मुलायमसिंग यांनी बलात्कार विरोधी कायद्यात बदल करण्याची दर्पोक्ती करत एका नवीनच विषयाला तोंड फोडले आहे. मला वाटल होत की मायबोलीवर एक धागा याच्या विरोधात निर्माण होऊन किमान १०० प्रतिसादाच्या पुढे याचा प्रवास झाला असेल. पण बहुदा अस घडल नाही. मायबोली प्रशासनाने या धाग्यावर बंदी घातली असेल तर माहित नाही.
या सर्व विषयावर तोंड सुख घेताना सर्वच महिला नेत्या फारच जबाबदारीने विरोध करताना दिसत आहेत. थोडक्यात बदनाम होण्याआधी असेच काहीसे विधान आसारामबापुंनी केले होते त्यांना खुपच विरोध झाला होता त्यामानाने मुलायमसिंगांना होणारा विरोध खुपच अल्प आहे याचे आश्चर्य वाटते.
बलात्काराला फाशीची शिक्षा या गोष्टीला मुलायमसिंगांचा विरोध होता असे दिसते. एकंदरीत वादग्रस्त विधाने करण्यामधे मुलायमसिंग यांचा हात कुणी धरु शकत नाही. वर्तमान पत्रात सुध्दा ही बातमी मागच्या पानावर किंवा सकाळ सारख्या वर्तमान पत्राने किमान ११/४/२०१४ रोजी छापायची टाळली होती. आज अग्रलेखाने समाचार घेतला म्हणजे शिळ्या कढीला उत आल्यासारखे आहे. कार्यकारी संपादकाचा प्रधान संपादकाशी संपर्क झाला नसेल किंवा प्रधान संपादकांचे मायबाप तीसर्या आघाडिचे एकंदरीत विधानावर काय मत आहे हे अजमावत असतील.
मुलायमसिंग यांना सामुहीक कॉपी विरोधी कायदा रद्द करण्याइतके सोपे वाटले की काय ? ही नशा असते. उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या सरकार होते त्या काळात राजनाथसिंग शिक्षण मंत्री होते. त्यांनी सामुहीक कॉपी विरोधी कायदा केला. हा कायदा शपतविधी झाल्यानंतर अर्ध्यातासात रद्द करु अशी दर्पोक्ती मुलायमसिंग यांनी त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकात केली. २ टक्के इतकी मतांची वाढ होऊन नेताजी मुख्यमंत्री झाले आणि आपण किती दिलेला शब्द पाळतो हे दाखवण्यासाठी त्यांनी घड्याळ लाऊन २० मिनीटात हा कायदा रद्द करण्याचे काम केले.
त्यावेळेला तरुण व विद्यार्थी मतदारांनी २ टक्के मते समाजवादीच्या पारड्यात जास्त टाकली. इथे अशी परिस्थीती आहे का ? काय साधायचे आहे मुलायमसिंगांना अश्या विधानाने ?
मिडीयातर या विधानाविरुध्द अत्यंत संयत बातम्या देताना दिसत आहे म्हणजे मिडीयावर सुध्दा मुलायमसिंगयांचा दबाव आहे.
या कायद्याचा दुरुपयोग अजुनतरी झालेला दिसत नाही. माझ्या मते १६ डिसेंबरच्या २०१२ च्यादबावानंतर हा ( फाशीचे प्रावधान ३७६ ई) हा बदल अस्तित्वात आला आहे. याचा फायदा घेत शक्ती मिल मधल्या आरोपींना फाशी झाली. या चार आरोपीपैकी तीन आरोपी मुस्लीम होते आणि त्यांना सहानभुती म्हणुन हे विधान केले गेले आहे का ? या निमित्ताने आपण मुस्लीम समाजाचे तारणहार आहोत हे मुझ्झफरनगरच्या दंगलीनतर लांब जात असलेल्या मुस्लीम समाजाला पुन्हा आपल्याजवळ करण्यासाठीचे प्रयत्न आहेत का ?
