Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 April, 2014 - 06:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
१) प्रथम अंडी उकडून, साले काढून त्याला सुरीने हलक्या हाताने वरून चिरा द्या.
२) पालक गरम पाण्यात थोडा वाफवून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करुन घ्या.
३) भांड्यामध्ये तेल गरम करून त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवा.
४) शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला घालून जरा परतवा.
५) आता वरील मिश्रणावर पालक घालून थोड ढवळा व त्यात गरजे नुसार मिठ, लिंबू रस व गरम मसाला घालून ढवळा.
६) ह्या मिश्रणाला थोडी उकळी आली की त्यात उकडलेली अंडी सोडून हलक्या हाताने ढवळा व झाकण देऊन थोडी वाफ येऊ द्या.
वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी १ अंड हवच.
अधिक टिपा:
चिरा देताना अंड्याचे तुकडे होउ देऊ नका. बलक लागे पर्यंतच चिर द्या म्हणजे पालक मसाला आत मुरेल.
चविला अप्रतिम लागते ही डिश. माझ्या दोन्ही मुलींना प्रचंड आवडला हा प्रकार.
माहितीचा स्रोत:
मी स्वतःच बनवला हा प्रकार.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जागू.. खूपच मस्त.. तुझ्या
जागू.. खूपच मस्त.. तुझ्या रिसिपी वाचताना भूक चाळवतेच..
अगो, छोले/चणे घालूनपण छान
अगो, छोले/चणे घालूनपण छान होतात पालक-छोले.
इथे लिहिले आणि मग भाजी आणायला
इथे लिहिले आणि मग भाजी आणायला गेल्यावर आठवले प्राची
छोले घालूनही केलाय पालक पण त्यात पालकाची प्युरी नाही वापरली.
शिवाय सुरण-पालक बरेचदा केला जातो पण त्यातही पालक बारीक चिरुनच.
अंडी-पालक काँबिनेशन खतरा लागणार हे नक्की
जागू, मस्त रेसिपी. पण विना
जागू, मस्त रेसिपी. पण विना अंड्याची करून बघेन, पनीर घालून करीन. मी अंड खात नाही म्हणुन, पण पालक आणि अंड हे खरोखर तुझं ग्रेट इनोवेशन आहे.
हे म्ह्णजे आलू-पालक,
हे म्ह्णजे आलू-पालक, पालक्-पनीर types झाले. चांगलच लागेल चवीला पण हे authentic अंड पालक नाही. अंड पालक हे जळगाव साईडला अंडी फोडून चिरलेल्या पालका बरोबर शिजवतात ते. पोळी-ब्रेड बरोबर ब्रेकफास्टला खातात.
जागू , छान झालं होते. फक्त
जागू ,
छान झालं होते. फक्त त्यात पनीर होते.पनीर न तळता उकडून घातले.
बीएस - रेसिपी द्या. जास्त
बीएस - रेसिपी द्या. जास्त सोप्पी असेल ना.
बीएस - रेसिपी द्या. जास्त
बीएस - रेसिपी द्या. जास्त सोप्पी असेल ना.>>> माहीत नाही. ओळखिच्या लोकांनकडे नेहमी करायचे. त्यांचाच कड्न कळ्ळ हे जळगात खासियत आहे. चवीला एवढे खास वाटले नाही म्हणून रेसिपीची कधी चौकशी केली नाही. त्याच्यापेक्श्या जागूची रेसिपी नक्कीच चवदार वाटते.
माझ्या करता नवीन प्रकार आहे
माझ्या करता नवीन प्रकार आहे हा. मस्तच दिसतोय, आणि असेलच.
Pages