Submitted by पराग जोशी on 3 July, 2014 - 01:55
मी २७-ऑक्टो ते ७-नोव्हें स्विर्त्झलँड येथे वास्तव्यास असणार आहे. राहण्याची व्यवस्था माझ्या कं.तर्फ़े ज़ुरिक येथे करण्यात येणार आहे. माझी बायको आमच्या १० महीन्यांच्या मुलासोबत येण्यास इच्छुक आहे.
मला तिथे माझ्या मुलाच्या खाण्या-पिण्यासाठी काय मिळू शकेल? इथुन जाताना काय-काय नेता येईल? आम्ही शाकाहारी आहोत. मला कं.तर्फ़े सर्विस अपार्टमेंट (किचन असलेले) मिळणार आहे.
तसेच कार्यालयीन वेळेनंतर संध्याकळी व उपलब्ध एकमेव वीकेंड ला मी जवळपासची प्रेक्षणीय स्थळे पाहू इच्छितो. फ़िरण्याचा, माझ्या कुटूंबाचा राहण्याचा व खाण्या-पिण्याचा खर्च मला करावा लागणार आहे. साधारण किती खर्च येईल?
तरी कृपया कुणी मार्गदर्शन करेल काय? खाण्या-पिण्याबद्द्ल (आमच्या व लहान मुलाच्या) सविस्तर माहिती दिल्यास फ़ार बरे होईल. विशेषकरून मला माझ्या मुलाच्या खाण्या-पिण्याची काळजी वाटत आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कृपया कुणी लवकर मार्गदर्शन
कृपया कुणी लवकर मार्गदर्शन केल्यास फार मदत होइल, कारण मला माझा निर्णय २ दिवसांत माझ्या कं. ला कळवायचा आहे.
पराग, मी मुख्यत: धागा वर येउन
पराग, मी मुख्यत: धागा वर येउन कोणीतरी जाणकार लिहीतील म्हणून लिहीतोय. मला फारशी माहिती नाही.
जर जवळपास ग्रोसरीची दुकाने असतील तर लहान बाळाच्या खाण्यापिण्याचा काही प्रश्न येणार नाही. पण ८-१० दिवसांसाठी दूध व इतर खाण्याच्या चवीत बदल होणार. त्यावेळेस तेथे थंडी किती असते माहीत नाही. अमेरिकेपर्यंतच्या प्रवासाचा जेटलॅग लहान मुलांना ८-१० दिवस सहज राहतो. युरोपपर्यंतचा किती राहील माहीत नाही. दुसरे म्हणजे वीकडे मधे तू ऑफिसच्या कामात असताना तेथे बायको व मुलगा काय करणार याचाही विचार करून जा. स्वित्झर्लंडचे नीट माहीत नाही - काही इतर ठिकाणी थंडीत दिवसासुद्धा बाहेर फिरणे सोपे नसते.
तुमच्या मुलाच्या नेहमीच्या डॉ शी ही बोलून घे एकदा, बरोबर काय ठेवावे लागेल याबद्दल. एवढ्या लहान मुलाला घेऊन, केवळ ८-१० दिवसाची ट्रीप आहे, तीही थंडीत - या गोष्टी विचारात घेऊन ठरवा. जेथे राहणार तेथे तुमच्या कंपनीतील इतर लोक राहात असतील, आधी राहून आले असतील (विशेषतः मुलांना घेऊन) - असे कोणी आहेत का? ते काय म्हणतात?
फारएण्ड, प्रतिसाद
फारएण्ड,
प्रतिसाद दिल्याबद्द्ल धन्यवाद. मला अपेक्षा होती कि कुणीतरी पक्की माहिती सांगू शकेल. परंतु काही उत्तर मिळाले नाही अजुन. तरिही तुमच्या मुद्द्यांबद्द्ल धन्यवाद.
तुम्ही जात आहात त्या काळात
तुम्ही जात आहात त्या काळात टोकाची थंडी नसेल तरी थोडीफार असेल. जॅकेट घालून बाहेर हिंडावे लागेल पण बर्फ वगैरे पडत नसेल. स्वित्झर्लंडमध्ये विशेषतः झ्युरिकला तुम्हाला भरपूर किराणा दुकाने, भारतीय वस्तुंची दुकाने मिळतील. कसलीही गैर सोय होणार नाही. झुरिकमध्ये भरपूर भारतीय रेस्तराँ आहेत. तसेच तुम्हाला जागोजागी टर्किश-मिडल इस्टर्न खाण्याच्या जागा दिसतील (केबाब असे लिहिलेले असते). तिथे फलाफल नावाचा पदार्थ मिळतो - संपूर्ण शाकाहारी (डाळीचे वडे, कांदा-टोमॅटो-सॉस वगैरे पिटा ब्रेडमध्ये भरुन).
