नविन प्रोजेक्टमधे घर घेताना त्या प्रोजेक्टची सत्यता कशी पडताळुन पहावी?

Submitted by निल्सन on 7 May, 2014 - 08:00

मी सेकंड होम / गुंतवणुक साठी नविन प्रोजेक्टमध्ये शोधले असता मला नेटवर शहापुरजवळ एक प्रोजेक्टची जाहीरात दिसली. त्यांचे ऑफिस ठाण्यात माझ्या घरापासुन जवळच असल्यामुळे आम्ही तिथे गेलो. आम्हाला तो प्रोजेक्ट आवडला आहे व बजेटमध्येपण आहे पण मला कसे कळेल की तो डेव्हलपर खरा आहे कारण काही महिन्यांपुर्वी भिवंडीतील बिल्डर्स सुरवातीला आपण जी २०% रक्कम देतो ती घेऊन पळुन गेले.

तर मी जो शहापुरचा प्रोजेक्ट पाहतेय त्यांची वेबसाईट आहे तसेच त्यांचे गोवा, लोणावळा व साऊथलाही प्रोजेक्ट सुरु आहेत तर काही सुरु होणार आहेत. याचा जो CMD आहे तो चेन्नईतला नावाजलेला उद्योगपती आहे. त्याची आधी एका नावाने इलेक्ट्रॉनिक्स कंपनी होती. नंतर त्याने दुसर्या नावाने रिसॉर्ट आणि हॉटेलचा उद्योग सुरु केला आणि आता तो डेव्हलपर्स आहे. (ही सर्व माहीती नेटवरुन व त्यांच्या ऑफिसमधुन)

तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहापुर येथे त्यांनी ३२ एकर जागा विकत घेतली आहे तिथे आम्ही पाहत असलेला नविन प्रोजेक्ट ते मे महिन्याच्या शेवटी सुरु करत आहेत. त्यात ते सर्व सुखसोयी देणार आहेत जसे स्विमिंगपुल, क्लबहाऊस मेंबरशिप, सेमी फर्निश फ्लॅट तसेच शॉपिंग मॉल इ. फ्लॅटचे पझेशन ३० महिन्यात.

जर मी विकत घेणार असलेले घर मला १८ लाखाला येतोय तर २ महिन्याच्या आत २.५ लाख भरायचे. उरलेली रक्कम बँक लोन (अ‍ॅक्सिस / DHFL) अथवा बिल्डरला ७२ महिन्यात फेडायची ( याला ते In House Finance म्हणतात). २.५% रक्कम बिल्डरकडे जमा झाल्यावर ते स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेशन करुन देणार. सुरवातीला जेव्हा २.५ लाख देणार तेव्हा अ‍ॅग्रिमेंट बनवुन त्याला नोटरी करणार.

एव्हढेच नाही तर त्यांचे जे रिसॉर्ट आहेत तिथे फ्री मेंबरशिप, तसेच डोमेस्टिक / इंटरनॅशनल कुठे जाणार असाल तर ३ ते ५ तारका हॉटेलमध्ये ६ रात्र ४ जणांसाठी फक्त ८००० / १४०००. ( एक साईटचा पत्ता सांगितला होता आता विसरली मी www.de .......... यावर चेक करा असे सांगितले)

तर एव्हढी सगळी क्रुपाद्रुष्टी (कसे लिहायचे?) करतायत म्हणुन जाम संशय येतोय. त्यासाठीच मला या बिल्डरची सत्यता कशी पडताळुन पाहता येईल हे पाहीजे. प्लीज मदत करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांच्या कडून सगळे कागद घ्या. प्रत्यक्ष साईट वर जाऊन पाहणी करा.तसेच ग्राम पंचायत मध्ये जाव्वून चोकशी करा.

धन्यवाद दिपकजी.

साईट पहायला रविवारी जाणारच आहोत. पेपरमध्ये जमिनी खरेदीचे आणि बिल्डींगचा प्लानसाठी सांगितले आहे अजुन काय जरुरी पेपर आहेत?

