पुण्यात घरासाठी लागणार्‍या मुलभुत फर्निचरची उत्तम दुकाने

Submitted by हर्ट on 2 July, 2013 - 00:17

नमस्कार, मला माझ्या नवीन घरासाठी लागणार्‍या मुलभुत फर्निचरची खरेदी करायची आहे. साधारणः

१) सोफा सेट
२) टी पॉय
३) डायनिंग टेबल
४) सिंगल्/डबल बेड आणि त्यावरच्या गाद्या.
५) कपडे ठेवायला कपाट
६) पुस्तक ठेवायला कपाट
७) लॅपटॉप ठेवायला टेबल आणि खुर्ची
८) चप्पल बुट ठेवायचे रॅक
९) किचनमधले कपाट

हे सर्व नीट कुठे मिळेल अथवा चांगल आणि लवकर करुन कोण देईल?

साधस पण छानस लाकडी फर्निचर हव आहे.

एक विचारायच आहे की डायनिंग टेबल काचेचा बरा की पुर्णतः लाकडी बरा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या पुतणीचे २१ जुलै पासून ऐम्बीएचे वर्ग सुरु होतील. तिला सिंहगड बी स्कूलमधे प्रवेश मिळाला. म्हणून रेडीमेड फर्चिचर घेण्याखेरीज माझ्याकडे अन्य पर्याय नाही.>>> विद्द्यार्थ्याला रहाण्यासाठी एवढे furniture जास्त वाटत नाही का?
१. कपडे ठेवायला आणि पुस्तक ठेवायला एक कपाट पुरेसे आहे.
२. लॅपटॉप ठेवायला टेबल आणि खुर्ची
३. फक्त गादी, उश्या, चादरी आणि पांघरूण पुरेसे आहे असे वाटते. तरीही खाली गादी घालून झोपायचे नसेल तर कामचलावू लाकडी बेड दोन-तीन हजारांत मिळायला हरकत नाही. (पण पुन्हा एकदा हौसेला मोल नसते Happy )

तुळशीबागेत अक्षय का कोणतेसे हॉटेल आहे त्याच्या बाहेरून, रेडिमेड पड्दे घेतलेले मी ७-८ वर्षांपूर्वी बहुधा ५० का ७५ रू ला एक पडदा+ रिंग्सचा खर्च २५ एक रू. आला असेल. अजून फाटलेले नाहीत, धुतले कि नवेच दिसतात, त्याच पडद्यांसकट घर भाड्याने दिलंय. सगळ्या भाडेकरूंनी वापरले. कोणिही बदलले नाहीत.

टयूब, पंखे, गिझर रविवार पेठ, पडद्याचे रॉड बहुतेक बुधवार पेठेत होलसेल दरांत घेतले होते.

मी पण फर्निचर घेतोय, सध्या एक डबल बेड (बॉक्स टाइप) आणि वॉर्डरोब घ्यायचा विचार आहे. बेड बनवून घ्यावा आणि वॉर्डरोब विकत घ्यावा असा विचार आहे. आम्ही शिवाजीनगरला 'अ‍ॅट होम' मध्ये पाहिलं काही, महाग आहेत. पण डिसाइन्स मस्त होते. आत्ता 'निर्मिती' ला चक्कर टाकेन.

मला पडदे पण लावायचे आहेत, तर कुणी चांगलं कर्टन हाउस आहे का माहिती? माझं घर 'पिंपळे सौदागर' ला आहे आणि त्या भागात महाग आहे सगळं असं ऐकलयं. हे कर्टनवाले स्वतः येऊन मापं घेऊन जातात आणि नंतर रॉड आणून पडदे लाऊन देतात काय?

http://www.maayboli.com/node/22188 इथे फर्निचर, किचन, पडदे याबद्दल भरपूर चर्चा झालीये.
आयडीयाज मिळण्याच्या दृष्टीने बघायला हरकत नाही हा बाफ.