माझे मत आहे की तुम्ही आरामात जा, मजा करा.
रेल्वेपास घेउन तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये आरामात हिंडू शकाल. ट्रिपअॅड्वाइजरवगैरेवर वाचून तुम्हाला आवडतील असे अनेक जागा तुम्ही शोधू शकाल.
पराग.. तुम्ही जाणार आहे
पराग.. तुम्ही जाणार आहे तेव्हा तिथं बर्यापैकी थंडी असेल. शून्याच्या खाली जाणार नाही कदाचित पण भारतातल्या पेक्षा नक्कीच जास्त थंड असेल (३ ते १० अंश).
झुरीकमध्ये खायचा प्यायचा विशेष त्रास होणार नाही. भारतीय दुकाने आणि रेस्तराँ बरेच आहेत.शिवाय सुपर मार्केटस मधून तुम्हाला दूध, दही, भाज्या, ब्रेड हे सगळे मिळू शकेल. पण १० महिन्याच्या बाळासाठी जर काही विशेष लागणार असेल तर तिथं कोणि ओळखिचं(कंपनीतलं वगैरे) असेल तर आधी विचारून घेतलेलं बरं.
तुमच्याकडं एकच वीकेंड आहे. त्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमधे दिवस लहान होतो. त्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त २ ते ३ जागा बघता येतील (त्याही वीकेंडमध्ये). तुम्हाला तिथला २-३ दिवसांचा स्वीस पास घेता येइल जो ट्रेन्स, बस आणि बोटिंवर चालतो. स्वीस रेल्वेच्या वेबसाइटवर तुम्हाला माहिती मिळू शकेल.
स्वीस खूप महाग आहे शिवाय त्यावेळी बर्यापैकी थंडी असेल त्यामुळं फक्त २-३ दिवस फिरण्यासाठी एवढया लहान मुलाला घेउन जावं की नाही ते तुम्हीच ठरवा.
पराग, मी काही वर्षांपूर्वी
पराग, मी काही वर्षांपूर्वी स्वित्झर्लंडला गेले होते, जुलै महिन्यात. आम्ही गाडी रेंट केली होती.( तिथे अमेरिकन पद्ध्तीचे लेफ्ट हॅन्ड ड्राइव्ह आहे.) त्यामुळे तेथील पब्लिक ट्रान्सपोर्टची कल्पना नाही. २-३ महत्वाच्या प्रेक्षणीय जागा आल्प्समधे खूप ऊंचीवर आहेत, जिथे बारा महिने बर्फ असतो. आणि तुम्हीतर थंडीच्या तोंडावर चालला आहात. तेव्हा गरम कपड्यांची व्यवस्था प्रामुख्याने करावी लागेल. पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था चांगली असेल तरीही पायी चालणे बरेच होईल, तेही थंडीत व छोट्या बाळाला घेऊन.
आम्ही ग्रोसरीतून ब्रेड, बटर, चीज, फळं व इतर काही तयार खाद्यपदार्थ आणून ब्रेफा करत असू. लंच जिथे जावू तिथे.
तुम्ही कार रेंट करणार नसाल तर तुमच्या उपलब्ध वेळात दगदगच जास्त होईल असं वाटतं.
आणखी काही प्रश्न असतील तर जरुर विचारा.
थंडी बर्यापैकी असेल झुरिकला.
थंडी बर्यापैकी असेल झुरिकला. (मला झुरिक ट्रेन स्टेशन मधे ऑक्टोबर २३/२४ ला लोअर लेवलची (underground) एक प्रकारची हाडात जाणारी थंडी चांगली आठवतेय - तेव्हा बाहेर नॉर्मल थंडी होती).
झुरिक मधे बस्/ट्राम इ. ची खूप चांगली सोय आहे. पण बाळाला घेऊन कितपत सोयीचं होइल याची कल्पना नाही. झुरिकचा तलाव फार सुंदर आहे. नुसतं तासन् तास बसू शकतो :). तुम्ही जाताय त्या काळात बोटिंग अगदी तुरळक ठिकाणी चालू असतं. tripadvisor खरंच अतिशय उपयुक्त साइट आहे - तिथे खूप चांगले सल्ले मिळतात. (तुम्ही बाळ/ लिमिटेड दिवस/ प्रवासाच्या तारखा वगैरे लिहिलंत तर लोक अगदी चांगली माहिती देतील.)
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांना.
ट्ण्या,
धन्यवाद.
फ़लाफ़ल
मनीष,
--->स्वीस खूप महाग आहे शिवाय त्यावेळी बर्यापैकी थंडी असेल त्यामुळं फक्त २-३ दिवस फिरण्यासाठी एवढया लहान मुलाला घेउन जावं की नाही ते तुम्हीच ठरवा.