असे समजण्यास वाव आहे कारण याच्या पाठोपाठ अबु आझमी यांनीही अश्याच प्रकारचे वादग्रस्त विधान केले. समाजवादीपार्टीने चार मुस्लीम उमेदवार मुंबईत लोकसभा निवडणुकीत उभे केले आहेत. त्यांची मते मिळावीत म्हणुन हे विधान आहे का ? आज १६ वयाच्या मुलींना संमतीने विवाहपुर्व संबंधाला मान्यता मिळण्याची चर्चा चालु असताना केवळ मुस्लीम महिलांनी त्यांच्या धर्माला अपेक्षीत असलेले वर्तन करावे या साठी हा कायद्यातला बदल अपेक्षीत आहे की सर्वच महिलांनी मुस्लीम धर्माप्रमाणे वर्तन करावे असे अपेक्षीत आहे ?
मुलायमसिंग हे केवळ समाजविरोधी विधाने करण्यात अग्रेसर आहेत असे नाही तर देशविरोधी विधाने करण्यात मागेपुढे पहात नाहीत. कारगील युध्र्दाच्या वेळी भारताने हे युध्द पुकारले म्हणुन पाकिस्थानला हे युध्द लढावे लागले आणि त्या खर्चापोटी काही कोटी रुपये पाकिस्थानला द्यावेत असले अचरट विधान ही त्यांनी केले होते.
अश्या व्यक्तीला काय लोकनेता म्हणावे ? केवळ उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यात मुसलमानांची मते ४५ ट्क्यांच्या आसपास आहे किंवा मुंबईमधे मुस्लीम समाज काही भागात जास्त आहे व तो असल्या विधानांनी समाजवादी पक्षाच्या जाळ्यात ओढला जाऊ शकतो ही मानसिकता देशविघातक आहे.
यात विशेष ते काय? जिथे
यात विशेष ते काय? जिथे "शहाबानो" प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन कायदा केला जातो तिथे सामुहिक कॉपी/ सामुहिक बलात्कार वगैरे बाबी किरकोळच ठरणार!
अश्या प्रकारच्या वैचारिक
अश्या प्रकारच्या वैचारिक दिवाळखोर नेत्यांना जनता निवडुन कशी देते हेच एक कोड आहे. आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये यावर सुंदर अग्रलेख आला आहे. त्यात अबु आझमीच्या विधानाबद्द्ल लिहिलेले हे शब्दच ह्यांची किंमत दाखवण्यासाठी पुष्कळ आहे. "बलात्काराची शिकार झालेल्या स्त्रीलाही फाशी दिली पाहिजे, असे ते म्हणतात, त्यावर काही लिहिणे हा शब्दांचाच अपमान ठरेल."
नरेश, मटावाल्यान्चा तो
नरेश, मटावाल्यान्चा तो "शब्दांचा अपमान" वगैरे चूलीत जाऊदे, याप्रकारची पुन्हा पुन्हा प्रसारित होणारी वक्तव्ये बघता पुढल्यामागल्या दाराने तालिबान अन माओवाद येऊ घातलाय, तिथे शब्दान्चा अपमान वगैरे बाबी काय घेऊन बसलात?
नितीनचंद्र, नेते काय बोलतात
नितीनचंद्र,
नेते काय बोलतात ते बाजूलाच ठेवा.
आपल्याकडचे लोक माठ, बथ्थड, दळभद्री आणि किडे आहेत.
आजवर हा माणूस नेता म्हणून वावरलाच कसा? तो आता निवडणूकीत सभा घेतोच कसा? त्याला व्यासपीठ मिळतेच कसे? सर्वोच्च न्यायालय आणि कायदेसंस्था गप्प बसतात कशा?
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, निर्भयाच्या वेळी दिल्लीतील रस्त्यावर उतरणारे लोक आता कुठे गेले?
बेफ़िकीर यांना अनुमोदन! अशा
बेफ़िकीर यांना अनुमोदन!
अशा सडक्या मनोवृत्तीच्या माणसांना समाजात राजरोसपणे वावरू देणे म्हणजे काळ सोकावल्यासारखे आहे.
असे नेते (?) उडदामाजी
असे नेते (?) उडदामाजी आहेत.
मोदींच्या पत्नीबाबत बोलणारे काँग्रेसी असोत किंवा '५० करोड की गर्लफ्रेंड' असे हिणवणारे मोदी असोत... सगळेच आचरट आणि हिणकस विधाने करत असतांत, आणि त्यांचे पाठिराखे उन्मादाने त्याला समर्थन देत असतांत. बेफि म्हणतांत तसंच - आपल्याकडले लोकच.....
