Submitted by अजय on 8 July, 2009 - 21:16
बॄ. म्. म. २००९ मधल्या आवडलेल्या गोष्टी.
(कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया त्या त्या धाग्यावर देता येतील. हा धागा व्यवस्थापन किंवा इतर धागा नसलेल्या गोष्टींसाठी आहे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१. एक दोन
१. एक दोन कार्यक्रमांचा अपवाद वगळता बाकीचे सगळे कार्यक्रम खूप आवडले.
२. जेवण आवडले.
३. एक्सपो मधले उद्धव ठाकरेंच्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन खूप आवडले.
४. महाराष्ट्र शासनाचा आपल्या राज्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये दाखवणारा स्टॉल आवडला. हा स्टॉल शासनाने कायम स्वरुपी बी एम एम ला दिल्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात सांगीतले.
सगळ्यात महत्वाचे या संमेलनाच्या निमीत्ताने झालेली मायबोलीकरांची भेट आवडली.
१.
१. रजिस्ट्रेशन करताना सांगितल्या प्रमाणे सवलतीचा चेक चोख मिळाला.
२. वेगवेगळी कूपन्स न देता एकच जेवणाचे कूपन ओळखपत्राच्या मागे होते. त्यामुळे ते सांभाळून ठेवावे लागले नाही.
३. "मराठी लाईट" (जेवढं जमेल तेवढं मराठी बोलूया) ही संकल्पना खूप सुंदर. मी अनेक लहान मुलांना/तरूणांना अभिमानाने आणि प्रयत्नपूर्वक मराठी बोलताना अनुभवलं.
४. वेगवेगळ्या दिवशी वेगळ्या प्रकारचे जेवण (पेशवाई, नागपूरी, कोल्हापूरी, मालवणी) जेवण ठेवण्याची कल्पना सुंदर. जेवणही चविष्ट होते.
अजय...
अजय... सगळ्या मुद्याना अनुमोदन...
वेगवेगळे जेवण ठेवण्याची Idea खरोखरच मस्त होती.
'अवघा रंग...., नानाची मुलाखत, भीमरावांची गजल, धरोहर..' अत्यंत आवडले.
रजिस्ट्रेशन वर लक्ष ठेऊन वेळोवेळी आलेल्या E-mail हे पण कौतुकास्पद वाटलं.
Housefull झालेले कार्यक्रम Repeat ठेवण्याची कल्पना आवडली...
हा बा. फ.
हा बा. फ. उघडून चांगलेच केलेत.
विनय व अजय यांच्या सर्व मुद्द्यांना १०० टक्के अनुमोदन.
त्रिगलबंदी, धरोहर, रवि दातार याचे गाणे हे सर्व आवडले.
रुनी आणि
रुनी आणि अजयच्या सर्व मुद्द्यांना अनुमोदन.
मायबोलीकर भेटल्यामुळे खरंच खूप मजा आली.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
रुनि, अजय,
रुनि, अजय, विनय अनुमोदन.
जेवणाच्या थीमप्रमाणे संगीतही होते. ३ तारखेला आषाढी होती म्हणून नाश्त्याच्या-जेवणाच्या वेळी विठ्ठलाचे अभंग, कोल्हापुरी जेवणाला लावण्या, मालवणी जेवणाला कोळीगीते लावली होती.
अधिवेशनाच्या आदल्या दिवशी डिनर आणि आशाचा हिन्दी गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता ही कल्पनाही आवडली. (या दोन्हीचे तिकिट वेगळे होते, किंमतीच्या मानाने ते जेवण खास नव्हते तरी) बिझनेस कॉन्फरन्स ला आलेले आणि जे लोक गुरुवारी दुपारपर्यंत पोचणार होते त्यांच्यासाठी संध्याकाळचा हा एक कार्यक्रम झाला.
मला काही स्वयंसेवकांचा चांगला अनुभव आला. आपली मायबोलीकर गौतमी आणि मंदारने खूप काम केलंय.
कोलंबीचे
कोलंबीचे कालवण वाटीभर होते तरी ते आवडले. स्वयंसेविका ओळखीच्या असल्याने दुसरी/तिसरी चौथी..... वाटी मिळाली असती हे पण आवडले....
कोल्हापुरी भरली मिरची मस्त होती.
कांदेपोहे मिळाल्यामुळे 'उभ्या उभ्याला' उभा राहू शकलो...