हो खरं आहे. म्हणुनच द्विधा मनस्थितीत आहे. माझा मुलगा आत्ता १० महिन्यांचा आहे. ऒक्टो मध्ये तो १४ महिन्यांचा होईल. पण त्याचे हाल होऊ नये अशी अपेक्षा आहे. माझा राहण्याचा खर्च कं. करणार आहे. मला माझ्या कुटूंबासाठीचा राहण्याचा अतिरीक्त खर्च द्यावा लागणार आहे. बाकी खाण्या-पिण्याचे जमेल तेवढं सामान आम्ही इथुनच घेऊन जाणार आहोत. ऊर्वरीत खर्च (प्रवास, बाहेर खाणे, वगैरे) करावा लागेल. तरी निम्या खर्चात अशा ट्रीपची शक्यता असल्याने कुटूंबासोबत जावे असेही वाटते.
मी २५ ला सकाळी (शनिवार) तिथे पोहोचू शकतो. आणि रविवारी झुरिकची काही स्थळे पाहू शकतो. बाकी नंतरच्या वीकेंड ला लुशेन (उच्चार माहित नाही) ला जे झुरिकपासून जवळ आहे, जाऊ शकतो. वीकेंड ला बाहेर पड्ल्यावर घरी संध्याकाळी परत यायचा विचार आहे. बाकी फ़िरणे (वीकडेला) संध्याकाळी करायचा विचार आहे. साधारण अंधार कितीला पडेल? आणि संध्याकाळी ५ नंतर काही पाहता येईल का? गार्डन, चर्च, वगैरे.
तसेच, बाहेर लहान मुलासाठी खाण्याचे काय घेऊन जाता येईल? म्हणजे थर्मास मध्ये दुध गरम राहील का? किती वेळ? तो दुध-पोळी कुस्करुन खातो. दात येण्यास सुरूवात आहे.
शुगोल,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी खुप ऊंचीवर जाऊ इच्छित नाही. कारण मुलगा लहान आहे. आत्ता तो चालू शकत नसला तरी तोपर्यंत चालायला लागेल अशी अपेक्षा आहे. कारण त्याचे तसे प्रयत्न सुरु आहेत.
पराग मला तुम्हाला नाऊमेद
पराग
मला तुम्हाला नाऊमेद करायचे नाही पण लहान मूल बरोबर असल्यामुळे हे सांगावेसे वाटले. तुम्ही दोघेच असता तर बिनधास्त जा असे म्हटले असते.
१) भारतापेक्षा नक्कीच बर्यापैकी जास्त थंडी त्यावेळेस तिथे असेल. आक्टोबर नोव्हेंबर हा झुरीचसाठी टुरीस्ट सिझन नाही.
२) भारताबाहेर कुठेही मेडीकल इन्शूरन्स नसेल तर जाऊ नये. तुमच्या कुटुंबियांचा मेडिकल इन्शूरन्सचा खर्च तुमच्या निर्णयात लक्षात ठेवा. पटकन डॉ़क्टर मिळणे सोपे असले तरी खूप खर्चिक असू शकते आणि बर्याच भारतीय विमा कंपन्या आधी तुम्हाला ते भरायला लावतात आणि नंतर भारतात आल्यावर त्याचा परतावा मिळतो.
३) तुम्ही फार कमी दिवसांसाठी जात आहात. स्वानुभवावरून सांगतोय, काही लहान मुलांना जेटलॅग जायला प्रौढांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. मुलगा रांगण्यापेक्षा मोठा झाला असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून झोपताही येत नाही. तुमच्या तिथल्या रात्री, न झोपणार्या मुलाला संभाळण्यात, आणि दिवस कसे बसे जागे राहण्यात जाऊ नयेत. कारण तसे झाले तर तुम्हाला काहीच बघण्याचा आनंद घेता येणार नाही.
आगाऊ सल्ला (तुम्ही विचारल
आगाऊ सल्ला (तुम्ही विचारल नाही तरी चांगल्या मनाने लिह्तीये): एकटे जाण्याचा निर्णय घ्यावा लागला तर नंतर १० दिवस मुलगा घरी सांभाळा आणि बायकोला कुठेतरी बजेटमधल्या ट्रीपला पाठवा. मुले मोठी झाली कि खर्च वाढतात आणि मग एकदम पन्नाशीत जाग येते कि बरच काही राहून गेल.
बाळाला आठ दहा दिवस घरचे बघू
बाळाला आठ दहा दिवस घरचे बघू शकतील तर तुम्हा दोघांना जाता येइल . ते जास्त बरे पडेल. शुभेच्छा. मस्त मजा करा.
सीमंतिनी अहो उलटे पन्नाशीत टेन्शन कमी होते. आपण युरोपला मुले न्युयॉर्क मध्ये असे होउ शकते. मुलांचे बघायची कटकट नसेल तर निवांत आपल्या आवडीचे काही ही बघता येते.