, तर कुणी चांगलं कर्टन हाउस आहे का माहिती?>>> पिम्परीत जा.
माप घेवुन जाणे अवघड नाहिये. एक टेप विकत घ्या आणि दुकानात दरवाजे, खिडक्या ह्यांची लाम्बी रुन्दी सांगा.
पडदा वेगळ्या माणसाकडे विकत मिळेल.
रॉड आणि त्याचे अडकवणी वेगळ्या दुकानात मिळेल.

रॉड स्टील फिनिश साधारण २५-३० रु फुट आहे.
ब्राउन अथवा ऑफ व्हाइट १५-२० रु फुट. (६ महिन्यापुर्वीचा रेट आहे हा)
कट करुन हव्या त्या मापात देतात.

पाहिजे त्या डिजाइन्स्चे रॉडचे साइड बार (अडकवण्या??) मिळतील.
ह्यात रेन्ज भरपुर आहे/ ९० रु जोडीपासुन ६००-७०० रु जोडी..

बसवुन घ्या एखादा कारागीर आणुन.

एका ड्रीलला १० रु च्या हिशेबाने आकुर्डी-निगडीत घेतात.
किंवा त्यालाच सगळं काम एकदम काढुन २००-३०० रुपयात पटवा. (२-३ तासाचं काम असेल तर)
फुल डे काम असेल तर तो ५००-७०० रु घेइल.

पिम्परीतल्या एका चक्कर मध्ये सर्व काम उरकण्याचा प्रयत्न करा.
काही पडद्याचे डिजाइन्स रेडीमेड नसतात. (काही भारी कापड असलेले) ते स्टिच करुन देतात.
साधारण ७-८ दिवस लागतात. एखादा मित्र सोबत असेल तर सर्व बाइकवर देखील घेवुन जाउ शकतो.
कार असेल तर प्रश्नच नाही.

भिंतीला आतून टाइल्स/ फरश्या लावून घ्यायच्या. कडाप्पा किंवा ग्रॅनाइटच्या फळ्या आपल्याला जसे कप्पे हवेत तश्या प्रकारे भिंतीत बसवून घ्यायच्या. कडाप्पा किंवा ग्रॅनाइटचीच फ्रेम बसवून घ्यायची फरशी ते माळा/ सीलिंग अशी. आणि वरून फायबरची स्लायडिंग किंवा फोल्डींग डोअर्स बसवायची. एकदम बेस्ट. त्यात हवंतर लोखंडी तिजोरी फिट करून घ्यायची दिसणार नाही अशी. स्वच्छतेसाठी उत्तम. किडे वगैरे व्हायला वाव कमी.

>> यस. आम्हीही अशीच बनवून घेतली आहेत. जागाही वाचते खूप आणि सुटसुटीत.

शर्मिला, नीधप आणि इतर -- तुमच्या वर्णनात आलेल्या फर्निचरची जर छायाचित्रे इथे डकवता आली तर खूपच उपयोगी होईल नमुना म्हणून वापरता येईल.

सर्वांचे अनेक अनेक आभार.

बी,
गोदरेज चे नविन क्रिएशन वार्डरोब आले आहेत.पुर्ण भिंत (उंचीने ) १० फूट पर्यन्त कव्हर होते. बाकी वूडन दुकानात ( @ होम ) ६.५ ते ७ फूट उंचीचे वार्डरोब असतात (आणि ते अजून उंच करून देत नाहीत.). पण भिंतीची वरची रिकामी जागा जर स्टोरेज पर्पज म्हणून वापरायची असेल तर गोदरेज क्रिएशन हा पर्याय चांगला आहे. हा फोटो -
KreationNew.jpg

