कायद्याची माहिती असेल तर कृपया आपली मते इथे मांडा.

Submitted by मिश्कील on 23 July, 2014 - 02:15

माझ्या एका ओळखीच्या नातेवाईक इसमाने ज्याच नाव सुरेश आहे त्याने दोन वर्षपूर्वी एका गृहस्थाला काही पैसे दिले होते. आणि आता ते सुरेशला परत हवे आहेत तर तो गृहस्त आज देतो उद्या देतो अस बोलतो. सुरेश त्याला एक दिवस आड सतत फोन करतो. आता त्या गृहस्ताने सुरेशची पोलिस कम्प्लेट केली आहे कि सुरेश सतत मला फोन करून पैसे मागत असतो , माझी मेंटल हर्यस्मेण्ट करतो आणि त्याने मला आणि माझ्या कुटुंबाला आत्म्हतेस प्रवृत्त केले आहे अश्या पद्धतीचा गुन्हा त्याने सुरेश विरुद्ध दाखल केला आहे तर अश्यावेळेस सुरेशने काय कराव त्याच्या कडे काहीच प्रूफ नाहीये कि त्याने त्या गृहस्थाला पैसे दिलेत . कृपया कुणाला कायद्याची माहिती असेल तर आपली मते मांडा ...

आत्ताची परिस्थिती

सुरेश ने वकील केला . केस अजूनही चालू आहे . आता पैसे घेणारा माणूस केस मागे घेण्यासाठी सुरेशच्या हातापाया पडतोय पण सुरेश ऐकत नाहीये सुरेशकडे प्रूफ म्हणून त्याने सुरेशला केलेले एस.मेस आहेत त्यात त्याने मी पैसे कधी देऊ शकतो हे दिसतंय पण त्याने कधीही सांगितलेल्या वेळेला पैसे दिले नाहीत असे सुरेश कडे त्याचे १०-१२ मेसेज असतील.
पण आता झालाय काय खरच पैसे घेणारा हतबल झालाय सुरेश केस मागे घेत नाही म्हणून परागंदा झालाय आणि तिकडून तो सुरेशला फोन करून तू केस मागे घेतली नाहीस तर मी आता खरोखर आत्महत्या करेल आणि त्यात तुला अडकवेल.
अश्या वेळेस सुरेशने काय कराव.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेशने पैसे देताना काय म्हणून दिले आणि त्यासाठी कागदपत्रे केली का आणि केलीच असतील तर ती कायदेशीर आहेत का ? ते पहा त्यानंतरच थोडीफार शक्यता आहे.
केवळ मैत्रीखातर किंवा उधार दिलेल्या स्वरुपातील केस न्यायालयात टाकून फक्त निराशा पदरी पडेल.

अश्यावेळेस सुरेशने काय कराव त्याच्या कडे काहीच प्रूफ नाहीये कि त्याने त्या गृहस्थाला पैसे दिलेत
>>

काहीही प्रूफ नाही म्हनजे सुरेशने त्याला पैसे दिलेले नाहीत असा त्याचा कायदेशीर अर्थ होतो. त्याने खरोखरच आत्महत्या केली तर मात्र सुरेश विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो पण तो सिद्ध होइलच असे नाही. तो पर्यन्त नुसते फोन करून तगादा करणे हे काही मेन्टल अब्यूज होऊ शकत नाही.मात्र फोनवरून धमक्या देणे होउ शकेल.

फोन करुन तगादा लावण्यापेक्षा रजिस्टर्ड पत्र पाठवावे. म्हणजे आपल्याकडेही पुरावा राहतो. अर्थात देवाण-घेवाणीचा काही करारनामा केला असेल तरच याला अर्थ आहे. अन्यथा हूड म्हणतात तसेच... अक्कलखात्यात जमा करावेत.

कुणा अमक्यासमोर पैसे दिले असतील व तो त्रयस्थ व्यक्ती शपथेवर तसे सांगत असेल तर कदाचित थोडेफार वेटेज मिळू शकते.
तरीही, घेणारा, देणार्‍याने मला 'व्याजाने' पैसे दिले असे सांगून चोराच्या उलट्या मारून, गोंधळ घालूच शकतो. मोठी रक्कम असेल, तर शक्यतो कागदोपत्री व्यवहार करून, व चेकनेच द्यावी हे उत्तम. अनेकदा इन्कमट्याक्सला एंट्री म्हणून काही लाखांचे व्यवहार असे होतात. त्या साठी चेकनेच पैसे दिले/घेतले जातात.

रोबिन्हूड, इब्लिस, किरण कुमार आणि सडेतोड दीर्घ प्रतिसादाबद्दल खरच मनापासून धन्यवाद .
म्हणजे फक्त आत्महत्येला प्रवृत्त करण हा गुन्हा ठरत नाही म्हणजे सुरेशला शिक्षा होणार नाही त्याने ते पैसे अक्कलखात्यात जमा करावे असाच ना बाकी काहीही इशू नाही होणार् ना ?

म्हणजे फक्त आत्महत्येला प्रवृत्त करण हा गुन्हा आहेच! सुरेशने हवं तर पोलिस स्टेशन्ला जाऊन सांगावे की हा ईश्यु आहे व सदर व्यक्ती मला आत्महत्येची धमकी देत आहे, ज्याला मी जबाबदार नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणं हा गुन्हा आहेच त्यामुळे पोलिस त्या व्यक्तीची ’समजूत’ घालतील

पैसे दिल्याचा काहीच पुरावा नसेल तर विसरायचे... कुठल्याही प्रकारची लिखा पढी नसताना केलेले व्यावहार विसरण्यासाठीच असतात.

