Submitted by प्राची on 25 April, 2014 - 02:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
उकडलेले बटाटे,
तीळ,
हिरवी मिरची,
कडीपत्ता,
कांदा,
लिंबू,
कोथिंबीर,
मीठ,
हळद,
फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग.
क्रमवार पाककृती:
१. बटाट्याच्या भाजीला करतो तसे बटाटे चिरून घ्यायचे.
२. तीळ खमंग भाजून पूड करून घ्यायची.
३. फोडणी करून कडीपत्ता, मिरची घालून थोडी हळद घालायची.
४. आता बटाट्याच्या फोडी घालून परतून घ्यायच्या.
५. वरून मीठ आणि तिळकूट घालून नीट परतून घ्यायचे. तीळकूट बटाट्याच्या फोडींना नीट लागले पाहिजे.
६. आता गॅस बंद करावा.
७. वरून कांदा उभा चिरून घालावा. कोथिंबीर चिरून घालावी.
८. लिंबू पिळून मिक्स करून घ्यावे.
९. गुरखाली चटणी तयार.
वाढणी/प्रमाण:
खाल तसे.
अधिक टिपा:
१. याला चटणी का म्हणतात ते मला माहिती नाही.
२. कांदा कच्चाच घालावा.
३. पोळीबरोबर मस्त लागतो हा प्रकार.
माहितीचा स्रोत:
गुरखाली भाषिक मैत्रीण
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त वाटतो आहे प्रकार. बटाटे
मस्त वाटतो आहे प्रकार.
बटाटे उकडून घ्यायचे का?
तीळ कुठले? पांढरे की काळे, पॉलिश्ड की अनपॉलिश्ड?
लिंबू असल्याने मी साखर पण घालणार.
हो ग, उकडलेले बटाटेच की. तीळ
हो ग, उकडलेले बटाटेच की.
तीळ पांढरे. (पॉलिश्ड्/अनपॉलिश्ड कोणतेही चालतील. :))
छान आहे हा प्रकार.
छान आहे हा प्रकार.
पहाडी आलूच्या जवळपास जाणारी
पहाडी आलूच्या जवळपास जाणारी रेसिपी वाटली. त्या रेसिपीत कान्दा नव्हता.
पहाडी आलू
मस्तय की हा प्रकार...
मस्तय की हा प्रकार...
माझी आजी उकडलेल्या
माझी आजी उकडलेल्या बटाट्याच्या पिवळ्या भाजीला कधीकधी दाण्याचं कूट घालायची, ते आठवलं.
अकु, खरेच की ग!!!
अकु, खरेच की ग!!!
पर्वतीय भागातली रेसिपी
पर्वतीय भागातली रेसिपी असल्याने असेल कदाचित! पण चव भारी लागते!
असेल. तू कांदा घालून बघ. मस्त
असेल. तू कांदा घालून बघ. मस्त लागतो कच्चा कांदा.
मस्तच आहे हा प्रकार.
मस्तच आहे हा प्रकार. पाहुण्यांसाठी केल्यास हमखास हिट जाणार
कच्च्या कांद्याने एकदम वेगळीच चव येणार.
सही प्रकार. सगळं साहित्य आहे.
सही प्रकार. सगळं साहित्य आहे. आजच करते.