तुम्ही कुठल्या game च्या व्यसनाधीन (Addicted )आहात ???

Submitted by रणथंबोर on 6 April, 2014 - 07:31

तर मंडळी....

सध्या आपल्या सगळ्यांकडे Smarthphone नामक अवयव असेलच ..त्यात तो Android वर पळणारा असणायची शक्यता जास्त आहे (Windows वाले अल्पसंख्याक पण असतीलच ).. तर मला हे जाणून घ्यायचे आहे कि आपण कोणत्या Game साठी वेडे झाले आहात...

आधी मी कबूल करतो...
१) तीन पत्ती
२) सब वे सर्फर
३) टेम्पल रण २ ...

आता बोला...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आता टाईम टू नेक्स्ट लाईफ १४४२:३१ दाखवतोय<<<<<
याला पण सोल्युशन आहे. तारीख दोन दिवस पुढे कर. पाच लाईफ फुल दिसल्या की योग्य तारखेला परत ये. १४४२ तास थांबणार आहेस का? Proud

सहसा दोन दिवस पुढे जाऊन पुरावं. नाहीतर अजून एखाद दिवस पुढे जा.

अगं ए श्र ! ड्राय डे असलेल्या दिवशी बेवड्याला मागील दाराने दारु कशी मिळवायची ते शिकवल्यासारखं करतेयस तू Lol

बरं झालं मला कसलंच व्यसन नाही लागलंय ते. माबोवर डोकावत असतेच पण विथड्रॉवलस येत नाहीत Biggrin

पुर्वी २-३ आठवडे फार्मव्हिलेचं लागलं होतं पण जेव्हा रात्री उठून शेत कापलं तेव्हा फुल्ली मारुन टाकली त्यावर.

>>अगं ए श्र ! ड्राय डे असलेल्या दिवशी बेवड्याला मागील दाराने दारु कशी मिळवायची ते शिकवल्यासारखं करतेयस तू >> Lol इथे इतक्या जणांना गेम्स खेळायचं व्यसन असलेलं बघून आश्चर्य वाटलं.

अरे किती क्रशवाली लोकं..
मी अधुनमधुन सब वे सर्फर , अ‍ॅंग्री बर्ड्स खेळते .. जास्तीत जास्त अर्धा तास...

अगं ए श्र ! ड्राय डे असलेल्या दिवशी बेवड्याला मागील दाराने दारु कशी मिळवायची ते शिकवल्यासारखं करतेयस तू >> Rofl

SWEET

मला नाही कसलं व्यसन (कारण माझ्याकडे स्मार्ट फोनच नाहीये Proud )
मध्ये माबोचं व्यसन लागलेलं, आता मरेपर्यंत काम आलय तेंव्हा ते कंट्रोलमध्ये आहे.
आता मध्ये वॉट्सअप च व्यसन लागलेलं ... ते कितपत खरं आहे बघायला वॉट्सअप अन इन्स्टॉल करुन पाहिलं. काहीही बिघडलं नाही. कदाचित दिवसभर मोबाईल जवळ नसल्याने सवयीचं रुपांतर व्यसनात झालेलं नाहीये Happy

सध्या हंग्री शार्क एवोल्यूशन गेम - लास्ट लेवल डन
8 बॉल पूल - सध्या लेवल ३८
दोन्ही गेम खूप अडिक्टीव आहेत..
पीसी वर age of empires II खूप वर्ष खेळलोय... जाम आवडतो हा गेम

मी टॉवर रेडर्स खेळायचो (Tower Raiders)
शिवाय टॉवर डिफेन्स (Tower Defense)

एज ऑफ एंपायर्स सारखा गेम नाही... खुप मजा यायची!

एज ऑफ एंपायर्स सारखेच ग्राफिक्स वापरून बनवलेला एक बॅनिश्ड नावाचा गेम आहे.
तो पुर्णपणे कंस्ट्रक्टिव्ह आहे. आपल्याला एक गाव उभ करावं लागतं.
त्यात येणारे प्रश्न सोडवावे लागतात. नैसर्गिक संकट झेलावी लागतात. खुप बर्फ पडले तर लोक गारठतात. इकॉनॉमी कशी वाढेल वगैरे पाहावी लागते.
हे गाव वसवणे आणि वाढवणे असे याचे उद्देष्ट आहे.

सदैव बंदुका आणि माणसं मारून मारून रक्ताळलेल्या स्क्रीन ला कंटाळलो होतो.
हा गेम खुपच वेगळा आणि चांगला वाटला.

मला आता टाईम टू नेक्स्ट लाईफ १४४२:३१ दाखवतोय >>>> मलाही Sad
मी तारिख दोन महिने पुढे ढकलली तरी तसेच दाखवतय.. काही उपाय???

कँडीक्रश वाल्यांनो - एक दिवस पुधे का जाताय? - अडिच तासांनी पुढे जा पाच लाईफ मिळवा. पाच लाईफ मिळाली हे बघा आणि वेळ रीसेट करा आणि मग खेळा मी तर वेळ्सुद्धा पुन्हा रिसेट करत नाही. खेळून झालं की ती वेळ नोटस मध्ये लिहून ठेवायची. मग वेळ रिसेट करायची. मग पुढच्या वेळेला खेळताना त्याच वेळेवर जाऊन खेळायचे. असे करून चोवीसही तास वापरते. थोडा वेळ समजण्याचा इनकव्हेनियन्स होतो. पण मला चालतो. ह्यामुळे जेव्हा खेळायचा मूड येतो तेव्हा चांगले पंचवीस - तीस लाईफ खेळयला मिळ्तात.

