसार त्या शरीरावर ह्या श्रुष्टीतील बऱ्या वाईट गोष्टी अवलंबून असतात त्यानुसारच स्वभाव,आवडीनिवडी ,अवलंबून असते. हे शास्त्र फक्त सद्गुरूंनाच कळत असल्याने त्याला अनुरूप असेच नाम /मंत्र ते देत असतात किंवा सदगुरु जे काही सांगतात ते आपल्या शरीराच्या कंपनाशी सुसंगत असल्यानेच त्यांच्या आज्ञा पाळणाऱ्यावर लगेच अपेक्षित परिणाम होण्यास सुरवात होत असते आणि या प्रवाहात आल्या नंतर खरे तर तेच सर्व करून घेत असतात.

नाम सदगुरूकडूनच घेणे जरूर आहे की ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतले तरी चालेल ?
............वास्तविक भगवंताचे नाम स्वत:सिध्द आहे आणि परिपूर्ण आहे; त्याला दुसर्‍या कुठून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही. म्हणून सदगुरूकडून घेतलेले नाम आणि आपण स्वत:च्या पसंतीने घेतलेले नाम ह्यांत फरक करता येत नाही. तरीसुध्दा सदगुरूकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्टय आहेच. ते असे की तो त्या नामाच्या पाठीशी सत्तारूपाने असतो आणि आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्याची आपल्याला फार मदत होते. त्यामुळे आपल्या हातून होत असलेले नामस्मरण त्याच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा तर्‍हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहात नाही. सदगुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्यानेत्याचा आत्मा तृप्त होतो. म्हणून सदगुरूकडून नाम घेणे जरूर आहे.आता अशा रीतीने सदगुरूने नाम दिल्यावर एखाद्याला असे वाटेल की मी 'राम राम' असे म्हणत होतोच आणि आता सदगुरूने तेच सांगितले तर मग यात काय मोठे झाले? पण यातच विशेष आहे कारण यात मी कर्ता हा अभिमान टाकावा लागतो. सदगुरूकडून नाम घेतले म्हणजे आपल्या कर्तेपणाच्या अभिमानाला वाव रहात नाही.
सद्‍गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तिने आणि एकग्रतेने घेतले, तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो, असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे. आपण तसे नाम घेतो का ? नामाकरिता नाम आपण घेतो का ? का मनात काही इच्छा, वासना ठेवून घेतो ? कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच; नाम म्हणजे देव आणि देव म्हणजेच नाम. एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच. मुले पतंग उडवितात, एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो. तरी तो पतंग उडविणारा म्हणतो, 'माझ्या हातात आहे पतंग.' कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला.
परमार्थ म्हणजे काय, हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर, आसक्ति सोडून प्रपंच करणे हे होय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले, म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे.

तेव्हा अनुग्रहित होण्या विषयी शंका बाळगू नका .व नंतर तर शंका बाळगण्याचे काहीही कारण नाही कारण त्यांचे आज्ञा पालन हेच आपले ध्येय आपण ठरवले असल्यामुळे उर्वरित जवाबदारी सांभाळण्यास तुम्हाला आज आहात त्यापेक्षा जास्त वैभव व समाधानात पहाण्यास ते समर्थ आहेत.त्यांचे नांवच समर्थ ,मग उशिर कशाला ? गुरुला सर्वस्व मानुन त्यांची आज्ञा पाळुन तर पहा त्यातच स्वर्ग सुख असल्याचा अनुभव आल्याशिवाय रहाणार नाही. अंधारात प्रकाशा सोबत चालताना जसे अंधाराचे अजीबात भय नसते तसे गुरुनी सांगितलेल्या अनुसंधानात रहिल्यास दुःखाचे भय वाटतच नसते.
सद्‌गुरु सांगेल तसे वागावे. त्यामुळे आपला अभिमान नाहीसा होतो. संतांचा थोडासा कटाक्ष जो कर्ममार्गावर आहे तो याचकरिता की, कर्म करण्याने अभिमान येतो, आणि त्याउलट, गुरुआज्ञेत वागल्याने तोच अभिमान नाहीसा होतो. इथे शंका वाटेल की, गुरू तरी नामस्मरण करायलाच सांगतात, म्हणजे कर्म आहेच ना ! वैद्याने एका रोग्याला सांगितले की तू काही खाऊ नकोस. त्याला वैद्याने औषधाच्या तीन पुड्या दिल्या, आणि त्या तीन वेळा घे म्हणून सांगितले. त्यावर तो रोगी म्हणाला, " तुम्ही काही खाऊ नको म्हणता, आणि या पुड्या घ्या म्हणून सांगता, हे कसे ? " त्यावर वैद्याने सांगितले, "पूर्वी जे अजीर्ण झाले आहे त्याचा नाश करण्यासाठी या पुड्या उपयोगी आहेत." त्याप्रमाणे, गुरू आपल्याला नामस्मरण करायला सांगतात ते पूर्वीचा विषयाचा अनुभव नष्ट करण्यासाठी. जो आपली विषयवासना कमी करून आपल्यामध्ये नामाचे प्रेम उत्पन्न करील तोच खरा सद्‌गुरू होय.

आपल्या गुरूने जे सांगितले ते सत्य मानावे. "या मार्गाने शंभर पावले गेलास तर खजिना सापडेल." असे गुरूने सांगितले, तर दुसऱ्या मार्गाने दोनशे पावले जरी गेला तरी त्याचा काय उपयोग ? "मला सगुण साक्षात्कार व्हावा" असे म्हणतो, पण प्रत्यक्ष बोलणारा चालणारा सदगुरू पाहून समाधान होत नाही तर परमात्म्याचे दर्शन करून देऊन काय उपयोग ?आंबा हवा असेल तर कोय पेरल्या शिवाय कुठला मिळणार ? सदगुरूने जे सांगितले त्या परते माझे काही हित आहे,हे मनातच येऊ नये.आपण खरोखरी सर्वस्वी त्याचे व्हावे.एका सदगुरूवचनावर विश्वास ठेवला म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टींचा मनावर परिणाम होत नाही.तुमचा परमार्थ ही तुमच्या स्वाधीन नाही; सद्‍गुरूच तो तुमच्या करिता करीत असतात; तेव्हा तुम्ही कशाची ही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानीत राहावे. सद्‍गुरुदर्शनाने पूर्वकर्मे, पापे, जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्‍गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये, समाधानात आणि आनंदात असावे. आपण आपल्या सद्‍गुरूचे आहोत असे छातीठोकपणे सांगत चला. काही नाही केलेत तरी चालेल, पण आपले सद्‍गुरू आपल्या मागेपुढे आहेत अशी दृढ भावना असावी.
गुरु कुणाला करावे ? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद कुठेही एकच असते. गुरूला कोठे आडनाव असते का ? गोंदवलेकर गोंदवल्यास राहात असतील, दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहात असेल. म्हणून लौकिक आडणाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्वकाळी अबाधित असेच असते. तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरू समजा, आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा; त्याच्या देहाकडे पाहू नका. तो लुळापांगळा आहे की काय, हे पाहू नका. तो देहाने कसाही असला, तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज, जिथून गुरुपद निर्माण झाले, त्याला असते. गुरुआज्ञा हाच परमार्थ; तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात, तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात, तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरूकडे जा. गुरू सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा.

