डॉ दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट चा वापर केला म्हणुन अंनिसने गुन्हा दाखल करणे योग्य कि अयोग्य?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 11 July, 2014 - 23:47

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात "प्लॅंचेट‘चे माध्यम वापरल्याची चौकशी व्हावी व असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. हा पहा संदर्भ
दैनिक सकाळ बातमी
आपल्याला या अंनिसच्या भुमिकेबद्दल काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके. तुम्ही दाभोळकरांच्या भूमिकेला पाठिंबा आहे का या प्रश्नाला कृष्ण धवल च्या पलिकडे असं पुन्हा मोघम उत्तर दिलं आहे. म्हणजे तुमची भूमिका थोडीशी वेगळी आहे हे तर मान्य ना ? माझं म्हणणं इतकंच की स्पष्ट भूमिका घेतल्यास बरं राहील.

प्लॅंचेट अस्तित्वात आहे किंवा प्लॅंचेट अस्तित्वात नाही याशिवाय आणखी एखादी शक्यता सांगता येऊ शकेल का ?
---- या व वरच्या बहुतेक पोस्ट मधे स्वर्णसुंदरी यान्नी व्यक्त केलेल्या मताशी सहमत, रास्त अपेक्षा आहेत... "अभ्यास वाढवा" हे वाचल्यावर माझी अजुनच द्विधा स्थिती झाली. नक्की काय म्हणायचे आहे हे समजत नव्हते आणि मी स्वत:ला या विषयातले कळत नाही म्हणुन दोष देत आहे.

महाराष्ट्रातल्या पोलिस खात्यात काम करणारे लोक हे आपल्या मधुनच गेलेले असतात. पोलिस खात्यात काम करणार्‍या सर्वान्चेच शिक्षण, वैचारिक बैठक आणि मिळालेले प्रशिक्षण हे विज्ञानावर आधारित असणे (आज) अशक्य आहे.

माझ्या पुरते आत्मा, पुनः जन्म, प्लॅन्चेट आदी अमान्य आहे.

मी इंजिनीयरींगला असताना आमचे प्रोफेसर म्हणायचे - प्रयोगशाळेत लोखंडापासुन सोने बनवणे शक्य आहे पण कदाचित १० ग्रॅम सोन्याला ह्या कामी १० लाख रुपये लागतील. इंजिनियरींग ही विज्ञानाची प्रगत शाखा आहे ज्यात या प्र्योगाचे व्यावसायईकीकरण करण करणे अपेक्षीत आहे.
------ थोडा गैरसमज होणे शक्य आहे असे वाटते म्हणुन खुलासा....
'लोखंडापासुन सोने बनवणे शक्य आहे' प्रक्रिया काय आहे?
http://en.wikipedia.org/wiki/Nuclear_transmutation

याच विचाराला थोडे ताणले तर "हवेमधुन सोन्याची अन्गठी काढलेली मी स्वतः बघितली..., त्यानी भक्ताच्या हातात सोन्याचे अन्गठी दिलेली मी बघितली आहे..."... असले भम्पक, बोगस क्लेम एकायला मिळतात. आणि हे प्रकार आजही २०१४ मधे एकायला मिळतात... हे सर्व प्रकार निव्वळ हातचलाखी असते. काहीच नसताना, काही निर्माण होणे निव्वळ अशक्य आहे. चिन्तेची गोष्ट ह्या प्रकारान्वर केवळ अशिक्षीत नाही तर शिकलेली, मोठ्ठी मोठ्ठी पदवी असणारे पण भुलतात.

उदय,

>> याच विचाराला थोडे ताणले तर "हवेमधुन सोन्याची अन्गठी काढलेली मी स्वतः बघितली..., त्यानी भक्ताच्या
>> हातात सोन्याचे अन्गठी दिलेली मी बघितली आहे..."... असले भम्पक, बोगस क्लेम एकायला मिळतात.

या विचाराला ताणू नका. प्रत्यक्ष आयझॅक न्यूटनने लोहाचे सोने बनवणाऱ्या (वा तसा दावा करणाऱ्या) अल्केमी नामक शास्त्रावर लेखन केलं आहे. अधिक माहीतीसाठी (इंग्रजी दुवा) :
http://en.wikipedia.org/wiki/Isaac_Newton%27s_occult_studies

कुठलीही शक्यता मोडीत काढण्यापूर्वी ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे.

आ.न.,
-गा.पै.

>> "अभ्यास वाढवा" हे वाचल्यावर माझी अजुनच द्विधा स्थिती झाली. नक्की काय म्हणायचे आहे हे समजत नव्हते आणि मी स्वत:ला या विषयातले कळत नाही म्हणुन दोष देत आहे. <<
उदय,अहो तो जालीय अभ्यास वाढवा असा कॅज्यअल सल्ला मी दिला आहे.तो फार गांभीर्याने घेउ नका.कुणाचाच अभ्यास परिपूर्ण नसतो. बाकी प्लँचेट या प्रकारात तथ्य असू शकते का? असा विषय घेतला तर मनोरंजक होईल.

अंनिसचे विजय भटकरांना आव्हान!
वाचा
http://www.ibnlokmat.tv/archives/131921

http://abpmajha.abplive.in/pune/2014/08/02/article373667.ece/ANSs-challe...
आमचे भाकित- विजय भटकर आव्हान स्वीकारणार नाहीत. २१ लाखांसाठी कुणी एवढा आटापिटा करायला सांगितलाय?

Pages