उन्हाळा सुरु झाला की त्या मौसमातील खास फळं खायला मिळतात. त्यातलेच फणस हे एक. ह्याच्या आठळा ह्याचे अगणित प्रकार मग आमच्या घरी सुरु होत. आठळ्याच्या पीठाचे थालीपीठ, आठळा-जवळा, आठळा-करंदी, आठळा-गवार, आठळा-वांग वगैरे वगैरे. त्यातलेच काही प्रकार देण्याचा प्रयत्न राहिल. :)(घाबरवत तर नाही नं?)
फणस आणि त्याच्या आठळा किती बहुगुणी आहेत हे गूगलून मिळेलच तसेच आजी, आई कडून एकले असेलच तेव्हा इथे ते देत नाही
आठळाची अशीच एक सुंदर व माझी आवडती रेसीपी देतेय. बघा तुम्हाला आवडते का?
हि एक टू इन वन अशी पाककृती आहे. घट्ट केली तर भाजी, पातळ केली तर आमटी म्हणून खपू शकेल पण एकंदरीत हि भाजीच प्रकारात मोडते ज्यास्त आमच्याघरी.
जिन्नसः
१) फणसाच्या सुकवलेल्या आठळा,जितकी ज्यास्त भाजी कराल तितकी ती कमी पडते. तेव्हा तुम्हाला आवडेल तेवढे घ्या. आठळा ठेचून साल काढून पाण्यात टाकून ठेवा.
२)शेवग्याच्या शेंगा वरून खरवडून धूवून मग त्याचे तुकडे करून घ्या.
३) साजूक तूप घरचे असेल तर उत्तम.
फोडणीसाठी: हिंग, राई, उभी चिरलेली एखादी हिरवी मिरची, लाल बुटक्या मिरच्या आवडतील तश्या, लसणीच्या २-३ पाकळ्या ठेचून.
वाटणः
१ वाटी खोवलेल ओलं खोबरं, १ मोठा कांदा, ७-८ लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर. ह्याच क्रमाने जरासे तेल टाकून छान परतून घ्यायचे वेगवेगळे , मग थंड झाले की छान गंधासारखे वाटून एकत्र करून घ्यायचे.
कोरडा मसाला:
धणे, जीरं(प्रत्येकी पाव चमचा), मेथ्या( ३-४ दाणे), जायपत्री, लवंग(१-२), अर्धं इंच दालचिनीचा तुकडा, काळे तीळ. सर्व कोरडे भाजून थंड करून पूड करावी. ह्यात पाव चमचा मालवणी लाल मसाला मिसळून ठेवावा.
१) एका टोपात तूप कढले की, फोडणीचे सामान ज्या क्रमाने दिलेय तसेच घालत खमंग फोडणी करावी.
२) लगेच त्यात आठळा परताव्या. जरासे आधणाचे पाणी टाकून झाकण ठेवून जरावेळ शिजू द्याव्या
३) आठळा अर्ध्या पेक्षा जरा ज्यास्त शिजल्या वाटतील तेव्हा शेवगाच्या शेंगा परताव्या व लागलीच वरचा मसाला एक चमचा टाकावा. छान परतून पुन्हा झाकण ठेवून आच मंद करून शिजवावे. लागलीच तर आधणाचे पाणी जरासे टाकावे.
४) आठळा व शेंगा शिजल्या की भाजीच्या प्रमाणात वरील वाटण लावावे. मीठ टाकून जरावेळ वाफवून आच बंद करावी
जर आमटी कराची असेल तर नारळाचे घट्ट दूध घालून थोडया वेळाने आच बंद कराची.
काहीच नाही.
आठळा आणि शेंगा ह्याचा मलदा करु नका फक्त.
शेवगाच्या शेंगा मिळाल्या की
शेवगाच्या शेंगा मिळाल्या की भाजी करून फोटो टाकेन लवकरच.
मस्त.. इथे शेवग्याच्या शेंगा
मस्त.. इथे शेवग्याच्या शेंगा जंगलात मिळतात.. आठल्यांसाठी चेस्टनट्स वापरीन.
आठळ्याच्या पीठाचे थालीपीठ,
आठळ्याच्या पीठाचे थालीपीठ, आठळा-जवळा, आठळा-करंदी, आठळा-गवार, आठळा-वांग वगैरे वगैरे. त्यातलेच काही प्रकार देण्याचा प्रयत्न राहिल. (घाबरवत तर नाही नं?)
बिन्दास टाका. आठळ्या माझ्याही लाडक्या आहेत. गरे खाऊन झाले की दुस-या दिवशी आठळ्या एकतर भाजुन नाहीतर उकडून खाणे हा माझा लाडका उद्योग होता कोणे एके काळी
रच्याकने, आठळीचे अनेकवचन आठळ्या. तुम्ही आठळा लिहिलेय ते वाचताना अडतेय..
.
.
आठळा/ आठळ्या दोन्ही
आठळा/ आठळ्या दोन्ही ऐकलंय.
आम्ही आठळ्या म्हणतो.
तुमच्या यादीतले सगळे प्रकार अतिशय आवडते.
बाकी सीफूड बरोबर कच्च्या कैरी ही मस्तं लागतात.
म्हणजे कैरी घातलेला जवळा, सुक्का कोळीम, काढ, करंदी, खेकड्याचं साळणं, माश्यांचं सांबारं.
आत्ताच आईचा फोन आला होता रत्नागिरच्या घरात कैरी आणि कांटांचं सांबारं खातोय म्हणून .
मी आठळ्या असल्या की
मी आठळ्या असल्या की नेहेमीच्या आमटीत घालते बऱ्याचदा.
आठळ्या घालून मायाळूची व
आठळ्या घालून मायाळूची व तूरीच्या डाळीची आमटी छान होते. धणे/लाल मिरच्या/ खोबरे वाटून लावायचे. चिंच तिरफळ घालून उकळायचे. वरून लसणाची फोडणी द्यायची.
आठळे उकडून खाणे हा एक आवडता
आठळे उकडून खाणे हा एक आवडता उद्योग होता..
भारी रेसिपी, करुन बघणार!
भारी रेसिपी, करुन बघणार! उकडुन खायला पण आठळ्या छानच लागतात.
देवीका आज्ज्याबात(!!) घाबरवत
देवीका
आज्ज्याबात(!!) घाबरवत नाहीयेस! फणस ( आठळ्या ) शेवगा या तर सगळ्या परसदारातल्या भाज्या! अति आवड्त्या!
मस्त! लगे रहो!
बरेच दिवस वाट पाहून शेवगाच्या
बरेच दिवस वाट पाहून शेवगाच्या शेंगा मिळाल्या नाहीत. मग शेवटी घरात होती ती झुकीनी आणून घातली.
मस्त दिसतेय भाजी. आजपर्यंत
मस्त दिसतेय भाजी. आजपर्यंत फक्त भाजून/शिजवूनच खाल्ल्यात फणसाच्या बिया. शेवग्याच्या शेंगा पुष्कळ आहेत पण इथे अजून फणस घरी आला नाही. बुकमार्क करून ठेवतो पाकृ. पाकृसाठी धन्यवाद.