Submitted by प्रकाश घाटपांडे on 11 July, 2014 - 23:47
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात "प्लॅंचेट‘चे माध्यम वापरल्याची चौकशी व्हावी व असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. हा पहा संदर्भ
दैनिक सकाळ बातमी
आपल्याला या अंनिसच्या भुमिकेबद्दल काय वाटते?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घाटपांडेसाहेब, इतरांच्या
घाटपांडेसाहेब, इतरांच्या खांद्यावर बंदूक कशाला ठेवताय? आधी तुम्ही चर्चा प्रस्तावक म्हणून तुमची भूमिका मांडा पाहू!
असे कले तर लोक
असे कले तर लोक पुर्वदुषित/पुर्व पोषित ग्रह म्हणून पाहतील म्हणुन सध्या मी ते टाळतो आहे. मी यथावकाश ती मांडेनच. मला लोकांची भुमिका काय हे जाणुन घेण्यात रस आहे.
पुर्वदुषित/पुर्व पोषित ग्रह
पुर्वदुषित/पुर्व पोषित ग्रह म्हणून पाहतील....
असं काही नसतं...तुम्ही तुमची भूमिका ठामपणे मांडा...लोकही त्यांना हवी ती भूमिका मांडतील/मांडणारही नाहीत...
मुळात अंनिसचा हरकतीचा मुद्दा
मुळात अंनिसचा हरकतीचा मुद्दा काय आहे तो जाणण्याची इच्छा आहे. निव्वळ प्लॅचेट वापरले याबद्दल हरकत असेल तर ठिकच आहे. त्यांच्या तत्वाशी सुसंगत आहे. पण मला बरेचदा एकुण चर्चेत "अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्य वेचणार्या डॉ. दाभोळकरांच्या खुनाच्या तपासासाठी" या वाक्यावर जास्त भर दिल्यासारखा वाटतो. म्हणजे इतर कुणाच्या खुनाच्या तपासासाठी प्लँचेट वापरलं तर चालेल काय?
बातमीतले एक वाक्य असे आहे
डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास करताना पुणे पोलिसांनी प्लॅंचेटसारख्या अंधश्रद्धेस खतपाणी घालणाऱ्या माध्यमाचा वापर करणे खेदजनक आहे, असे महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.
अर्थात याची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा असे माझे मत आहे.
'निव्वळ' नाही पण प्लँचेटचा
'निव्वळ' नाही पण प्लँचेटचा वापर झाला हा मुद्दा आहे.
बातमी वाचली. बित्तंबातमी वर
बातमी वाचली. बित्तंबातमी वर द्या.
तुमचे म्हणणे काय आहे यावर ?
पुणे पोलिस नरेंद्र
पुणे पोलिस नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाच्या तपासासाठी किंवा इतर कुणाच्याही खुनाच्या तपासासाठी प्लँचेटचा वापर करतील असे मला तरी वाटत नाही. अशी बातमी एका मासिकाने दिली आहे हे सर्वांना माहित आहे. पण हा एक निव्वळ टि.आर.पी. वाढवण्यासाठी केलेला एक फार्स असु शकतो. पुणे पोलिस आयुक्तांनी त्या मासिकावर कायदेशीर कारवाई करण्याचे सुतोवाच केले आहे. अंधश्रध्दा निर्मुलन समितीने जरी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे तरी त्यातुन काही निष्पन्न होईल असे मला वाटत नाही.
http://www.outlookindia.com/a
http://www.outlookindia.com/article/Murder-Search-My-Soul/291281 इथे पत्रकार आशिष खेतान यांचा रिपोर्ट . मला वाटत एबीपी माझा वर याची चर्चा झाली होती.