कोणाचा अनुग्रह घ्यावा हा प्रश्न असल्यास इथे सुद्धा डोळे झाकून कोणाच्याही मागे जाऊ नये .जसे कि स्वामी विवेकानंद म्हणतात कि परमेश्वराने प्रत्येकालाच हात,पाय,डोके,बुद्धी,ई. जे काही दिले आहे ते सर्व तपासून पाहण्यासाठीच असते व स्व:तची फसगत होऊ नये म्हणूनच आहे त्यामुळे त्यांनी स्व:त त्यांचे गुरु प.पु.श्री रामकृष्ण परामहंसांची त्यांच्या दृष्टीकोनातून चाचपणी केली ती इतकी कि प.पु. रामकृष्णांची अखेरची घटका चालू असताना स्व:त त्यांना पुन्हा सांगावे लागले कि बाबा रे मीच तो राम आणि मीच तो कृष्ण हे ऐकून मात्र स्वामी मात्र चपापले कि माझ्या मनात सध्या चाललेले हे बिनचूक ओळखतात म्हणजे आता तरी मी चिकित्सा थांबवलीच पाहिजे असे म्हणून स्वामींनी
गुरुंच्या जवळ असलेल्या थुंकदाणीत साठलेला सर्व कफ एका घोटात पिऊन आपली निष्ठा सिद्ध केली म्हणून धन्य ते गुरु आणी शिष्य .

शिष्याच्या भावनाच गुरूला गुरुपद देतात. जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्‍गुरू उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरू. जे चिरकाल टिकते ते गुरुपद समजावे. खरोखर, सद्‍गुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरूने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन. संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे. पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्ये ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो, त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फळाची आशा आपोआपच सुटेल. आपले कर्तव्य कोणते ते सद्‍गुरू आपल्याला दाखवून देतात.

आता मला लवकरात लवकर अनुग्रह कसा मिळेल हा जर प्रश्न असेल तर उत्तर देखील तेवढेच सोपे आहे--
बुफे काऊन्टर --- एखाद्या समारंभात अनेक काऊन्टर असले तरी ज्या प्रमाणे सर्वत्र चव एकच,गोडी एकच, कारण ते सर्व अन्न तयार एकत्रच झालेले असते त्याच प्रमाणे गुरु तत्व हे एकच आहे ह्या प्रणालीत कुठल्याही सद्गुरूंचे शिष्य झालो म्हणजे एकच गोडी चाखावयास मिळते.म्हणून मनात द्वैत भाव न ठेवता गुरूस अन्यन्य भावाने समर्पित व्हावे. किंवा अशा मोठ्या समारंभाच्या ठिकाणी अनेक लोकांना पाण्याची व्यवस्था जशी एकाच टाकीतून फक्त अनेक तोटया लावून केलेली असते ती एकाच ठिकाणी गर्दी होऊन लोकांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून व सर्वांना सोईचे व्हावे म्हणूनच तसेच गुरुंचे आहे गुरु हे तत्व इथून तिथून एकच फक्त सर्वांना उपलब्ध व्हावे म्हणून ते वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळ्या ठिकाणी अवतरत असतात. इथे फक्त एकाच सावधानता पाळली पाहिजे ती म्हणजे जे गुरु परंपरेतील आहेत त्यांचाच अनुग्रह घ्यावा ,हि परंपरा भगवान शंकरापासून सुरु होते. जिज्ञासूनी गुरुचरीत्रातून याची खात्री जरूर करून घ्यावी .विद्वान सर्वत्र पूज्यते यासाठी सर्वानी ज्ञानी व्हावे हीच सदिच्छा असल्याने सर्वांनी मन:पूर्वक प्रयत्नास लागावे ,कसूर नको.प्रपंचात कर्तव्य पालन ,वृत्तीचा संयम ,सद्गुरुंशी अन्यन्य शरणागती हेच परमेश्वर प्राप्तीचे (साधनेचे )सुलभ व खात्रीशीर साधन आहे.त्रेतायुगाचे चालक मालक ,पालक,श्री विष्णू /सत्य युगाचे श्रीराम /द्वापारयुगा चे श्री कृष्ण /तर कलियुगाचे श्री स्वामी समर्थ म्हणजेच गुरु महाराज आहेत. तेव्हा आपल्याला कोणी गुरु भेटले नाहीत म्हणून दु;खी कष्टी न होता मनोमन त्यांची प्रार्थना सुरु करावी त्यांचा ध्यास धरावा कि जे कोणी परम पुरुष माझे गुरु आहेत त्यांनी यावे व मला दर्शन द्यावे व मला अनुग्रहित करून घ्यावे .हि तळमळ का एकदा सुरु झाली कि गुरु आपल्या सनीध्य आल्याशिवाय राहणार नाहीत. अंतकरणापासून आपल्या गुरूस हाक मारावी म्हणजे ते निश्चित येतील व कल्याण करतीलच.

एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरू कल्पिला, तो सांगेल तेच साधन मानावे. गुरू देहातच असावा हे मानणे चूक आहे. गुरू हे देहात कधीच नसतात. गुरू प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे. अशी भावना ठेवून वागले, म्हणजे गुरू कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते. गुरू सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे. तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरू नामाशिवाय दुसरे काय सांगणार ? त्यातच आपण सदा राहावे. जो खरा साधनात राहतो, त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरूला अनन्यशरण जाऊन, तोच सर्व करतो आहे हे मानून, जे होईल त्यात आनंद मानीत जावा. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरूला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. श्रीरामचंद्राची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला; आणि ते साहजिकच आहे. एकच देव, एकच साधन, आणि एकच गुरू मानला, त्याचप्रमाणे, आपण एका नामात राहण्याचा प्रयत्‍न करावा. मुलगा हसतखेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो; याच्या उलट, मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतामध्ये फरक आहे.

सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते. सरकारच्या हातात सर्व सत्ता असते, आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरिता एकेका खात्यकडे एकेक कामगिरी सोपविलेली असते. कायद्याला धरून जोपर्यंत ते खाते आपले काम करीत असते, तोपर्यंत सरकार त्यात ढवळाढवळ करीत नाही. फक्त क्वचित् प्रसंगी आणि विशेष कारणामुळेच, हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करते, आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते. तोच नियम इथेही लागू आहे. प्रापंचिक बाबतीत 'प्रारब्ध' हे एक खाते आहे, त्याचा संबंध देहापुरताच असतो. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्यावाईट गोष्टी भोगाव्या लागतत. सत्पुरुष होता होईल त्यांत ढवळाढवळ करीत नाही. फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरिताच जर जरूर असेल, तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करील. पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते. आपण मात्र त्याने सांगितलेला साधनात राहून, त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागणे जरूर असते. हा अडथळा अनेक प्रकारचा असतो. एक म्हणजे, त्याने सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणे; दुसरे, दुसऱ्याला अमुक एक दिवसात साधले, मला अजून का साधत नाही, असा विचार मनात येणे; आणि तिसरे, सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्‍न करणे. थोडक्यात म्हणजे, एकदा संताच्या पायावर डोके ठेवल्यावर, आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपवून, प्रपंचत घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडताहेत अशी भावना ठेवून, आपले कर्तव्य करीत, त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहणे, हाच खरा मार्ग आहे.
व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता, त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे; म्हणजे देहभाव आपोआप नष्ट हो‍ऊन जाईल. हे सर्व साधायला, परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपा मार्ग आहे; आणि त्याकरिता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे. कोणी बारा अन बारा चोवीस वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात, आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात; तेव्हा अशा लोकांतच अर्थ नसतो, की गुरूत काही नसते ? तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईलका ? त्या प्रमाणे , विषय बरोबर घेऊन गुरूकडे गेलो, तर गुरूची खरी भेट होईल का ? ती शक्य नाही. या करिता, ते(गुरु) सांगतील ते साधन आधी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते, आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्या जवळ खरे समाधान मागावे. आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते ? मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहात नाही, आणि मग त्याला कंटाळण्याचे ही कारण उरत नाही.

