Submitted by पिल्या on 5 July, 2014 - 03:22
Network 18 ह्या कंपनीचे मालक आणि मुख्य संपादक राजदीप सरदेसाई आणि उप-संपादक सागरिका घोष ह्यांनी मे महिन्यात झालेल्या कंपनीच्या takeover नंतर काल राजीनामा दिला.
रिलायन्स कडुन झालेल्या या ४००० कोटी रुपयांच्या व्यवहारानंतर हे होणे अपेक्षित होते असे बरेच जाणकारांचे मत आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता मिडीया मधेच सरकार चे
आता मिडीया मधेच सरकार चे हस्तक हस्तक्षेप करु लागले की असेच होणार
खर्या बातम्या कधीच येणार नाही आता बाहेर.. ५ वर्ष फक्त लांगुलचालनच टिव्हीवर बघा.. इंडीया वाँट्स क्नो मधे फक्त जुने सरकार काय काय करत होते त्यावरच बातम्या चर्चा असेल नविन सरकार वर नसेलच याचा प्रत्यय कालच आला आहे.
हम्म. बरोबर आहे. KG Basin
हम्म. बरोबर आहे.
KG Basin आणि इतर रिलायन्सच्या कामांबद्दलही बातम्या बाहेर येणार नाहीत.
या टेक-ओव्हरच्या संदर्भात
या टेक-ओव्हरच्या संदर्भात गेल्या शनिवारी लोकसत्तामधे (सदर 'अन्यथा') लेख आला होता. पण तेव्हा हे कनेक्शन लक्षातच नाही आलं...
भारतातली १२९ वर्षे जुनी
भारतातली १२९ वर्षे जुनी काँग्रेस पार्टी हेच उद्योग करत आली आहे. लोकमत ह्या वृतपत्रसमुहाचे मुख्य जवाहरलाल दर्डा अनेक वर्षे महाराष्ट्रात मंत्री होते. त्याचे पुत्र राजेंद्र दर्डा आणि विजय दर्डा सुध्दा जेव्हा जेव्हा सरकार असते तेव्हा आपली वर्णी लाउन असतात.
शरद पवारांच्या नातेवाईकांनी जनसेवा म्हणुन सकाळ खरेदी नाही केला.
केसरी -मराठा वृतपत्राचे महत्व आता संपुष्टात आले आहे पण जेव्हा केसरी जोरात होता तेव्हा याचे मालक जयंत टिळक अनेक वर्षे विधानसभा अध्यक्ष होते.
विशाल सह्याद्री नावाचा आणखी एक पेपर ( वर्तमान पत्र ) ज्याचे मालक अनेक वर्षे आमदार होते.
हे झाले महाराष्ट्रात . बाकी अनेक राज्यात ह्या पेक्षा वेगळी परिस्थीती नसेल.
चालायचच. लोकशाहीचा चवथा स्तंभ आता भरीव राहिलेला नसुन पोकळ झाला आहे.
पण पार्टी विथ डिफ्रंस आहे
पण पार्टी विथ डिफ्रंस आहे ना.......... एका चुकी केली म्हणुन इतरांनी केलेले तेच करावे आणि ते बरोबर कसे ठरते ?
>>पण पार्टी विथ डिफ्रंस आहे
>>पण पार्टी विथ डिफ्रंस आहे ना.......... एका चुकी केली म्हणुन इतरांनी केलेले तेच करावे आणि ते बरोबर कसे ठरते ? <<
हि मुळात चुक नाहिच; धंद्यात स्ट्रटिजीक अॅक्विझिशन म्हणतात याला. आता राजकारण धंदा आहे का, हे मात्र विचारु नका...
अरे वा आता भाजप ने केल्यावर
अरे वा आता भाजप ने केल्यावर गोड मानायला लागलेत चांगले आहे
कोषातुन बाहेर या, तुर्तास
कोषातुन बाहेर या, तुर्तास एव्हढेच.
नॅशनल हेराल्ड स्वता:च्या
नॅशनल हेराल्ड स्वता:च्या नावाने विकत घेऊन जेल मध्ये
जाण्याची पाळी आलीय "माय-लेका" ना.
+++++आता मिडीया मधेच सरकार चे
+++++आता मिडीया मधेच सरकार चे हस्तक हस्तक्षेप करु लागले की असेच होणार +++++
पुर्वी बाई अस नव्हत, तेंव्हा आम्हीच विकत घ्यायचो, नॅशनल हेराल्ड सारखे बिझनेस,
आम्हाला बाई हस्तक वैगेरे लागत नव्हते.
निखील वागळेंनाही डच्चू
निखील वागळेंनाही डच्चू मिळणार. एका नव्या मराठी चॅनलचे संपादक होणार.