गहू - १ किलो
चणा डाळ - पाव किलो
साजूक तूप - पाऊण किलो
किसलेल गूळ -पाऊण किलो
बदाम - १०० ग्रॅम
काजू - १०० ग्रॅम
पिस्ता - १०० ग्रॅम
डिंक - १०० ग्रॅम
खसखस - २ टे.स्पून
बडीशेप - २ टे. स्पून
जायफळ - १
१. गहू आणि चणाडाळ एकत्र करुन जाडसर दळून आणावी.
२. एका पातेल्यात पाणी गरम करून घ्याव. परातीत पीठ घेवून त्यात १५० ग्रॅम तूप घालून हाताने मळून घ्याव. नंतर थोड पाणी घालून थोड्या थोड्या पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यावा.
३. पिठाचे हातामध्ये मावतील असे लांबट गोळे करावेत.
४. एकेक गोळा हाताच्या तळव्यामध्ये घेऊन त्यावर चार बोटांनी मूठ करून, बोट मागे ओढावीत. बोटांचे ठसे लांबट गोळ्यावर उमटून तो चपटा होईल. जेणेकरून मुठीया तयार होईल.
५. कढईत अर्धा किलो तूप घालून गरम करून घ्या. मध्यम आचेवर मुठीया तुपात तळून घ्या. मुठीया थोड्या थंड झाल्यावर हाताने फोडून मिक्सरमध्ये रवाळ वाटून घ्या. एकेक तळणीचा घाणा सुरु असताना तळलेल्या मुठीया फोडून आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या.
६. मुठीया तळून झाल्यावर डिंक तळून घ्या.
७. एका मोठ्या पातेल्यात रवाळ चुर्मा काढून घ्या. त्यात तळलेला डिंक, बदाम, काजू, पिस्त्याचे तुकडे किंवा पावडर घाला. त्यात एक जायफळ किसून घाला. खसखस आणि बडीशेप घाला. दोन्ही न भाजता घालायच आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या.
८. मुठीया तळलेल्या कढईत तूप उरत त्यातच थोड तूप घालून गूळ वितळवून घ्यावा. गूळ पूर्ण वितळल्यावर ते चुर्म्याच्या मिश्रणात घालून ते पातेल गॅसवर मंद आचेवर ठेवून ५ मिनिट व्यवस्थित परतून घ्या.
९. मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळा.
अजून एक पद्धत
गव्हाच्या पिठाला तूप लावून ते पीठ २४ तास तसच झाकून ठेवायच आणि नंतर दुधाने किंवा पाण्याने पीठ घट्ट मळून घेऊन मुठिया तळून घ्या.
लई अवघड आहे. आयते करुन दिलेत
लई अवघड आहे. आयते करुन दिलेत तर खाऊ
माझे आवडते लाडू....
माझे आवडते लाडू....
आमच्याकडे हे लाडू जरा वेगळ्या
आमच्याकडे हे लाडू जरा वेगळ्या पद्धतीने होतात. माझी आई बडोद्याची असल्याने गुजराथी पद्धतीने होतात. आई चणाडाळ, डिंक आणि बडीशोप घालत नाही, बाकी साधारण असेच करते.
मी एकदा राजस्थानी चुरमा लाडू खाल्ले त्यात खवाही होता.
मला पण खूप आवडतात चुर्मा
मला पण खूप आवडतात चुर्मा लाडु. मस्त कृती आहे आरती.:स्मित:
तोंपासु ! पण आयतेच खायला मजा
तोंपासु ! पण आयतेच खायला मजा येईल
लक्ष्मी गोडबोले, निलापी,
लक्ष्मी गोडबोले, निलापी, अन्जू, रश्मी, अगो धन्यवाद.
अन्जू, चणाडाळ, डिंक आणि बडीशोपने छान चव येते. खव्याचेपण छान लागतात खायला. आयते खायला मिळाले तर अजूनच छान.
दोघींनी मिळून केल तर लवकर होतात. आमच्या लाडवांना तिघींचा हात लागला होता. भाभींनी मुठीया बनवून तळून दिल्या. मी मिक्सरमध्ये वाटून दिल आणि नंतर मी, आई आणि भाभींनी तिघींनी मिळून लाडू वळले.
तुपानं निथळ्लेले! पण
तुपानं निथळ्लेले! पण पक्क्क्क्की रसोई अस्ल्यानं जबरदस्त टेस्ट असणार...
योकु बरोबर ओ़ळखलस. भाभी १
योकु बरोबर ओ़ळखलस.
भाभी १ किलो तूप वापरतात. मी जरा कमीच वापरल. त्यांचे लाडू दोन दिवसांनंतरही तूपाने निथळत असतात.
आरती माझ्यासारखी लाडुप्रेमी
आरती माझ्यासारखी लाडुप्रेमी हे अख्खे ताट दोन दिवसात रिकामे करेल ग.:फिदी:
फोटो पण चवदार आलाय.:स्मित:
मस्त फोटो आहे पण मी करणार
मस्त फोटो आहे पण मी करणार नाही. खूपच खटाटोप आहे
रश्मी, आम्हीसुद्धा
रश्मी, आम्हीसुद्धा लाडूप्रेमीच
अश्चिनी, यु डोंट वरी मी तुझ्यासाठी बनवून घेऊन येईन.
(No subject)
आआयआआयआआआआआअ. (लाळ
आआयआआयआआआआआअ. (लाळ गळतेय)
आई असेच करते.
झंपी धन्यवाद
झंपी धन्यवाद
आरती फोटो मस्तच.
आरती फोटो मस्तच.
मस्त प्रकार! भयंकर टेस्टी
मस्त प्रकार! भयंकर टेस्टी असणार!!
माझ्या मारवाडी मैत्रिणींकडे
माझ्या मारवाडी मैत्रिणींकडे हे लाडू खाल्लेत. अप्रतीम चविष्ट!
पण तिथे ह.डाळ आणि बडिशेप या दोन जिनसा नाही घालत.
पण मी करताना आरतीच्या रेसिपीनेच करून बघीन.
यम्मी!
यम्मी!
अन्जू, ज्यो का, मानुषी काकू,
अन्जू, ज्यो का, मानुषी काकू, चिन्नु धन्यवाद.
मानुषी काकू, लाडू करून बघितल्यावर फोटो नक्की इथे द्या.