नेहमीच्या गोदरेज स्लिम लाईन कपाटाचे उंची वाढवलेले १ डोअर (अंदाजे ७ ते ७.३ फूट) आणि वरती परत २.५ फूट उंचीचा कप्पा असे १ युनिट आहे .आतील रुंदी २ फूट आहे.
त्या युनिटला लागतील तेवढी युनिट्स जोडता येतात . वरचा कप्पा नेहमीच्या गोदरेज डोअर सारखाच उघडता येतो. डोक्यावरून हँडल वरती घेत उघडावा लागत नाही. डोअर ला रंग व फ्लोरल डिजाइन चॉईस आहे. तुमच्या भिंतीच्या साइझ मध्ये जेवढी युनिट्स बसतील तेवढी बसवता येतात.साधारण १० फूट उंच भिंत असेल आणि वार्डरोबची लांबी १० फूट असेल तर अशी ६ युनिट्स बसतात(त्यात डिजाईन चॉईस आहे) . व खर्च ४५ ते ५० पर्यंत येतो. एका दिवसात फिटिंग होते.

लिविंग रूम वाल्यांचा सोफ कम बेड ही चांगला पर्याय आहे.सोफ्याचा डबल बेड करता येतो. ट्रॉली ला चाके असतात. व ट्रॉलीत बरेच स्टोरेज मिळते. रिजनेबल किंमत व दर्जा चांगला आहे यांचा.
फोटो -
Andy.jpg

हाऊसफुल्ल बद्दल थोडेसे - हे लोक स्वस्त देतात ,कारण ते फर्निचर पार्टिकल बोर्ड चे असते . ते मुळातच भुसा कॉम्प्रेस्ड करुन केलेले असते. १५ हजारात ते सोफा सेट ही त्यामुळेच देऊ शकतात. त्यात काहीही बदल करता येत नाही (जसे नवीन ड्रिल मारणे, हिंजीस दुसर्या जागी लावणे वगैरे ) हे फर्निचर ४,५ वर्षे जाते. नंतर त्यातून भुसा येतो. जर ४,५ वर्षांसाठीच घ्यायचे असेल व पुढचे पुढे बघू असा विचार असेल तरच हाऊसफुल्ल कडे जा.
तयारच घ्यायचे असेल तर ,

१) अति उतम क्वालिटी पण महाग चालेल असे असेल तर - एकबोटे ,निर्मिती, टँजंट
२) मध्यम क्वालिटी व किंमत थोडी कमी हवी असेल तर मग गोदरेज /@ होम / लिविंग रुम
३) ४,५ वर्षांचाच प्रश्न असेल तर हाऊसफुल्ल

अजून एक -
किचन साठी - नील कमल चे स्टोरेज कपाट (फायबर्+प्लॅस्टिक) चांगले आहे.जागेचा पुरेपूर वापर होतो.फायबर्+प्लॅस्टिक मटेरिअल मुळे पाणी लागण्याचे टेंशन नाही.प्रत्येक कप्प्याची उंची कमीजास्त करता येते.प्रत्येक कप्प्यात २५ किलो वजन बसते. ७००० ते ८००० किंमत आहे.
हा फोटो -
freedomcabinetbig2acrwtrbrownbiscuit.jpg.66b58fc114.999x210x210.jpg

(फोरम मधे नवी पोस्ट टाकताना प्रॉब्लेम येतोय Uhoh )

ऑफीस फर्निचरसाठी चांगली असलेली फीदरलाईट या कंपनीचे सोफे घरातही चालू शकतील असे आहेत. दहा वर्षांपूर्वी त्यांचे सोफे घेतले होते. जबरदस्त क्वालिटी आहे. रिंकल फ्री कर्वज असतात. आधी बेंगलोरहून मागवावे लागत. आता पुण्यात ढोले पाटील रोडला आहे शोरूम. ( किंमती सध्याच्या माहीत नाहीत. थोड्या चढ्याच असतील )

http://www.featherliteindia.com/featherlite-living-sofas.html

डिझाइन्ससाठी http://www.ebonygautier.com/
मी यांचं कॉम्प्युटर टेबल घेतलं होतं. हलकं, सुटसुटीत , तरीही मजबूत. ११ वर्ष झाली. ठणठणीत आहे. घरी सुतार बसवून काही फर्निचर करून घेतलं, तेव्हा त्या मंडळींनीही टेबलाचं कौतुक केलं होतं.

