हा मणिरत्नमचा आवडता स्पॉट आहे म्हणे! त्याच्या बर्याच सिनेमात आहे हा. रा-वन मध्येही होता. त्या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी अभिषेक आणि ऐश्वर्या राहिले होते त्याच रुममध्ये आम्हीही म्हणजे अभिषेक अग्रवाल, ऐश्वर्या अग्रवाल ( ) राहिले. भरीला आमच्याबरोबर आराध्या अग्रवालही होती. ते हे - अथिरापल्लीचं रेन फॉरेस्ट रिझॉर्ट .
अथिरापल्ली हे फारसं माहित नसलेलं केरळमधिल ठिकाण. तिथे फक्त एकच गोष्ट बघण्याजोगी - अथिरापल्लीचा धबधबा! पण काय सांगू, हे रिझॉर्ट इतक्या मोक्याच्या जागी वसवलंय की दृष्ट काढून टाकावी.
त्या हिरव्यागार झाडीच्या कोंदणात लपून अखंड ध्रोंधारत असलेल्या त्या नितांतसुंदर धबधब्याचं सौंदर्य अनुभवण्यासाठीच फक्त या रिझॉर्टची निर्मिती करण्यात आली आहे. बाकी आजूबाजूला जवळपास एकही हॉटेल नाही. फक्त हेच एक सुंदर रिझॉर्ट. बस्स.
रिझॉर्टच्या साईटवर हा आशियातील सर्वात मोठा धबधबा असल्याचं म्हणतात. खखोदेजा. आणि मोठा आहे की नाही ते माहित नाही पण सुंदर नक्कीच आहे.
इथे रहा आणि सकाळी डोळे उघडल्यापासून फक्त ते निसर्गाचं अद्भुत न्याहाळा. अगदी रात्री झोपल्यावरही तो आवाज कानात गुंजत राहतोच.
रिझॉर्टची रचनाच अशी की सर्व खोल्यांमधून समोरच धबधबा दिसावा. वरच्या पातळीवर असलेल्या रीसेप्शन आणि रेस्टॉरंटसमोर तर छानपैकी लॉन आहे. त्याच्या रेलिंगवर रेलून तासनतास धबधबा बघत बसून रहा. रात्री तिथे टेबल मांडून कँडल लाईट डिनरही घेता येतं.
हा रुममधून दिसणारा :
आणि हा त्या रूमच्या भल्यामोठ्या बाथरूममधिल जाकुझीत बसून बघता येण्यासारखा :
रिझॉर्टमधीलच दुसर्या एका रूममधून :
रिसेप्शन आणि रेस्टॉरंट :
जरा उजवीकडे वळूयात :
पुन्हा एकदा उजवीकडे वळलात तर समोर दिसेलच :
दुसर्या दिवशी सकाळी रिझॉर्टचा माणूस बरोबर घेऊन आम्ही धबधबा जवळून बघण्याच्या मिषानं एक जंगल ट्रेलही करून आलो.
धबधब्याकडे जाण्याचा रस्ता :
समोर झाडीतून आलेली वाट चालून, हा प्रस्तर उतरून खाली आलो की समोरच नदी लागते आणि याच स्थळी ती कड्यावरून उडी मारते :
इथून समोर नजर टाकली तर झाडीत लपलेलं रिझॉर्ट दिसतं.
प्रस्तराच्या बाजूनं एक पायवाट उतरून आपल्याला धबधब्यापाशी अगदी जवळपर्यंत जाता येतं.
धबधबा मनसोक्त पाहून झाल्यावर खालूनच जंगलातील पायवाटेनं रिझॉर्टवर परत आलो.
या रिसॉर्टमध्ये ट्रीहाऊसही आहे. पण त्याकरता बरंच आधी बुकिंग करावं लागेल. जमलं तर नक्की जा.
**************************************************************************************************
खास लोकाग्रहास्तव माहितीत भर घालत आहे.