गुरुवर्या अजून किती लांब आहात? हा प्रश्न सतत त्यांना विचारीत राहिले म्हणजे आपोआप आपल्यातील अंतर निश्चितच कमी व्हावयास सुरुवात होईल.
माझे आयुष्य किती ते मला माहित नाही .माझा जन्म कोणत्या कार्यास्तव झाला हेही मला माहित नाही .मी कोण ? कुठला? हेही माहित नाही.मला कोठे पोहचायचे आहे ? त्यासाठी कोठून सुरुवात करावी ?कशी करावी ?माझी पात्रता ती काय ? मी कसे वर्तावे ते मला समजत नाही .मनातील सर्व प्रश्नांचे समर्पक उत्तरे मी कोठे शोधावीत? आज मज जवळ प्रचंड अज्ञान आहे हीच माझी ओळख असल्याने जगाच्या दृष्टीने मी तुच्छ झालो आहे .मला सन्मानाने ,स्वाभिमानाने जगण्याचा काही मार्ग कोण दाखवेल?माझ्या अज्ञानामुळे मी प्रचंड घाबरलो आहे .त्यामुळे मी तणावपूर्ण मानसिकतेमध्ये जगत आहे .हे हालाखीचे जीवन जगत असल्याने मी आज जे माझ्या अल्प बुद्धीनुसार कार्य करत आहे ते योग्य किती ? अयोग्य किती ?अयोग्य कार्यापासून मी मुक्तता कशी मिळवावी म्हणजे मला तुम्ही दिलेल्या जीवनाचा सदुपयोग करता येईल ? देहाचा सदुपयोग मला ठाऊक नाही ...गुरुवर्या अजून का येत नाहीत तुम्ही निष्ठुर तर जरूर नाहीत मग माझा अपराध तो काय ? जन्म मरण माझे हाती नाही मग ह्या हाल अपेष्ठांचा अंत कधी होईल .मी पापी आहे म्हणून तुम्ही येत नाही का? पण पाप करताना मला तशी बुद्धी का होते? मला जर याचे ज्ञान असते तर मी केले नसते हे मला आता कळून चुकले आहे तुम्ही लेकराचा हा अपराध क्षमा करू शकत नाहीत काय? मी एवढा टाकाऊ आहे का मग हे जीवन घेऊन तरी काय करू . माझ्या मनाचा गोंधळ आता मला असह्य होत आहे .हि मनाची द्वैत अवस्था कशी थांबवू ?तुम्ही कोठे आहात मी तुम्हाला कोठे शोधू ? मला तर तुम्ही जवळ असलात तरी दिसणार नाहीत कारण मला तुमची ओळखच झाली नाही . लोभामुळे माझी मन शांती होत नाही. मला आनंदात सतत राहावे तर वाटते पण खरा आनंद म्हणजे काय? तो कोठे मिळेल ? त्याच्या शोध कसा घ्यावा ? कुठवर घ्यावा. आणि शेवटी आता असे वाटू लागले आहे कि या देह रुपी रथाच्या घोड्याचे लगाम कोणा तरी सर्व सामर्थ्यवान चालकाच्या हाती सोपवल्या शिवाय हा रथ समर्थपणे मार्गक्रमण करणार नाही .असे व या शिवाय अनेक प्रश्नांचे काहूर मनात उठल्या शिवाय खरा आनंद काय ते समजत नाही तेव्हा एकाला आनंदाचे कारण विचारले. तो म्हणतो, आता मला आनंदाशिवाय काही उरलेच नाही. कारण मी आणि माझे गुरु यातील अंतर कमी झाले मला एकदाचे गुरू भेटले! ही खरी गुरुभेट! ! ! श्री राम .........श्री राम..............श्री राम................|||
त्यामुळे गुरु केला असे न म्हणता मी शिष्य झालो हे वाटणे जास्त संयुक्तिक आहे. मी जर स्वत:ला सद्गुरूचा शिष्य म्हणवितो , तर त्याना आवडते तसे मी वागले पाहिजे. आणि त्याना नाम आणि सदाचार फार आवडतो!
जिथे तुम्ही राहता तिथे सद्‌गुरु आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते, हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितलेल्या प्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरू म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे.

संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरू कसे म्हणावे ? जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो. संताची परिक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो. सर्वांभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संताची खरी ओळख होईल. संताच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो, त्यावरून आपण संताची परिक्षा करावी. माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संताची खरी जागा म्हणता येईल. ज्याला भगवत्प्राप्तीची तळमळ लागली आहे, त्यालाच शिष्य म्हणावे. जो गुरू‍आज्ञेबाहेर जात नाही, आणि गुरू हेच भगवंतप्राप्तीचे साधन मानतो, तो सच्छिष्य होय. गुरूपरता देवधर्मच नाही मानू.

एक जण एका संताकडे नेहमी दर्शनाला येत असे. तिथे इतर मंडळी ही पुष्कळ असत, पण तो कुणाशी ही बोलत नसे, कुणी काही विचारले तर उत्तर देत नसे, सदा मुद्रा खिन्न असे. कुणालाही त्याच्याशी बोलावे असे वाटत नसे. असे काही दिवस गेले. पुढे एके दिवशी ते सद्‍गुरु म्हणाले, "माझा तो वेडा कुठे आहे ? तो आज का आला नाही ?" हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारू लागला, आणि जो तिथून निघाला तो पुनः आलाच नाही ! तो कशाला येईल ? गुरूने एकदा आपल्याला 'आपले' म्हणावे हेच शिष्याला मिळवायचे असते. ते त्या गृहस्थाने ओळखले, आणि म्हणून त्याचे काम झाले. गुरू तुम्हाला 'तुम्ही माझे झाला' असे म्हणत असताना सुद्धा तुम्ही ते ओळखत नाही, कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता, आणि विषयाची प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो. या ‍उलट, गुरू तुम्हाला निवृत्ती देतात. निवृत्ती दिल्या वर विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते. जसे तहान लागल्यावर पाणी हवेसे वाटते, पण तेच पाणी पोटभर प्यायल्यावर नकोसे वाटते, म्हणजे त्याची निवृत्ती होते. आपलाया वर आज विश्वास बसायचा नाही; पण हा विश्वास बसायला भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. नामाने ते कार्य होते, म्हणून नामस्मरण करीत जावे. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते.
. एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलांची पत्रे येत असत. तो पत्र वाची आणि देव्हाऱ्यात ठेवून देई. दुसरे पत्र आले की ते वाची, आणि मागले पत्र काढून टकी. एकदा वडिलांनी पंचवीस रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवले. नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, "तुला तुझा वडिलांचे पत्र मिळाले का ?" त्यावर तो म्हणाला "हो." त्यावर त्या गृहस्थाने विचारले, "अरे, मग पैसे का पाठविले नाहीस वडिलांना ?" त्यावर तो म्हणाला, "तेवढेच राहिले बघा !" तसे आपले होते. आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, परंतु सद्‍गुरूने सांगितलेले तेवढे करीत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता, उलट अहंपणा वाढवायलाच मदत करतात. म्हणून सद्‍गुरूने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे, संशयरहित होऊन करावे. त्याकरिता व्यवहार सोडण्याची जरून नाही. आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारात गुंतू नये. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असते. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो, आणि योग्य वाटेल तेथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणे. त्याप्रमाणे, आपले सर्व जीवन एकदा सद्‍गुरूच्या ताब्यात दिल्यावर, तो सांगेल त्याप्रमाणे वागणे हेच आपले कर्तव्य ठरते.

(महाराज म्हणतात -------मी म्हणजे अमुक एक, अशी आपल्या अस्तित्वा विषयी जशी खात्री असते, तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्‌गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली, म्हणजे आपल्या सद्‍गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देह बुद्धीची केली, तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले. वास्तविक, माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वांभूती भगवद्‍भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे ).