भ्र्मरजी, मी मुलायमसिंगांच
भ्र्मरजी,
मी मुलायमसिंगांच नाव घेतल की अपरिहार्य पणे मोदींचे नाव आल पाहिजे अस नाही. " ५० कोटींची गर्लफ्रेंड' यात देशविघातक, समाजविघातक असे काहीच नाही.
वैयक्तीक टिका ही देशविरोधी असेलच किंवा समाजविरोधी असेलच असे नाही. निवडणुकीच्या गदारोळात हा धुरळा उडतोच. मुद्दे संपल्याच हे लक्षण आहे.
http://www.google.co.in/url?s
http://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja...
मिर्चि लागली का? सुरूवात मोदी
मिर्चि लागली का?
सुरूवात मोदी ने केलेली
स्वतः वर आले की मिर्ची लागते का?
काही वर्षांत स्वामी आणि त्याची पिलावळ जे अफवा आणि गलिच्छ आरोप वैयक्तिक करत आहे तेव्हा कुठे होते?
उदयन, अयोग्य लिहिता आहात.
उदयन,
अयोग्य लिहिता आहात.
बरोबर आहे योग्य अयोग्य जे
बरोबर आहे
योग्य अयोग्य जे आहे सत्य आहे
५० करोड ची गर्लफ्रेंड हे मोदी नेच वैयक्तिक सुरूवात केली होती
ते बरे चालते?
आणि दुसर्याने फक्त लग्नाविषयी विचारले की लगेच योग्य अयोग्य आठवते का?
आठवा - "टंच माल" उदयन, जितकी
आठवा - "टंच माल"
उदयन, जितकी वर्षे मागे जाऊ तितके नेहरू आणि गांधी घराणे चव्हाट्यावर येत जाईल. संयम ठेवलेला बरा!
टंच माल कोणत्या बाबतीत
टंच माल कोणत्या बाबतीत बोललेले कामाच्या कार्याच्या बाबतीत पण। ज्यांचा विचारच स्वामी सारखा आहे ते तर स्वतःच्या भाषेतलाच टंच समजणार
जे खोटे आहे ते तर व्हाटसप फेबू वर 2009 च्या पराभवानंतर पसरवलेच आहे बेफी... नविन काय आहे त्यात
कृपया स्वामी सुब्रमण्यम
कृपया स्वामी सुब्रमण्यम समजावा
चूकुन दूसरा समजुन भावना दुखावू नये
उदयन विषय काय आणी प्रतिक्रिया
उदयन
विषय काय आणी प्रतिक्रिया काय? प्रचार करतना सामन्य माणसाना त्रास होईल असे कायदे करण्याचे अश्वसने देउ नयेत.
विचार करा, जर असा माणुस जर पंतप्रधान झाला तर बायका- मुली चे काय हाल होतिल.
सध्या कडक कायदे असताना नराधम अस्ले क्रुत्य करताना कचरत नाहीत. कायदे बदलले तर काय हाल होतिल?
मुयायम आणि आझम सारखे भ च्या
मुयायम आणि आझम सारखे भ च्या बाराखडीतले लोक या देशात आहे हेच जनतेचे दुर्दैव आहे.. यांच्यावर जनतेने प्रतिक्रया द्यावीच जिंकता कामा नयेच अशी लोक
उदयजी, मुलायम आणि आझम
उदयजी,
मुलायम आणि आझम सारखे भ च्या बाराखडीतले लोक या देशात आहे हेच जनतेचे दुर्दैव आहे.. यांच्यावर जनतेने प्रतिक्रया द्यावीच जिंकता कामा नयेच अशी लोक - धन्यवाद - इतकेच अपेक्षित होते.
मी चुकिच्या गोष्टीला चुकच
मी चुकिच्या गोष्टीला चुकच म्हणतो नितिन जी...