ऑक्टोबर २०१२ ला आम्ही केरळची ट्रीप केली. मुन्नार, अथिरापल्ली आणि कोची ही ठिकाणं निवडली. तीनही ठिकाणची बुकिंग्ज नेटवरून सर्च करून केली. मुंबईहून फोनवरूनच कोची एअरपोर्टपासून एक कार विथ ड्रायव्हर रेंट केली होती. तो पूर्ण ट्रीपभर आमच्याबरोबर होता. त्यामुळे डोक्याला त्रास नव्हता. नशिबानं ड्रायव्हरही चांगला होता.
अथिरापल्लीला ट्री हाउसमध्ये राहण्याची खूप इच्छा होती. पण ते ऑलरेडी बुक्ड होते. पण तोवर मनात ट्रीहाऊसची हौस दाटून आली होती म्हणून मुन्नार बाहेर एक एलि एकोफ्रेंडली रिझॉर्टमध्ये ट्रीहाऊस बुक केले. पहिल्या रात्री ते उपलब्ध नव्हते म्हणून एक रात्र त्यांच्या साध्या रुममध्ये काढली. ती एक खरंतर अगदी छोट्याश्या टेकटीवरची छोटीशी खोपटीच होती. शेजारूनच एक सुरेख झरा वाहत होता. मला तर जामच आवडली. आतमध्ये अगदी बेसिक गोष्टी. पण बुकिंगच्या वेळी मॅनेजरनं या सगळ्याची व्यवस्थित कल्पना दिली होती. त्यामुळे आम्ही ओके होतो.
पण हाय रे दैवा, रात्री नवर्याच्या पायावर एक जळू चढली. मग त्या झोपडीवरचं माझं मन उडालंच. लेक तर पहिल्यापासून कुरकुरत होतीच तिला आणखी स्फुरण चढलं.
दुसर्या दिवशी ब्रेफानंतर ट्रीहाऊस रिकामं झाल्यावर आम्ही त्याची पहाणी केली आणि एकूण स्वच्छता पाहता अजून एक रात्रं इथं घालवणं शक्य नाही या मतावर एकमत झालं. पैसे परत मिळणार नव्हते. त्यामुळे ते तसेच सोडून मुन्नारला आयत्यावेळी क्लब महिंद्र मध्ये राहिलो. त्यांनी तर स्वतःहून अपडेट करून एक भलामोठा सुईट दिला.
पण त्या इकोफ्रेंडली रिझॉर्टमध्ये खाल्लेली केरळी चिकन करी आणि भात आणि दुसर्या दिवशी ब्रेकफास्टला खाल्लेलं पुट्टु आणि कडला करी जन्मात विसरता येणार नाही. इतकी अस्सल आणि रोबस्ट चव होती त्या दोन्ही पदार्थांना.
कोचीला बोटहाऊसचंही मुंबईहून आधीच बुकिंग करून टाकलं होतं. बोटहाऊसमधून फेरी मारताना छान वाटतं पण रात्रं काढणं जरा बोअरच झालं. एका किनार्याला लावून ठेवतात. तिथे डास असतात वगैरे मुळे थोडा हिरमोड झाला.
अथिरापल्लीला दोन रात्री खूप झाल्या. मुन्नारहून अथिरापल्लीच्या वाटेवर एक स्पाईस गार्डन लागते ती बघता येईल. जेवण रिझॉर्टमध्ये चांगले होते. आणि धबधब्याच्या वाटेवर ७-८ छोटी छोटी रेस्टॉरंटस आहेत तेथे एकदा लंच घेतलं - लोकल जेवण जेवायचं होतं म्हणून. ते ही चांगलं होतं.
काही फोटो नंतर अॅड करते.
जबरी!!! सॉलीडच आहे
जबरी!!! सॉलीडच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच लोकेशन, फोटो पण झकास
मस्तच लोकेशन, फोटो पण झकास आलेत.
आहाहा... पारणं फिटलं
आहाहा... पारणं फिटलं डोळ्यांंचं ..मामी धन्यवाद ग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम फोटो!! कुठून एकेक
अप्रतिम फोटो!!
कुठून एकेक ठिकाणं शोधून काढतेस गं.. कन्सल्टन्सी चालू कर बरं तुझी..
अथिरापल्लीला तुम्ही कसे गेलात, बाकी प्रवासाची व्यवस्था काय आहे, जेवण कसं काय, या रिसॉर्टला किती दिवस राहावं, अजून जवळची ठिकाणं कुठली घेता येतील वगैरे माहितीची पण भर घाल लेखात.
