एअर कूलर कोणता घ्यावा?

Submitted by रंगासेठ on 1 April, 2014 - 07:55

आम्हाला एअर कूलर घ्यायचा आहे. एसीचं बजेट नाहीये आणी पंखा कुचकामी ठरतोय.
मी कूलर बेडरूम मध्ये ठेवणार आहे (१५० चौफु).

१) सध्या कूलरमध्ये कोणते पर्याय उपलब्ध आहेत? कुठल्या कंपनीचा कूलर घ्यावा?
२) ८ तासासाठी कूलर वापरायचा असेल तर वॉटरटँकची क्षमता किती असावी?
३) यातही 'स्टार' रेटिंग असतं का?
४) मूवेबल कूलर पाहिजे.

धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दोन वर्षांपूर्वी माझ्या रूमसाठी नागपूरच्या राम कूलर्स कंपनीचा डेझर्ट कूलर घेतला. पुण्यात बुधवार पेठेत पासोड्या विठोबापाशी त्यांचे डीलर आहेत. कूलर उत्तम चालतो, रूम गार करतो, वीजेचे भाडे अवाच्या सवा येत नाही. राम कूलर्सची आफ्टर सेल्स सुविधाही चांगली आहे.
तुमच्या रूमच्या आकारानुसार व आवश्यकतेनुसार कोणता कूलर घ्यायचा हे ठरवू शकता.

रंगासेठ, कुलर हा फक्त ड्राय वातावरणात काम करतो. आणि घेताना त्याचा आवाज सोसवेल हे बघुन घ्या. रात्रीच्या शांततेत तो आवाज त्रास्दायक / महात्रासदायक ठरु शकतो.

सिंफनीचा ३५ लिटर घ्यावा. टायमर पण आहे १ तास, २ तास व ४ तास लावता येतो व त्याचे कॉम्बीनेशन. मोव्हेबल आहे व हलवायला सोप्पा आहे.

सल्ला जरा विचित्र वाटेल पण करून पहा.

  • झोपताना खिडक्यांवर पडद्याच्या आकाराची चादर ओली करून टाका. मोठी चादर पाण्या भिजवून पलंग अथवा झोपण्याच्या वरील बाजूस चारही बाजूला त्याची टोके बांधून त्या खाली झोपावे वरून फॅन सुरू ठेवावा. मस्त गार वाटेल. चादर वाळल्यावर पुन्हा चादरीवर पाणी शिंपडावे पुन्हा मस्त गार वाटते.मी हा प्रयोग कुलर घ्यायच्या आधी केला आहे.
  • कुलर घेतल्यावर काही दिवस (उन्हाळा सुरू झाल्यावर) त्याच्या आवाजाने झोप येत नाही.
  • कुलर बंद केल्यावर हवेत दमटपणा जाणवतो त्यामुळे दमा असल्यास अवघड जाते. विशेषत: लहान मुलांना सर्दी झाल्यास अवघड.
  • रात्रभरात सुमारे १५ लिटर पाणी हवेत फेकल्यामुळे गारवा नक्कीच जाणवेल परंतु सर्दी, अंगदुखी, टिव्ही पाहताना आवाज ऐकू न येणे यासारख्या समस्येला तोंड द्यावे लागेल.
  • या कुलरमधील पाणी दिवसाआड स्वच्छ न केल्यास पाण्याचा वास येऊ लागतो.
    बाकी ‘गारवा’ मिळतो हे नक्की.

    असो.....
    बजाजचा कुलर घेऊन पाहा. छान आहे.

बजाजचा कुलर घेऊन पाहा. मी मागच्याच आठवड्यात घेतला . ठिक चालतोय. बजेटच्या हिशोबाने बरा भेटला ५०००/- रुपयांत) पहिले २ दिवस आवाजामुळे खुपच त्रास झाला. ह्वेत खरच दमटपणा जाणवतो. आता सवय झालीये (नव्हे केलीये Happy ) काय करणार गरमीमध्ये दुसरा पर्याय नाही

http://compareindia.in.com/specification/air-coolers/bajaj-rc-2004/323132

माझ्याकडे हा २००७ पासुन आहे फक्त एकदाच जाळी बदलली. तेव्हा मला ७के ला पडला होता. आवाज करत नाही.आम्ही तर त्याला बेडरुम मधेच ठेवतो फक्त खिडकीजवळ म्हणजे दमटपणाचा त्रासही होत नाही.

