Submitted by sadho on 7 September, 2014 - 03:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१. काकडी, मोठे तुकडे करून - १.
२. शेपू - १ जुडी.
३. अक्रोड - ३ - ४ तुकडे.
४. लसूण पाकळ्या १- २.
५. दही - १ वाटी.
६. जिरेपूड, मिरेपूड, मीठ - चवीनुसार.
क्रमवार पाककृती:
१. काकडीची साल काढून मोठे तुकडे करून घ्यावेत.
२. शेपू निवडून धुवून चिरून घ्यावा.
३. लसूण पाकळ्या सोलून छोटे तुकडे करून घ्यावेत.
४. अक्रोडाचे तुकडे करून घ्या.
५. मिक्सरमध्ये दही, काकडी, शेपू, लसूण, अक्रोड, मीठ, जिरेपूड, मिरेपूड घालून बारीक वाटून घ्यावे.
६. फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सूप प्यावे.
वाढणी/प्रमाण:
२ जण
अधिक टिपा:
१. तारातोर ह्या बल्गेरियन सूपची ही रेसिपी आहे, त्यात जिरेपूड आणि मिरेपूडची अॅडिशन केली आहे.
२. कच्च्या लसणीची चव आवडत नसल्यास एकच पाकळी घातली तरी चालेल.
माहितीचा स्रोत:
बल्गेरियन सूप रेसिपी - तारातोर व स्वप्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव ! मस्तं दिसतय.
वॉव ! मस्तं दिसतय. तोंपासू
एकंदरीत या स्पर्धेन ऊन्हाळ्याची सोय करुन ठेवलेली आहे.
मस्त लागतं हं सूप. आत्ताच
मस्त लागतं हं सूप. आत्ताच प्यायले . आईने आत्ताच बनवून इथे रेसिपी टाकलीये
ओह ! तुमच्या मातोश्री आहेत का
ओह ! तुमच्या मातोश्री आहेत का ?
कौतुकास्पद अगदी.
मस्त दिसतंय हे कोल्ड सूप! एक
मस्त दिसतंय हे कोल्ड सूप!
एक बदल कराल का प्लीज? या सूप चं नाव 'तारातोर' आहे. तेव्हढं प्लीज बदलाल का हेडरमध्ये.
ही लिंक - http://en.wikipedia.org/wiki/Tarator
एकदम कूल वाटलं वाचुनच मुळात
एकदम कूल वाटलं वाचुनच
मुळात काकडीच एवढी आवडती आहे की त्याचं सुप्प हे वाचुनच आहाहा होतंय
अर्रे! मावशी पण आल्या काय
अर्रे! मावशी पण आल्या काय मायबोलीवर
फोटो मस्त दिसतंय. आम्ही शेपू वगळून तारातोर करणार
आई माबोवर आधीपासूनच आहे, पण
आई माबोवर आधीपासूनच आहे, पण तिने रेसिपी पहिल्यांदाच टाकलीये :).
ही रेसिपी आवडली. सगळे
ही रेसिपी आवडली. सगळे घटकपदार्थ ओळखीचे आहेत शिवाय काजूबदामखजूर वगैरे "तिकडच्या" कॅटेगरीमधले नाहीत.
नक्की करणार.
छानच.. म्हणजे कूल !
छानच.. म्हणजे कूल !
अरे सहिच, साधना ताई कधी
अरे सहिच, साधना ताई कधी माबोवर आली? मस्त
किती सोप्पी कृती आहे. काकडी
किती सोप्पी कृती आहे. काकडी शेपू कॉम्बो मस्त लागेल. करतेच आता...
फोटो भारी. दही असल्याने आमची
फोटो भारी. दही असल्याने आमची करून बघण्यात माघार
छान आहे हे. ठंडा ठंडा कूल
छान आहे हे. ठंडा ठंडा कूल कूल.
सोपी पाकृ आहे
सोपी पाकृ आहे पण
काकडी+शेपू+लसुण कॉम्बो आवडेल का नाही ते कळत नाहीये.
मस्त !
मस्त !