Submitted by तृप्ती आवटी on 17 July, 2009 - 10:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
२ मध्यम आकारचे बटाटे, १ लहान कांदा, २ चांगल्या तिखट लाल मिरच्या (ओल्या), मीठ, ३ टे स्पून सरसोंचं तेल.
क्रमवार पाककृती:
बटाटे उकडुन कुस्करुन घ्यावेत. मिरच्या गॅसवर अथवा चुलीतल्या निखार्यावर भाजून जरा गार झाल्यावर बटाट्यात कुस्करुन घालाव्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, सरसोंचं तेल आणि चवीनुसार मीठ घालुन छान एकत्र कालवुन घ्यावे.
आवडत असल्यास कोथिंबीर चिरुन घालावी. पण कोथिंबीर न घालताच छान लागते.
वाढणी/प्रमाण:
४ लोकांच्या जेवणात भरीत म्हणुन वाढल्यास पुरेल.
अधिक टिपा:
१. लाल मिरची ताजी नसल्यास सुकी वापरावी. मी चिली फ्लेक्स घातले होते एकदा, चांगले लागले.
२. तेल कच्चेच घालायचे आहे.
३. सरसोंचं तेल फार उग्र आहे वासाला आणि चवीला. मी EVOO वापरते.
माहितीचा स्रोत:
सासुबाई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच
मस्तच लागते हे. मझ्या लेकिला अगदि कमी तिखट घालुन, वरुन थोडे सोअर क्रीम घालुन देते. खुप आवडते तीला असे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जेवणात
जेवणात भरीत म्हणुन वाढल्यास पुरेल >>> पण भरीत भाजी किंवा आमटी म्हणून कसं वाढणार? :p
छान
छान लागतं.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी दही घालते यात. हिन्ग, जिरे, हिरवी मिरची फोडणी. आणि चिमूटभर साखर.
साशल.
सरसोंचं
सरसोंचं तेल >> याला शुद्ध मराठीत मोहोरीचे तेल म्हणतात ना?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~
हो का ? मला
हो का ? मला ठावुक नव्हते.
सशल, करणार्याने हे बटाट्याची भाजी म्हणुन वाढलं तर खपेल की![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
छान
छान रेसिपी. सरसोच तेल ऐवजी सनफ्लॉवर तेल चालेल का ?
हे अल्पनाने
हे अल्पनाने सांगितलेलं-
उकडलेला बटाटा किसुन / मॅश करुन, त्यात बारीक चिरुन कांदा, अद्रक्,हिरवी मिरची, हवा असल्यास लसुण, मीठ, गरम मसाला, जिरे-धणे पुड (सर्व मसाले ऑप्शनल आहेत).. असं सगळं मिसळायचं.. त्यात २-३ थेंब कच्चं सरसोचं तेल घालायचं (मला नाही आवडत)... हि झाली बेसिक आलु भरता किंवा आलु चोख्याची कृती.. यातच वाफवलेले मटार, टॉमॅटो (किसुन, चिरुन), वांग भाजुन वैगरे आपल्या आवडीप्रमाणे घालुन व्हेरिएशन्स करता येतात.
जागु, मला माहिती नाही कसं
जागु, मला माहिती नाही कसं लागेल.