मनुकांचे लाडू

Submitted by HemangiPurohit on 26 September, 2013 - 07:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : मनुका १ वाटी, काजू किंवा दाणे भरडलेले अर्धी वाटी, मिल्क पावडर २ चमचे
फाईन शुगर ( बारीक साखर) २ चमचे

क्रमवार पाककृती: 

कृती : मनुका स्वच्छ धुऊन पुसून त्याला मिक्सरमध्ये बारीक करावे. नंतर त्यात काजूचा किंवा दाण्याचा भरडा व मिल्क पावडर टाकून याचे लाडू वळावे व साखरेमध्ये घोळवून खायला द्यावे.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटताहेत हे लाडू... अकु ही रेसिपी शोधून दिल्याबद्दल धन्यवाद.
शाकाहारी आणि गोड पदार्थ, यांसोबत लाडू हा टॅगही टाकता येईल का? अजून लवकर सापडेल.

ही रेसिपी वापरुन मी डाएट बार्स तयार केलेत Happy काजुला अक्रोडने रिप्लेस केले, थोडे स्लाईस्ड बदाम वापरलेत. साखर मुळीच वापरली नाही. मनुका आणि क्रॅनबेरीज वापरल्यात. खूप सुरेख वड्या पडल्यात. फ्रीज मध्ये ठेवुन खुटखुटेत पणा पण आला. चव मस्त आहे. धन्यवाद.

काहीही... हे काय लाडू झाले...? किती महाग पडतील..!! अजिबातच पुरवठ्याचे नाहीत. आणि किती छोटे छोटे होतील.......कमी जिनसांत करायचे झाले तर! नुस्त्या मनुका काय वाईट लागतात का?

डाएट बार्स - हे बरोबर वाटतंय.फक्त चिकट होता कामा नये.अॅल्यु फॅाइलात चांगले गुंडाळून ट्रेकिंगला नेता आले पाहिजेत.