नमस्कार ......
दुपारच्या चहाची वेळ झालेली आहे. 'दुपारचा चहा, सोबत रेडिओ ऐकून पहा' सदराअंतर्गत आता आपण ऐकणार आहोत; 'वर्षाविहार: एक अनुभव' हा कार्यक्रम. नेमेचि येणारा पावसाळा आपल्यासोबत यंदाही घेऊन आला आहे, `वर्षाविहार'. अहाहाहाहा! ते पावसाचे थेंब (पावसाच्या थेंबाचा आवाज). तो गरमागरम आले घातलेला चहा (ग्लासात चहा ओतल्याचा आवाज.) आणि भजी... (कढईत भजी तळण्याचा आवाज.)
हे सर्व तुमच्या भेटीला यंदाही.
हा फोन-इन कार्यक्रम आहे. त्यात तुम्ही प्रश्न विचारू शकता, उत्तरे देतील कार्याध्यक्ष व वहिनी.
(रेडिओचे नेहमीचे संगीत पाच मिनिटे वाजते. या वेळात गृहिणींनी चहाचा कप हातात घेऊन रेडिओसमोर बसणे आवश्यक आहे.)
निवेदक: येथे कार्याध्यक्ष आणि वहिनी अगदी वेळेत येऊन बसलेले आहेत. आपण त्यांच्याकडूनच वर्षाविहाराबद्दल जाणून घेऊया.
वहिनी: मी काय सांगू? (वर्षाविहाराबद्दल सांगा. - निवेदकाने मनात म्हटलेले वाक्य सुस्पष्ट ऐकू येते. केवढी ती आवाजाची क्लॅरिटी!) आमचा चि. नचि लहान होता ना, तेव्हा एकदा तो म्हटला, आई, आई.... तसा तो बाबांना काही सांगतच नाही मुळी. मलाच सांगतो. तर म्हणाला, आई आई.... माला किनै पावसात भिजायचंय. आता एवढ्याश्या मुलाला का मी पावसात नेऊ? म्हटलं, भिजवणार नाही दाखवेन नुस्तं. चालेल का? तर म्हणाला, चालेल. तसा अगदी ऐकतो हो माझं. तर तेव्हा त्याला पाऊस दाखवावा, म्हणून आम्ही पहिल्यांदा मावळसृष्टीला गेलो. आमच्या `अहोंच्या ' बर्याच कविताही ऐकवायच्या राहिल्या होत्या. तो नाही ऐकवत हो. मीच माझ्या सुश्राव्य आवाजात ऐकवते... आता नमुना दाखवू का?
निवेदक: (गडबडीने) अं नको. आत्ता नको. कारण आपल्याला पहिला फोन आलेला आहे. (फोन कनेक्ट झाल्याचा आवाज!)
फोन: मै मुन्नाभाई.
निवेदक: अरे वा, वविची लोकप्रियता इतकी वाढली आहे तर....
मुन्नाभाई: मेरेको खाली ये पूछनेका था, ये वर्षाविहार मे जो वर्षा है बोलेतो वर्षा उसगावकरच ना? तुम लोग आखिर बजेट बढाता क्यू नही? मुझे बताओ, सर्किटको बोलके अपुन सब फिक्स करेगा. कतरिना कैफ आके डान्स करे तो कैसा रहेगा?
कार्याध्यक्ष: भाई, ये वर्षा बोलेतो (याचीही भाषा बिघडली!) वो पानीवाली... बारिश बारिश... बोलते है ना भाय. और किसीको भेजने की जरुरत नही है भाई. हमारी सांस्कृतिक समिती है ना वो लोगोंको टॉर्चर करने के नये नये प्लॅन हरसाल बनाती है. हर साल की तरह श्रमाता तो है ही उपर से इस बार नंदिनी को भी लिया है... आप जरुर आना भाई. आपका और सर्किट का नाम लिखके रखता हूं...
(गडबडीने फोन ठेवल्याचा आवाज.)
निवेदक: मुन्नाभाई डिस्कनेक्ट झालेले दिसतात. सांस्कृतिक समिती , श्र आणि नंदिनी वगैरे ऐकून त्याना चक्कर आलेली दिसतेय..
