शेवग्याच्या पाल्याची भाजी

Submitted by दिनेश. on 11 May, 2014 - 10:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
प्रयोग !
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसतेय ही भाजी.

कोकणात दारात शेवगा असून पाल्याची भाजी करतच नाहीत आमच्याकडे, करायला हवी खरं म्हणजे पण फुलांची भगरा भाजी करतात. असं नवरा म्हणाला.

छान रेसिपी. शेंगदाण्याऐवजी खोबरं वापरून करतात ही भाजी आमच्याकडे. [ दादरच्या कबुतरखान्याजवळ बसणार्‍या भाजीवाल्यांकडे बर्‍याच वेळां मिळतो हा पाला ]. भोपळ्याच्या [लाल] कोवळ्या पानांची भाजीही अशीच छान होते.

अगदी आवर्जून लहान मुलांना द्यावी अशी भाजी आहे ही. मागणी कमी असल्याने बाजारातही कमी दिसते.
दादर, परळ, लालबाग, चेंबूर इथे मी बघितली आहे. गुजराथी लोकांत प्रसार झाला तर मागणी वाढेल.

आमच्या घरी फक्त गोकुळअष्टमीला ही भाजी लसुण, कांदा व खोबर घालुन बनवतात. दिनेशदा तुम्ही दिलेली पाककृतीचा उपयोग करुन यंदाच्या पावसाळ्यात नक्कीच बनवणार. गावी शेवग्याच्या फुलांची भाजी खाल्ली होती चव अफलातुन.

कथा अशी आहे..
द्रौपदीची थाळी.. त्यातून तिने सगळ्या पांडवाना वाढून स्वत: जेऊन नंतर धुवून ठेवलेली असते, आणि तेवढ्यात दुर्वास ऋषी शिष्यांसह तिकडे येतात. द्रौपदी कृष्णाचा धावा करते. तो हजर होतो आणि म्हणतो 'भूक लागली आहे'. जेवण अर्थातच नसतं. मग तो ती थाळी उचलतो , तर त्याला शेवग्याचं एक पान चिकटलेलं असतं. ते पान खाऊन त्याची भूक भागते.. म्हणुन जन्माष्टमीला ही भाजी... कृष्णाचं पोट भरावं म्हणुन.......

शेवग्याची झाडे कोकणच्या लाल मातीत भरपूर. त्यात Iron असते.

विनय, हा संदर्भ माहीत नव्हता. या कहाणीच्या आमच्या व्हर्जनमधे तुळशीचे पान होते.

शेवगा,

ह्याला ईंग्रजीत मुरंगा म्हणतात, आणि मळ्यालम मध्ये मुरुंग्यका,......

शेवगा दक्षिण भारतभर आणि कोकणात प्रसिद्द आहेच, पण देशा बाहेर सुद्दा शेवगा वापरला जातो,

शेवग्याची पाने जिवनसत्व, मिनरल्स, अ‍ॅंटीऑक्सिडंसचा असा खजिना आहे की असा साठा दुसर्या कुठल्याही
वनस्पतीत मिळत नाही.

शेवग्याची पाने, चीन, अति पुर्वेत आणि आफ्रिकेत वापरली जातात. आफ्रिकेत तर ह्या शेवगाच्या वाळलेल्या

पानांची पूड करुन ठेवलेली असते जी अन्नात टाकून नवजात शिशूनां दिली जाते.

मुरिंगा नावाच हेल्थ सप्लिमेंट अमेरिकेत प्रसिद्द आहेच.

हैदराबादच्या राष्ट्र संस्थेने शेवग्याचा असा एक फायदा सिद्द केला आहे ज्याने संपुर्ण भारतीय जनतेला त्याचा फायदा होऊ शकेल. शेवग्याच्या सेवनाने शरीरात औषधी लवकर शोषली जातात. याचा फायदा कर्क रोग्यांना सर्वात जास्त होऊ शकेल.

http://www.treesforlife.org/our-work/our-initiatives/moringa
http://en.wikipedia.org/wiki/Moringa

कल्पतरू म्हणावा असा वृक्ष...

आणि कोकणात... या झाडाची लागवड करू नये म्हणतात.. किंवा केलीच तर म्हातार्‍या माणसाने करावी.. असं काहीतरी शास्त्र आहे म्हणे... (कारण माहीत नाही.. )

त्यात आयरन खुप असते ते ठीक आहे पण ती खायची म्हणताना आपण पुढं आणि आपली आय आपल्या मागे पळत (रनत) असली चव असावी त्या पाल्याची. त्यामुळेच फोटूत बाकी लवाजमा जास्तं आणि पाला मात्र अगदी कमी अशी आयरनी आहे बघा. Proud

ओन्ली किडिंग बरका दिनेशदा. आपण हवी तशी करुन खावी भाजी. आम्ही पण कधी कधी पालक अशीच इतर गोष्टींच्या मार्यातच खातो. Happy

शेवग्यात / त्याच्या पानात लोहाबरोबरच भरपूर अ आणी क जीवबसत्व असते. त्याच्यातली प्रथिने पाचक असतात.