क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिले नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत ! 'काशी', 'गंगा', असे म्हटले म्हणजे पवित्रतेचे संस्कार मनात उभे राहतात, पण तिथल्या राहणार्‍या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षावर्षात स्नानासही जात नाहीत. यावरून, त्यांना ते क्षेत्र असे वाटतच नाही असे दिसते. क्षेत्र हे आपल्या भावनेनेच नाही का निर्माण होत ? मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार ? याला अर्थातच दृढभाव असायला पाहिजे. तितका तो दृढ होत नसेल, तर क्षेत्रात जावे; आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल, तर 'काशीस जावे नित्य वदावे;' म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे, म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्‌भूत होऊन मन पवित्र होईल. देव सर्वत्र भरलेला आहे, पण तो भावाने प्रकट केला पाहिजे. प्रह्लाद, द्रौपदी यांना अगदी खात्री होती की देव आपला साह्यकारी आहे, तेव्हा देवाला प्रकट होणेच भाग पडले. सद्‌गुरू मला साहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे, म्हणजे त्यांना साहाय्य करावेच लागते. याचा अनुभव घेणे हे तुमच्याच हाती नाही का ?

.अनुग्रह लवकरात लवकर होण्या साठी “ओम नमो भगवते वासुदेवाय” हा मंत्र जपावा त्याने निश्चितच आपले गुरु जवळ येतात .ज्याला वेळीच गुरु भेटले त्याच्या आयुष्याचे कल्याण झाले .ज्याने आपल्या गुरूचा शोध च घेण्याचे ठरवले नाही त्याचे आयुष्य मात्र दिशा हिन च राहते. .त्यांची आठवण सार्वत्रिक ठेवणे म्हणजे सद्गुरूंचे होणे त्या शिवाय ते तुमचे होणार नाहीत. आपल्या सद्गुरुनी दिलेली नामसाधना , उपासना निष्ठेने करत राहिल्यास आपला प्रपंच आणि परमार्थ त्यांच्या सत्ते ने सुखकर होईल. सद्गुरुकडे जाऊन काय शिकावे? तर मी पणा जाळणे आणि ईश्वर प्रप्तीची तळमळ शिकायला पाहिजे. आणि हे गुरूनी दिलेल्या नामाने साधते. सद्गुरू आपला मी पणा घालवतात.
कुठला तरी भोग भोगणे आहेच .तेव्हा किमान आपल्या पेक्षा जास्त वाइट भोग भोगणाऱ्या कडे पाहुन तरी भोग आनंदाने भोगावा तेथेच गुरूंचे अधिष्ठान असते .ते कोठे हि असले तरी ते आपली शक्ती ,प्रेरणा,शिष्यात घालून त्याला साधनेत पुढे नेतात .ते सर्व शक्तिमान असल्याने शिष्य कोठेही असला तरी सद्गुरु कृपा शक्तीचा प्रवाह त्याच्या पर्यंत पोह्चतोच व देह बुद्धी क्षीण करतो . आपल्या साधनेत झपाट्याने वाढ झाल्यास आपणास ती सहन होणार नाही. म्हणून होईल तेवढेच गुरू करून घेतात. त्यात समाधान मानावे.
(महाराज म्हणतात ------- 'मला सर्व कळते' असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच. कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यलाच कळेल की, मला सर्व कळते आहे. गुरूला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की, त्याचे मन आणि आपले मन एकच झाले पाहिजे. म्हणजे दैववशात जरी आपण गुरूपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू. आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे, आपले सर्व दुःख मला संगत जावे. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हांला मिळायचे नाही; ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे. ज्याला मी भेटावा असे वाटते, जो माझा म्हणवितो, त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे.

परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखविला त्यानेच जावे. मध्येच दुसरा मार्ग घेतला, तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले, तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसाला सोडीत नाही ही गोष्ट निराळी. ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले, त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरूवर सोपवून तुम्ही मोकळे झाला, गुरुआज्ञेशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही. पण तुम्हाला असे वाटते कुठे ?)

माझ्या गुरूंना आवडणाऱ्या गोष्टी मी खालील प्रमाणात आमलात आणाव्यात
१)सत्संग-सतत सत्पुरुषांची चरित्रे वाचणे/व त्यावरच बोलणे/ भगवत भक्त जोडत जाणे/सद्ग्रंथ वाचत जाणे
२)अन्नदान- घरात अन्न धान्य साठा करताना मला जास्तीत जास्त अन्नदान घडो या भावनेने साठा करावा ३)नामस्मरण-जेंव्हा अति आनंद होतो तेव्हा सुरु झालेले नामस्मरण दु:खी कष्टी झाल्यावरही चालू ठेवण्यास शिकणे (कारण मनाच्या दोन वितिरिक्त ३रि अवस्था असू शकत नाही) या उद्देशाचे सतत भान असणे.काही लोक वेळ जात नाही अशी तक्रार करतात मात्र त्यांना जर नामस्मरण करत असावे असे सांगितले तर ते म्हणतात कि लोक मला म्हणतील कि हा ढोंग करतोय त्या मुळे दुसरे काही तरी सांगा .तेव्हा लोक काय म्हणतील या पेक्षा महत्वाचे असते ते देव काय म्हणेल म्हणजे नामस्मरणाची मनाला सवय नसते ती गाण्याच्या चालीवर का होईना पण सुरवात करून लावून घ्यावी लागते.व चालताना,काम करताना,कधी हि रिकामे न रहाण्याचा संकल्प करावा म्हणजे नामस्मरण आपोआप होण्याची योग्यता येईल व आज्ञा पालन होईल.
येथे एक कटू सत्य मात्र लक्षात ठेवावे कि परमेश्वर रागावला तर गुरु वाचवू शकतात ,परंतु गुरु कोपले तर मात्र कोणीही वाचवू शकत नाही
व्यास पूजन किंवा गुरु पूजन पारंपारिक पद्धतीने ---एका पाटावर तांदूळ पसरून त्यावर सुपाऱ्या मांडून महर्षी वेद व्यास व श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा त्यावर स्थापन करून संकल्प सोडून षोडशोपचारे त्यांची पूजा करतात त्या बरोबर अन्य देवतांची सुद्धा पूजा करतात .व निवसंतु सुखेतात्र गमी व्यास कृतार्थताम | यथा शक्तींच शुश्रुषा करिष्याम:वय मुदा| याचा अर्थ आपण या ठिकाणी सुखाने राहावे म्हणजे आम्ही धन्य पावलो याच प्रमाणे आम्ही आपली यथा शक्ती प्रफुल्लित अंतकरणाने सेवा करू तिचा स्वीकार व्हावा तसेच व्यास पौर्णिमेला हित शत्रुंचेही स्मरण केले जाते कारण त्यांच्या मुळे च या नश्वर जगातील अनिष्टांची ओळख होते व आपल्याला मानसिक क्लेश सहन करण्याची ताकद येते .वेद व्यास हे आद्य शंकराचार्यांचे स्वरूप मानले जातात म्हणूनच ज्यांनी सर्व भौतिक सुखाचा त्याग केला आहे.असे सर्व सन्यासी देखील हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात गुरु हा ब्रम्हदेवा प्रमाणे सद गुणांचा निर्माता ,विष्णू प्रमाणे सत प्रवृत्ताचा कारक व महेशा प्रमाणे सर्व दुर्गुणांचा /दुप्रवृत्तीचा विनाश करणारा असा असतो.तो परब्रम्ह स्वरूप असून जीव शिवाचे मिलन घडवून आणणारा असतो .गुरु सानिध्याने शिष्याची वृत्ती ग्रहण शील बनते .गुरूच्या सहस्त्र तेजस्वी सूर्या प्रमाणे तेजोमय विचारांचा ज्ञानाचा संवेदनशील शिष्यावर ,त्याच्या मनावर ,हृदयावर संक्रमण होते व त्याची बुद्धी विकसित होऊन सुसंस्काराचे त्याच्यावर रोपण होते.त्याचा मुळे गुरु व शिष्य दोघे हि प्रारंभी तेजस्वी नावधीत मस्तु म्हणजे आमची ज्ञानदानाची व ज्ञानार्जनाची प्रक्रिया तेजोमय होवो अशी प्रार्थना करतात .गुरु जवळ बसून शिष्य नम्रता जिज्ञासा ,ज्ञानसाधना व सेवा या गुणांचा अंगीकार करतो .गुरु म्हणजे ज्ञानाचा सूर्य ,प्रेमाचा महासागर व हिमालया एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व या दिव्याच्या तेजाची पूजा म्हणजे गुरु पूजन होय ब्रम्हानंदम परम सुखदम केवलं ज्ञानमूर्ती |व्दव्दातीत गगन सदृश्य तत्वमस्या दिलक्षम||एक नित्य विमलमचल सर्व धी साक्षी भूतं |भावातीत त्रिगुण रहित सद्गुरुंत नमामि || याचा अर्थच परब्रम्ह स्वरूप अत्यंत सुखद केवळ ज्ञानमूर्ती ,इंद्रासारखा शूर ,आकाशासारखा निर्लेप ,व सूक्ष्म तत्वमसी हेच ज्याचे लक्षण आहे अद्वितीयनित्य,विमल,अचल,त्रिगुण रहित, अशा तेजोनिधी सद्गुरूंना माझा नमस्कार असो जय श्री राम.