स्वित्झर्लंडबद्दल जाणकार
स्वित्झर्लंडबद्दल जाणकार सांगतीलच..पण जेमतेम १ वर्षाच्या मुलाला घेऊन जेमतेम १०-१२ दिवसांसाठी (इतक्या लांबवर आणि मुलाकरिता एकदम वेगळ्या असणार्या हवामानात) जावं का? - याचा खरंच विचार करा.
धन्यवाद सगळ्यांचे. तरिही अजुन
धन्यवाद सगळ्यांचे. तरिही अजुन काही मुद्दे असतील तर जरूर कळवा. मला सोमवारी माझा निर्णय कळवायचा आहे.
तसेच, बाहेर लहान मुलासाठी खाण्याचे काय घेऊन जाता येईल? म्हणजे थर्मास मध्ये दुध गरम राहील का? किती वेळ? केळी, चिक्कू असं काही नेता येईल असे वाटत आहे. जे मुलाला कुस्करुन दुधात देता येईल. तसेच बाहेर काही गरम दुध मिळण्याची सोय असेल का?
मेडिकल इंशुरन्स नाही माझ्या कटूंबासाठी :(. आणि आत्ता काढलाच तरी क्लेम १ वर्षापर्यंत करता येणार नाही कदाचित. किंवा अशी काही पॉलिसी मिळते का की १५ दिवसांसाठी काढू शकेन? आणि क्लेम पण सेट्ल होऊ शकेल? मुद्दा रास्त आहे, परंतु त्रास व्हायची किती शक्यता आहे (लहान मुलांना)? आणि जाताना इथल्या डॉ.ची औषधे नेणारच आहोत. ती चालणार नाहीत का?
मेडिकल इंशुरंसची गरज पडू नये
मेडिकल इंशुरंसची गरज पडू नये पण लहान मुलांना अगदी सर्दी झाली तरी कधी कधी डॉ.कडे न्यावे लागते.त्यामुळे इंशुरंस घ्यावाच असे सुचवेन.तुम्ही परदेशात आणि थंडीत जाणार आहात त्यामुळे इंशुरन्स न घेण्याची रिस्क घेऊ नका. जितके दिवस परदेशात आहात तितक्या दिवसांसाठी ट्रॅवल इन्शुरन्स मिळतो तो घ्या.
इन्शुरन्सबद्दल सहमत. तिथे
इन्शुरन्सबद्दल सहमत.
तिथे कुणी कंपनीतील सहकारी तुमची मदत करू शकत असतील तर खुश्शाल त्यांना संपर्क करा. ग्रोसरी, वीकेंडला फिरणे किंवा आणि काही मदत करू शकत असतील तर पहा. पण ऐनवेळी कुणाला जमत नसेल आपल्या तयारीतही रहा. म्हणजे कार रेंट, सर्विस अपा. च्या जवळची ग्रोसरी स्टोर्स ई.
मुलासाठी: चांगल्या कंपनीचा थर्मास वापरा. जमल्यास दुधापेक्षा गरम पाणी व मिल्कपावडर वापरता येते का ते पहा. दुध नासण्याची शक्यता असते म्हणून.
अमेरिकेत गर्बर बेबीचे जसे बेबी फूड्स असतात ते नेता येतील का ते पहा. (एयरलाईन्सला विचारा). शक्य असेल तर काही बाटल्या जसे मॅश्ड बीन्स, पोटॅटो, बनाना, कॅरेट्स ई. नेता येतील. त्या बाटल्या सील्ड असल्याने तुम्हाला पाहीजे तेव्हा वापरता येइल. जर भात सुरु केला असेल तर थोडी मुगाची डाळ व तूर डाळ भाजून भरड करून तसेच तांदूळ भाजून भरड करून (वेग्वेगळे) जरूर न्या. लागेल तेव्हा भाजल्या जिर्याची पूड गरम पाण्यात घालून खिचडी बनवता येते. त्यात तिथे मिळतील त्या भाज्या मॅश करून घाला.
आठवडाभर असल्याने जमत असल्यास गिट्सची रेडी टू कूक पाकीटं न्या. तसेच तांदूळही न्या(अती झाले का? पण थंडीत ऑफीस सांभाळून कितपत बाहेर पडता येइल अशी शंका वाटली). बाकी पुपो, लाडू, थालीपीठं, चकल्या असे standby पदार्थ नेता येतील का ते पहा.
कुठे फिरणार असाल तर ट्रिपअॅडवायझर आताच धुंडाळा. नंतर तिथे जाऊन टाईम वेस्ट करू नका. काही अर्ली बड डील्स असतील तर कं. तल्या सहकार्यांकरवी तुम्ही जाण्यापूर्वीच बूकींग करणे शक्य असेल तर पहा.