दिनेशजी भाजी मस्त दिसतीय, पण तुम्हाला शेन्गदाणे जास्त आवडतात का? म्हणजे पातळ भाजीत किन्वा बाकी इतर पदार्थात पण ते असतात.:स्मित:

आम्ही ( म्हणजे मी, आई आणी साबा) अळुच्या भाजीत घालतो दाणे, डाळ आणी खोबरे काप वगैरे. पण बाकी भाज्यात त्याचे प्रमाण कमी असते. माझी चुलत जाऊ मात्र प्रत्येक भाज्यात सढळ हाताने शेन्गदाणे घालते. अगदी शेपुत सुद्धा.

ही भाजी आमच्या कोल्हापुर साईडला मृग नक्षत्र सुरु होते त्या दिवशी म्हणजे जुनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते.

विवेक, छान माहिती.
युगांडा मधे सरकारी प्रोत्साहनाने शेवग्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. पण पुढे त्याचे योग्य प्रकारे मार्केटींग न झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. स्वाहिली भाषेतही मोरिंगा असेच नाव आहे.

इथे अंगोलात त्याची झाडे जागोजाग आहेत, पण या शेंगा ना बाजारात असतात ना हे लोक खात. क्वचित कधीतरी एखादी म्हातारी बाई पाने तोडताना दिसते. शेंगा तर झाडावरच सुकून जातात. केनयात या शेंगांचा खप आहे पण तो जास्त करून भारतीय लोकांमधेच.

त्यामूळे आफ्रिका असे कुणी लिहिले की जरा काळजी वाटते. अगडबंब खंड आहे हा ( मला प्रवासात ऊभा आडवा पार करावा लागतो ना ) प्रत्येक देशाचे हवामान आणि संस्कृती वेगवेगळी आहे. अर्थातच खाद्यसंस्कृती पण.

रश्मी, इथे ओल्या खोबर्‍याचा वापर नाहीच. म्हणून शेंगदाणे. आणि तसेही मला ते खुप आवडतात. घरी भाजलेले नेहमीच असतात. पूर्व आफ्रिकेत आणि पश्चिम आफिकेतही त्यांचे भरपूर पिक येते. नायजेरीयात तर केळी आणि शेंगदाणे हे एकत्र खाणे खुपच लोकप्रिय आहे. नायजेरियात जसे खमंग भाजलेले शेंगदाणे मिळतात ( ते बाटलीत सीलबंद मिळतात ) तसे मी इतर कुठल्याच देशात खाल्ले नाहीत. भारताच्या पूर्वेकडे ते खुपदा तळलेले असतात. ( आणि मला तरी शेंगदाण्यांने पित्त वगैरे होत नाही. ) इथे अंगोलात शेंगदाण्याचे पिठ
( कूट नाही, पिठच ) तयार मिळते. सूपमधे दाटपणासाठी ते वापरतात. ( नायजेरीयात तर भोपळ्याच्या सोललेल्या बिया आणि सुकट एकत्र वाटून वापरतात. आपल्या नारळाच्या वाटणापेक्षा ते फारच आरोग्यपूर्ण आहे. )

बुवा, बर्‍याच पालेभाज्या शिजल्यावर चोरट्या होतात. त्यामूळे अशी भर. आणि त्याद्वारे पालेभाज्यांत नसलेली प्रथिने मिळवता येतात.

हो पालेभाज्या शिजल्यावर चोरट्या होतात, त्यामुळे २ माणसाना अख्खी जुडी लागु शकते. तेच पातळ भाजी केली की बेसन, डाळ वगैरे मुळे थोडीच लागते.

शेन्गदाण्याच्या बाबतीत माझी जाम पन्चाईत.:अरेरे: मला फार पित्त होते, त्यामुळे पोह्यात पण घालणे सोडलेय.

बाकी माहिती तुम्ही आणी नाईकानी उत्तम दिलीत.

वा भाजी दिसतेय मस्तच. मी पुण्यात अशी भाजी विकत कधी पाहीली नाही. सहजच सांगीतले. माझ्या दारातच झाड आहे..मला आंबट गोड भाज्या आवडतातच .नक्की करुन पाहीन. दोन माणसांसाठी एकावेळेसाठी एक वाटी भरुन पाने घेउका?

दिनेशदा मस्त रेस्पी.
माहीतीसाठी सर्वांना धन्यवाद. या पावसाळ्यात मिळाली पानं तर नक्की करून पाहणार.