सुंदर मंजूडी + १००
सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंजूडी + १००
मस्त!
मस्त!
जबरी फोटो !!! मस्त वाटतं आहे
जबरी फोटो !!! मस्त वाटतं आहे ठिकाण.
अस वाटतय आता उडुन तिकड जाव..
अस वाटतय आता उडुन तिकड जाव.. सुपर्ब..मस्त आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसला अद्भुत नजारा आहे. वाव..
कसला अद्भुत नजारा आहे. वाव.. मामे तु खरेच लकी की तु असल्या ठिकाणी जातेस आणि तुझ्यासोबत आम्हीही लकी... तुझ्यामुळे असल्या जागा आहेत हे क़ळते..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धबधबा पाहुन गोकाकच्या धबधब्याची आठवण झाली. तोही असाच आहे.
अथिरापल्लीला तुम्ही कसे
अथिरापल्लीला तुम्ही कसे गेलात, बाकी प्रवासाची व्यवस्था काय आहे, जेवण कसं काय, या रिसॉर्टला किती दिवस राहावं, अजून जवळची ठिकाणं कुठली घेता येतील वगैरे माहितीची पण भर घाल लेखात. >> +१
मी पण हेचं विचारणार होते.
अथिरापल्लीला तुम्ही कसे
अथिरापल्लीला तुम्ही कसे गेलात, बाकी प्रवासाची व्यवस्था काय आहे, जेवण कसं काय, या रिसॉर्टला किती दिवस राहावं, अजून जवळची ठिकाणं कुठली घेता येतील वगैरे माहितीची पण भर घाल लेखात.
>>> ओके. लिहिते थोड्याच वेळात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
what about food??? >>>
what about food??? >>> वर्षुताई, रिझॉर्टमध्ये फुड चांगले होते. उत्कृष्ट नाही म्हणता येणार पण ठीक होते. मला आणि नवर्याला साउथ इंडियन फूड प्रचंड आवडतं. मला तर केरळीय जेवण अतिशय प्रिय. त्यामुळे नो प्रॉब्लेम.
अहाहा, कसलं भारी असेल ते रिसॉर्ट. >>> आडो, रिझॉर्ट छान आहे. पण अगदी अल्टिमेट वगैरे नाही. रुम्स मोठ्या, आणि दगडी वगैरे आहेत. रिझॉर्ट मध्ये बाकी काही त्यात फॅसिलिटी नाहीत. एक टिव्ही आणि इन्डोअर गेम्स करता रुम आहे. छोटा स्विमिंग पूल आम्ही गेलो त्यावेळी बंदच होता. पण लोकेशन करता १०० पैकी १०० मार्कं. आणि फक्त धबधब्याचे नखरे बघायला जायचं. ट्री-हाउस मिळाले तर सोन्याहून पिवळे. एक एक्झॉटिक एक्स्पिरियन्स मिळेल.
हम्म नेटवर टॅरिफ १२५०० एका
हम्म नेटवर टॅरिफ १२५०० एका रात्रीचे दिलेत ज्यात बहुतेक एक जोडपे आणि सहा वर्षाखालील मुल इतकी मंडळी असतील. तरीही काही फॅसिलिटीज नाहीत??..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा! मस्तच आहे!
वा! मस्तच आहे!
वाह! किती सुंदर ठिकाण आहे.
वाह! किती सुंदर ठिकाण आहे. स्वर्ग याहून वेगळा असेल असं वाटत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामे, आथिरापल्ली नाही गं -
मामे, आथिरापल्ली नाही गं - आद्रपल्ली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी गेलेले तेंव्हाही तिथे शूटींग चालू होतं कशाचं तरी ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मीही जाऊन आलेय इथे
मस्त आहे हा धबधबा
या धबधब्यात लोकांना जाऊ देत नाहीत म्हणून बरं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मणिरत्नमच्या 'रावण' मधे आहे हा धबधबा. बरसो रे गाण्यामधे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माम्ये बरीच फिरतीयेस कि ग तू.
माम्ये बरीच फिरतीयेस कि ग तू. फोटोज सुरेख .