कार्याध्यक्ष: (दु:खी आवाजात गातो) हमसे भूल हो गई, हमका माफी दई दो.
वहिनी: अय्या, अचाट न अतर्क्य सिनेमांमधली गाणी म्हणण्यापेक्षा मी `अहोंचं ' एखादं विडंबनच म्हणते बाई.... (फोन पुन्हा वाजतो.)
निवेदक:(सुटकेचा श्वास टाकून) आता कोण आहे?
हिमेश: मी रेशमिया.
निवेदक: अरे वा... (त्याला मध्येच तोडत)
वहिनी: अय्या तुम्हीच का ते रेशमिया? कसले गाता हो! आमच्या ह्यांनी..... तुम्हाला माहीत असेलच म्हणा... तुमच्यावर केलेल्या विडंबनामुळेच ते नेटवर वर्ल्ड फेमस झालेत ना...
हिमेश: तेच विचारायचं होतं. ते वाचून माझा गाण्याचा कॉन्फिडन्स गेलाय हो. मला वविला गाऊ द्याल का? त्यामुळे तरी माझा कॉन्फिडन्स परत येईल असं वाटतंय. वाटलं तर मी ववि स्पॉन्सर करतो अख्खा...
कार्याध्यक्ष: (उत्साहाने) हो... तुम्हाला कोण नको....(त्याला तोडत)
वहिनी: काही नक्को. मला तिथं अज्जिबात स्पर्धा नकोय. आपण काय सारेगमप कार्यक्रम करायला चाललोय तिथं? आणि तुम्ही फार भांडता बाई. रियालिटी शो मध्ये पाहिलंय मी.... तसे मी सगळेच रियालिटी शो बघते नि चर्चा पण करते. तर ते नकोच.
हिमेश: (हताश आवाजात) निदान मग मला एखादी मायबोली टोपी तरी पाठवाल का? टीशर्ट समितीला सांगून? ती तरी लकी ठरते का बघतो.
(हताश होऊन फोन आपटल्याचा आवाज.... मागून 'त्रासिक बनाया आपने...' चे सूर)
निवेदक: कार्याध्यक्ष, पुढला फोन येईपर्यंत तुम्ही तुमच्या संयोजनकौशल्याबद्दल काहीतरी सांगा बरं.
कार्याध्यक्ष: तसा मी आद्य वविकर. सगळ्यांत पहिला वर्षाविहार झाला त्यात मी होतो. नंतर मी अज्ञातवासात गेलो. ववि संयोजनावर मी दोन वर्षं सखोल संशोधन केलं आणि नंतर सूत्रं हातात घेतली. घेतली कसली, आली म्हणा... (बाकीच्यांना काही करायला नको! कार्याध्यक्ष म्हटलं की झालं! )शा र, परदेशाहून आलेल्या मायबोलीकरांच्या भेटी.... असं करता करता ववि देखील माझ्याच कडे आलं बघा.
निवेदक: पुन्हा एक फोन आलेला आहे. अर्रे... हे तर आपलेच एक मायबोलीकर अरुण....
अरुण: कार्याध्यक्ष, लब्बाड... इथे आहात होय? तरीच म्हटलं तुम्ही फोन का उचलेनासे झालात? मला एकच प्रश्न आहे.
कार्याध्यक्ष: अरुण, आपण हे ऑफलाईन बोलूया ना!
अरुण: अरे नाही, आत्ताच उत्तर दे. मला बरीच तयारी करावी लागणार आहे.
कार्याध्यक्ष: (भेदरून) कालचाच प्रश्न ना?
अरुण: (उत्साहाने) हो... मला सांग. यंदा वहीचा साइझ वाढवला आहेस ना? दोनशे पानी वही यंदा केलीये मी कवितांसाठी. खेरीज तिथे wi fi मिळतं का बघ ना? माझा लॅपटॉप आणेन मी. ब्लॉगवरच्या कविता....
निवेदक: (धीर एकवटून) अरुण, मला नक्कीच खात्री आहे, यंदा तुम्हाला तुमची दोनशे पानी वही अथपासून इतिपर्यंत ऐकवायची संधी मिळणार आहे. तुम्ही तुमच्या तयारीला लागा कसे! (फोन बंद होतो.)
