यांचं काय करायचं ? (इलेकट्रॉनिक्स )

Submitted by Srd on 9 August, 2014 - 23:55

आपल्याकडे मोबाईल आले आणि गजराची घड्याळे ,रेडिओ ,सीडी /टेप रेकॉर्डर प्लेअर कैसेटसह ,फिल्म कैमेरे ,एनसायक्लोपिडिआ पुस्तकांचा संच हे सर्वच बाद झाले . नवीन पिढीकडे या गोष्टी नसणारच परंतू ज्यांच्याकडे आहेत त्यांना प्रश्न पडतो यांचे काय करायचे ?विकायला गेलो तर कोणी घेत नाही .

माझ्याकडे टेप होता त्याच्या स्पिकरला थेट वायर जोडून बाहेर काढली आणि ३.५एमेम इअरफोन ची पिन जोडली.टिव्हीच्या आतली स्पिकरची वायर तोडून त्यामध्ये हेडफोन सॉकेट लावले .या सॉकेटमध्ये टेप जोडला की त्यात आवाज येतो आणि समोरच्या सोफ्यावर बसून टिव्हीचा आवाज कमी ठेवून कार्यक्रम ऐकता येतात .वायर काढली की टिव्हीचा स्पिकर चालू होतो .

मोठ्या आठ वॉटच्या रेडिओमध्ये एफ एम नव्हते .त्याला छोटा दहा बैंडचा किचिबोचा ट्रानझिस्टर जोडून तोही छान चालतो .फक्त ब्लूटुथ अडेप्टर मिळतो का ?

आता मोबाईलच्या कैमऱ्याला जुनी टेलिफोटो लेन्स लावायचा अडेप्टर आला तर त्या लेन्सीज वापरता येतील .
इमर्जन्सी लैंपला ६ वोल्टस आउटचे सॉकेट लावून ते वापरता येते .
तुमच्याकडे काही युक्त्या आहेत का ?

१)टोपी

२)

३)जुन्या टेपचा वापर

४)रेडिओ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्यायला त्या डबड्या वस्तुच्या बदल्यात कोर्‍या नोटा त्याही पुषकळ कशा मिळतात.....?

शिरूभाऊ,
हाय! लै दिवसांनी दिसले.
आपली रद्दी लोकाचा रॅपिंग पेपर असू शकतो. Wink
शिवाय भंगार झाल्याशिवाय कुणी कशाला विकेल? Proud

ओके. आता धागाविषयाला धरून आमची रिक्षा.

एक जुगाड माझ्याकडूनः

कारटेपला एमपी-३ प्लेयर जोडता येतो.

- एक जुनी कॅसेट घेऊन ती उघडून त्यातील सर्व रिळ बाहेर काढा.
- टेपचा एक रीड-राईट हेड घ्या आणि त्याला दिलेल्या कनेक्शनला वायर सोल्डर करा.
- सोल्डर केलेला हेड कॅसेटमध्ये वरच्या दिशेला येईल असा फिट करा आणि त्याच्या सोल्डर केलेल्या वायर्सला ऑडियो जॅक जोडा.
- अशा प्रकारे तयार केलेली कॅसेट कारटेपमध्ये घाला आणि ऑडियो जॅक एमपी-३ प्लेयरला जोडा.
- आणि एमपी-३ प्लेयरची गाणी कारटेपवर वाजवा..

फोटो नसल्याने जास्त माहिती देऊ शकत नाही.

सरळ कार टेपच्या हेडलाच ऑडिओ जॅक सोल्डर केला तर काय होईल? तुमची आयडिया फक्त टेपचा अ‍ॅम्प्लीफायर वापरायचा अशीच आहे ना?

*

srd,

धन्यवाद!

यापेक्षा उरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचे फर्निचर किंवा मग भिंती बनवून घर बांधणे सोपे आहे मला.. Wink

कारटेप मध्ये टाकायला डायरेक्ट कॅसेट मिळते.. ३.५ च्या जॅकची वायर लावलेली.. ती टाकली की कारटेप मध्ये कुठलेही डिव्हाईस जोडून गाणी ऐकू शकता..

कारटेप बदला आणि नविन सिडी डिव्हीडी प्लेअर घ्या....... ६ लाखाची कार वापरायची आणि २००० रुपये वाचवण्यासाठी ५० रुपायची कॅसेट घ्यायची..... Biggrin

इब्लिसशेठ, तुम्ही चुकताय.. मी कारटेप मधले पूर्ण फंक्शन वापरतोय अ‍ॅम्प्लिफायरसहित..

उदयन, कारटेपचा आवाज आणि नविन सीडी प्लेयरचा आवाज यात खूपच फरक आहे.

मी फक्त जुगाड सांगितला आहे.

जी गोष्ट चालू आहे ती वापरात ठेवायची अथवा त्याचा उपयोग आणखी वाढवायचा उद्देश आहे .नवीन कारमध्ये मुद्दामहून जुगाड नाही करायचा .
बऱ्याचवेळा हेडफोन चालत नाहीत .तेसुध्दा चालू करतो .वायर वळून आत तुटते ती बदलायची .रिपेरवाले हे करत नाहीत .कित्येक जण इलेक्ट्रॉनिक्स शिकले आहेत त्यांना हौशिने काही करता येईल .

आमच्याकडे पोराच्या बर्‍याच सेलवर चालणार्‍या खेळण्यांना जुने मोबाइल चार्जर जोडले होते. (उदा: सेलवाली गिटार+ कॅसिओ, एबीसीडी, स्पेलींग्ज, अंक इ शिकवणारा टॅबलेट सारखं खेळणं, छोट्याछोट्या कार्सचा ट्रॅक्सवर चालणारा खेळ असतो तसले गेम्स).
आता पोरगा रिमोटवाल्या गाड्या वापरतोय. त्यांना हे चार्जर लावता येत नाहीत. Sad

कुशल व्यक्ती यातून स्वयंरोजगार निर्माण करू शकते.. असे सहजच वाटले

माझ्याकडे एक टोपी आहे .एका नातेवाईकाने परदेशातून आणली होती .याला वरच्या बाजूस एक सोलर पैनेल आहे त्याचे कनेक्शन कपाळावरच्या फ्लैपमधल्या छोट्या पंख्याला जोडले आहे .उन्हात टोपी घालून फिरताना पंखा चालतो आणि घाम येत नाही .२०००सालापासून चालू स्थितीत आहे .त्यावेळी मोबाईल नव्हते .आता त्यावर मोबाईल चार्ज करता येईल का ?कृपया जाणकारांनी सांगावे .

१)टोपी
१

२)
२

शरद, ते सोलार पॅनेल किती व्होल्ट देते, त्यावर अवलंबून आहे. चार्जरला ५ व्होल्ट ची आवश्यकता असते..

चार्जरला ५ व्होल्ट ची आवश्यकता असते..>> चार्जिंगकरता करंट देखिल तितकाच महत्वाचा आहे.

होय मोबाईलची बैटरी ३.७ व्होल्टची असली तरी चार्जर चे थोडे जास्त असले पाहिजे .शिवाय प्लस मायनसचा घोळ आहेच .परंतू हा जुगाड अंगलट येऊन मोबाईलने राम नाम सत्य म्हणायला नको या भीतीने जोडले नाही .एक दिवशी मार्ग निघेल आणि ट्रेकिंगला गेलो की आपला मोबाईल बंद नाही पडणार .
हिम्सकूल ,या टेपचा स्पिकर अफलातून आहे .आणखी एक रेडिओलापण असेच केले आहे .

Pages