चार मध्यम आकाराचे उभे कापलेले कांदे, अर्धी वाटी दोन तास भिजवून पाट्यावर बारीक वाटलेली खसखस, पाच लसूण पाकळ्या व पेरभर आलं वाटून, एक चमचा धणे व अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ तिखट व कोथिंबीर बारीक चिरून
फोडणी - अर्धी वाटी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद
लोखंडी कढईत तेल टाकून फोडणी करावी. त्यात कांदा टाकावा व वाटलेलं आलं लसूण टाकावे. कांदा मऊ झाला की त्यात धणेजिरे पूड, बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर व तिखट टाकावे. दोन मि. परतल्यावर वाटलेली खसखस टाकून छान परतून घ्यावे व साधारण दोन वाट्या पाणी व मीठ टाकावे, पाच मि. भाजी शिजू द्यावी. एका काचेच्या भांड्यात काढून वरून कोथिंबीर घालावी.
कांदा खरपूस होऊ देऊ नये.
लोखंडी कढई व पाट्यावर बारीक वाटलेली खसखस, भाजी ची लज्जत वाढवते.
विदर्भाच्या उन्हाळ्यात भाज्या कमी असतात तेव्हा खासकरून ही भाजी केल्या जाते.
भाकरी बरोबर चांगली लागते.
ही भाजी भारी दिसतेय म्हणजे
ही भाजी भारी दिसतेय म्हणजे वाचून इमॅजिन केलं.
(फोटो अजूनही दिसत नाही )
थोडी चढत असेल असे वाटतेय.
फोटो दिसत नाहिये.
फोटो दिसत नाहिये.
मस्त! ह्यालाच खसखशीचा झुणकाही
मस्त!
ह्यालाच खसखशीचा झुणकाही म्हणतात का? मी खाल्ला आहे पण कसा करतात ते नाही माहीती. मस्त लागतो अन वर चांगल बोटभर तेलही असतं
धन्यवाद! साती- मी एवढी घेतली
धन्यवाद!
साती- मी एवढी घेतली नाही आय मीन खाल्ली नाही:) घेतली\खाल्ली नाहीतरी उन्हाने माणूस सुस्तावतो.
योकु - हो भाजीला भरपूर तेल घालावं लागतं.
.
.
ही कांदा खसखस भाजी आमच्या
ही कांदा खसखस भाजी आमच्या बंगाली शेजारी बाई करायच्या. झकास लागते. फार चोरटी होते पण.
chhaan aahe prakaar haa !
chhaan aahe prakaar haa ! madhyantree lokasattaa madhe khaanDoLee haa prakaar vaahalaa hotaa. topaN khasakhashEechaa karataat.