बोटहाऊस ला बोर होत का ? डासांमुळे?
माहिती पण मस्तच मस्त
भर आवडली .धन्यवाद
भर आवडली .धन्यवाद
सुंदर फोटोज. काय मस्त रचना
सुंदर फोटोज.
काय मस्त रचना आहे त्या रीसॉर्टची. धबधबाही सुंदर. पावसाळ्यात अजून रौद्र रुप दिसत असेल नाही ?
मस्त मामी. कुठुन शोध लागतो
मस्त मामी. कुठुन शोध लागतो तुला असल्या खास जागांचा? खूप छान फोटो.
मस्त जागा. छान फोटो. साईटवर
मस्त जागा. छान फोटो.
साईटवर ट्री हाऊसमध्ये दोनच लोकं राहू शकतात असं लिहिलंय म्हणजे मामीने "द्राक्ष आबंट" म्हटलं तरी चालेल. मामे, तुला अजिबात कोल्हा बिल्हा म्हटलं नाहीये हे नोटच कर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुट्टु (की पुट्ट?) बद्दल बरंच कौतुक ऐकलंय. (तेच ते नागपुरी स्टाइलमध्ये म्हणतात नं "या कधी आमच्या नागपुरला..वाळ्यागिळ्याचे तट्टे लावू..यंव नी त्यंव ;)) तसं कधी कुणी प्रत्यक्ष करून घातलं नाहिये.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वेका, पुट्टु म्हणजे काय हे
वेका, पुट्टु म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असल्यास आधी रारंगढांग वाचणे आणि मगच केरळा ट्रिप करणे. नाहीतर नुसत्या पुट्टुकरता एवढा खर्च वाया गेला असं वाटायला नको.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरे देवा इतका अभ्यास
अरे देवा इतका अभ्यास (पुट्टूसाठी??) सायो, दीपवाल्यांना सांग की आमच्यासाठि एक फ्रोजन सँम्पल बनवायला![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कोणाला केरळ ट्रीप, रिसॉर्ट
कोणाला केरळ ट्रीप, रिसॉर्ट बद्दल माहिती हवी असेल तर मी दिलेल्या लिन्कमधल्या बाईंना (इंद्रायणी) संपर्कातुन विचारल्यास त्या सांगू शकतील. सद्ध्या माबो पहात नसल्याने त्यांना विपु केली तरी कळणार नाही.
http://www.maayboli.com/user/35766
वॉव. मामी तू म्हणजे माबोची
वॉव. मामी तू म्हणजे माबोची TripAdvisor आहेस. Consultancy सुरू कर एक.
ठिकाण एकदम मस्त आहे. फोटो तर भारीच.
मामी आम्ही ह्या वर्षी केरळ
मामी आम्ही ह्या वर्षी केरळ ला गेलो होतो ...पण आता हा धबधबा बघायला परत जावे लागणार !
मस्त लोकेशन आणि फोटो एकदम भारी !!
लोकेशन भन्नाट आहे. मला वाटतं
लोकेशन भन्नाट आहे. मला वाटतं रोजा मधलं 'दिल है छोटासा' च शुटिंगही इथेच झालं असावं.
मामी... Consultancy मनावर घ्या.
मला नाही आवडलं पुट्टं
मला नाही आवडलं पुट्टं![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
जबरदस्त टिकाण
जबरदस्त टिकाण आहे.
कोचीन-चालकुडी-अथिरापल्ली.
मी भर जुलै-ऑगस्ट मधे गेलो होतो दोनदा. अथिरापल्लीच्या ७/८ किमी पुढे गेलात तर दुसरा अप्रतिम धबधबा आहे. वाल्राचाल(आपले उच्चार वाराचाल). दोन्ही लोकेशन सहीच आहेत. माझ्या सुदैवाने अथिरा पल्लीला शुटींग चालु होते पण ते यंडु गुंडु ... त्यामुळे टेन्शन इल्ला.तिथेच मला शेकरु पहावयास मिळाला होता. जमल्यास फोटो टाकतो.
मस्त ! फोटो पाहुनच तॄप्त
मस्त ! फोटो पाहुनच तॄप्त व्हायला होतं तर प्रत्यक्श तिथे गेल्यावर काय?
Pages