डॉ. न्ररेंद्र दाभोलकरांची
डॉ. न्ररेंद्र दाभोलकरांची हत्या ही निंदनीय आहे. एखाद्या गुन्ह्याच्या तपासाच्या शास्त्रशुध्द आणि जगमान्य पध्दती असताना इतक्या प्रसिध्द माणसाच्या हत्येचा तपास न होणे खचितच पोलीसांच्या आजवरच्या चांगल्या रेकॉर्डच्या पार्श्वभुमिवर एक काळा डाग आहे.
ह्या हत्येचा तपास व्हायलाच हवा आणि खुन्याला शासन मिळायला हवे. याकरता कोणत्याही मार्गाने तपासाला दिशा मिळावी. याकरता प्लँचेटचा वापर झाला तरी त्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही.
मला काही जुन्या बातम्या आठवतात ज्याच्या लिंक्स अथवा पुरावे आत्ता इथे देता येणार नाहीत. मुंबईत एका मृत पोलिसाची समाधी/स्मृतीस्थळ आहे जिथे तपासात अडथळे येतात तेव्हा पोलीस जाऊन नवस बोलतात. असे केल्याने त्यांच्या अडचणी दुर होतात असा त्यांचा समज आहे.
यात गुन्हेगार सापडुन जर शासन झालेच तर विधायकच भुमिका असते ना ? कोणाच्या का कोंबड्याने उजाडले म्हणजे झाले.
मला वाटत एबीपी माझा वर याची
मला वाटत एबीपी माझा वर याची चर्चा झाली होती.
----- येथे ABP माझा वर आशिष खेतान यान्च्याशी झालेली महत्वपुर्ण चर्चा...
https://www.youtube.com/watch?v=n39oW0n8TqY
बातमीमधे तथ्य असेल तर अत्यन्त लाजिरवाणी गोष्ट आहे.... सखोल निष्पक्षपाती चौकशी आवश्यक आहे.
जर ह्या बातमीत तथ्य असेल तर
जर ह्या बातमीत तथ्य असेल तर दाभोळकरांच्या कार्याची आजही किती गरज आहे ह्याची जाणीव होते.
अनिसने योग्य पावूल उचलले आहे.
समजा प्लॅन्चेट वापरले असेल,
समजा प्लॅन्चेट वापरले असेल, तरी त्यात लाजिरवाणे काय आहे?
प्लॅन्चेटमधे नेमके काय केले होते?
उद्या देवीला "कौल " नामक विधीची फुले डाव्याउजव्या खान्द्यावर लावली तर ते देखिल लाजिरवाणे का?
क्रिकेटच्या गेम मधे छापकाटा करण्यासाठी नाणे उडविले तर ते देखिल लाजिरवाणे का?
महाराष्ट्र व देशातील राज्य लॉटर्यात बक्षिसाकरता तिकिट घेतले तर ते देखिल लाजिरवाणे का?
रेसच्या घोड्यान्वर पैसे लावुन खेळले, त्याकरताची "स्टॅटिस्टिकल डाटा(?)" असलेल्या पुस्तिकान्वरुन घोड्याची नावे ठरवुन पैसे लावले तर ते देखिल लाजिरवाणेच ना?
सरते शेवटी लोकसभा/विधानसभा/ झेडप्या/म्युन्सिपालट्या यान्च्या निवडणूकितल्या उमेदवारास ज्याला काळा की गोरा ते देखिल पाहिले नाही अशा कोणाला तरी कोणत्या तरी मशिनचे बटन दाबुन "निवडल्याचे" समाधान मिळविणे देखिल लाजिरवाणेच ठरले पाहिजे ना?
>>समजा प्लॅन्चेट वापरले असेल,
>>समजा प्लॅन्चेट वापरले असेल, तरी त्यात लाजिरवाणे काय आहे?<<
ती विदेशी अंधश्रद्धा आहे. वापरायचीच आहे तर किमान स्वदेशी तरी वापरा ना!
>>>> ती विदेशी अंधश्रद्धा
>>>> ती विदेशी अंधश्रद्धा आहे. <<<<<
आयला, अन्धश्रद्धेत देखिल स्वदेशी-विदेशी अस्ते काय? बर झाल तुम्ही सान्गितलेत.
