समस्त मायबोलीकरांनो .....
सालाबादप्रमाणे याही वर्षी घेऊन येत आहोत, मायबोलीकरांकरता आणि त्यांच्या कुटुंबीयांकरता आपल्या लाडक्या मायबोलीचा `वर्षा विहार २०१४'...वर्ष बारावे....
यात नवीन असे काय ? असा प्रश्न पडला असेल तर ज्या मायबोलीकरांनी अनुभवलाय त्यांना विचारा...
मायबोली वर्षा-विहार हा एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इथे चालणार्या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा तसेच इतर अनेक उपक्रम याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहाराच्यादिवशी. वविच्या दिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात. सगळे वाद, स्पर्धा बाजूला ठेवून , मतभेद बाजूला सारुन, नवीन ओळखी आणि मित्र बनवण्याचा हमखास मेळा म्हणजे मायबोली वर्षाविहार ...
यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २७ जुलै २०१४ या दिवशी, एस पी फार्म्स (पेण पासुन ५ किमी. अंतरावर) येथे.
पण मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवसांत करणं गरजेचं आहे.
त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्यांची नावनोंदणी.
वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय (पती/पत्नी/मुले) येऊ शकतात.
नावनोंदणी करण्यासाठी इथे टिचकी मारा. टिचकी मारल्यानंतर येणार्या नोंदणी फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.
नावनोंदणीची अंतीम तारीख आहे १९ जुलै २०१४.
नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.
वर्षाविहार-२०१४ ची वर्गणी आहे :
मुंबईसाठी :-
प्रौढ आणि दहा वर्षावरील मुले : रु. ९५० /-प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ६७५, बस : रु. २५० , सांस खर्च : रु. २५)
मुले (वय ३ ते १० वर्षे) : रु. ३५०/- प्रत्येकी. (रिसॉर्टः रू.३५०)
पुण्यासाठी:-
प्रौढ आणि दहा वर्षावरील मुले : रु. १००० /-प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ६७५, बस : रु. ३००, सांस खर्च : रु.२५)
मुले (वय ३ ते १० वर्षे) : रु. ३५०/-प्रत्येकी (रिसॉर्ट : रु. ३५०)
*बसमध्ये या मुलांसाठी बसायला स्वतंत्र जागा हवी असेल तर बसचे जास्तीचे पैसे भरावे लागतील.बसमध्ये स्वतंत्र जागा हवी आहे की नाही यासाठी नोंदणी फॉर्ममध्ये माहिती दयावी.
(पुणे आणि मुंबई यांच्या बसच्या खर्चातला फरक हा पुण्यापासून वविच्या ठिकाणाचे अंतर मुंबईपेक्षा जास्त असल्यामुळे आणि प्रति कि.मी.चा पुण्याच्या बसचा दर मुंबईच्या बसच्या दरापेक्षा जास्त असल्यामुळे आहे. वविला येणारे सर्व पुणेकर मायबोलीकर हे नक्की समजून घेतील अशी खात्री आहे.)
३ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही. (फक्त बसमध्ये बसायला जर या मुलांसाठी स्वतंत्र जागा हवी असेल तर बसचा खर्च फक्त करावा लागेल. बसमध्ये स्वतंत्र जागा हवी आहे की नाही यासाठी नोंदणी फॉर्ममध्ये माहिती दयावी.)
रिसॉर्ट च्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता , दुपारचे जेवण , संध्याकाळी चहा स्नॅक्स यांचा आणि रिसॉर्टमधील सुविधांचा ( (तब्बल ६-७) स्विमींग पूल, रेन डान्स इ.) समावेश आहे.
वरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी ५० माणसांप्रमाणे धरला आहे. लोकसंख्या कमी झाल्यास नोंदणी करणार्या सभासदांना प्रवास खर्च कदाचित थोडा जास्त येऊ शकतो ( तो खर्च माणसांच्या संख्येवर अवलंबून आहे.) त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करा.
पुणे आणि मुंबई येथे २० जुलै २०१४ या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.
वविचे पैसे जमा करण्याचे ठिकाण,दिवस आणि वेळ खालीलप्रमाणे:-
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकी शेजारील कट्टा. वेळ: २० जुलै २०१४, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २० जुलै २०१४, सं. ५.३० ते ८.००
(ठाणे आणि वाशी येथील वेळ-ठिकाण लवकरच जाहीर केले जातील.)
समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं गेलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
स्वतंत्र येणार्यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
ऑनलाईन पैसे भरणार्यांना ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.जे बँक डिटेल्स ऑनलाईन ट्रान्सफरसाठी दिले जातील, त्या अकाऊंटमध्ये कृपया कॅश डिपॉझिट करु नये.
ऑनलाईन पैसे भरणार्यांनी २० तारखेपर्यंत कधीही पैसे भरले तरी चालतील. प्रत्यक्ष पैसे भरणार्यांना २० तारखेला पैसे द्यायला येणे काही कारणांनी शक्य नसेल त्यांनी त्या त्या शहरातील वविसंयोजकाना फोन करून २०च्या आधी भेटुन पैसे दिलेत तरी चालतील.
२० तारखेपर्यंत पैसे आले नाहीत तर मात्र नाईलाजास्तव केलेली नोंदणी रद्द करावी लागेल.
मुंबई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.
वर्षाविहार-२०१४ संयोजन समिती :
पुणे -
१.मल्लीनाथ - मल्लीनाथ करकंटी. (९९६०३६६५६६)
२.मयूरेश - मयूरेश कंटक (९९२२४०१७७८)
३.शुभांगी कुलकर्णी
मुंबई -
१.घारुआण्णा - संदिप खांबेटे (९८१९९९३६३४)
२.मुग्धानंद
३.राजू७६
वर्षाविहार जागेबाबत :-
एस पी फार्म्स
पेण-खोपोली रोड,
पेण पासुन ५ किमी अंतरावर, कामार्ली गावा नजीक.
पेण, रायगड - ४०२१०७.
संकेत स्थळ : http://spfarmhouse.in/
आपल्याला काही शंका असल्यास आपण या बाफवर वविसंयोजकांना मेसेज टाकू शकता.
वविची रुपरेषा साधारण अशी असेल......
सकाळी ९.३० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.३० न्याहारी
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल आणि रेन डान्स मधे धम्माल मस्ती.
१२.३० ते २.०० जेवण
२.०० ते ३.०० गप्पाटप्पा
३.०० ते ४.३० सा.स. मनोरंजन
४.३० वाजता चहा व स्नॅक्स
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्या बस मधून प्रयाण.
सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्या मंडळींची नावे इ. माहिती ववि नोंदणी फॉर्ममध्ये व्यवस्थित भरावी. ही माहिती वाहतूक कंत्राटदाराला परवान्यासाठी देणे आवश्यक असते.
तुम्ही कळवलेल्या थांब्या प्रमाणे बस रुट सेट करुन तुम्हाला जवळचा पिक अप पॉइंट आणि वेळ ठरवुन देण्यात येईल.
सूचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील).
तर मायबोलीकरांनो हा सोहळा चुकवू नका . मुंबई आणि पुण्याचे मायबोलीकर एकत्र भेटण्याचे हमखास ठिकाण म्हणजेच वर्षा विहार ...
विशेष सूचना:- ववि नावनोंदणी केल्यावर तुम्हाला आपोआप एक ईमेल येईल ज्यात तुम्ही दिलेली माहिती आणि सगळ्यात खाली तुमच्या वविनावनोंदणीची लिंक असेल.त्या लिंकमार्फत तुम्हाला तुमची माहिती कितीही वेळा बदलता येईल. १६ जुलैनंतर तुम्हाला ती माहिती बदलता येणार नाही. एकदा नावनोंदणी करून माहितीत परत बदल केलात तर ईमेल येणार नाही. जर पहिली नावनोंदणी करतानाच मेलबॉक्समध्ये ईमेल आली नसेल तर स्पॅम फोल्डर पहा. बर्याच वेळा ईमेल तिथे जाते.
फोटोरूपी एक झलक.
अरेsss... आला रेsss
अरेsss... आला रेsss आलाsss...

मस्तच...
लागा तयारीला
लागा तयारीला
सांस म्हनजे.........श्वास की
सांस म्हनजे.........श्वास की सासु ?
