Submitted by श्री on 5 April, 2014 - 10:00
पुण्यात फ्लॅटसचे रेट्स बर्यापैकी वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत पुण्यात ८०-९० लाखाला फ्लॅट घेऊन तो भाड्याने देणे गुंतवणुकीच्या दृष्टीने कितपत किफायतशीर ठरेल ?
आज फिक्स्ड डिपॉझिटला चांगला रेट आहे पण तो काही काळाने नक्कीच कमी होईल. अगदी ६ टक्के इंटरेस्ट रेटने पुढील १० वर्षांत होणारी फिक्स्ड डिपॉझीटवरील बचत ही फ्लॅटच्या १० वर्षांत वाढलेल्या किमंतीपेक्षा कमी असु शकते.
तुम्हाला काय वाटत ? पुण्यात फ्लॅटमध्ये गुंतवणुक फायदेशीर ठरेल का ? आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने कुठल्या एरियात फ्लॅट घेणं योग्य ठरेल ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुण्यात तेवढी भाडी मिळत
पुण्यात तेवढी भाडी मिळत नाहीत, बॅन्गलोरमध्ये भरपूर भाडी मिळतात. पण फ्लॅटच्या किंमतीमध्ये वाढीचा दर पुण्यात बॅन्गलोरपेक्षा जास्त आहे.
९० चा एक घेण्या पेक्षा दुसरी
९० चा एक घेण्या पेक्षा दुसरी कडे जिथे कमी रेट आहे परंतु जास्त ग्रोथ असेल अश्या ठिकाणी २-३ घेउन ठेवा
समजा २०-२५ लाखाचा फ्लॅट घेतला तर येत्या ३ वर्षात त्यांची किंमत नक्कीच ३५ च्या वर जाणारच
असे जर ३ घेतले तर तुमचे किमान १० लाख प्रत्येकी असे ३० लाख ३ वर्षात बनु शकतील ..
पण त्याकरीता ग्रोथ होत असल्या शहरात फ्लॅट शोधने महत्वाचे आहे
मी २ वर्षापुर्वी १४ ला घेतलेला आता त्याची किंमत ३५ मिळत आहे..
मला तर कधी कधी असे वाटते की
मला तर कधी कधी असे वाटते की पुण्यात घेण्यापेक्षा इन्दोर सारख्या शहरात घ्यावा का फ्लॅट ?
उदयन मग काय पार्टी शार्टी हाय
उदयन मग काय पार्टी शार्टी हाय का नाय
पुण्यात एखाद्या अपकमिन्ग
पुण्यात एखाद्या अपकमिन्ग एरियात दुकानाचा गाळा किती पर्यंत मिळू शकेल ?
१० ते २० लाखाच्या दरम्यान मिळेल का ? आणि पुढे भाव किती वाढू शकेल ?
गुंतवणूकीसाठीचा एक विचार. (दुकान चालू करायचे नाही)
पाटील साहेब मी विकला नाही
पाटील साहेब मी विकला नाही अजून
लोकाचा एक स्वीट स्पॉट असतो.
लोकाचा एक स्वीट स्पॉट असतो. फ्लॅटस साठी पुण्यात सध्या तो ५०-८० लाख आहे. त्यचा वर फ्लॅट घेतला तर विकयला पण वेळ लागतो तसेच भाडे पण % मध्ये खुप कमी मिळते.
त्यामुळे ८० लाखाच्या आत फ्लॅट घेतला तर विकायला अडचण येणार नाही आणी चार पैसे सुटतील. पुढील १० वर्षात जो भाग जास्त develop होईल तिकदे घेतल्यास return जास्त येतील (This is million dollar question)
If you are looking flat as investment then at this rate fixed deposit is still good option even though rate goes down. Because rate will go down only when floating money in market goes down. (fiscal deficit is low) With floating money goes down, housing demand will go down. During 1999 to 2004 interest rates where going down but flat rates where stable. Locking high interest rate for longer period can be one of the option.
Nothing runs longer. Gold was also giving higher returns for 6 years then it is stable for last two years so fixed deposit is having better return.
Share market was also giving high return then it was lingering at 17,000 for few years(so fixed doposit was having better return) & it was started again running high.
