ग्रीक मधील महाभारत (ट्रॉय चे युद्ध) भाग 2

Submitted by अकिलिस on 12 June, 2014 - 03:33

ग्रीकांची जहाजे ट्रॉयच्या किनाऱ्यावर पोहचली. अजून ट्रोजन लोकांबरोबर आमने सामने होण्याची वेळ आली नव्हती. नाही म्हटले तरी ट्रॉयच्या किल्ल्याची अन हेक्टर सारख्या योद्ध्यांची थोडी धास्ती होतीच ग्रीकांना. त्यावेळेस ट्रॉयचा किल्ला भेदने कोणालाही शक्य नव्हते. किल्ल्याचा भिंती फार उंच होत्या व किल्ल्याची तटबंदी ही तेव्हढीच मजबूत होती त्यामुळे ट्रॉयचा किल्ला भेदने कोणालाही शक्य नव्हते. तसेच हेक्टर सारखा चतुर व वीर योद्धा ट्रॉय कड़े होता. त्याकाळी ट्रोयला हरवने मुश्किल होते.
ग्रीकांच्या लुटीत ट्रॉयजवळचे ईतिऑन नामक एक शहर लुटले गेले, बायाही पळवून आणल्या गेल्या. त्यात अपोलोचा (देव) भटजी "क्रिसेस" याची कन्याही यवनांनी पळवली. क्रिसेस भटजी मग अ‍ॅगॅमेम्नॉनकडे गेले, आपल्या पोरीच्या सुटकेसाठी खूप याचना केली. पण त्याने काही क्रिसेसचे ऐकले नाही. मग क्रिसेस ने अपॉलोची(देव) प्रार्थना केली. आपल्या भक्तावरचा हा प्रसंग ऐकून अपॉलो ग्रीकांवर रुष्ट झाला म्हणजेच प्लेग आला. कारन लढाई न करताच ग्रीकांचे सैनिक मरू लागले होते. अ‍ॅगॅमेम्नॉनने एक सभा बोलाविली ग्रीकांचा मुख्य राजपुरोहित काल्खस याने सांगितले की जर क्रिसेसला सन्मानाने परत पाठविली नाही तर ग्रीकांचा विनाश अटळ आहे. पण अ‍ॅगॅमेम्नॉन मात्र खवळला आणि म्हणाला आपण क्रिसिसला पाठऊ पण क्रिसिस नसेल तर मला ब्रिसिस हावी आहे व ब्रिसिसला अ‍ॅगॅमेम्नॉन समोर हजर करण्यात आले. (ब्रिसिस म्हणजे, अकिलिस ने एवढ्या गाजवलेल्या पराक्रमात त्याला बक्षिस म्हणून मिळाली होती आणि अकिलिसला सुद्धा ती आवडत होती.) त्यावेळेस अकिलिस खुप वैतागला त्याच्यात आणि अ‍ॅगॅमेम्नॉन मध्ये ब्रिसिस वरुन खुप तू तू मैं मैं झाले अकिलिसने अ‍ॅगॅमेम्नॉन समोर तलवार उपसली पण तेव्हढ्यात ओडीसिअसने मध्ये पडून अकिलिसला थांबविले नाहीतर त्याच दिवशी अ‍ॅगॅमेम्नॉनचा मुडदा पडला असता. कारण त्यावेळेस अकिलिस एव्हढा वीर योद्धा दूसरा नव्हता. पण ब्रिसिसला काही अ‍ॅगॅमेम्नॉनने परत अकिलिस कड़े पाठविले नाही. त्यानंतर अकिलिस ने युद्धापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. तेंव्हा अ‍ॅगॅमेम्नॉन म्हणाला आमचे युद्ध आम्ही बघून घेऊ तुझी आम्हाला काहीच गरज नाही. त्यावेळेस अकिलिस ने ग्रीसला परत जाण्याचा निर्णय घेतला व आपल्या सेनेलाही तसे कळविले. पायलॉसचा राजा नेस्टॉर मध्यस्ती करू लागला होता, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
युद्धाच्या आदल्या दिवशी ट्रॉयची सुद्धा एक सभा भरली होती. त्यावेळेस सुद्धा हेक्टरने युद्धाला विरोध दर्शविला होता पण ट्रॉयचा राजपुरोहित याने सभेत सांगितले होते की देवांच्या आशीर्वादाने विजय आपलाच होईल त्यामुळे राजा प्रियाम याने युद्धला परवानगी दिली.