फिरणे हे aim नका ठेवू. जमेल ते आणि बाळाला सोसेल ते पहा. बायकोला (जर बाळाला सांभाळणे जमत असेल तर बाळाला) नक्की घेऊन जा. प्रेग्नन्सी आणि डीलीव्हरीच्या जवळपास १२ महिन्यांनतर बाहेर जाण्यास मिळाले तर खूप बरे वाटते. believe me, this could be your lifetime investment for your happy married life!
Enjoy!
पराग, तुमचा सहकारी तिकडे
पराग, तुमचा सहकारी तिकडे असतील तर त्यांचे सल्ला घ्या.. कारण जर एखादे कुटुंब तिकडे असेल तर काहि काळजी करण्याचे कारण नाही..त्यांना विचारा आणि खुशाल घेऊन जा त्यांचा घरी..पण तिकडे कोणी नसेल तर एकटेच जावा.. तिकडे इंग्लिश कोणाला येत नाहि.. आणि ते खूप भंयकर आहे.. मोड्कतोडक इंग्लिश म्हणजे Yes/ No with body language. आणि एक, विमानात फक्त एक चेक इन बॅग प्रत्येक माणशी..
त्यांना विचारा आणि खुशाल घेऊन
त्यांना विचारा आणि खुशाल घेऊन जा त्यांचा घरी.. >>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मान ना मान तू मेरा मेहमान :
मान ना मान तू मेरा मेहमान ::हहगलो:
पराग ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये
पराग ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये थंडी असेल. तुम्ही सगळ्यांनी त्या थंडीला पुरतील असे jacket घेऊन जा. जागा ठरवताना jungfrauhoch किंवा mount Titlis टाळा. हे ठिकाण खूप उंचीवर आहेत. एवढ्या उंचावर लहान मुलाला घेऊन जाणे advisable नाही. हिवाळ्यात लवकर अंधार होतो..त्यामुळे ५ ते ६ वाजेपर्यंत तुम्हाला घरी यायला लागेल. झुरिक महाग असले तरी तुम्ही घरून खायचे पदार्थ नेऊ शकता. अजून काही प्रश्न असल्यास विचारा.
सगळ्यांना पुन:श्च
सगळ्यांना पुन:श्च धन्यवाद.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
परंतु मी अशी आशा करतो की पुन्हा निश्चिंत मनाने फ़िरण्याची संधी लवकरच नक्की मिळेल.
वरील प्रतिसाद, माझे सहकारी तसेच ट्रिपऍडवाईजर च्या प्रतिसादांवरुन मला एकट्याने जाण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.
मला मुलाच्या तब्येतीची काळजी वाटली. ऑक्टो-नोव्हे. मध्ये तिथले हवामान (पाऊस आणि थंडी) व फ़िरायला मिळणारे फ़क्त ३ दिवस हे पाहता १ वर्षाच्या मुलाला घेऊन कितपत पाहणे होईल हि शंका वाटली. तसेच सूर्यास्तही संध्याकाळी ५.३० लाच होईल असे कळले त्यामुळे कार्यालयीन वेळेनंतर फ़िरणे कठिण दिसते.
या निर्णयामुळे बायको नाराज आहे
परत एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासुन आभार.
पराग - अमा म्हणते आहे तसे
पराग - अमा म्हणते आहे तसे करण्याचा विचार करून पाहा. चौदा महिन्याच्या मुलाला दहा दिवस तुमच्या किंवा पत्नीच्या आई वडिल किंवा बहिण भावाकडे ठेवणे शक्य असल्यास विचार करा. जाऊ शकणार असाल तर बाळाला आत्ता पासून थोडा थोडा वेळ आई पासून लांब रहायची ज्यांच्याकडे ठेवू शकणार त्यांची सवय करा.
माझा मुलगा १५ महिन्याचा असताना १२ दिवसाच्या राजस्थानच्या ट्रिपला गेले होते. तेव्हा त्याला माझ्या आईकडे ठेवले होते. त्याला आधी पासून माझ्या आई कडे राहायची सवय होती त्यामुळे कठिण नाही गेले.
इन फॅक्ट आता तो सहा वर्षाचा होईल पुन्हा १५ दिवस त्याला आईकडे ठेवून आम्ही लदाखला जातोय.