सामान्य माणसाने ज्या प्रोजेक्ट चे बांधकाम बर्‍यापैकी पुढे गेले आहे अश्याच ठीकाणी बुक करावे.
३० महिन्यात सांगुन ६० महिने पण लागु शकतात. कदाचीत पुर्ण च रखडु शकतात प्रोजेक्ट.

३० महिन्यात सांगुन ६० महिने पण लागु शकतात. कदाचीत पुर्ण च रखडु शकतात प्रोजेक्ट. >>>>> असे होतेच बर्याचदा. मी पण ही शंका विचारली
त्यासाठी या बिल्डरने अ‍ॅग्रिमेंटमध्ये क्लॉज दिलाय की दिलेल्या वेळेत पझेशन नाही दिले तर महिना पर स्क्वे.फुट ७.५ रुपये व्याज देणार.

हा दुसरा धागा नन्तर पाहिला....

१. सगळ्यात आधी जागेचा सातबारा उतारा चेक करा … त्यावर बिल्डरचे नाव असले पहिजे. जर नसेल तर मूळ जागा मालक आणि बिल्डर ह्यांच्यामधील 'डेव्लपमेण्ट अग्रीमेंट आणि पावर ऑफ attorney' चेक करा. (बिल्डर देइल )
सातबारा तुम्हाला इथे http://mahabhulekh.maharashtra.gov.in/ बघायला मिलेल. इथला सातबारा १ वर्ष जुना असू शकतो . लेटेस्ट सातबारा तलाठी कार्यालयात मिळेल.

२. गाव नकाशा मध्ये तुम्हाला दिलेल्या सातबारा उतारयाची जागा योग्य आहे हे चेक करा . (तलाठी कार्यालयात मिळेल ).
सातबारा मध्ये जो सर्वे नंबर दिला आहे तो रहिवासी विभागात येतो काय हे चेक करा. हे डीटेल्स तुम्हाला डेव्लपमेण्ट प्लान मधील झोन बघून कळतील . डेव्लपमेण्ट प्लान चे नकाशे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेबसाईट वर मिळतात.

३. जो बांधकामाचा प्लान मंजूर झाला आहे त्याची खात्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेबसाईट वरून करून घ्या.
उदा. पुणे महानगर पालिकेची वेबसाईट किंवा पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची वेबसाईट .
http://www.punecorporation.org/pmcwebn/index.aspx
https://www.pcmcindia.gov.in/

३. बांधकाम चालू करण्याचा दाखला चेक करा. त्यावरचे सर्वे नंबर आणि बांधकामाचे क्षेत्रफळ , अनुक्रमे सातबारा आणि मंजूर नकाशा बरोबर तुलना करून बघा . (स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेबसाईट वरून घ्या. )

गणोबा ह्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आवश्यक आहेतच. सोबतच...
१) ज्या जागेवर प्रस्तुत प्रकल्प राबविण्यात येत आहे त्या जागेचे बिनशेती आदेश (Non Agriculture Order) पारित झालेले आहेत हे सुध्दा पडताळुन घ्या.
२) प्रकल्पातील जमिनीवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर प्रकरणे (Legal Matters) प्रलंबित आहेत का हे सुध्दा पडताळुन घ्या.
३) प्रकल्पाला मिळालेल्या शासनाच्या विविध विभागाच्या परवानगींची प्रत दाखविण्याची मागणी करा. उदा. पर्यावरण विभाग (Environmental Dept.), वनविभाग (Forest Dept.) इत्यादी.
४) नागरी जमिन कमाल धारणा कायद्यान्वये (Urban Land Ceiling Act, 1976) मिळालेल्या परवानगींची मागणी करा.

सातबारा, परवानग्या हे सर्व बघाल, पण बिल्डर च्या नीयती ला कसे ओळखु शकाल. जी प्रोजेक्ट रखडलेली आहेत, किंवा बिल्डर नी फसवले आहे अश्या बर्‍याच प्रोजेक्ट साठी बँका, HDFC नी सुद्धा कर्ज मंजुर केली आहेत.

हा भारत देश आहे, इथे सर्व बेकायदेशीर गोष्टी होऊ शकतात.

म्हणुनच अनोळखी बिल्डर आणि काम सुरु झाले नाही अश्या प्रोजेक्ट मधे धाडस दाखवु नका.