कर्ता गुरु-श्रीराम,वात्सल्य गुरु –श्रीजगदंबा गायत्री माता ,करविता गुरु-श्री दत्तात्रय ,रक्षक गुरु-श्री हनुमान तर दिगदर्शक-गुरु श्री साईनाथ
श्री गुरुंचे स्वागत (मानस पूजेने)
सर्वच पूजे मध्ये मानस पूजा श्रेष्ठ असल्याने मानस पूजेमध्ये खालील भाव मनात आणून त्यांचे पूजन करावे याला कुठलाही खर्च नाही .
आज श्री गुरु माझ्या घरी आले आहेत .पपई खडावा ,हातात दंड,आणि चेहऱ्यावर बाल सूर्याचे तेज असलेले माझे गुरुवर्य आज माझ्या घरी आले आहेत.ज्यांच्या मस्तकावर सुशोभित जटा आहेत.कपाळावर कस्तुरी चंदन मिश्रीत तिलक लावलेला आहे त्यामुळे त्यांचे विस्तीर्ण असे मुख कमल अतिशय देदीप्यमान दिसत आहे.असे गुरुवर्य आज माझ्या घरी आले.ज्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असून काखेला त्र्यिलोक्याचे रक्षण करणारी झोळी तर कासेला उपवस्त्र अशा रूपातील माझे गुरुवर्य आज माझ्या घरी आले आहेत.
कृष्णा नदीच्या तटाजवळील कुरु व्दिपात वास्तव्य असणारे परमपुरुष श्रीपाद योगी असे माझे गुरुवर्य आज माझ्या घरी आले आहेत माझे गुरुवर्य भक्त कल्प द्रुम आणि पूर्ण सचीतानंद दत्त दिगंबर असून जी गुरु परंपरा भगवान शंकरा पासून सुरु झाली आहे ते गुरुवर्य आज माझ्या घरी आलेआहेत.
अशा प्रकारच्या उत्कृष्ठ मानस पूजेने गुरुवर्य निश्चितच प्रसन्न होतील मग ............
स्वामी चरण जेथे , न्युन काय तेथे? समाधानाने रहावे . -------जेथे सद्गुरूंचे चरण असतात तेथे ज्ञान असते .त्या ज्ञानामुळे तेथे अज्ञान फिरकत नसते .म्हणून त्या सोबत तेथे इडा पिडा व्याधी वास करत नाहीत .असलेले देहाचे भोग भोगण्यास प्रचंड ताकद मिळत असल्याने त्या भोगाचे हि कौतुकच वाटत असते .जीवनाचा खरा उद्देश कळलेला असल्यामुळे लाभ-हानी ,मान-अपमान,सुख-दु:ख, याची तमा नसते ,कुठलीही काळजी नसते कारण “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे “ अशी खणखणीत साद त्याच्या कानात सतत गुंजत असल्याने प्रचंड निर्भयता येते .सत्कर्म टाळू म्हटले तरी टळत नसतात कारण ती प्रेमळ गुरु माउली च सर्व घडवून आणत असते. तेथे मी करता हि भावना अजिबात नसते तर मी एक माध्यम आहे ते देतील त्या बुद्धीने कर्म करत रहाणे असल्यामुळे कुठलीच खंत नसते त्या मुले पूर्ण आरोग्य लाभते व घरात अखंड लक्ष्मी मातेचा वास असतो
सकारात्मक उर्जेची पातळी प्रचंड असल्यामुळे येणाऱ्यांना हि तेथून जावेसे वाटत नसते.तेथे प्रचंड उत्साह असल्यामुळे मोठ मोठी कामे होऊ लागतात फक्त स्व:त साठी न जगता पक्षी,किडा,मुंगी,व इतर जीवांवर हि प्रेम जडते. कुठल्याही सतकार्याला आपोआप ताकद ,मदत मिळत जाते लोकांची बघण्याची दृष्टी पूर्णता बदलून जाते असे किती तरी वर्णन करावे ते थोडेच आहे सारांश म्हणजे सद्गुरूच्या जवळ एका आनंदा शिवाय दुसरे काहीही नसते म्हणून आयुष्यात जो पूर्णानंद मिळवायचा असतो त्याचा पूर्ण मनोमन आनंद मिळतोच .......श्री राम
* आपल्या सद्गुरुनी नामरूपाने जी शक्ति दिली आहे, त्याची जाणीव होणे म्हणजे परमार्थ. अन त्या जाणिवेसाठी नामाचे अनुसंधान हवे. सद्गुरू आपल्याला सन्मार्गावर आणून आपली आत्मबुद्धी प्रकट करतात. मग प्रत्येक क्षण पूर्णा नंद बनतो. हा प्रवास नामा ने सुरू होतो

संत भेटल्यावर, काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटते, त्यांना गुरू भेटूनही भेट न झाल्यासारखेच आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली, अशी इच्छा का असावी ? गुरू एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते, त्यानेच गुरू भेटल्याचे सार्थक केले असे होते. गुरुआज्ञेपरते दुसरे त्याला साधनच नसते. तोच परमार्थ, आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानीमनीही येत नाही. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा, आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावी.जय श्री राम
प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे, मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही. जो संताची किंवा सद्‍गुरूची आज्ञा पाळतो, त्याचे प्रारब्ध हे प्रारब्धरूपाने राहात नाही.भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी, म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळवल्यासारखेच आहे.भगवंताचा जो झाला । त्याला देह प्रारब्धावर टाकता आला ॥ जय श्री राम
(महाराज म्हणतात ---- एक शिष्य मला भेटला, तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. मी त्याला विचारले, "तुला एवढा कसला आनंद झाला आहे ?" त्यावर तो म्हणाला, "मला आता आनंदाशिवाय दुसरे काही उरलेच नाही, कारण मला आज गुरू भेटले !" जो असा झाला, त्यालाच खरी गुरूची भेट झाली. तरी, तुम्ही गुरूला अनन्य शरण जा, म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरूरी नाही.भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे. देहाचे भोग येतील-जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहा. तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका. गुरुभेट झाली म्हणजे तुम्ही तुम्हीपणाने उरतच नाही. मात्र, गुरूला अनन्य शरण जा.जय श्री राम )
परमार्थात गुप्ततेची गरज आहे. आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी; कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून, आपली स्वतःचीसुद्धा लागण्याचा फार संभव असतो. म्हणून परमार्थात गुप्तता असावी; आणि आपल्या हातून जे साधन होते आहे, ते सद्‍गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतले जात आहे, ही जाणीव ठेवावी.तरच अभिमान जाईल

कोणत्याही मंगल कार्यात सर्वा आधी गणपतीचे आवाहन करतात, आणि सगळे कार्य संपले की सर्वांचे शेवटी त्याचे विसर्जन करतात. त्याच प्रमाणे अनुसंधानानेच पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी. लौकिक कार्या मध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण शिल्लक उरतो, पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपण ही त्यात नाहीसे व्हावे. "जसे ठेवायचे असेल तसे ठेवा, पण आपला विसर पडू देऊ नका, एवढी भीक घालावी, "अशी गुरूच्या चरणी प्रार्थना करावी.