कार्याध्यक्ष: म्हणून मी त्याचा फोन घेत नव्हतो कालपासून! पण शेवटी इथे गाठलंन...
निवेदक: ओहोहो... आत्ता फोनवर आहेत परदेशात काही वर्षं राहुन नुकत्याच भारतात परतलेल्या श्यामलीताई.....
ताई: यंदा किनै सरप्राईझ आहे बर्का माझ्याकडून! मी बकलावा आणते ना नेहमी... पण यंदा मी भार्तातच आहे. तर किनै मी बकलावा घरच्या घरीच बनवला आहे. ह्यांना खायला दिला तर हे गुंग होऊन झोपलेच चोवीस तास नि त्यांची परतीची फ्लाईट हुकली. अर्थात जागे झाल्यावर ह्यांनी म्हटलंच, बरं झालं. मला अजून सुट्टी भारतात घालवायला मिळाली तुझ्या बकलाव्यामुळे... तर अस्सं आहे. मी जवळपास एक डबाभर बनवला आहे. आणणार आहे हं वविला....
(फोन एकाएकी कट होतो. कार्याध्यक्ष, निवेदक आणि वहिनी एकदम किंकाळी फोडतात)
कार्याध्यक्ष: बसप्रवासाचा नवीन नियम - कुणालाही खाद्यपदार्थ घेऊन गाडीत चढता येणार नाही.... हुश्श!
निवेदक: आता गरजेचा आहे एक ब्रेक.
(मधले संगीत. जाहिरात.)
रिसॉर्टचे भाडे: १०० $
बसभाडे: २०$
मधले खाणे: १५$
मायबोलीकरांसोबत एक पूर्ण दिवस: Priceless.
(कार्यक्रम पुन्हा सुरु.)
निवेदक: पुढचा फोन आलेला आहे आपल्याला घारुअण्णांकडून. ते मुंबईचे ज्येष्ठ संयोजक. त्यांनाही इथं बोलावलं होतं आम्ही चर्चा करायला पण काय आहे ना, ते प्रत्यक्ष भेटीपेक्षा मोबाईलवर जास्त भिस्त ठेवतात.)
घारुअण्णा: कार्याध्यक्ष, कसं काय? पुण्यातली तयारी नीट चालू आहे ना? म्हटलं आता फोन लावलाच आहे इथं तर तुझ्याशी बोलून घ्यावं. (फोन वाजतो.) जरा होल्ड करा हां... (दुसर्या मोबाईलवर बोलू लागतात. पुन्हा फोन वाजतो.) तुम्हीही होल्ड करा हां....
निवेदक: घारुअण्णांकडे मोबाईल आहेत तरी किती?
घारुअण्णा: हां बोला.
निवेदक: तुमच्या संयोजनकौशल्याबद्दल बोलायचं होतं.............
घारुअण्णा: सगळी मोबाईलची कृपा... पहिल्यांदा मावळसृष्टीला गेलो. तिथल्या सुप्रसिद्ध धबधब्यात उडी घेतली. ईश्वरी संकेतच होता म्हणा ना तो. तशीच उडी ववि संयोजनातही घेता येईल असा स्पष्ट संकेत मिळाला. मुंबईचा कार्यभार घ्या म्हणाले... घेतला.
निवेदक: कार्यभार ना?
अण्णा: मोबाईल.... तेव्हा पहिला... मग दुसरा... असं करता करता आज डझनभर आहेत.
निवेदक: वा अण्णा....
घारुअण्णा: निघायला हवं... फोन वाजतोय. वविला भेटूयाच.
निवेदक: घारुअण्णा वविला तरी प्रत्यक्ष भेटतील ही आशा करूयात. पुढला फोन आहे स्वाती २६ यांचा.
स्वाती: नमस्कार. वैनी, पाया पडते हं.
निवेदक: वा वा... केवढा आदर. ...
स्वाती: तुमच्याही पाया पडते हं.
निवेदक: (गोंधळतो.) वा... असू दे, असू दे.
स्वाती: कार्याध्यक्ष....
कार्याध्यक्ष: असू दे. असू दे.