जेव्हढे पैसे दिले होते त्या किमतीत जगण्यासाठी अत्यन्त आवश्यक असा धडा शिकायला मिळाला असे म्हणायचे आणि मनाची समजुत काढायची...

सडेतोड सर्व बरोबर पण सुरेशला काही कल्पना न्हवती कि हा गृहस्त पोलीस कम्प्लेंट करेल जी त्या गृहस्ताने सुरेश विरुध्द केली आणि आत्महत्या करायला आपण त्या गृहस्ताला प्रवृत्त करत आहोत हे हि सुरेशला अजिबात वाटत न्हवते तो फक्त आपले पैसे मागत होता. आता already पोलीस कम्प्लेंट झाली आहे आणि सुरेश आता पोलिस केसला घाबरतो आहे कृपया मार्गदर्शन करा

ह्म. बहुतेक पोलीस समजावून सांगतील, असं करू नका. समोरच्या पार्टीचे हात फार पोचलेले नसतील तर फार मनस्ताप होऊ नये. उसने दिलेले पैसे परत मागत होतो हे तर सांगायलाच लागेल ना?

हे सगळं कायद्याच्या माहितीवर नाही, पण ऐकलेल्या प्रकरणांतून मिळालेले ज्ञानकण.

आत्महत्या वगैरे खरेच झाली तर मोठी केस झाली ती, किंवा नाही झाली तरी सुरेश आपल्याला मेंटली हॅरास करतोय हे त्या माणसाला सिद्ध करावे लागेल. नुसते फोन येताहेत नाही तर त्यात काय बोलणे झाले आणि त्या बोलण्याची रेकॉर्ड (हे असतात का कुठे सेव्ह?) पुरावा म्हणून लागेल. ज्यात मग त्या माणसाने पैसे घेतले होते हे सुद्धा काही संभाषणावरून समजेल.

सो एवढे काही प्रकरण जाणार नाही. तो माणूस पोचलेला नसेल तर पोलिसांना विश्वास पटवून त्या माणसाला दमात घ्या, पोलिस आपला खाक्या दाखवतील, उगलला तर उगलला. जर माणूस धीट असेल तर मात्र ती कोर्ट केस बनते म्हणत पोलिस हाथ मागे घेतील. आणि आपसात मांडवली करायला सांगतील, मग ते पैसे विसरणेच उत्तम.

तळटीप - कायद्याचे ज्ञान मला शून्य !

आता सुरेशला पोलिस हॅरॅस करायची शक्यता नाकारता येत नाही...मित्राला दिलेले पैसे गेले आहेतच आता कदाचित पोलिसही मगतील..कारण आत्महत्येला प्रवॄत्त करणे हा गंभीर गुन्हा आहे

कायदेशीर रित्या पैसे दिल्याचे काही प्रूफ नसल्यामुळे पैसे परत मिळणे जवळ जवळ अशक्य आहे.
जरी प्रूफ असते तरी सारखा फोन करुन पैसे मागणे ( जरी उधार दिले असले तरी ) हा कायद्याच्या दृष्टीने फौजदारी (Criminal) गुन्हा च आहे. त्यामुळे तुमच्या मित्रा ला ते आधी फोन करणे बंद करायला सांगा.

फक्त दिवाणी दावा दाखल करुन पैसे मागता येतील, पण प्रूफ नसल्या मुळे ते ही मिळणार नाहीत.

ह्या पुढे काय करावे.
१. आधी पैसे मागण्याचे फोन करणे बंद करावे.
२. पोलिसांना पटवून ती तक्रार बंद करावी. त्यासाठी अजुन पैसे द्यायला लागतील Sad
३. शहाणपणा शिकण्याची ती एक फी होती असे समजुन पैसे सोडुन द्यावे.

वरील सर्व प्रतिसादान्ना अनुमोदन.
या केस मधे पोलिसच बरीच काही कायदेशीर व कायदेबाह्य मदत करु शकतात.

तसेच >>>>> माझ्या एका ओळखीच्या नातेवाईक इसमाने ज्याच नाव सुरेश आहे त्याने दोन वर्षपूर्वी एका गृहस्थाला काही पैसे दिले होते. आणि <<<< केवळ इतक्या मजकुरावरुन इथे काहीही सल्ला/उपदेश देता येणार नाही.
पैसे का दिले होते ? व्याजी दिले होते? की सन्कटकाळी मदत म्हणुन? की व्यवसायात भागीदारी म्हणून? की अजुन काही कारणाने?
सुरेशने पैसे देण्याचे कारण कळल्याखेरीज त्यावर काहीही भाश्य करता येणार नाही, व त्याचा पैसे देण्याचा हेतूच जर व्याजी किन्वा तत्सम असेल तर तो अजुनच गोत्यात येईल.
पोलिस या हेतूची व इतर सर्व बाबीन्ची त्यान्च्या अनुभवी नजरेतुन्/तपासातुन शहानिशा करतातच.
पण त्यावरही जाहीर भाश्य करणे शक्य नाही.

पोलिसांनी अशी कितीशी मुदत दिलीय भेटून जायला? इथे लिहिल्यालाच आजचा चौथा दिवस आहे.
तुम्हाला माहिती मिळून तुम्ही लिहिण्यातही काही काळ गेला असेलच ना?