>>>> वापरायचीच आहे तर किमान स्वदेशी तरी वापरा ना! <<<<<
तुम्हीच शिकवा ना स्वदेशी..... आनन्दाने वापरू. गेलाबाजार उदाहरणे तरी द्या स्वदेशीची.....
अंनिस ला दाभोलकरांचा खुनी
अंनिस ला दाभोलकरांचा खुनी सापडण्यात इंट्रेस्ट आहे की पोलिसांच्या तपास कामात? खुनी सापडण्यात इंट्रेस्ट असेल तर तो कशानेही का सापडेना, यांना काय करायचं आहे? आणि पोलिस तपास कसा करतात यात त्यांना इंट्रेस्ट असेल तर त्यांनी तोंड बंद ठेवून गप्प बसावे कारण पोलिसांच्या तपासावर अंकुश ठेवणे हे त्यांचे काम नाही.
मला "प्लॅन्चेट" बद्दल अधिक
मला "प्लॅन्चेट" बद्दल अधिक माहिती हवी आहे. कोणी जाणकार देऊ शकतील का?
पोलिस खाते बंद करून ते बुवा,
पोलिस खाते बंद करून ते बुवा, महाराज, तांत्रिक, मांत्रिक, ज्योतिषी ह्यांच्या ताब्यात देण्यात यावे.
लिंबुभाऊ, अमानविय-१ हा धागा
लिंबुभाऊ, अमानविय-१ हा धागा वाचुन तर बघा प्लँचेटवर शेकडोंनी पोष्टी आहेत.
अनंत ... सहमत. >>>> कारण
अनंत ... सहमत.
>>>> कारण पोलिसांच्या तपासावर अंकुश ठेवणे हे त्यांचे काम नाही.<<<<
अहो आख्ख्या हिन्दु धर्मावरच अन्कुश ठेवण्याची मनिषा बाळगुन असलेल्यान्ना हिन्दुस्थानच्याच पोलिस खात्यावर अन्कुश ठेवण्यात वावगे ते काय वाटणारे? नै का?
नरेशजी, अहो प्लॅचेटला विरोध
नरेशजी, अहो प्लॅचेटला विरोध करणार्यान्नाच सान्गुदे की..... त्यान्ना सगळेच माहित असणार, त्याशिवाय का ते विरोध करताहेत? नै का?
हायला मुद्दा काय आहे ? ह्त्या
हायला मुद्दा काय आहे ? ह्त्या करणार्यांचा तपास ना ? थर्ड डिग्री आणि तपासाच्या पध्दती यावर सुध्दा पोलीस अडचणीत येऊ शकतात.
ज्या गुन्हेगारांना मध्यंतरी अटक केली होती त्यांच्या विरुध्द पुरावा मिळाला नाही. अश्या गुन्हेगारांनी पोलीसांनी छळ केला अशी तक्रार करण्याची सोय आहे. यात संबंधीत पोलीस अधिकार्याचे विरोधात कोर्ट ताशेरे ओढु शकते. असे झाले की त्यांचे प्रमोशन अडचणीत येते.
पोलीसांनी थर्ड डिग्री लाऊन एखाद्याला त्रास देण्याच्या बेकायदेशीर कृत्यापेक्षा प्लँचेट किती चांगले आहे.
(No subject)
>>पोलीसांनी थर्ड डिग्री लाऊन
>>पोलीसांनी थर्ड डिग्री लाऊन एखाद्याला त्रास देण्याच्या बेकायदेशीर कृत्यापेक्षा प्लँचेट किती चांगले आहे.
हो ना यामधे निदान बोलावलेला आत्मा कुठे तक्रार करणार नाही पोलिसांच्या विरोधात
पण यामधे एक प्रोब्लेम आहे, तो म्हणजे जो कोणी आत्मा सापडेल त्याला पकडून पोलिस त्याच्याकडून वदवून घेतील की तो प्रसिद्ध व्यक्तीचा आत्मा आहे म्हणुन.