निवेदक: बोला.
स्वाती: (लाजत) मी यंदाच्या वविला खास कार्यक्रम सादर करणार आहे म्हटलं. म्हणून फोन केला.
निवेदक: वा... काय करणार आहात?
स्वाती: (दुप्पट लाजत) जादूचे प्रयोग...
कार्याध्यक्ष: काSSSSSSSSSSSSSय?
वहिनी: माहित्ये. कळलं. भर पावसाळ्यात 'सूर्यदर्शन'. हो की नै?
स्वाती: इश्श्श्श! (फोन कट होतो.)
निवेदक: वैनी... ह्ये वागनं बरं न्हवं....
(फोन वाजतो.)
निवेदक: बोला.
रीना: मी बोलतेय.
निवेदक: वा... बोला की!
रीना: मी हिप्पोवर बसून बोलतेय.
निवेदक: (भयचकित होऊन) वा.. वा...
रीना: कार्याध्यक्ष, यंदा राईडला कुठला प्राणी आहे हो? मी किनाई हत्ती, जिराफ, झेब्रा ... झालंच तर हिप्पो यावर बसून प्रॅक्टिस केलीये. शिवाय जीन पण आहे नवीन.
कार्याध्यक्ष: जीन????????????? वविला मादक पेयं अलाउड नाहीत, रीना..
रीना: अय्या, तुम्ही शब्दार्थ वगैरे बघत नाही वाटतं? जीन म्हणजे खोगीर.
कार्याध्यक्ष: असं का? ते चालेल.
रीना: ते नवीनच घेतलंय मी. म्हशीच्या पाठीवर ते घालून पुन्हा प्रॅक्टिस करून बघितली. तिच्यावर बसूनच येणार होते पण वविला पोचायला उशीर होईल असं म्हणाले सगळे..... माझं स्किल त्यांना बघवत नाही नं.... असो. यंदा राईडला गेंडा ठेवा बर्का.... येते.
(फोन कट होतो. कार्याध्यक्षांनी व वहिनींनी टाकलेल्या सुटकेच्या निश्वासांचा आवाज.)
निवेदक: (गडबडीने) अधिक फोन येण्याआधी आपण इथेच थांबूयात.
कार्याध्यक्ष: सर्व 'धोके' पत्करून तुम्ही मायबोलीकर वविला नेहमीप्रमाणेच भरघोस प्रतिसाद द्याल याची आम्हाला खात्री आहे . . . ठिकाण ठरलंय, दिवस ठरलाय. तुम्हाला लवकरच सांगतोय. हा कार्यक्रम रेडिओ प्रोमो होता. लौकरच मुख्य पोस्ट येईलच. सज्ज व्हा तर मंडळी. भेटूयात तर मग.
वहिनी: ते माझं विडंबन गायचं राह्यलं ना...
निवेदक: ते आता वविलाच....
(कार्यक्रम संपल्याचे संगीत.)
अरे वा
अरे वा जोरात आहे की ववि. बापरे अरुणची दोनशे पानी वही आणि वहिनींच गायन. या वेळच्या वविला यायला जमणं जरा मुश्किल दिसतंय.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
~~~~~~~~~
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~
धम्माल!!!!!!!
धम्माल!!!!!!!
छान
बापरे अरुणची दोनशे पानी वही आणि वहिनींच गायन. या वेळच्या वविला यायला जमणं जरा मुश्किल दिसतंय >> अगदी अगदी मिनू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
================
आज झालो तुझी मी वदंता नवी
कालची बातमी काल होती खरी
शेवटी शेवटी खूप आल्या सरी
-एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!
हा
हा कार्यक्रम ऐकायला गृहीणींनी हातात कप घेऊन बसायचं आणि गृहस्थांनी (WFH वगैरे सुविधा असणारे हो) काय करायचं?
.
स्वाती, जादूच्या प्रयोगांपेक्षा उखाण्यांचा कार्यक्रमच कर गं...... त्याची प्रॅक्टीस आहे तुला.... हवं तर तुझी आणि यशची जुगलबंदी ठेवू आपण... राफा असतीलच उखाण्यांचा सप्लाय करायला..