थोडक्यात म्हणजे, आपल्याला मुळात काय पाहिजे हेच कळत नाही. कावीळ झाली म्हणजे डोळयाला खरे रूप कसे कळणार? म्हणून, ज्याचे डोळे साफ आहेत तो सांगेल त्या प्रमाणे वागावे. या करिता गुरू-आज्ञा प्रमाण मानून आपण वागत जावे. नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावे म्हणजे मनात शंका येत नाहीत.सदगुरूच्या आज्ञेचे पालन करताकरता साधकाला नामाची गोडी लागते, आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. जय श्री राम.

महाराजांचे आवर्जून सांगणे आहे कि,--------
माझे सर्व कर्माचा गुरूच सूत्रधार।सर्व सत्ता गुरूचे हाती।तेथे न चाले कोणाची गति॥
गुरूचरणी अत्यंत विश्वास। आणि साधनाचा अखंड सहवास।
येथे प्रपंचाचा सुटला फास।हाच परमार्थाचा मार्ग आहे खास॥ जय श्री राम
गुरूकडून घेतलेले नाम पावन करील जगास । हा ठेवावा विश्वास । राम कृपा करील खास ।।
देहानें नाहीं करता आले । मन रामापायीं गुंतवले । रामानें त्याचें कल्याण केलें ।।
||श्री राम जय राम जय जय राम||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनायक. दि.पत्की.,

लेख आवडला. निगुरा न रहिबा असं कबीर म्हणून गेलेत. श्रीगुरूंची महती वर्णावयास देवी शारदेला पूर्ण कल्पकाळ अपुरा पडेल.

अवतारादिकांचेही श्रीगुरूंशिवाय चालत नाही. श्रीराम वसिष्ठांना शरण गेले होते. तर सांदीपनींना श्रीकृष्णाने गुरू मानले होते. ज्ञानोबामाउली निवृत्तीनाथांचे शिष्य होते. अशी अगणित उदाहरणे आहेत.

हा लेखही आपण श्रीगुरूंच्या कृपेने लिहिलेला वाटतो. Happy

आ.न.,
-गा.पै.

ash11,गामा_पैलवान, स.न.
समुद्राची शाई व पृथ्वीचा कागद जरी केला तरी सद्गुरुंचा महिमा वर्णन करणे अशक्य आहे असे जे म्हटले जाते ते अक्षरशः खरे आहे याची प्रचीती आली कारण खूप लिहावेसे वाटत आहे बघू या ती प्रेमळ गुरु माऊली केव्हा करून घेईल ते.गुरुंच्या कृपेनेच त्यांच्या विषयी लिखाण व वाचन होत असते याची सुद्धा प्रचीती आली .
सद्गुरुनाथ महाराज कि जय

खूप छान लिहिलंय.

काय गोड गुरुची शाळा | सुटला जनक-जननीचा लळा |
तुटली मोहममतेची श्रुंखळा | लाधलो अवलीळा मुक्तता ||...... (श्रीसाईसच्चरित)

अप्रतिम लिहिलंय

फक्त एक छोटीशी सुधारणा
रामदास स्वामी

यांनी कुठलेही गुरु केल्याचे ऐकिवात नाही , किंवा तशी नोंद नाही

रामदास स्वामीना साक्षात प्रभु श्री रामचंद्राचाच अनुग्रह झालेला आहे.असे वर्णण नेट वर सुद्धा आहे .दासबोधाच्या १ ल्या दशकातील ४ थ्या समासात स्वामीनी सदगुरुंचे वर्णन केले आहे या वरुन त्यांना देखील सदगुरुंचे किती महत्व होते असे मला म्हणावयाचे आहे
swami.jpg

|| श्री राम जय राम जय जय राम ||
वाचुन समाधान झाले फक्त एक विनंती वजा सुचना
श्री दत्त गुरुंनी सुद्धा २४ जणांना गुरु मानले त्याचा उल्लेख ईथे आला असता तर अधिक बरे झाले असते

विश्वयशश्री ,सप्रेम नमस्कार .

बरोबर आहे .श्री गुरु दत्त महाराजांनी सुद्धा म्हटले आहे कि,

दिक्षा गुरु एकच असतो पण शिक्षा गुरु अनेक असू शकतात त्यांनी खालील २४ जणांना शिक्षा गुरु मानले आहे व त्या प्रत्येका बद्दल ते काय म्हणतात ते थोडक्यात असे.
(१) पृथ्वी :- पुष्कळ सहन करून सर्वांनाच सुख देणे ,सर्वांप्रती सदभाव व सहनशीलता शिकलो
(२) वायू :- असंतोष व निसंगता शिकलो
(३) आकाश :- आत्मा आकाशा सारखा अनादी आणि अविनाशी आहे ईश्वर त्याच्या सारखा सर्व व्यापी आहे हे शिकलो
(४) पाणी :- शीतलता आणि माधुर्य पाण्यापासून शिकलो ,साधकाने पाण्यासारखे शुद्ध, मधुरभाषी,आणि शीतल स्वभाव युक्त राहिले पाहिजे
(५) अग्नी :- पावित्र्य .हृदयात जर विवेकरुपी अग्नी पेटला तरच पाप वासना जाळून भस्म होईल .विवेकच अग्नी होय.कोणत्याही व्यक्तीचा दुर्व्यवहार ,पापाची बाब ,मनात ठेऊ नये .विवेकाग्नी ने ती जाळून टाकावी
(६) चंद्र:- क्षमता .वृद्धी व ह्रास तर शरीराचे होतात .आत्म्याचे नाही संपत्तीत आपले भान विसरू नये आणि विपत्तीत दु:खी होऊ नये
(७) सूर्य :- अभिमान रहित परोपकार. एकाच सूर्याची प्रतिबिंबे अनेक पात्रात अनेक दिसून येतात तसे आत्मा एकाच आहे पण नाना प्रकारच्या देहाच्या उपाधी मुळे तो अनेक स्वरूपाचा दिसून येतो मात्र तो उपाधी रहित आहे
(८) कबुतराच्या प्रसंगा पासून :- कोणत्याही वस्तू वा व्यक्ती विषयी अतिशय आसक्ती असू नये.तो पत्नी व पुत्राच्या आसक्ती पाई मेला .दुसऱ्या करता ना रडता स्वता करता रडा
(९) अजगर :- प्रारब्धा नुसार जे मिळेल त्यात समाधानी राहावे
(१०) समुद्र :-मर्यादा न सोडणे .सुख दुखात समचीत रहायला पाहिजे
(११) पतंग :-सौंदर्याने पागल होऊन पतंगाप्रमाणे त्याच्या मागे लागले तर अहितच होते .जगातील विषय बाहेरूनच सुंदर दिसतात पण आत मात्र नव्हे .ते सौंदर्य म्हणजे केवळ कल्पना होय .सुंदर तर केवळ एक श्रीकृष्ण च होय त्याचेवर प्रेम करा
(१२) भुंगा :- :- आसक्त न होता फक्त सार ग्रहण करणे .भुंगा लाकूड पोखरू शकतो पण कमल नाही कारण तो कमलावर आसक्त असतो .
(१३) हत्ती:- स्पर्श सुखासाठी हत्ती आपले प्राण गमावतो. लोक एक मोठा खड्डा खणतात त्यात गवत पाला पाचोळा भरून टाकतात वर एक नकली हत्तीण बसवून देतात .तिला खरी हत्तीण मानून स्पर्श सुखाच्या इच्छेने तेथे जातोच व खड्ड्यात पडतो .साधकाने स्त्रीचा संग करू नये .तसेच स्त्री साधिकेने पुरुषाचा संग करू नये .
(१४) मधुमाशी - कोणत्याही वस्तूचा अति संग्रह करू नये हे मधुमाशी पासून शिकलो .मधुमाशी संग्रह करते लोक तिला मारून मध काढून घेतात.तेव्हा संग्रह करण्या पेक्षा दान करा .
(१५) हरीण:- हत्ती स्पर्श सुखाच्या लालसेने मारतो तर हरीण संगीत श्रावणाच्या लालसेने मारतो म्हणून योग्याने गीत नृत्य,संगीत इ.विषयांचा त्याग करावा.
(१६) मासळी:- रससुख व जिव्हा स्वाद यांची लालूच मासळीला मारते . गळा च्या काट्याला लावलेला मांसाचा तुकडा खायला मासोळी जाते व गळाला अडकून मरते. माणसाला हि जिव्हा फार त्रस्त करते .सर्व इंद्रिये जिंकून जिभेवर ताबा नसला तर नाश झाल्याशिवाय रहात नाही .जो रसनेला जिंकतो तो सर्वच जिंकू शकतो
(१७) वेश्या :- कामी पुरुषाच्या प्रतिक्षेत जगण्या पेक्षा देवासाठी जर जागले तर त्याची प्राप्ती तरी होईल .कामोपभोगेच्छां सर्वात मोठे दु:ख आहे
(१८) कुररी पक्षि :- संग्रह करण्या पेक्षा त्याग करावा
(१९) बालक:- निरागस भाव ग्रहण करणे
(२०) एक कंकण :- एका कुमारिकेच्या घरी पाहुणे आले असता घरात तांदूळ कांडलेले नव्हते म्हणून तिने बांगड्या काढून ठेवल्या कारण कांडताना जर आवाज झाला असता तर पाहुणे घरात तांदूळ तयार नाहीत म्हणून निघून गेले असते त्या प्रमाणे गावात राहत असताना कलह, क्लेश, टाळावे म्हणून साधूने एकांतवास स्वीकारावा
(२१) लोहार:- कामात एवढा गर्क होता कि रस्त्यावरून वाजत गाजत जाणाऱ्या राजाच्या मिरवणुकीकडे सुद्धा लक्ष नव्हते . यावरून लौकिक कार्यात जर एकाग्रते शिवाय सफलता मिळत नाही मग पारलौकिक कार्यात ईश्वराच्या आराधनेत तन्मयते शिवाय सिद्धी कशी मिळू शकेल ? ध्याता ,ध्यान,व ध्येय जेव्हा एकरूप होतील तेव्हाच जीव कृतार्थ होतो.
(२२) साप:- योग्यानेही एकटेच फिरावे
(२३) कातणी:- आपल्या तोंडातून तार काढते ,त्याच्याशी खेळते आणि पार नंतर गिळून हि टाकते .ईश्वरही अशीच सर्व सृष्टी आपल्यापासून निर्णाण करतो व शेवटी आपल्यातच सामावून हि घेतो
(२४) कीटक :-भुंगा अळी ला पकडतो आपल्या बिळात तिला कैद करून टाकतो .भयाने ती आळी सतत भुंग्याचे चिंतन करत शेवटी स्वत भिंगोटी बनते .तसे मनुष्य हि ईश्वराचे चिंतन करता करता ईश्वर बनू शकतो .विषयाचे चिंतन करता करता विषयी बनतो .तर प्रभूचे चिंतन करता करता प्रभूमय बनतो