वि.सू. : मी हे सर्व गंमतीने लिहिलेले आहे, कोणी सिरिअसली घेऊन भावनाप्रधान होऊ नये.
"It doesn't matter whether a
"It doesn't matter whether a cat is white or black, as long as it catches mice."
- Deng Xiaoping
महेशराव, समजा प्लँचेट
महेशराव, समजा प्लँचेट केल्यावर दाभोलकरांचा आत्मा आला, तरी तो सांगणार आहे का मी दाभोलकर आहे म्हणून? आत्मा असल्याची कबूली दिली तर............बाकी समजून जा
अच्छे दिन आलेले आहेतच.
अच्छे दिन आलेले आहेतच.
ऑफिशिअल फतवा काढून पोलीसांनी सर्वच खुनांच्या तपासकामात प्लँचेटचा वापर सुरू करावा, असा नियम करून टाकला तर बरं होईल असं दिसतंय एकंदरित.
पोलिस अकादमीमधे ट्रेनिंग देतानाच प्लँचेट, भानामती, करणी, काळी जादू इ.चे ट्रेनिंग देऊन टाकावे.
अतिरेक्याने बोंबस्फोट केला? त्याला डायरेक्ट मूठ मारायची. तिथल्या थितं रक्ताची उलटी होऊन मरेल बेनं. हाकानाका. शोध फिद करायचा अन त्याला तुरुंगा टाकायचं अन केस चालवायची पुरावे गोळा करायचे असले पालथे धंदे हवेत कशाला?
फार झालं तर ब्रह्मवृंदाने शापवाणी वगैरे उच्चारावी. तसे भरपूर पावरबाज बाबा महाराज आहेतच आपल्याकडे. लिंबूभाऊचा धर्मही बुडणार नाही अशाने, उलट तेज येईल त्याला.
काय बरोबर ना, @ लिंबूभाऊ, नितिनचंद्र अन इतर प्लँचेट समर्थक?
फक्त पोलिसच कशाला, सैन्यात पण
फक्त पोलिसच कशाला, सैन्यात पण अशा तुकड्या तयार केल्या जाव्यात.
अतिरेक्याने बोंबस्फोट केला?
अतिरेक्याने बोंबस्फोट केला? त्याला डायरेक्ट मूठ मारायची.<<< अहो ते करायला त्या व्यक्तीची काहीतरी वस्तू,केस वगैरे लागते म्हंणतात हो. आता सईद अहमद,बगदादीची लुंगी,केस्,रुमाल असलं कोण आणणार?
बरोब्बर @ महेश. सोरटी
बरोब्बर @ महेश.
सोरटी सोमनाथाच्या वेळेला शापवाणी उच्चारण्याचा सैनिकी कार्यक्रम केला होता म्हणे सौराष्ट्रात. तरी ते देऊळ फोडून नेलं की काय असा काहीतरी इतिहास आहे.
पुन्हा प्रयोग करून पहायला अजिब्बात हरकत नाही.
त्या व्यक्तीची काहीतरी
त्या व्यक्तीची काहीतरी वस्तू,केस वगैरे लागते म्हंणतात
<<
अहो सायन्स किती पुढे गेलंय! तुम्ही ते सीआयडी पहात नाही का? क्राईमसीन वर थोडाफार डीएने नक्कीच सापडेल की!
भानामतीशास्त्राने डीएनए वापरून मूठ मारण्याचे तंत्र विकसित करायला हवे. यावर अभ्यास व्हावा असे माझे मत आहे. आपल्या देशातल्या या उच्च "धार्मिक" (लिंबूभाऊ म्हणतात म्हणून धार्मिक बरं का) परंपरांना नावं ठेवण्याची फ्याशन आलिये आजकाल.
युनिव्हर्सिटीतून तरी कुणीतरी हे करायला हवे. विरोधासाठी विरोध काय कामाचा?
Pages