१. Corn Tortillas (तॉर्तियास)
२.चेडर चीझ
स्टफिंग साठि :
१. बरीक चिरलेलि शिमला मिर्चि - २ कप
२. बारिक चिरलेला कांदा - १ कप
३.शिजवलेला राजमा - १.५ कप
४. चवीपुरते मीठ
५.तेल - २ चमचे
सॉस बनवण्यासाठि
१. मैदा - २ चमचे
२.जिर्याचि पूड - १ चमचा
३.लाल तिखट पूड किवा पॅप्रिका - १.५ चमचा
४.चिपोत्ले सॉस - १.५ चमचा (पॅप्रिका न वापरता फक्त लाल मिर्चि पूड वापरत असल्यास.नाहि तर गरज नाहि)
५.लसणाचि एक पाकळि - चिरून किंवा ठेचून
६.ओरेग्नो(oregano) - ३/४ चमचा
७.थाइम (Thyme) - ३/४ चमचा
८.टोमेटो क्रश - १ कप
९. मीठ चवीपुरते
प्रथम कॉर्न तॉर्तिया भाजून घ्यावे (हे म्हणजे मक्याचि भाकरीच )
स्टफिंग :
कढईत तेल घालून्,मध्यम आचेवर ठेवावे.तेल थोडे तापले कि चिरलेलि शिमला मिर्चि व कांदा त्यात परतायला ठेवावा.दोन्हि नीट शिजल्यावर त्यात शिजलेला राजमा (पाण्यासकट) घालाव,मीठ घालावे अजुन १० मिनिटे उकळू द्यावे.नंतर गॅस बंद करून झकून ठेवावे.
सॉस
मध्यम आचेवर कढई ठेवावि.त्यात मैदा भाजायला सुरुवात करावि.(करपणार नाहि याचि काळजि घ्या).मैदा होत आला कि त्यात जिर्याचि पूड घालावि.म्हणजे तीहि भाजलि जाते.लगेच पाणि घालावे(साधारण पाऊण लिटर).त्यात वर दिलेल्या सगळे साहित्य घालून चांगले शिजवून घ्यावे.सॉस जरा दाट असूद्या
आता अवन ३५० फॅ ला प्रीहीट करायला ठेवावे.
एका अवन सेफ ट्रे मध्ये थोडा सॉस ओतुन ठेवा.
दुसर्या एका उथळ भांड्यात थोडा सॉस घ्या,प्रत्येक तॉर्तिला त्यात बुडवून घेऊन मग त्यात स्टफिम्ग भरून जोडलेलि बाजु तळाला असेल असे ट्रे मध्ये ठेवा.असे एकाबाजूला एक असेंबल करतजा.
सगळे तोर्तियास बुडतील इतक सॉस परत ओता.
त्यावर चेडर चीज वरून घाला.
आता ३० मिनिटांसाठि अवनमध्ये बेक करायला ठेऊन द्या.
तीस मिनिटानंतर बाहेर काढून सर्व्ह करा
१.नॉनवेज स्टफिंग करू शकता
२.वरच स्टफिंग बनवताना,१/४ कप वाईन घातलि कि अजून छान लागत.
३.चेडर चीझ नसल्यास्,मोझरेला चीझ वापरू शकता
४.तॉर्तियास उपलब्ध नसल्यास मक्याचा किंवा ज्वारिचा छोट्या भाकर्या(घरीच बनवलेल्या) बिंधास्त चालतात
४.कृति मोठि वाटत असलि तरी खूप सोपि रेसिपि आहे
५.फोटो प्रतिसादामध्ये देत आहे
१. अवन मध्ये जाण्यासाठि
१. अवन मध्ये जाण्यासाठि तयार
२.पोटात जाण्यासाठि तयार
Wow..looks wonderful. .
Wow..looks wonderful. .
यम्मी! ज्वारीच्या भाकर्या
यम्मी! ज्वारीच्या भाकर्या वापरून करून बघणेत यील.
मस्त डिश आहे. आमच्याकडे सगळे
मस्त डिश आहे. आमच्याकडे सगळे साहित्य मिळेल असे वाटतेय.
ज्वारीच्या भाकर्या वापरून
ज्वारीच्या भाकर्या वापरून करून बघणेत यील.>>>३०मि. बेक केल्यावर भाक-या सॉसमध्ये विरघळून जातील.
नाइ जमनार. याऐवजी चकोल्या
नाइ जमनार. याऐवजी चकोल्या करण्यात येतील
बरोबर आहे सोनाली. पण मी
बरोबर आहे सोनाली. पण मी केलेल्या भाकर्या लय निगरगट्ट असतात. अश्यातश्या विरघळायच्या नाहीत
जोक्स अपार्ट. बेकींग टाईम कमी करावा लागेल. थँक्स.
मस्त दिसत आहे..
मस्त दिसत आहे..
यात कोंबडी किंवा
यात कोंबडी किंवा मत्स्यावतारही मिळू शकतो. मेक्सीकन रेस्टॉरंटमध्ये हमखास मिळतो.
गोपिका, थ्यांक्स फॉर द
गोपिका, थ्यांक्स फॉर द वंडर्फुल रेसिपी. खूप आवडली सगळ्यांना. एकदम पर्फेक्ट झाली.
mast
mast
गोगो, करून पाहुन, आवर्जुन
गोगो,
करून पाहुन, आवर्जुन कळवल्या बद्दल खूप धन्यवाद.खरच छान वाटल
अमा, धन्यवाद....