पेण पासुन ५ किमी अंतरावर,
पेण पासुन ५ किमी अंतरावर, कमराली गावा नजीक. >>>> संयोजक कामार्ली करा प्लीज
बाकी मला आवडलं हे ठिकाण येवा पेण आपलाच असा
आला आला वविचा धागा आला
आला आला वविचा धागा आला
नोंदणी केलेली आहे..
नोंदणी केलेली आहे..
मस्तच.....
मस्तच.....
उदयन सांस म्हणजे वविचा श्वास
उदयन सांस म्हणजे वविचा श्वास असही म्हणू शकता तुम्ही
उदयन सांस म्हणजे वविचा श्वास
उदयन सांस म्हणजे वविचा श्वास असही म्हणू शकता तुम्ही >>>> क्या बात क्या बात क्या बात
व्वॉव!!! धम्माल
व्वॉव!!! धम्माल
<उदयन सांस म्हणजे वविचा श्वास
<उदयन सांस म्हणजे वविचा श्वास असही म्हणू शकता तुम्ही<> +१०००००
ववि ला यायचे आहे पैसे भरायला
ववि ला यायचे आहे पैसे भरायला २० जुलै २०१४ ला जाईन.
२००४ मध्ये नाही तर २०१४ मध्ये
फोटोरूपी एक झलक.
फोटोरूपी एक झलक.
पावसाचे काय! त्याने केले आहे
पावसाचे काय! त्याने केले आहे का बुकिंग
येणार आहे का तो!!
तुम्ही आलात की तो आपोआपच येइल
तुम्ही आलात की तो आपोआपच येइल
yenarya lokanchi yadi kalali
yenarya lokanchi yadi kalali tar bar hoeel
agadi ithe nahi pan magachya darane kalali tari chalel
फोटो फार मोठे आहेत.. थोडे
फोटो फार मोठे आहेत..
थोडे छोटे कराल का ?
yenarya lokanchi yadi kalali
yenarya lokanchi yadi kalali tar bar hoeel....>>>> अरे वा रिया.. टि-शर्ट संयोजक झाले आता वविसंयोजकांना पकडतेयस का??
इथेही मापं काडनार वाटतं ही
इथेही मापं काडनार वाटतं ही आता...
apun dujabhav nahi karata hai
apun dujabhav nahi karata hai
अले वा ,गचलगुंडी पण आहे वाट्ट
अले वा ,गचलगुंडी पण आहे वाट्ट यंदा ज्युनिअरला घेवून येतोच करु कल्ला तिथेच.
यादी टाकून काय बरे होईल?
यादी टाकून काय बरे होईल? त्यापेक्शा जे लोक यावेत असं वाटतंय त्यांना आपणच आग्रह करायचा. तेवढीच संयोजकांना मदत.
अले वा ,गचलगुंडी पण आहे वाट्ट
अले वा ,गचलगुंडी पण आहे वाट्ट यंदा ज्युनिअरला घेवून येतोच करु कल्ला तिथेच.
>>>
(Y)
आशु, वो तो हम कर ही रेले है
आशु, वो तो हम कर ही रेले है
पण माझ्यापुर्तं बोलायचं झालं तर इथे काही लोकं अशी आहेत ज्यांना मला भेटायचंय पण मी त्यांना ओळखत नाही. म्हणजे कधी बोलणं नाही होत... अशा व्यक्ती येणारेत कीनाही ते कळालं की फार बरं वाटतं
बाकी मी येतेय. प्रितीचं काय ते फिक्स झालं की नोंदणी करेन.
तिचं फिक्स नसेल तर तुझं पण
तिचं फिक्स नसेल तर तुझं पण फिक्स नाही का रिया.. तुझं फिक्स असेल तर तुझी नोंदणी करुन टाक आणि नंतर तिचं नाव अॅड कर..
मस्त
मस्त
OKZ karate jaraa weLaane
OKZ
karate jaraa weLaane
नोंदणी केली आहे
नोंदणी केली आहे
shabbas kedar! ek tari
shabbas kedar!
ek tari olakhich nav nighal
kavita pan yenar na?
mi pan nondani karate lavkarach
रिया,आपण ओळ्खतो का एकमेकांना?
रिया,आपण ओळ्खतो का एकमेकांना?:फिदी: मी बहुदा येणार आहे वाटतं वविला
Pages