दुसर्‍या दिवशी, दोन्ही सैन्ये एकमेकांसमोर उभी ठाकली. दीड लाखाचे तरी ग्रीक सैन्य असेल. ट्रोजन सेनेचा आकार तितका अचूक दिलेला नाही. जसजसे युद्ध पुढे सरकु लागले तसतसे ट्रॉयला सुद्धा अनेक राज्ये येऊन मिळाली होती ते आपण पुढे पाहूच. सगळे एकत्र जमल्यावर हेक्टरने प्रस्ताव ठेवला की उगाच बाकीच्यांनी लढण्याऐवजी हेलेनच्या दोन प्रेमवीरांनी आपसात काय ते बघून घ्यावे, त्यांच्या वैयक्तिक लढाईत जो विजेता होईल, त्यालाच हेलन मिळेल. (कारन त्याला माहीत होते की युद्ध झाले तर दोन्ही पक्षांचे अतोनात नुकसान होईल व असंख्य लोक मारले जातील तेंव्हा हे युद्ध व्हावे अशी त्याची बिलकुल इच्छा नव्हती.) हेलेनचा नवरा मेनेलॉसला तेच तर पाहिजे होते. कारन त्याला पेरिसला मारायचे होते आणि आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. पण अ‍ॅगॅमेम्नॉनला ते काही मान्य नव्हते त्याला ट्रॉय वर विजय मिळवायचा होता. हेलनाशी काही देने घेणे नव्हते पण मेनलॉस ने समजावल्यावर (मला पॅरिसला मारू दे. तुम्हाला ट्रॉय जिंकायचा आहे तर आपण नंतर जिंकू) त्याने होकर दिला.
इकडे ट्रॉयचा राजा प्रिआम हा ट्रॉयच्या भुईकोटाच्या तटावरून युद्ध बघत होता. हेलेनसाठी चाललेले युद्ध बघण्यासाठी मुद्दाम त्याने हेलेनला पाचारण केले. इकडे हेलन अस्वस्थ झाली होती. मेनेलॉस आणि पॅरिसचे युद्ध सुरु झाले पण हा पॅरिस जरा लढाईत कच्चाच होता. तो काही हेक्टर थोड़ीच होता, मेनेलॉसच्या तलवार-भाल्याचे वार चुकवता चुकवता त्याच्या नाकी नऊ आले आणि अखेरीस कुठूनतरी तो सटकला. नाहीतर त्याचे काही खरे नव्हते. इकडे अ‍ॅगॅमेम्नॉनने म्हणू लागला की ट्रॉय वाल्यांनी आम्हाला दागा दिलेला आहे आता युद्ध अटळ आहे.
दुसर्‍या दिवशी सकाळी लढाई सुरू झाली. अ‍ॅगॅमेम्नॉन तयार होऊन युद्धाला निघाला, त्याच्या पाठोपाठ अख्खी सेना निघाली. समोर ट्रोजन सेनाही सज्ज होतीच. हेक्टर, एनिअस, पॉलिडॅमस, आणि अँटेनॉरचे तीन मुलगे पॉलिबस, आगेनॉर आणि अकॅमस हे त्यांचे मुख्य सरदार होते. यथावकाश लढाईला तोंड लागले. इकडे अ‍ॅगॅमेम्नॉन सुद्धा आपल्या पराक्रमाचे प्रदर्शन करीत होता. त्याने बिएनॉर या ट्रोजन योद्ध्याला आणि त्याचा सारथी ऑइलिअस या दोघांना भाला फेकून ठार मारले. ते पाहून ट्रोजनांची भीतीने गाळण उडाली. अ‍ॅगॅमेम्नॉन सोबत ग्रीक फौज पुढेपुढेच निघाली. ट्रोजन घाबरून पळत होते यथास्थित त्यांना मारण्यात येत होते. ट्रॉयच्या स्कीअन गेट नामक दरवाजाजवळ आल्यावर ग्रीक फौज बाकीच्यांची वाट बघत थांबली. हेक्टरच युद्धातल ज्ञान खूपच चांगले होते त्याने आपल्या सेनेचे वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये रूपांतर केले होते. एक टुकड़ी दमली की ताज्या दमाची नवी तुकडि पुढे करायची व स्वता हेक्टर त्यांचे नेतृत्व करायचा. थोड्या वेळात बाजूने रथात बसलेल्या हेक्टरच्या नेतृत्वाखालील ट्रोजनांची नव्या दमाची फौजही मोठी गर्जना करत आली. ग्रीक आता सावधान झाले आणि ट्रोजनांनी आक्रमक पवित्रा घेतला. लढाईला पुनश्च एकवार तोंड लागले. इफिडॅमस आणि अ‍ॅगॅमेम्नॉन यांची लढाई सुरू झाली. एक ट्रोजन योद्धा कून याने अ‍ॅगॅमेम्नॉनला युद्धसाठी आव्हान दिले आणि अ‍ॅगॅमेम्नॉनला त्याने जख्मी केले अ‍ॅगॅमेम्नॉनच्या अंगातून रक्त वहु लागले पण त्याही अवस्थेत त्याने कुनला तलवारीच्या एक घवानेच मारुन टाकले व त्यानंतर सुद्धा तो लढतच होता, पण नंतर मात्र . जेंव्हा त्याला जास्त त्रास होवू लागला त्या कारणाने त्याने रन सोडले.