आणखी एक महत्वाचे म्हणजे ग्रंथ हे गुरु होत.

तुमच्या दृष्टीने सर्व श्रेष्ठ ग्रंथ कोणता ?

:- सर्व साधारण पणे जीव हा कोणाच्या तरी साह्यानेच प्रगती करत असतो त्या मध्ये ग्रंथ हि मोठी भूमिका वठवतात ग्रंथातील विचार प्रगती कडेच नेतात.
येथे सर्व श्रेष्ठ आपण त्या ग्रंथाला म्हणू कि ज्या ग्रंथाने माझ्या जीवनाला एक उत्कृष्ठ वळण दिले व त्यानेच मी आज येथे आहे .ग्रंथ हे गुरु आहेत मग ग्रंथ आयुष्याला वळण देऊ शकतो कि नाही ? जो ग्रंथ माझे आयुष्यच उत्कृष्ठ करतो तोच माझा उत्कृष्ठ ग्रंथ. मी सतत त्या ग्रंथाला मनाच्या मुलामय अशा बिछान्यावर सतत प्राणासमान जपतो त्याची काया वाचा मने पूजा करतो हा ग्रंथ मी नित्य वाचतो मनन करतो . त्यात लिहलेले सर्व हेच माझे जीवन मी त्या प्रमाणे वागण्यास बांधील आहे म्हणून मला आज हे सुंदर दिवस आले आहेत आणि माझ्या या ग्रंथावर असलेल्या श्रद्धेमुळेच माझी व माझ्या दिक्षा गुरु मधील अंतर कमी झाले व मला ह्या ग्रंथानेच गुरुंचा अनुग्रह होण्याचा मार्ग मोकळा केला व मला लायक केले म्हणजे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्या शिवाय सोने होत नाही हि त्या ग्रंथाची किमया आहे त्यातील दैवी शक्तीचा अनुभव आहे अशी भावना आपली ज्या ग्रंथा बाबत असते तोच आपला उत्कृष्ठ ग्रंथ असतो मग कोणाचा गीता असेल ,कुराण असेल, कुणाचा बायबल, तर कोणाचा आणखी काही. म्हणजे जगात उत्कृष्ठ ग्रंथाची कमी नाही कमी आहे ती या विषयावर आत्मचिंतन करून स्वताचा उद्धार करून घेणाऱ्याची .
प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक उत्कृष्ठ ग्रंथ असायलाच हवा असा ग्रंथ हि आयुष्यात योगायोगानेच येत असतो तुम्ही शोधून सापडत नसतो आणि आपण जर एखादा ग्रंथ उत्कृष्ठ म्हणत असू तर त्या वर आपले जीवापाड प्रेम असावे त्यातील विचार आचरणात आणावे त्याचे मनन करावे व सभोवतालच्या अज्ञानी लोकांना हि आपण ज्या चांगल्या रस्त्यावरून चालत आहोत तो मार्ग जरूर दाखवावा म्हणजे त्या ग्रंथराजाची खर्या अर्थाने सेवा होते व आपल्यावर कृपा होत असते. कारण ग्रंथ लिहिणारा त्या ग्रंथातच असतो जसे कि रामदास स्वामिनी दासबोधा बद्दल म्हटले आहे. तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर अनुग्रहित व्हावयाचे आहे तर तुम्ही मनाने आधी हे पक्के करा कि मला ग्रंथाची सेवा करणे भाग आहे .तुमचे गुरु तुमचा शोध घेत येतील.
तसेच महत्वाचे म्हणजे अनेक विषय एकाच गुरुजींनी शिकवले तर आपली काय अवस्था होइल म्हणजे ते ज्ञान ग्रहण करताना एक अवस्था अशी होइल कि आपल्याला कंटाळा येइल तेच वेगवेगळ्या गुरुजी कडुन शिकताना कंटाळा येण्याची अवस्था खुप उशीरा येइल म्हणुन गुरु पद एकच असले तरी ते वेगवेगळ्या रुपात अवतरतात ते फक्त ज्ञान देण्यासाठीच तेव्हा हे माझे गुरु ते तुझे गुरु असे काही मनाने कल्पु नये तर त्या कल्पनेलाच गुरु पद एकच हि सवय लवण्या साठीच गुरु सांगतात ती सेवा मनोभावे करावी .समजा इतीहासाचे शिक्षक गणीत शिकवु लागले तर मनाची तयारी होत नसते म्हणुन काय इतीहासाच्या शिक्षकाला गणीत येत नाही असे थोडेच आहे त्यांना सर्व येते आपण मानले नाही तर त्यांना थोडाच फरक पडणार आहे .तेव्हा प्रत्येक गुरुंचा आदर करणे,ते जे ज्ञान देतात ते आमलात आणणे हेच आपले कर्तव्य असते हिच गुरु सेवा असते .आपले गुरु आपला हा भाव सुद्धा पहात असतात..म्हणुन गुरु म्हणजे सर्वस्व