पराग जोशी, पुढच्या वेळी
पराग जोशी, पुढच्या वेळी स्वीसला येताना मे ते ऑगस्ट ह्या कालावधीत या. दिवस मोठा असतो, हवामान बरेच चांगले असते. मुलाला अॅडजस्ट व्हायला जास्त वेळ लागेल हे गृहित धरा. महत्वाचे म्हणजे व्हिसा काढताना मेडिकल ईश्युरन्स काढावाच लागतो हे लक्षात ठेवा. इथे जास्त माहिती वाचता येईल - http://www.schengenvisainfo.com/schengen-visa-application-requirements/
एव्हढं नक्की कि इथे शाकाहारी
एव्हढं नक्की कि इथे शाकाहारी म्हणुन काही प्रॉब्लेम येत नाहे. मी पण शुद्ध शाकाहारी आहे आणि सध्या इथे आहे. आपलं सगळं मिळतं, अगदी आम्रखंड-पुरीचं जेवण सुद्धा ;). आणि काही लागलं तर मागवुन घेता येत कारण इथले दुकानदार पण मराठी आहेत. त्यामुळे जेवणाचे काही हाल नाहीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिकडे इंग्लिश कोणाला येत
तिकडे इंग्लिश कोणाला येत नाहि.. आणि ते खूप भंयकर आहे..
>>>
स्वित्झर्लंडमध्ये इंग्रजी येत नाही असे फारसे होत नाही. टुरिझम अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग असल्याने लोक भरपूर इंग्रजी बोलतात.
संपदाने वर सांगितल्याप्रमाणे युरोपात कुठल्याही प्रकारच्या विसासाठी अर्ज दाखल करताना आरोग्यविम्याची पावती दाखवायला लागते. काही देशात (उदा: हंगेरी) तिथे चालणार्या विमा कंपनीच्या विमाचा आग्रह धरतात (उदा: आयसीआयसीआय असेल स्टार वगैरे लोकल शेन्घेन विमा घ्यायला लावतात. स्वानुभव. ह्याबद्दल विविध थेअरीज आहेत. एम्बसीवाल्यांना कट मिळतो वगैरे वगैरे). तेव्हा चौकशी करा पण विमा घ्याच. १-२ दिवस ते १-२ वर्षे असा कुठल्याही मुदतीचा विमा मिळतो.
माऊंट टिटलीस च्या पायथ्याशी
माऊंट टिटलीस च्या पायथ्याशी 'वडापाव' विकणारा गडी मराठी होता.. (२०११ साली). तेव्हा अजिबात घाबरू नका.. यशराज आणि तमाम शिनेमावाल्यानी तो देश भारतात समाविष्ट केला आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माऊंट टिटलीस च्या पायथ्याशी
माऊंट टिटलीस च्या पायथ्याशी 'वडापाव' विकणारा गडी मराठी होता..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>
गोगा, एंगेलबर्गला जिथून टिट्लिसचा रोप वे सुरू होतो तिथे ना? तो मराठी गडी अजूनही आहे. सगळे ढेरपोटे भारतीय तिथे वडापाव, सामोसे, पावभाजी ओरपत असतात. आणि एकदम स्लिम-फिट-तगडे युरोपिअन वय वर्षे १५ ते ७०, आपापले स्नोबोर्ड, स्कीज वगैरे घेउन जडशीळ स्कीबूट्स घालून गर्दी न्याहाळत पुढे जातात
स्वित्झर्लंडमध्ये जेव्हड्या भारतीय खाण्याच्या रस्त्यावरच्या टपर्या दिसल्या तेव्हड्या इतर कुठे युरोपात नाही. सगळ्या तळ्यांच्या काठच्या रस्त्यांवर सामोसा विकणारा मिळेल, सर्व मॅक्डोनल्डमधून वेज बर्गर मिळेल, भारतीय रेस्तराँ तर जवळपास प्रत्येक टुरिस्ट ठिकाणी आहेत. युंगफ्राउला तर वरती 'बॉलीवूड रेस्टॉरंट' पण आहे.
बर्याच सुवेनिअर दुकानात, रोपवेच्या तिकीट खिडक्यात-एन्ट्रीला हिंदीत पाट्या लिहिलेल्या आढळतील.
मग टण्या कसा होता वडापाव? ते
मग टण्या कसा होता वडापाव? ते लिही की![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
नाही खाल्ला वडापाव.
नाही खाल्ला वडापाव. स्वित्झर्लंडला जाउनसुद्धा वडा-पाव अन समोसे खायचे असतील तर कशाला जावं तिकडे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तु गोगांना विचार कसा होता ते.