Best option is to catch the stuff which has high potential. Not many people have this skill. ( at least I do not have it)
घरांच्या किंमती वाढल्या नाही
घरांच्या किंमती वाढल्या नाही तर रुपयाचे अवमूल्यन झालं आहे.. त्यामुळे रुपयाची Puarchasing Power maintain करण्यासाठी घरात गुंअतवणूक करु शकतात. २ ते ५ वर्षासाठी यात जोखीम जास्त आहे... Long termसाठी चांगले आहे.
धन्यवाद सगळ्यांना , तुम्ही
धन्यवाद सगळ्यांना , तुम्ही दिलेल्या सल्ल्यावर जरुर विचार करेन.
श्री, पुण्यात फ्लॅट घेतलाच तर
श्री, पुण्यात फ्लॅट घेतलाच तर आयटी पार्कच्या जवळ असेल असाच घे... बरचं भाडं मिळतं
तळेगाव कसे आहे गुंतवणुकीला
तळेगाव कसे आहे गुंतवणुकीला रेट जरा स्वस्त आहेत. (long term investment)
मंदार, तळेगाव (दाभाडे)
मंदार,
तळेगाव (दाभाडे) गुंतवणुकीपेक्षा जर तुम्ही तिथे राहुन निवांत लाईफ एंजॉय करणार असाल तर जास्त चांगले आहे. जर तुम्हाला चांगले रिटर्न्स हवे असतील तर मात्र तुमची निराशाच होइल कारण बाणेर, बालेवाडी, रावेत, वाकड, हिंजवडी, खराडी, वाघोली, मोशी इ. सारखे रिटर्न्स तिथे तुम्हाला नक्कीच मिळणार नाहीत. ओवर (खुप ) लाँग टर्म म्हणजे किमान 10/15 वर्षानी भाव वाढतील पण जर तुम्हाला पाच वर्षात घसघशीत रिटर्न्स ची अपेक्षा असेल तर ते एवढे फास्ट मिळणार नाही.
ज्याना इन्वेस्टमेंट आणि त्यातुन रिटर्न्सची अपेक्षा आहे त्यांनी मी वरील सांगितलेल्या ठिकाणावरच विचार करावा.
Cheap things are cheap and expensive things are expensive for a reason
2 BHK, 1282 Sq-ft Flat For
2 BHK, 1282 Sq-ft Flat For Sale in Kothrud, Pune , Price: 59.0 Lac(s) Onwards (Price per sq.ft. : Rs. 4,602)
Zinnea by Surana Bhansali Natekar Developers , Zinnea is situated near Chandni Chowk.
कोणाला ह्या प्रोजेक्टविषयी अजुन काही माहीती आहे का ? बिल्डर विषयी ? कोथरुडमधले रेट्स ह्या रेट्स पेक्षा जास्त असावेत असा अंदाज आहे ?
4000 पर्यंत घेऊन या... व्हँट
4000 पर्यंत घेऊन या... व्हँट आणि रजिस्ट्री त्यात टाकून घ्या
सौदा बरा वाटतोय मग
३ वर्ष तुम्हाला फ्लैट स्वतः
३ वर्ष तुम्हाला फ्लैट स्वतः कडे ठेवावा लागेल अन्यथा 33% टँक्स द्यावा लागेल ३ वर्षानंतर 10% च द्यावा लागेल
टु बी एच के कोथरूड मध्ये आणि
टु बी एच के कोथरूड मध्ये आणि ५९ ल्याक्स . खूपच छान आहे
उदयन्.....माझा पण हाच विचार
उदयन्.....माझा पण हाच विचार आहे कै एक दिवस्.....पण नाशिकात पाहिले मी.....already खूप high आहेत्......तुम्ही कुठे घेत्लाय? आणि तुमच्या मताने कुठे बघावा? प्लिज हेल्प...