अतिशय सुंदर लेख. ह्या लेखातल्या प्रत्येक शब्दाशी सहमत .
श्री दत्त गुरुंनी सुद्धा २४ जणांना गुरु मानले त्याचा उल्लेख ईथे आला असता तर अधिक बरे झाले असते.
दत्त गुरु हे स्वतः जगद्गुरु आणि परब्रह्म.
दत्तगुरूंना तपस्येच्या काळात २४ जीव भेटले. त्यातल्या प्रत्येकात त्यांना काही गुण दिसला काहीतरी शिकण्यासारख दिसलं म्हणून त्यांनी ह्या २४ जीवांना गुरु मानलंय.
२४ पेकी मला २ गोष्टी माहित आहे. तांदूळ निवडणार्या मुलीची आणि वेषेची .
हि वेश्या सदा काम , विषयवासना ह्यात गुरफटलेली असायची . खूप पैसे मिळवले होते तिने. खूप सुंदर हि होती. परंतु एका दिवशी काय झाले माहित नाही. नटून थाटून गिर्हैकाची वाट बघत बसली. कित्येक लोक तिच्या जवळून गेले पण एकानेही ढुंकून पहिले नाही. तिला वाटलं makeup मध्ये काही गडबड असेल. म्हणून पुन्हा नीट आवरून आली . पुन्हा तोच प्रकार. आता मात्र ती विचार करू लागली भर तारुण्यात , इतकं सौंदर्य जवळ असतानाही हि गात तर म्हातारपणी कुरुपपण आल्यावर कसं होणार. आणि खाडकन तिचे डोळे उघडले. सगळा पैसा दान करून हि गंगेच्या तीरावर तपस्या करायला गेली. पुढे फार मोठी योगिनी बनून इतरांनाही मार्गदर्शन करू लागली.
लोकांना हजारदा सांगूनपण त्यांच्यात काहीच बदल घडत नाही. आणि आयुष्यभर विषय्वास्नेत गुरफटलेली वेश्या मात्र एका क्षणात वैरागी होऊ शकते .
हेच दत्तगुरूंनी तिला गुरु मानायचं कारण आहे .

गुरू: ब्रह्मा गुरू: विष्णू गुरू: देवो महेश्वरः
गुरू: साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।

या श्लोकातील पहिले दोन / तीन चरण कल्पित, म्हणून निरर्थक आहेत.
आद्य गुरू माता असते, जी जीवनाची यशस्वी सुरुवात (काल्पनिक श्री-गणेशा!) करून देते.
बोलणे (= मातृभाषा!), चालणे, वैयक्तिक स्वच्छता, विनय व शिस्त.
नंतर येतो तो पिता, जो रूढीनुसार संरक्षण-पोषण करताना काही जीवन मूल्ये शिकवेल
[अशी रास्त अपेक्षा असते.]
मग येतात ते ‘पगारी'- त्यागी गुरुजन जे साक्षरता, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान "विद्या" शिकवून व्यक्तीला स्वावलंबी व समाजोपयुक्त बनवितात.
त्यापलीकडचे गुरू तंत्रज्ञान, क्रीडा, वाद्य, संगीत इ. "कला" विषयांत नैपुण्य अवगत होण्याची पात्रता निर्माण करतात.
प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन व विश्व-विद्यालयीन अशा गुरुजनांपैकी
कुणाचा तरी [ठोसा/] ठसा आपले आयुष्य [बि/]घडवून जातो!
या 'वास्तविक' आत्मिक 'वरेण्य' गुरूंपलिकडे / अलिकडे कोणी पूजनीय नसते, नसावे.

बाकी इतर सर्व "अध्यात्मिक, पारमार्थिक, पारलौकिक, यौगिक गुरु, बाबा, योगी, महाराज" हे स्वतः परावलंबी अनावश्यक थोताण्ड्माजक जंतू असतात,
जे जंतांप्रमाणे भक्ष्य-व्यक्तीचे तन-मन-धन-आयुरारोग्याला कीड लावून सर्वनाश घडवून आणतात.
जे द्रोणाचार्यासारखे एकलव्याच्या श्रद्धेचा गैरफायदा घेवून त्याचा नाश घडवून आणतात!

एकलव्याचा खरा गुरू कोण?!
= एकलव्याची महत्त्वाकांक्षा, प्रयत्न अथक
एकलव्याचा कसा गुरू द्रोण?
खूद्र भटुकडा, त्रयस्थ-नैपुण्य नाशक !!
[एकलव्याचा खरा गुरू एकलव्य, दुसरा कोण!]
अशा भक्ष्य-व्यक्तींचे एकलव्यासारखेच आत्मरचित दुर्दैव हे असते की मूढ अंधश्रद्धेच्या "नशे"त त्यांना आत्मनाशाचे भान रहात नाही.
त्यामुळे त्यांचे तन-मन-धन-आयुष्य गटारातल्या मैल्यावरील बुडबुड्यासारखे दुर्गन्धीमय, परिवारास विषारी व निरुपयोगी ठरते!

गुरू माता गुरू पिता, गुरू देवो आचार्याः
गुरू: गूगल, गुरू: विकिपिडिया, तस्मै श्री गुरवे नमः ।।
गुरु अध्यात्मिक, गुरु पारमार्थिक, बाबा, योगी च भम्पका:
गुरु साक्षात्कारी महा रोगी, तस्मै कदापि न भजेत् पण्डिताः ।।

** य: क्रीयावान स पण्डित: ।
जो सातत्याने काम करेल तो त्या सातत्याने त्यात 'निपुण' होईल, त्या क्षेत्रातील expert 'पंडित' ठरेल!

जितनी एक-पतिव्रता हो सकती है कुतिया
उतनेही पूज्य होते हैं गुरु अध्यात्मिक, पारमार्थिक
या साक्षात्कारी बाबा, योगी, महाराज पारलौकिक
जो मूरख अंध-श्रद्धोंको बनाते हैं चू…या!

गुरु को रब माने, खुद को कहे दास
दिन को पूजा व्रत करे, रात कोठा-निवास !

गुरु को वंदना, बेवा को डारियो लूट
जब उमर लगी सठीये, गई लंगोटी छूट||

जितनी एक-पतिव्रता हो सकती है कुतिया
उतनेही पूज्य होते हैं गुरु अध्यात्मिक, पारमार्थिक
या साक्षात्कारी बाबा, योगी, महाराज पारलौकिक
जो मूरख अंध-श्रद्धोंको बनाते हैं चू…या!

सारांश -
पुरावारहित भंपक थोतांड.
अध्यात्मी बगळे कर्ती 'पांढऱ्यावर काळे'!

विश्वसंसार भार पेलण्या असमर्थ दुबळे
ऐसे विज्ञानमूढ 'ढ' बावळे, मूर्ख, गबाळे
‘अतींद्रिय, पारलौकिक, अध्यात्मी’ बगळे
वरून ढवळे परी अंतरंगी हे कावळे काळे

भंपक ‘गुरु’ निरर्थ बरळे, करितो बावळे चाळे
लंपट 'बाबा' एकांती कोवळ्या चेलियां कवळे!
निर्बुद्ध भाविक भगत चेला तत्त्तंगड्या चोळे!
भोंदू वाचाळे वोकिती गरळें, कर्ती 'पांढऱ्यावर काळे'!

व्यर्थ वळवळे अज्ञान-कर्दमी अंधश्रद्ध गांडुळे
गुंगल्या भ्रमित 'बंद' भक्तांचे कैसे उघडतील डोळे?!
इन्द्रियें रस भोगिती पऱ्या, जिज्ञासू विज्ञानसागरी खेळे
स्वच्छंद भ्रमर लुटती मधु, उमलता सत्यज्ञान कमळे!