'उभ्या उभ्या...' चा BackDrop उभा करायला किशोर पाठारे यांना बरेच कष्ट घ्यावे लागले. युनियनवाले अगदिच 'हले डुले' करत होते. तरी त्याना 'बाबापुता' करून वेळ प्रसंगी शिव्या देऊन तो वेळेवर जाग्यावर लागला, तेव्हा त्यांचे आभार मानायलाच हवेत...
कांदेपोहे
कांदेपोहे झाल्यावर आता "मुलगी आणतील दाखवायला" या आशेने बसून राहिल्यामुळे काही लोकांना उभ्या उभ्या कार्यक्रमाला पोचायला उशीर झाला म्हणून विनय यांचा कार्यक्रम बुडला असे काहींनी मला सांगितले! ख. खो. दे. जा.

किशोर
किशोर पाठारे खरंच खूप कष्टाळू आहेत. इथल्या फ्लोरिडातल्या म. मं च्या कार्यक्रमात (नाटकांकरता) प्रचंड मेहेनत घेत असतात.
झक्की,
काही
काही मुद्दे वरती आलेलेच आहेत. पण मला आवडलेल्या गोष्टी:
१. रजिस्ट्रेशन्स केल्यापासून सगळ्या ईमेल्स तत्परतेने येत होत्या.
२. शंका निवारण करण्यासाठी, ईमेल पाठवल्याबरोबर ताबडतोब कमिटीकडून फोन आला आणि फॉलोअप सुद्धा केला गेला.
३. ऑनलाईन चिल्ड्रन इन्फर्मेशन फॉर्म्स भरायची सोय.
४. मैतर, शेवंतीचे बन, विश्वनायिका, भीमराव पांचोळे असे दर्जेदार कार्यक्रम
५. गझल कार्यशाळेच्या बाईंशेजारी बसून घेता आलेला मराठी गझल्सचा रसास्वाद.
६. वेगवेगळ्या थीम्सचे जेवण, मालवणी एकदम खास होते.
७. जेवणासाठी एक दोनच रांगा लावण्याऐवजी बरीचशी स्टेशन्स ठेवली होती.
८. मुलांसाठी असलेले मॅजिक शो, अग्गोबाई ढग्गोबाई असे त्यांना खरच आवडतील असे कार्यक्रम इ.
मला
मला त्यांनी ठेवलेली इन्डियन कॉफी आवडली.

(हे कुठे
(हे कुठे टाकयचे हे न कळाल्यामुळे इथे टाकत आहे. )
अधिवेशनात झालेल्या काही कार्यक्रमांच्या चित्रफिती
गगन सदन (मंगेश बोरगावकर, सायली ओक)
http://www.youtube.com/watch?v=ZM-QnZAIWvk
गोमु संगतीने (आशा भोसले, सुदेश भोसले)
http://www.youtube.com/watch?v=kSq0QqLlSfc
घाटे / व्यास - जुगलबंदी
http://www.youtube.com/watch?v=obfsgm6YtMY
आशा भोसले यांची पत्रकार परिषद
http://www.ashaforever.com/AshaForever/Ashaji.htm
नाना पाटेकर यांची मुलाखत
http://video.google.com/videosearch?q=nana+patekar+philadelphia&hl=en&cl...
उद्धव ठाकरे यांची मुलाखत
http://video.google.com/videosearch?q=uddhav+philadelphia+marathi&hl=en&...
सर्वच कार्यक्रम चान्गले
सर्वच कार्यक्रम चान्गले होते,खूप करमणूक झाली. जेवण तर खूपच चान्गले होतें.न्याहरी,लन्च आणी डीनर सर्वच चान्गल होत्,रोज वेगळा मेनु होता,कधी पेशवाइ,कधी नागपुरी,कधी मालवणी,खरच खूप मज आली,पदार्थ सर्व चवदार होते.
मी एका मुलीला हे सान्गितले,तर तीला खूप आनन्द झाला,ती मला म्हणाली,"काका,सर्व जन फक्त टिकाच करतात्,काय जमल नाही त्याबद्दल्च बोलतात्,काय चान्गल आहे,हे काका,तुम्हि सान्गितलत त्यामुले
चान्गले वाटले.
आपला डाक्टर विजय दामोदर पान्गरेकर...
सध्ध्या बोस्टन जवळ मुलान्कडे,
नेहमी साथी,भारतात्,औरन्गाबाद ला.