वॉल युनिट्स वगैरे एकसंघ, अवजड बनवण्यापेक्षा लहान लहान पीसेस जोडून बनवलं, काही काळाने मांडणी बदलून नावीन्य साधता येतं.

फर्निचर 'MDF' चे घेतलं तर काय फायदे-तोटे आहेत? वॉर्डरोब आणि बेड 'MDF' मध्ये मिळतय, जे आम्हाला आवडलय. वॉर्डरोबच्या आत पुन्हा ड्रील करायची गरज नसावी. 'MDF' ला कीड लागत नाही हे कळालं पण पाणी लागून ते फुगतं का हे माहिती नाही?

मेडियम डेन्सिटी फायबर बोर्ड.
दिसायला सुंदर असते. टवके लवकर उडतात. हेवी वापराच्या जागी जसे टेबल टॉप एम डी एफ नको. सिंथेटिक प्रकार आहे. हे बनवताना भुस्सा इ. सर्व प्रकारचे लाकडी वेस्टेज अगदी उसाची चिपाडे देखिल वापरली जाऊ शकतात. पार्टीकल बोर्ड पेक्षा बरा असतो.
जिज्ञासूंनी लिंकेत दिलेला विकि वाचण्याचे कष्ट घ्यावेत.
धन्यवाद!

सताठ वर्षापुर्वी फरटेक मधून कॉप्म्युटर टेबल घेतला होता. तो अजुनही नवीन वाटतो. पण आता त्यांनी फक्त ऑफीस फर्निचर विकायला चालू केलय. कोंढव्यात अनेक फर्निचरची दुकानं आहेत. दोन-तीन दुकानं बघून वूडफर्न (आधिचं न्यु लकी) ला ऑर्डर दिली आहे. दोन वार्डरोब्ज, क्रोकरी युनिट्स, दोन लॉफ्ट आणि एक डबल बेड. फक्त क्रोकरी युनिट्स कमर्शिअल प्लायवूड पासून आहेत बाकीचं एमडीएफ. सगळं मिळून दिड लाख बील झालंय.

उत्तम मटेरिअल, चांगली वर्कमनशिप, जर्मन मेड बिजागिर्‍या आणि इतर साहीत्य वगैरेची हमी दिलीये. बघूया काय होतय.

तुर्रमखाम, प्लीज पत्ता देशील का कोंढव्यातील ह्या दुकानाचा आणि तू ज्या वस्तू वर लिहिल्या आहेत त्यांचे सॅम्पल चित्र वा स्केचेस बघायला मिळतील का? ykakad@gmail.com ह्या पत्त्यावर पाठव प्लीज.

मी यांचं कॉम्प्युटर टेबल घेतलं होतं......
मयेकर,
ह्याचा फोटो काही सापडला नाही तुम्ही दिलेल्या लिन्क वर. सर्च मधे काय लिहिलं की दिसेल?
computer table' असा सर्च करुन काही दिसलं नाही. त्यान्च्या product range मधेही उल्लेख नाहीये.