मी पेट रेस्क्यु खेळते. ते गोड पेट्स मला खूप आवडतात.

लय भारी धागा काढलाय.. मार्क ट्वेन ला फुलटू अनुमोदन.. पूर्वी अशी परिस्थिती होती.. सध्या बरीच सुधारणा आहे... माबो दिवसातून एक दोनदाच उघडली जाते..

खेळाचे म्हणाल तर व्यसन कुठल्याच खेळाचे नाही.. पण कँडी क्रश, फार्म सागा, अँग्री बर्डस - हे मला प्रचंड आवडते..
क्रिमिनल केस..

फ्री सेलचे.
जबरदस्त व्यसन.
अहो येता जाता , उठत बसता, कार्य करता, मी आपला फ्री सेल खेळत बसतो. कुठेहि काँप्युटर दिसला की लागलो मी खेळायला. वर्षाकाठी एक लाख वेळा खेळल्या जात असेल.

पीसी वर age of empires II खूप वर्ष खेळलोय... जाम आवडतो हा गेम>>> अगदी माझा ही आवडता गेम. age of empires चे बहुतेक सगळे वर्जन्स खेळून झाले. पूर्वी चिप मॅगझिन्स सोबत सीडी मिळायच्या त्यात डेमो मोडवाले गेम यायचे तेव्हापासून आवडायला लागले. मग डेमो खेळून मन भागेना म्हणून सीडीज विकत घेतल्या. Proud आणि त्यासोबत सीझर आणि फॅरोह पण. मस्त मज्जा यायची खेळायला. आणि त्यापूर्वीही डॉस बेस्ड क्रुसेडर ... याचे तर जाम वेड लागलेले.. त्यानंतर सगळे बंद केलेले.
मग फेसबुक वर आल्यावर शेती कर कर केली. Proud ती पण बंद केली.
सध्या अगदीच कंटाळा आला की कॅण्डी क्रश Happy

आईला इतकं वेड लागलय या कांडीक्रस्श च, माझ्या हातात मोबाइल मिळ्तनाहिही.

लाईफ वाचवायची आणखी एक युक्ती आहे. शेवटच्या २-३ मूव्हज राहिल्या आणि पूर्ण होणार नाही असे लक्शात आले, की गेम बन्द करायचा. ( डाव्या कोपर्‍यात ऑप्शन आहे). परत सुरु केला की लाईफ तसेच रहातात Happy

मी ही गेले १०-१५ दिवस १४७ वर अडकलेय. प्रत्येक लेव्हल अवघड होत जाते. मध्ये मध्ये सोप्या असतात पण एखादीच अडकवते चांगलंच.

मी आयपॅड्वर कॅंडी क्रश खेळत होते. पण आता ३५ व्या लेव्हलच्या पुढे फेसबूक्च्या मदतीशिवाय जातच नाहिये. काय करावे लागेल?

सब वे सफर , फ्रूट निंजा , आणि टेम्पल रन
मस्त आहेत
मी काही फार खेळत नाही पण . बैटरी लवकर उतरते
कोडी सोडवणे यावर आधारित काही गेम आहेत का
डोक्याला चालना देतील असे

Unfortunately... कँडी क्रश मधे अशी मदत करता नाही येत. Sad खेळूनच लेव्हल पार करता येते.

लालत आहे माझ्या झिंदगानी वर ..
स्मार्ट फोन घेऊन वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला पण अजून मला कँडी क्रश माहीत नाही .. Sad

काय बकवास गेम आहे हा कँडी क्रश .. इथे एवढे वाचून शनिवारी रात्री डाऊनलोड केला, तर साला रविवारच्या सुट्टीचे तीनसाडेतीन तास फुकट गेले.. ते गेले ते गेले, आज सोमवारी ट्रेनमध्ये डॉकयार्ड ते बेलापूर तासाभराची झोप असते तिचेही खोबरे झाले. शेवटी वाशीला १५ मिनिटांसाठी का होईना झोपायला गेलो तर डोळे बंद केल्यावरही डोळ्यासमोर इथून तिथे कँड्या हलवतच होतो .. Sad

मी शेवटी कंटाळून Candy Crush काढून टाकला. झोपेत पण तेच दिसत राहते. काहीवेळा खूप Moves बाकी असतात पण तरी देखील पुढच्या लेवल ला जायला शक्य होत नाही.

>> शेवटी वाशीला १५ मिनिटांसाठी का होईना झोपायला गेलो तर डोळे बंद केल्यावरही डोळ्यासमोर इथून तिथे कँड्या हलवतच होतो >>>:D Lol

मला " चेन रिअ‍ॅक्शन " हा गेम खुप आवडतो.
अ‍ॅण्डाइड वर खेळता येतो. जास्तीत जास्त ८ लोक खेळु शकतात.

झोपायला गेलो तर डोळे बंद केल्यावरही डोळ्यासमोर इथून तिथे कँड्या हलवतच होतो .. Rofl
वेलकम टू कँडी क्रश वर्ल्ड... Happy

कोणी 'हे डे' वाले आहे काय?
फ्रेंशीप देणार काय? Happy

आमचं कँडी क्रश खेळून संपलं. मंजी लेव्हल्स संपल्या. त्या घुबडवाल्या अंधार्‍या पन संपल्या.

सध्या contract war नावाचा गेम खेळतोय सैनिक बनून विविध बंदूकींनी शत्रुला मारून पाँइट्स मिळवायचे
छान आहे पण सतत स्क्रीन वर हलणारे चित्र असल्याने तसेच एकाच वेळी जास्त ठिकाणी लक्ष द्यायला लागल्याने डोळ्यांना त्रास होतो Sad

100

Pages