नाशिक मधे फिल्म स्टार आणि
नाशिक मधे फिल्म स्टार आणि गुजराथी लोकांनी भाव फार वाढवुन ठेवले आहेत.. त्यापेक्षा टिटवाळा कर्जत नेरळ साईड ला बघा जे आता आता प्रगतीपथावर आहेत
2 BHK, 1282 Sq-ft Flat For
2 BHK, 1282 Sq-ft Flat For Sale in Kothrud, Pune , Price: 59.0 Lac(s) Onwards (Price per sq.ft. : Rs. 4,602) >> हा कोथरूड मध्ये म्हणजे नक्की कुठे आहे? बिल्डिंग किती जुनी आहे? घ्यायचा विचार असेल तर कागदपत्रं नीट तपासून घ्यावीत. बाकी डिल चांगलं वाटतंय.
<<2 BHK, 1282 Sq-ft Flat For
<<2 BHK, 1282 Sq-ft Flat For Sale in Kothrud, Pune , Price: 59.0 Lac(s) Onwards (Price per sq.ft. : Rs. 4,602)
Zinnea by Surana Bhansali Natekar Developers , Zinnea is situated near Chandni Chowk.>>
लोकेशन बघून वाटतय विचार करु नये. २४ तास ट्राफिकचा आवाज.
उदयन्....धन्यवाद्....आता उस
उदयन्....धन्यवाद्....आता उस गोड लागला म्हणून मूळापासून खातोय माफी असावी!!!.....तुम्ही सान्गितलेल्या areas मधे काही specific builders/schemes माहित आहेत का? खूप मदत होईल........please...
केवळ गुंतवणूक म्हणून फ्लॅट्स
केवळ गुंतवणूक म्हणून फ्लॅट्स घेउन घरांच्या किमती वाढवू नका!
aho swaroop kaka....amhee
aho swaroop kaka....amhee heee yaachi kimmat mojaliye.....ti vasoonl karayacha prayatna chalalay.....ani vasoolee haa vaeet shabd mulich nahi....
नाना.... जशी तुमची मर्जी
नाना.... जशी तुमची मर्जी
गुंतवणूक करणार्यांनी फक्त एक
गुंतवणूक करणार्यांनी फक्त एक गणित करा
10लाख रूपयावर 9% व्याजाने डिपाजिट ठेवल्यास चक्रवाढ ने ३ वर्षानंतर किती रिटर्न मिळतील?
10लाख किंमतीच्या सोन्याचे 3 वर्षानंतर ३-५% सहामाही जरी वाढ धरली तर किती मिळतील?
10लाख किंमतीचा फ्लँट ३ वर्षानंतर किती वाढेल आणि 10% टँक्स भरल्यावर व रेडी रेकनर पध्दतीने किती किंमत मिळेल?
यात ज्या प्रश्नाच्या उत्तरात रिटर्न जास्त तो निवडावा..
उदयन.. >> आपण पहिल्या
उदयन.. >> आपण पहिल्या पर्यायात कर वजा करायला विसरला आहात.
तो इन्कम टँक्स मधे वजा होतोच
तो इन्कम टँक्स मधे वजा होतोच आणि डीपोझीट वर सवलत देखील असतेच
घरात ३ वर्षानंतर १०% नाहीतर लवकर विकले तर ३३% डायरेक्ट लागतात लाभ कमी होतो
पुणे पासुन जवळ ५० किमी
पुणे पासुन जवळ ५० किमी परिसरात
सासवड ४५ किमी - सध्या पुण्याला जाण्यायेण्यासाठी फक्त रोड नेटवर्क उपलब्ध आहे तर रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या योजनेला हिरवा कंदिल मिळाला आहे
शिंदेवाडी ४०-४५ किमी - स्वतःची गाडी असेल तर २०-२५ मी. पुणे गाठता येईल. शिंदेवाडी ते शिरवळ या पट्ट्यात औद्योगिक वसाहत तसेच नविन रेसिडेन्शीयल प्रोजेक्ट येत आहेत.
या व्यतिरिक्त खोपोली चा पण विचार करुन बघा.
राजगुरुनगर- जवळजवळ ४० किमी
राजगुरुनगर- जवळजवळ ४० किमी
धन्यवाद सगळ्यांना. लोकेशन
धन्यवाद सगळ्यांना.
लोकेशन बघून वाटतय विचार करु नये. २४ तास ट्राफिकचा आवाज. >>> विक्रम तसं म्हटलं तर जवळपास आख्खं पुणं ओस पडेल.
Pages