इकडे अ‍ॅगॅमेम्नॉन परत गेल्याचे पाहून हेक्टरला अजूनच स्फुरण चढले. त्याने ट्रोजन सैन्याला धीर दिला आणि अनेक ग्रीक योद्ध्यांना मारत सुटला. हेक्टरने बर्याच ग्रीक सेनानींना एका झटक्यात ठार मारले. ग्रीक सेनेत हाहा:कार पसरला.
तो पाहून ओडिसिअस आणि डायोमीड उभे राहिले. त्यांनी काही ट्रोजनांना ठार मारले. त्या दोघांमुळे ट्रोजन सैन्यात उडालेला गदारोळ पाहून हेक्टरने आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला. व हेक्टर आणि ओडिसिअस यांची आता जुंपली पण दोघेही काही कमी नसल्या कारणाने निकाल काही लागत नव्हता बराच वेळ युद्धाचा निकाल लागत नाही असे दिसल्यावर दोघांनीही आपआपला मोर्चा दुसरीकडे वळवला तर दुसरीकडे पेरिसने बाण मारून डायोमीडला घायाळ केले, जखमेवर उपचार करण्यासाठी डायोमीडला परत जहाजाकडे गेला. आता ओडीसिअस जवळपास एकटा पडला होता, ट्रोजनांपासून त्याला वाचवायला कोणी नव्हते. पण ओडीसिअस काही कमी नव्हता, सोकस नामक ट्रोजनाने ओडीसिअसवर नेम धरून भाला फेकला. त्याने ओडीसिअस थोड़ा घायाळ झाला, पण तो प्राणघातक वार नव्हता. आता ओडीसिअसच्या जखमेतून रक्त आलेले ट्रोजनांना दिसल्यावर त्यांनी ओडीसिअसवर हल्ला केला. ते बघुन थोरला अजॅक्स त्याच्या मदतीला आला. अजॅक्स मदतीला आल्यावर मग जखमी ओडीसिअस सुद्धा उपचार करण्यासाठी परत जहाजाकडे गेला. रागाने लालबूंद झालेल्या अजॅक्सने ट्रोजनांची अक्षरशा कत्तल उडविली कोणाचे तलवारिणे मुंडके उडवत होता तर कोणाच्या छाती, पोटात तलवार घुसउन ठार मारत होता. एव्हढे झाले तरी रणभूमित आता मोठे ग्रीक वीर फार उरले नव्हते काहीजण मारले गेले होते तर काही जखमी झाले होते. त्यामुळे त्यांची सेना आता उघड्यावर पडली होती त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. ते पाहुन हेक्टर आणि त्याचि सेना ग्रीकां पळऊन पळऊन मारू लागले. एकूण रणात बरेच ग्रीक मारले गेले होते.
हेक्टर आणि अन्य ट्रोजनांनी मिळून ग्रीकांची दाणादाण उडवलेली होती. नेस्टॉर आपल्या शामियान्यात बसला होता तिकडेही लढाईचा आवाज ऐकू येत होता. नेस्टॉरला त्याच्या शमियान्यात शांत बसवेना शेवटी काय तर वय झालेले असले तरी तो सुद्धा एक योद्धा होता त्याने हातात तलवार आणि ढाल घेतली आणि रणांगणाच्या दिशेने चालु लागला.
पण मध्येच अ‍ॅगॅमेम्नॉनकडे त्याला भेटला त्याच्या बरोबर आणखी काही जखमी झालेले योद्धे होते त्यांना पाहुन नेस्टॉर म्हणाला लढाईत आपले काही खरे नाही. अकिलिस जोपर्यंत लढायला आपल्या बाजूने उतरत नाही तोपर्यंत आपला विजय अशक्य आहे. तेव्हा काहीही करुण अकिलिसला युद्धसाठी सज्ज करावेच लागेल अ‍ॅगॅमेम्नॉन पुढे काहीही पर्याय शिल्लक राहिला नव्हता. एक तर हार किंवा अकिलिस बरोबर संधि. त्याने अकिलिस बरोबर संधि करण्याचे ठरवले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Back to top