पहिला पाउस अनुभवायचाय !!

Submitted by अमित M. on 13 May, 2014 - 03:56

पहिला वहिला मॉन्सून पाहायला-झेलायला कधीपासून कुठेतरी जाईन म्हणतोय पण काही केल्या योग आला नाही. यावेळी मात्र वेळात वेळ काढून जाणारच. 'पहिला पाऊस कोकणातला' ह्या धर्तीवर कोकणात जायचा मनसुबा आहे. जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात १५०-१८० किमी च्या परीघात कुठे जाता येईल का ? १५०-१८० च लिमिट अशासाठी कारण आम्ही काही माबोकरानी सायकल वरून जायचं ठरवल आहे. असेल कोणी माहितगार किंवा आधी कधी पाऊस झेलायला कोकणात गेला असेल तर कृपया मार्गदर्शन करावे Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात १५०-१८० किमी च्या परीघात कुठे जाता येईल का ?>>>>दापोली, आंजर्ले, आसूद, केळशी Happy Happy

हा माझा अनुभव Happy
पहिला पाऊस कोकणातला

धन्स जीप्सी. खुपच मस्त लेख. तुम्हि म्हणत आहात तस दापोलि च विचार होता पण @२०० होइल. बघु. अगदिच काहि नाहि तर दिवेआगर किवा हरिहरेश्वर आहे मग.

बाकि तुमचा लेख याआधि वाचला होता. आज नव्याने वाचल. मजा आली.

जून १० नंतर कधीही मी असेल. तारिख लवकर फायनल करा. दापोली किती अंतर आहे नक्की ?
त्याआधी एक १५०+ राइड करुन येवू पुण्याजवळची रंगीत तालीम समजून .....