कूलर खिडकी किंवा हवा जेथून आत येऊ शकेल अशा ठिकाणी, उदा. बाल्कनीकडे खुलणारा दरवाजा, ठेवल्यास कूलरच्या दमटपणाचा कमी त्रास होतो. आवाजाचा त्रास होऊ शकतो. पर्याय नाही. परंतु माझ्या राहत्या परिसरात आजूबाजूला दिवसभर व रात्रीही भरपूर आवाज असतात. त्यात आणखी एक भर!!

माझ्याकडे बजाजचा छोटा एअर कूलरही आहे. तो आकाराने लहान असलेल्या खोलीसाठी किंवा मोठ्या खोलीच्या ठराविक भागाला गार करण्यापुरता बरा पडतो. ५ वर्षे जुना आहे. व्यवस्थित चालतो. सर्विसिंग इ. काही करावे लागले नाही.

कूलरमध्ये घालायच्या पाण्यात मी दोन-तीन थेंब सुगंध [अत्तर / इसेन्शियल ऑईल इ.] घालते. त्यामुळे त्या पाण्याला किमान शेवाळलेला वास तरी येत नाही.

रंगासेठ, अजुन घेतला नसेल तर एक मस्त उपाय सांगतो. रात्री घरातील आणि बाहेरील तापमा नात साधारण ५ ते ७ अंशाचा फरक असतो. तुम्ही छोटा सायलेंट एकझॉस्ट बसवुन घ्या खिडकित अगदी ग्रिलवर ( जय क्रॉस वेंटीलेशन असेल तर उलता बसवा म्हणजे बाहेर ची हवा आत येइल अशा). झोपायला जायच्या अगोदर तासभर चालु थेवायचा. मस्त ए.सी फील येइल. मी गावाकडे असेच केलेय.

अकु,
राम कुलर्स साठी +१

सिंफनी बजाज इ. कंपन्यांचे कूलर्स उगाचच भयंकर महाग आहेत. तेवढ्या किमतीत एसी येइल खरंतर. फक्त लोडशेडिंग असेल तर इन्व्हर्टरवर कूलरला पर्याय नसतो.

बंद खोलीत कूलर काम करीत नाही. थोड्याच वेळात दमटपणा लिमिटबाहेर वाढून घुसमटते.

पाण्याच्या वासासाठी, व मच्छर्स : विशेषतः डेझर्ट कूलर्स साठी.
पाण्यात फरशी पुसायचे फिनाईल टाका. एक स्मॉल पेग. सुमारे ३० मिलि. याने पाण्याला वासही येणार नाही अन डासांची अंडी /अळ्या असल्यात तर मरतील. दररोज टाकायची गरज नाही. ३-४ दिवसांतून एकदा केले तरी चालते.

ferfatka | 3 April, 2014 - 00:15

सल्ला जरा विचित्र वाटेल पण करून पहा.
Wink

यापेक्षा जास्त विचित्र सल्ले:
१. आंघोळीचा टॉवेल ओला करून गादीवर अंथरा. थोडा वेळ फॅन सुरू ठेवा. ५ मिन्टांनी टॉवेल उचलून २ मिनिटे थांबा. मग झोपा, अन टॉवेल पांघरा. अर्धा ग्लास पाण्यात ३ तास झोप मिळेल.
२. कटिंग सलून मधे न्हावी पाण्याचा फवारा मारतो. तशी बाटली घेऊन या. अधुनमधून आजूबाजूला उडवत रहा.
३. गच्चीवरचे पावसाचे पाणी वाहून नेणारे पाईप्स बंद करून गच्चीत पाणी भरून ठेवा.
४. बाथटबात 'थंड' पाणी भरून त्यात बसता येईल.

(वरील सर्व उपाय, ४४-४६° तापमानात यशस्वीरित्या करण्यात आलेले आहेत. वयाची अट : गद्धेपंचविशी.)

५. काश्मीरला रहायला जा.

मी वर्षानुवर्षे वाळ्याचे पडदे लावण्याचा यशस्वी प्रयोग केलाय. पण होणारा कचरा, पडद्यावर मारावे लागणारे पाणी, ते खिडकीबाहेरच्या मार्गावरून रस्त्यावर किंवा इमारतीच्या प्रांगणात पडत असल्यामुळे जा-ये करणार्‍यांची गैरसोय, पडद्या-आड आडोश्याला येणारे पारवे व दिवसभर त्यांचे घुमणे ऐकावे लागणे इत्यादी गोष्टींना कंटाळून एअर कूलरपर्यंत प्रवास केलाय. अजूनही घरात एसी बसवायला मन धजावत नाहीच! Wink शिवाय ऐन उन्हाळ्यात भर दुपारी दे मार पॉवर कट्स असल्यावर कसला एसी आणि कसला कूलर!! अशा वेळी इन्वर्टर वरचा फॅन तेवढा गपगुमान, आवाज करत का होईना, चालतो!

