१. मूगाची डाळ - १/२ वाटी
२. खवलेल ओल खोबर - १ टे.स्पून
३. काकडीचे तुकडे किंवा किसून- १ टे.स्पून
४. डाळींबाचे दाणे - १ टे.स्पून
५. सफरचंदाचे तुकडे किंवा किसून - १ टे.स्पून थोडासा लिंबाचा रस लावून घ्या.
६. गाजर किसलेले - १ टे.स्पून
७. हिरवी मिरची - १ बारीक तुकडे करुन किंवा उभे स्लाईस करून
८. लिंबाचा रस - १/२ टि स्पून
९. मीठ - चवीनुसार
१०. साखर - चवीनुसार
११. कोथिंबीर बारीक चिरून = १ टे.स्पून
फोडणीच साहित्य
१. मोहरी - १/२ टी स्पून
२. हिंग - चिमूटभर
३. कढीपत्ता - ५-६ पान
४. सुकी लाल मिरची - २ तुकडे करून
१. मूगाची डाळ १ तास भिजत ठेवावी. नंतर पाणी निथळून घ्यावे.
२. एका मोठ्या वाटीत मूगाची डाळ, काकडीचे तुकडे, गाजराचा किस, हिरवी मिरचीचे तुकडे, ओल खोबर, लिंबाचा रस, मीठ, साखर मिक्स करून घ्या. मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये एक खड्डा करून ठेवा.
३. तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, लाल मिरचीचे तुकडे घाला व गॅस बंद करून हिंग घालून ही फोडणी लगेच खड्डा केलेल्या मिश्रणात ओतून साईडच्या मिश्रणाने खड्डा बंद करून झाकण घालून ठेवा.
४. ५ मिनिटांनी सर्व मिश्रण चमच्याने ढवळून त्यात डाळींबाचे दाणे, सफरचंदाचे तुकडे आणि कोथिंबीरने सजवा.
५. बाजूला थोड काकडी, गाजर आणि डाळींबाचे दाणे वापरून फुल बनवायच प्रयत्न केला. आभार मनीमोहर. त्यांच गाजराच फूल एनवेळी आठवल.
जेवण किंवा नाश्ता म्हणून पोटभरीची आणि पौष्टीक कोशिंबीर.
प्रसादासाठी आणि लग्न समारंभात ही कोशिंबीर आवर्जून केली जाते.
(No subject)
मस्त. मला आवड्ते हि कोशिंबीर.
मस्त. मला आवड्ते हि कोशिंबीर.
मस्त दिसतंय फोटोज चं
मस्त दिसतंय
फोटोज चं डेकोरेश्न ही सुंदर
ताई जरा पाकृ आहारशास्त्र आणि पाककृती विभागातून काढा आणि मायबोली गणेशोत्सव २०१४ विभागात टाका बरं
शब्दखुणांमधे आता कशाला शिजायची बात,मायबोली गणेशोत्सव २०१४ हे २ असेच्या असे कंपल्सरी यायला हवेत
आत्ता कसं मस्त आहे डिश ही.
आत्ता कसं
मस्त आहे डिश ही. वन टाईम मिल डिश
riya, jhala bai ekdacha. :ha
riya, jhala bai ekdacha. :ha ha:
jayu, riya dhanyavad
मस्त सजावट.. फोटो आणखी स्पष्ट
मस्त सजावट.. फोटो आणखी स्पष्ट हवे होते.
दिनेशदा धन्यवाद. फोटो गडबडीत
दिनेशदा धन्यवाद. फोटो गडबडीत काढले.
आरती, छानच वाटतोय पदार्थ.
आरती, छानच वाटतोय पदार्थ. तिरंगा क्यूट. सजावट सुंदर... गाजराच फुलं तर अप्रतिम... धन्यवाद माझी आठवण काढलीस म्हणून
मलाही आवडते ही डिश.. छानयं
मलाही आवडते ही डिश.. छानयं
सौदिंडियन मैत्रिणींच्या घरी
सौदिंडियन मैत्रिणींच्या घरी याचेच थोडे वेगळे रूप खाल्ले आहे. मला कच्च्या मुगाच्या डाळीपेक्षा हरभरा डाळ आवडते त्यामुळे कधी केलीच तर ह.डाळ घालून करेन.
खड्डा करून फोडणीला झाकून का ठेवतात?
मस्त आहे हा प्रकार. खड्डा
मस्त आहे हा प्रकार.
खड्डा करून फोडणीला झाकून का ठेवतात? >>> फोडणीचा वास आतच रहावा म्हणून.
मूगडाळ कच्चट नाही का
मूगडाळ कच्चट नाही का लागत?
सिंडे, कढी, कोशिंबिरीला वरून फोडणी दिल्यावरही झाकण घालायचं असतं म्हणजे वास, चव मुरते.
कोशिंबीर म्हणुन ठिक आहे पण
कोशिंबीर म्हणुन ठिक आहे पण पोटभर कच्चे मुग कसे खाणार?
मनीमोहर, चनस, मामी, तृप्ती
मनीमोहर, चनस, मामी, तृप्ती आवटी, सायो, अदिति धन्यवाद.
तृप्ती आवटी, मामी आणि सायो ह्यांनी उत्तर दिल आहे.
मूगडाळ कच्चट नाही का लागत? <<< सायो, नाही.
पोटभर कच्चे मुग कसे खाणार <<< अदिति, ज्यांना आवडत ते खातात.
मस्तच .... भारी दिसतयं..
मस्तच .... भारी दिसतयं..
छान आहे. ते मुगाची डाळ
छान आहे. ते मुगाची डाळ ठेवलेलं खणाखणाचं ताट मस्त दिसतं आहे.
छान आहे कोशिंबीर. मांडणी छान
छान आहे कोशिंबीर. मांडणी छान केलीये.
मी मसुराच्या डाळीची कोशिंबीर नेहमी करते. फक्त कच्चा कांदा, कोथिंबीर, हिमी-हिंग-मोहरीची फोडणी आणि वरून लिंबू पिळते. आता अशी करून बघेन.
मस्त आहे ही कोशिंबिर. छान आहे
मस्त आहे ही कोशिंबिर. छान आहे काकडी-गाजर फुल.
हे असलं फुल बिल बनवतेस अन
हे असलं फुल बिल बनवतेस अन तरिही म्हणतेस की मी सुगरण नाही म्हणुन.. शोनाहो.. मुडा सोडुन बाकीच्याची बनवेन कोशिंबीर
खुप मस्त आरती. सजावट
खुप मस्त आरती. सजावट जेव्हडी छान तेव्हडी चवही छानच.. छान प्रकार..
मस्त !
मस्त !
मस्त आहे
मस्त आहे
मस्त आहे पाककृती. तिरंगा आणि
मस्त आहे पाककृती.
तिरंगा आणि काकडी गाजराचे फुल सुंदर दिसत आहेत. फोटो थोडे स्पष्ट हवे होते.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.