इब्लिस
हल्ली एचडीएफ बोर्डस देखील बेभरवशाचे आहेत. या बोर्डसचं टेस्टिंग कसं करावं याबद्दल काहीही माहिती नाही. काही दुकानातून तर कागदाच्या लगद्यापासून बनवलेले बोर्डस वापरलेलं "इंपोर्टेड" (मलेशियन) फर्निचर मिळतं. वरचा टॉपही कागदाचाच. त्यावर केमिकल कोट असतो. बाजूने वूडन लॅमिनेटस आणि आत लगदा. अवघड आहे ओळखणं. पाणी पडलं कि संपलं. मॉल मधे १०००० त मिळतं, तर आंबेगावात अमित फेज टू च्या मागे सिद्धार्थ फर्निचर मधे तेच ६००० त मिळतं. मित्राकडे पाहीलेलं मलेशियन टीकवूड फर्निचर मागितल्यावर चांगलं भक्कम मिळतंय. पण त्यासाठी दोन आठवडे थांबावं लागेल म्हणालाय. सॅम्पल नसल्याने अ‍ॅडव्हान्स देता येत नाही अशा परिस्थितीत सौदा लटकलाय. नाहीतर राजस्थानी सुतार आहेतच म्हणा..

मयेकरांना अनुमोदन. गोतियरचं वर्कस्टेशन दणदणीत, मजबूत. मी गेले कित्येक वर्षं वापरत आहे. पूर्वी अंधेरी (प.)ला शॉपर्स स्टॉपशेजारी त्यांची शोरुम होती. आता तिथून गायब आहे. मुंबईत त्यांची अजून कुठे शोरुम आहे का कल्पना नाही. पुण्यात असेल तर जरुर घे बी त्यांच्याकडून फर्निचर.

त्याने वर लिन्क दिलीय बघ बी. मुंबईत आता मालाडच्या इन्फिनिटीमधे गॉतियरची शोरुम आहे हे मला त्यावरुनच कळलं.

चैत्राली मला वाटतं ते प्रॉडक्ट (कॉम्प्युटर टेबल/वर्क स्टेशन) आता त्यांच्या रेन्जमधे नाहीये. कारण माझ्याकडचं पहायलाही मी सर्च केलं ते दिसलं नाही.

@बी: दुकाना बद्द्ल अधिक इथं कळेल.
स्केचेस घरून पाठवावे लागतील. पाहिजे तसं डिझाईन करून देतात अगदी कुठल्या साईटवरचा फोटो दाखवून करून घेता येतं. अडचण फक्त ही की कर्व्ज जास्त असू नयेत. बाकी इतरांपेक्षा दोन-चार हजार रुपये जास्त घेतात पण काम खणखणीत करतात अअसं वाटतं.

फरटेकच्या वेळी अगदी गणवेश घातलेल्या तीन लोकांनी अक्षरशः पंधरा मिनिटात टेबल बसवून दिला होता. चहा-पाण्याला पैसेच काय पण कस्टमरकडे पाणी देखिल प्यायची परमिशन नाही म्हणाले होते. एकदम प्रोफेशनल. नो नोनसेन्स.

कुणाला aran kitchen चाअब्नुभव आहे का? इटालियन कंपनी आहे.
दिसायला मस्त होतं किचन.

एकदम स्टा यलिश

पण ते पार्टिकल बोर्ड वापरतात.
त्यांच्या मते, इटालियन पार्‍टिकल बोर्ड इ. वे डिफरन्ट अँ ड बेटर दॅन इन्डीयन..

कुणाला अनुभव आहे का ?

नानबा, इटालियन पार्टिकल बोर्डही फार काही झळकत नाही. फर्निचर बाहेरून छान दिसतं पण स्टोरेजकरता आणि लाँगटर्म युजकरता अगदीच कुचकामी. आपली भरीव लाकडी कपाटं जसं कितीही लोड घेऊ शकतात तसे हे घेत नाहीत. वाकतातच.

योग्य धागा सापडला नाही म्हणून इकडेच विचारते

पुण्यात गाद्यांचे चांगले दुकान माहिती असेल तर सांगा प्लिज

तसेच मानेचे आणि कंबरेचे दुखणे असणाऱ्यांसाठी हल्ली ऑर्थो गाद्या मिळतात त्याविषयी कुणाला माहिती असेल किंवा वापरत असाल तरी सांगा

थँक्स

Pages