१/२ वाटी चणाडाळ
२ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून जीरे
१/२ मध्यम कांदा.
१/२ टीस्पून आमचूर
१ टेबलस्पून तेल
हवा असल्या एक टोमॅटो बारीक चिरून.
चवीपुरते मीठ
चणाडाळ तासभर भिजवून ठेवा.
कुकरमधे तेल घालून ते गरम करा.
त्यावर जीरे टाका.
जीरे तडतडले की त्यावर कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरून टाका.
कांदा मिरची तेलावर परतून घ्या.
टोमॅटो हवा असल्यास तो टाका. तोही थोडा भाजून घ्या.
त्यावर चणाडाळ टाका. डाळ परतून घ्या मग शिजण्यापुरते पाणी टाका.
शिट्टी लावून कुकर बंद करा. तीन चांगल्या शिट्या येऊ दे. (गॅस थोडा बारीक ठेवल्यास डाळ मस्त शिजेल).
कुकर थंड झाल्यावर डाळीत आमचूर आणि मीठ टाका.
लागल्यास पाणी टाकून तुरडाळीच्या आमटीएवढी Consistency करून घ्या.
करायला सोपी, चवीत बदल म्हणून इथे टाकली.
खरं तर सिंधी लोक हे 'डाल पक्वान' म्हणून ब्रेकफास्ट साठी खातात (मैद्याच्या पुर्यांबरोबर), पण मला भात/पोळी बरोबरही ही डाळ आवडते.
तुरडाळ / मुगडाळ बर्याच वेळा भाताबरोबर खाल्ली जाते तशी चणाडाळही अशी करून खाता येईल.
http://www.maayboli.com/node/49007 अमेरिकेत डोकं न वापरता उंधियू
http://www.maayboli.com/node/45519 'खडे आलू' अर्थात बाळ्-बटाटे
http://www.maayboli.com/node/46057 मालवणी भाजाणे वापरून केलेल्या पाककृती (व्हिडिओ)
http://www.maayboli.com/node/45955 पास्ता
http://www.maayboli.com/node/45519 बाळ बटाटे
http://www.maayboli.com/node/42083 कोवळा फणस
सोपी आहे की. एकदा
सोपी आहे की.
एकदा रेस्टॉरन्टमधे खाल्ला होता हा दाल पक्वान प्रकार आणि आवडला होता. आता नक्की करून बघणार.
धन्यवाद.
मला पण आवडते ही डाळ.
मला पण आवडते ही डाळ.
चणाडाळ का? आता येईलच मृ गात
चणाडाळ का? आता येईलच मृ गात
शिंडे. ६ / ८
शिंडे. ६ / ८
अरे हे सोप्पं दिसतय प्रकरण.
अरे हे सोप्पं दिसतय प्रकरण. मला आधी नावावरून गोडाचा पदार्थ वाटला होता.
मस्त लगेच बघते करुन .. पण
मस्त लगेच बघते करुन .. पण व्हिडीओ कुठेय?
मला आधी नावावरून गोडाचा
मला आधी नावावरून गोडाचा पदार्थ वाटला होता <<< गोड आणि मी?
पण व्हिडीओ कुठेय? <<< व्हिडियो दिला तर छापील हवी. छापील दिली तर व्हिडियो.. आता जेवायलाच या
मस्त होते ही डाळ.. एका रेसिपी
मस्त होते ही डाळ.. एका रेसिपी शो मधे बघितली होती..
अजुन हवंतर पळीभर तेल गरम करुन त्यात मिरची पुड टाकुन मग ती डाळीवर ओतायची तडका टाईप
मस्त. हे फार पुर्वी खाल्ले
मस्त. हे फार पुर्वी खाल्ले आहे, सिंधीं घरात. अजुन चव आठवली तरी खावेसे वाटते. कसे करायचे माहीत नव्हते. धन्यवाद ३ दा.
विनय , करुन बघत आहे. एकदम
विनय , करुन बघत आहे. एकदम सोपी आहे रेसीपी.
>>.. आता जेवायलाच या >> बर
>>.. आता जेवायलाच या >> बर चालेल
काल केली होती या पद्धतीने डाळ
काल केली होती या पद्धतीने डाळ पकवानवाली डाळ! एकदम मस्त चव आली आणि भात आणि तुम्ही सांगितलं आहे तसं पोळीबरोबर छानच लागली!
एकदम झटपट होणारी, बिना मसाल्याची आणि चविष्ट पाकृबद्दल धन्यवाद!
मी पण आज पॉटलक साठी केली
मी पण आज पॉटलक साठी केली होती. सगळ्यांना आवडली.
एकदम झटपट होणारी, बिना मसाल्याची आणि चविष्ट पाकृबद्दल धन्यवाद! >> ++१
एकदम झटपट होणारी, बिना
एकदम झटपट होणारी, बिना मसाल्याची आणि चविष्ट पाकृबद्दल धन्यवाद!>>>+1
I tried it too. Everyone loved it.
शहाड स्टेशन जवळ गोलमैदानाच्या
शहाड स्टेशन जवळ गोलमैदानाच्या भोवती गाड्यांवर हा पदार्थ मिळतो .
आज गणपति दर्शनासाठी आलेल्या
आज गणपति दर्शनासाठी आलेल्या मित्रांना पण ही डाळ खुप आवडली! धन्यवाद परत एकदा. रेसिपी विचारली बरेच जणांनी. मायबोली चा गजर केला तेव्हढ्यात!
सायोने रेसिपी अगदी झटकन शोधून दिल्याबद्दल तीचे आभार.
आमच्या येथे गणपती
आमच्या येथे गणपती शिरवतांना करतात ही डाळ .फक्त यात कांदा घालत नाहीत. कारण नैवेद्द्याला कांदा चालत नाही.
चला ... कुणाला तरी ऊपयोग
चला ... कुणाला तरी ऊपयोग झाला.. .
आजच केली एक 1 चव!!!!
आजच केली एक 1 चव!!!!