बंगळुराजवळच्या (बाहेरच्या) कामत हॉटेलापाशी (बंगलोर-पुणे मार्गावर जिथे वोल्वो बसेस नाश्ता-जेवणासाठी थांबतात तिथे) वाळ्याच्या हॅट्स आणि वाळ्याचे पंखे मिळतात. ते असेच हौस म्हणून आणलेले... पण एक दोन वर्षापलीकडे वापरले गेले नाहीत - खराब झाले व टाकून द्यावे लागले.

रंगासेठ, कुलर हा फक्त ड्राय वातावरणात काम करतो. +१

बहुतेक आपल्याला माहित असेल की दमट हवेत कुलर काम करत नाही. एखाद्या खिडकीत कुलर ठेउन प्रत्येक वेळि फ्रेश हवा थंड करुन आली तर कुलरच काम चांगल होत.

योकु | 4 April, 2014 - 12:52
मुंबई, ठाण्यात तरी एअर कुलर कुच्कामी. +१

याचे कारण असे की ड्राय आणि वेट तपमानात जर जास्त फरक असेल तरच कुलर चालतो. हा फरक हवेत समुद्रकिनारी आर्द्रता जास्त असल्याने कमी असतो.

कुलर आर्द्रता वाढवुन हवेतले तपमान कमी करतो. म्हणुन जेव्हा आर्द्रता वाढते तेव्हा कुलर असलेल्या खोलीत नकोसे होते. यासाठी एका खिडकीत कुलर लावावा. खिडकीतुन येणारी हवा फक्त कुलर मधुनच येईल असे पहावे. उरलेला खिडकीचा भाग बंद करावा. यामुळे नवीन ड्राय हवा दरवेळी आत येते व ती थंड होऊन येते आणि आर्द्रता नियंत्रणात रहाते.

एकवीरा बोगस प्रकरण आहे. आम्ही पैसे आणि अक्कल सर्चाज देऊन एक डबडं आणलं आहे दोन तीन वर्षापूर्वी. दुकानात म्हणजे प्रदर्शनात त्याचा गारवा जाणवला होता कारण आत स्टॉलमध्ये एसी होता. तो चक्क फॅन आहे अतिशय फास्ट वेगाचा. वार्‍याचा आवाज भयानक येतो. मात्र स्टर्डी आहे फायवर बॉडी आहे. डास पळवायला उपयोगी आहे.

देशावरच्या कोरड्या हवेतच कूलर चालतात कारण आर्द्रता फरक असेल तर. देशात पावसाळा सुरू होऊन दमट हवा झाली की त्याचा फ्यान होतो. कूलर लावताना वायुवीजन लागते म्हणजे एकाबाजूने कोरडी हवा खिडकीतून अथवा दरवाजातून कूलर मार्गे आत घ्यायची आणि एक्झॉस्ट दुसर्‍या खिडकी दरवाजातून बाहेर जाण्याची सोय करावी अगदी एसी सारखा इफेक्ट येतो. हल्ली त्याचे मागचे पॅड प्लास्टिक/ फायबरच्या जाळ्याचे येतात त्यामुळे वाळाकुजून जसा वास येत असे तसा वास आता येत नाही. काही कूलरला बर्फाची चेम्बर असते त्यात बर्फाचे खडे टाकावेत अथवा खालच्या पाण्यात काही खडे टाकावेत अगदी सुंदर इफेक्ट येतो. कूलर हे प्रकरण मे एन्डपर्यन्तच आणि देशावरच उपयोगी आहे. मे नन्तर देशावरही आर्द्रता वाढते आणि कूलर निरुपयोगी होतात....

एकवीरा बद्दल सहमत. 'उत्सव' प्रदर्शनात यांचे स्टॉल्स होते आणि एकदम थंडगार हवा पाहून खूश झालो होतो. मेहुण्याने एक दिवस अगोदरच 'सिंफनी' चा कूलर घेतला होता आणि तो हळहळत होता की कमी किमतीत वॉटरलेस कूलर मिळाला असता.
पण नंतर जरा आणखी पाहिल्यावर कळालं की त्यांचे स्टॉल्स नेमके AC आहेत तिथेच होते आणि त्यामुळे एकदम थंड हवा येत होती.