हा एक वेगळ्याच चवीचा पराठा आहे. पेशावरी असल्याने त्यात मुबलक सुका मेवा आहे पण त्या त्या प्रदेशात तेथील उपलब्धतेनुसार पदार्थ केले जातात.
खरे तर नानसारखे भिजवून मग सारण भरतात. पण यीस्ट नसेल तर मी असा करून पाहिला व छान लागला. तुम्हाला नान सारखे पीठ भिजवून करायचे असेल तर करु शकता.
बडीशेप, लवंग, सुका मेवा ह्याची अप्रतिम चव लागते. करून पहा.
पराठ्याची पारी: २ वाट्या कणीक, २ चमचे वस्त्रगाळ दही, छोटा चमचा साजुक तूप, चवीला मीठ, पाव चमचा लिंबू रस(त्यापेक्षा अजिबात ज्यास्त नाही घ्यायचा),पाव चमचा साखर जर आवडत असेल तर.
पेशावरी पराठा मसाला: एक मोठा चमचा बडीशेप(लखनौ वाली बारीक मिळाली तर छान), पाव चमचा जीरं, १-२ लवंगा, १ बडी वेलची, २-३ चहा वेलची, लहान पेर दालचिनी तुकडा, एकच स्टारफूल, सर्व छान परतून वस्त्रगाळ पूड.
पराठा स्टफींगः ३ चमचे बिनमीठाचे पिस्ते, २ चमचे बदाम, १ चमचा अक्रोड, २ चमचे सोनेरी बेदाणे/सुलतान, १ चमचा सुकं खोबरे,३-४ केसर काड्या,पाव चमचा कलींगडाच्या बीया, हे सर्व जरावेळ परतून घेवून मग थंड झाल्यावर वाटले की त्यात पुन्हा १ हिरवी मिरची, पाव चमचा लिंबू रस, वरील पराठा मसाला(एक मोठे चमचा) घालावे व लाडू वळून झाकून ठेवावे. नट्स मधील तेलाने वे बेदाणेमुळे ते पटकन वळले जातात.
घरी पुन्हा करेन तेव्हा फोटो टाकेनच.
पारी: कणीकेत सर्व साहित्य मध्ये खोलगट करून हळू हळू टाकून घट्ट भिजवायची. जर लागलेच तर कोमट दूध घालायचे. पण एकदम घट्ट भिजवायची व झाकून ठेवायची.
पुन्हा अर्धा तासाने छान मळून घ्यायची. अगदी रगडून रगडून..
रोजच्या सारखे सारण भरून लाटून घ्यायचे व भाजून घ्यावे. तव्यावरून काढला की घट्ट गोड दह्याबरोबर नाहीतर तिखट-गोड लोणच्याबरोबर खावा. ह्याचा स्वाद खूप सुरेख लागतो.
पराठा तसा हेवी वाटला तरी थंडीत एखाद दिवशी खायला काही हरकत नाही. योग्य त्या प्रमाणात नट्स पोटात जातील. पावसाळ्यात सुद्धा खायला हरकत नाही आणि रोज रोज असे पराठे थोडीच ना आपण मराठी माणसं करतो.
१. मेवा बारीक वाटावा, लाटताना फाटन नाही.
२.दही आंबट घेवु नये. अधंमुरं असेल तर उत्तम.
३.हिरवी मिरची नसेल घालायची तर वगळू शकता. माझ्या अनुभवाप्रमाणे गोड, तिखट चव मस्त लागते.
४.लिंबू रस कणीकेत घातल्याने खुसखुशीतपणा येतो.
५.खरे तर नानसारखे भिजवून मग सारण भरतात. पण यीस्ट नसेल तर मी असा करून पाहिला व छान लागला. तुम्हाला नान सारखे पीठ भिजवून करायचे असेल तर करु शकता.
मस्तच वाटतोय. छान लागत असेल
मस्तच वाटतोय. छान लागत असेल अस वाटतय. करुन बघीन नक्की.
मनीमोहोर, धन्यवाद. हो खूप
मनीमोहोर,
धन्यवाद.
हो खूप मस्त लागतो. लिंबाच्या गोड लोणच्याबरोबर किंवा मिक्स भाजी लोणच्याबरोबर मस्त लागतो.
मस्तच वाटतोय. छान लागत असेल
मस्तच वाटतोय. छान लागत असेल अस वाटतय. करुन बघीन नक्की.
आ॑हे घरी सगळे साहित्य.. करून
आ॑हे घरी सगळे साहित्य.. करून बघीन रविवारी !
व्वा . मस्त
व्वा . मस्त वाटतेय.............. पण मी करेन का माहित नाहि ??
भारी वाटतोय , पण .....
भारी वाटतोय , पण .....
छान प्रकार
छान प्रकार
छानच....
छानच....