बेकार होता... आमच्या
बेकार होता... आमच्या खानदानातल्या बायकानी त्याला 'वडापाव' कसा करावा हे शिकवण्याच्या प्रयत्न केला..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळे ढेरपोटे भारतीय तिथे
सगळे ढेरपोटे भारतीय तिथे वडापाव, सामोसे, पावभाजी ओरपत असतात. >>> गोगा, तुम्ही वडापाव खाल्ला की ओरपला ते एकदा स्पष्टं करा, तसेच वडापाव खातांना/ओरपतांना तुमची नॅशनॅलिटी काय होती ते सुद्धा सांगा. म्हणजे तुम्हाला न बघितलेल्यांना तुमच्या मोजमापांचा नेमका अंदाज बांधता येईल आणि ऊगाच गैरसमज होणार नाही.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नगरमध्ये एक 'बेक्कार' नावाचा
नगरमध्ये एक 'बेक्कार' नावाचा वडापाव आहे ज्याची ख्याती त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. ९० मध्ये ईन्कम टॅक्स डीपार्टमेंटने त्याच्या हातगाडीवर रेड टाकून लाखो जप्त केले होते, बटाटेवडे नाही पैसे. तो एवढे पैसे कमवून करचुकवेगिरी करतोय हे कश्यावरून कळले तर रोज रात्री गाडी बंद झाल्यानंतर जमिनीवर टाकून दिलेल्या वर्तमानपत्रांच्या हजारो तुकड्यांवरून (पेपरच प्लेट्स) ज्यात तो वडापाव सर्व्ह करीत असे.
ही वडापावची गाडी अजूनही चालू आहे आणि आजही तिथे तेवढीच गर्दी असते. तर नगरकरांसाठी बेक्कार वडापाव म्हणजे पुणेकरांसाठी ती कुठली **कर मिसळ म्हणे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नगरमध्ये एक 'बेक्कार' नावाचा
नगरमध्ये एक 'बेक्कार' नावाचा वडापाव आहे ज्याची ख्याती त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. ९० मध्ये ईन्कम टॅक्स डीपार्टमेंटने त्याच्या हातगाडीवर रेड टाकून लाखो जप्त केले होते,>>>>>>
लै फेमस आहे हा किस्सा.
बुवा, बघा नगरकर किती पोचलेले
बुवा, बघा नगरकर किती पोचलेले आहेत, थेट झ्युरिक मध्येच शाखा. ईन्कम टॅक्सची रेड पडल्यावर तो शहाणा झाला आणि थेट स्वित्झर्लँडच गाठलं. म्हणजे तुम्ही आम्ही माणिक चौकात ऊभे राहून जे वडे चोपले त्याचे पैसे स्वीस बँकेत गेले आणि आता आम्ही त्याच स्वीस बँकेचे प्रायवेट बँकिंग मॅनेज करतोय. नगरी मेंदू आणि काय, कधी वाया जाणार नाही.
माऊंट टिटलीस च्या पायथ्याशी
माऊंट टिटलीस च्या पायथ्याशी 'वडापाव' विकणारा गडी मराठी होता.. >> त्याच गडयाने दिलेल्या माहितीनुसार स्वीसला जाणार्या भारतीयांत मराठी लोकांचे प्रमाण जवळजवळ ७०% आहे.
यशराज आणि तमाम शिनेमावाल्यानी तो देश भारतात समाविष्ट केला आहे >> मी असं ऐकलंय की यश चोप्राला स्वीस सरकारनं स्पेशल स्टेटस दिलं होतं.
९० मध्ये ईन्कम टॅक्स डीपार्टमेंटने त्याच्या हातगाडीवर रेड टाकून लाखो जप्त केले होते >> बहुतेक प्रत्येक शहरांत असा एखादा किस्सा असतोच. सांगलीत एका भेळवाल्यावर (संभाची भेळ) रेड पडल्याचा किस्सा फेमस आहे.
चमन बहुतेक प्रत्येक शहरांत
चमन![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बहुतेक प्रत्येक शहरांत असा एखादा किस्सा असतोच.>>>> पण इथे आम्ही सरवात आधी टाकला ना? त्यामुळे आमचा ऑथेंटिक आहे जास्त.
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आधीच जोशींची बायको नाराज आहे,
आधीच जोशींची बायको नाराज आहे, आता वर तिला तिथे वडापाव मिळतो ते सांगा!!
काय म्हणाव ह्या मायबोलीकराना. बस्स आता तिथे स्वस्तात सिफोन साडी मिळते म्हणू नका म्हणजे झाल
आवरा हे गप्पांच पान.
पण इथे आम्ही सरवात आधी टाकला
पण इथे आम्ही सरवात आधी टाकला ना? त्यामुळे आमचा ऑथेंटिक आहे जास्त >> हो तर, शंकाच नाही.
पराग जोशी, झ्युरिकला जाल तेव्हा देसाईंच्या बेक्कार वडापाववाल्याला समस्त नगरकरांकडून रामराम सांगा.
माणिकचौकात त्याच्या नावाचा लई मोठ्ठा फ्लेक्सबोर्ड लावला आहे म्हणून सांगा. तुमच्या वडापाव वर पोसलेली नगरकर लेकरं तुमच्यासारखीच सातासमुद्रापार गेली तरी तुमच्या वडापाव मधलं नेहमी जास्तंच पडलेल्या मीठाला जागून अजूनही तुमच्या वडापावच्या आठवणीनं हुरहुरतात ते ही सांगा. वडापाव खाऊन झाल्यावर ईथे येऊन आठवणीनं सांगा वडापाव देसाई म्हणतात तसा 'बेक्कार' होता की नाही आणि हो! वडापावची पेपर-प्लेट आठवणीनं ट्रॅश करा बरं का!