मिस्त्रीला सुध्दा याच भाषेत बोललो आहे दुसर्या धाग्यावर... आणि इतरांकडुन देखील इतकीच अपेक्षा आहे
याच कारणांमुळे तर नक्षल वाद
याच कारणांमुळे तर नक्षल वाद फोफावत नसेल? अनास्था, अवहेलना, 'टाकी देयेल' भावना, असुरक्षीतता. किंवा कदाचीत मी चुकत ही असेन
उदयन काही कमालीची निर्बुद्ध
उदयन काही कमालीची निर्बुद्ध वक्तव्ये केली आहेत तुम्ही
वैकु तुझ्या सारख्या
वैकु तुझ्या सारख्या अक्कलशुन्य माणसाकडून हेच अपेक्षित आहे
मधे बोलायची वृत्ती कधी सुटणार नाही
इतकावेळ मायबोलीवर पाणउतार झाला तरी सुधरण्याची लक्षणे नाही तुझ्यात
आपल्याकडचे लोक माठ, बथ्थड,
आपल्याकडचे लोक माठ, बथ्थड, दळभद्री आणि किडे आहेत.>>.
भुषणजींशी १००% सहमत.
मुलायम बडा घाग आदमी (?) है.
मुलायम बडा घाग आदमी (?) है. याच्या नावा सोबत पुढे सिंह हा आदरवाचक प्रत्यय कुणी लावू नये. घाग म्हणजे धूर्त.. महाधूर्त. तो जे बोलला त्या "औरत ? वो तो पाव की जूती !!" अशा मनोवृत्तीचे लोक यू पी बिहार कडे भरपूर आहेत. ते त्याचे मतदार आहेत. वर उल्लेख केलेली शक्ती मिल बलात्कार काण्डातील फाशी ची सजा झालेले आरोपी मुस्लीम असणे व त्याना सहानुभूती व्यक्त करून आपण त्या समाजाचे तारणहार अशी प्रतिमा निवडणूकांच्या तोंडावर बळकट करण्याची शक्यता ही खरी आहे अस मला वाटत. त्याचा चेला अबु आझमी जे बोलला त्याची निंदा त्याची अभिनेत्री सून आयेशा टाकिया ने केली त्यावर आलेल्या अनेक प्रतिक्रियां मधे पत्रकार भाऊ तोरसेकर यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती ते म्हणाले आयेशा टाकिया ला (अबू आझमीला विधानसभेत कानफाटवणारे) म न से आमदार राम कदम यांना आज राखी बांधावी अस वाटल असेल !!
अबु आझमी आता मुस्लीमांचा डी
अबु आझमी आता मुस्लीमांचा डी एन ए चेक करायच्या गोष्टी करतोय. मागली लोकसभा आल्यावर जस आधार कार्डाच पेव फुटल आणि अनेकांच उखळ त्या काँट्र्क्ट मधे पांढर झाल तस चुकुन काँगेस आणि तथाकथीत तिसरा मोर्चा ( आजच काँग्रेस प्रवक्ते म्हनाले की असा काही मोर्चा अस्तीत्वातच नाही ) यांच मिळुन सरकार आलच तर २५ कोटी मुसल्मानांच डी एन ए चेक करायच काम काँग्रेस तातडीने हातात घेईल.
कारण तथाकथित तिसरी आघाडीचा पाठींबा म्हणजे मुलायम आलेच. मुलायम आले म्हनजे अल्पसंख्यांक मंत्रालयाचे मंत्रीपद अबु आझमी कडे जाणार आणि ते सगळ्यांचा डी. एन ए चेक करणार. पुढे काय करणार ? जे मुसलमान समाजवादीला मतदान करत नाहीत त्यांना मुजाहीर म्हणणार की त्यांच शिरकाण करणार ?
पण हे काँग्रेस, बसपा, तृण्मुल, इ. ला मतदान करणारे मुसलमानांच काय करणार ?
काही कळाले नाही. डी एन ए चेक
काही कळाले नाही. डी एन ए चेक कशासाठी करणार?
फारेंड तुम्हाला नाही कळायचं.
फारेंड तुम्हाला नाही कळायचं. तुम्ही तटस्थतेचा आव आणणारे छुपे संघिष्ट आहात.
विकु , मला आता ओळख अर्धवट
विकु :D, मला आता ओळख अर्धवट उघडकीला आल्यावर पुन्हा गँगमधे गेलेल्या डॉन सारखे वाटत आहे.
फारेंड
फारेंड
फारेंड, तुम्हारा चेहेरा
फारेंड, तुम्हारा चेहेरा पुलिसने देख लिया हय. अब तुम्हारा जिंदा रहना हमारे लिये खतरा है. मोना, हमारी गन कहां है ?
रुको प्लास्टिक सर्जरी अब हो
रुको
प्लास्टिक सर्जरी अब हो सकती है
Pages