आईशपथ यंदा
आईशपथ यंदा म्हणालो होतो याव ववीला पण तुमचे कार्यक्रम वाचुन विचार करेन म्हणतो
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
आता २००
आता २०० पानी नाही तर ४०० पानी वहीच आणतो ............. हर हर महादेव .............![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep
आता २००
आता २०० पानी नाही तर ४०० पानी वहीच आणतो >>>>> पॉकेट साईजची....
==================
फुकट ते पौष्टीक
ही ही
ही ही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मस्तच
पण मी मिसणार
वविचे
वविचे नियोजन जोरदार दिसतेय, माझी तर ववि ला पहिलीच भेट असेल ही त्यानिमित्ताने सर्व मायबोलीकरांची प्रत्यक्ष भेट तरी होईल आणी वविचा आनंद पण लुटता येईल, पण आजुन आमच्या बीबी वरचे कोणी आलेले दिसत नाहीत.
निखिलराव :
निखिलराव : नक्की या ववि ला. तुम्ही या आणि तुमच्या इतर बीबीकरांना पण घेऊन या .........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep
धमाल आहे!
धमाल आहे! फोन नंबर तरी द्या, पुढच्या कार्यक्रमात आम्हाला प्रश्न विचारता येतील.
शुभेच्छा!
सही है!! ......
सही है!! ......
*** Three Laws of
***
Three Laws of Thermodynamics, 'God and you play dice' style : (1)You can't win. (2)You can't break even. (3)You can't even get out of the game.
यायची
यायची इच्छा आहेच.... जमुदे अशी प्रार्थना करतेय देवाकडे.
साधना
गलगले
मी मिसणार
मी मिसणार ववि.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मज्जा माडी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय भन्नाट
काय भन्नाट लिहिले आहे एकदम. आता हे ववि प्रकरण बघितलेच पाहिजे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप छान..
खुप छान..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ग्रेट जॉब
ग्रेट जॉब डन यार.....
हे वाचुन मला आमच्या एका नाटकाच्या जाहिरातीची आठवण झाली....
(No subject)
सहीच
सहीच![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
झकास
झकास लिहीलय ! हहपुवा ...
कार्याध्य
कार्याध्यक्ष,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त चाललय.
भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडुन प्रेरणा घेवुन साहित्य संमेलनासारखा एक व.वि. पण करणार का अमेरीकेत?
"आता हे ववि
"आता हे ववि प्रकरण बघितलेच पाहिज", व वी हे प्रकरण!!!!!
![Maayboli_Group.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5079/Maayboli_Group.jpg)
बर यातल कोणत प्रकरण म्हणायचे आहे तुला....:)
आयला हा
आयला हा ऍश्_अनन्या अन्य वेळि कधि उगवत नाही... प्रकरण म्हटल्यावर कसा काय उगवला?
कार्याध्य
कार्याध्यक्ष रुनीचं म्हणणं घ्याच मनावर तुम्ही...
आमचा पूर्ण पाठींबा आहे.
~~~~~~~~~
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~
'मौसमी
'मौसमी फळात' याचंही नाव घाल भ्रमा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो.. कित्येक जुने मायबोलीकर दिसले, छान वाटलं
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
जबर्या
जबर्या लिहिलंय.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
टोणमलाच टोमणे!!! लय भारी.
खुपच छान....
खुपच छान....
ववि
ववि संयोजकांना शुभेच्छा...:)
मी पण वही घेउन येणार आहे..(कदाचित)..
ववि मध्ये चान्स मिळतो ना मिळतो. घ्या पहिल्या झारीची ..:)
जे कुणी लोक सुर्याला रवी म्हणतात
त्यातलेच काही मला कवी म्हणतात
भेटलो कधी बर्याच दिवसांनी त्यांना
तर काय पाडली कुठली नवी म्हणतात
कधी बसलो निवांतात आम्ही कुठे जर
आता पुरे का थोडी अजून हवी म्हणतात
चला तुमचं व्याकरण करू ठीक म्हणून
अहो मादी गव्याला ते चक्क गवी म्हणतात
वाटलंच जर जावं कधी पावसात फिरायला
मस्त साजरा करू यावेळेस ववी म्हणतात
Pages