हाच किस्सा पुण्यातील
हाच किस्सा पुण्यातील जोशी/भारती वडापाव बद्दलही ऐकला होता. अनधिकृत सूत्रांकडून असे समजते की अनेक शहरांतील वडापावच्या फेमस दुकानांसमोर होणार्या कागदी बोळ्यांच्या कचर्याने विविध मनपा त्रस्त झाल्या होत्या. मग कोणीतरी ही अर्बन लीजेंड सोडून दिली की टॅक्स वाल्यांनी त्यावरून उत्पन्न शोधून काढले. ताबडतोब दुकानांसमोरच्या जागा स्वच्छ राहू लागल्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<अर्बन लीजन्ड>>
<<अर्बन लीजन्ड>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
९० मध्ये ईन्कम टॅक्स
९० मध्ये ईन्कम टॅक्स डीपार्टमेंटने त्याच्या हातगाडीवर रेड टाकून लाखो जप्त केले होते >>
जेफरी आर्चरची माएस्ट्रो ही कथा आठवली त्यावरुन.
Schengen visa - Netherland
Schengen visa - Netherland Embassy मधुन घेतलाय, (one year validity ) पण मला स्विर्त्झलँड ला जायचय, तर हा विसा चालु शकेल का? कि मला स्विर्त्झलँड Embassy मधुन पुन्हा दुसरा विसा घ्यावा लागेल? Travel agent म्हणतोय कि ज्या देशाचा विसा आहे त्या देशात पहिले जायला हवे. म्हणजे मला Netherland ला जायला हवे. मग स्विर्त्झलँड, हि माहिती बरोबर आहे का?
हि माहिती बरोबर आहे का?>>
हि माहिती बरोबर आहे का?>> जर्नीचे ओरि जिनेटिंग पोर्ट असे. पण नेदर्लॅड स्विस जरा लांब आहे ना? नैतर काही वांधा नाही. मी अॅम्स्टर डॅम मध्ये दोन दिवस काढायला कध्ह्ही पण लंगडी घालत तयार असते. व्हिसा ओथोरिटी शी बोलून चेक करा. तिथे पोहोचल्यावर तुम्हाला त्रास नको.
माझ्याकडे फ्रान्स मधुन
माझ्याकडे फ्रान्स मधुन घेतलेला शेनेगन व्हिसा होता. त्यावर मी Frankfuirt (2 times) Munich (1 time) and Zurich (1 time) प्रवेश केला पण एकदाही डायरेक्ट पॅरिसला गेलो नाही. सो चालेल.
Port of entry / substantial
Port of entry / substantial stay या सगळया व्हिसा देताना तपासल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत.
एकदा व्हिसा मिळाला की कुठल्याही देशात जाऊ शकता.
स्वित्झर्लंडला जायला शेंघेन
स्वित्झर्लंडला जायला शेंघेन व्हिसा पुरतो, वेगळा व्हिसा घ्यावा लागत नाही आता. पण नेदरलंड्स कॉंसुलेट मधून व्हिसा घेतला आहात तर पोर्ट ऑफ एंट्री तिथलेच असायला हवे असा नियम पूर्वी असल्याचे आठवते आहे. इमिग्रेशन ऑफिसर तुम्हांला ह्याबद्दल प्रश्न विचारू शकतो.
पण नेदरलंड्स कॉंसुलेट मधून
पण नेदरलंड्स कॉंसुलेट मधून व्हिसा घेतला आहात तर पोर्ट ऑफ एंट्री तिथलेच असायला हवे असा नियम पूर्वी असल्याचे आठवते आहे>>> हो. पण जर Business visa असेल तर problem नाहि , नेदरलंड्स ला जायलाच हवे असे नाहि पण Tourist visa असेल तर पोर्ट ऑफ एंट्री नेदरलंड्स हवी किंवा तुमच्या एकुण ट्रिप मधील जास्तित जास्त दिवस नेदरलंड्स मधे हवे. जसे ईतर देशात जर प्रत्येकि ४/५ दिवस रहाणार असाल तर नेदरलंड्स मधे ७ दिवस तरी हवे.
स्वित्झर्लंडला जायच नक्कि
स्वित्झर्लंडला जायच नक्कि झाले. Mt. Titlis and Jungfraujoch ला August 1st week ला जायचा विचार आहे. Please guide kara, climate kase asel, konatyaa prakaarache kapade (sweaters, shoes) nyave etc. shopping karavi laganaar aahe, kaaran aamhi valvantat rahaatoy, garam kapade nahit. marathi type karayala problem hotoy.