मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑनलाईन शॉपिंगमधे रिस्क फॅक्टर असतोच, तो कंसीडर करून शॉपिंग करावी. शॉपिंग करताना शक्यतो रेप्युटेड शॉपमधुनच आणि रेप्युटेड सेलरकडून खरेदी करावी. गेल्या महीन्यात नेक्सस ७ फक्त रू. ८०४० मध्ये फ्लिपकार्ट वरून घेतला, मस्त चालू आहे. Happy

@भुंगा,

पूर्वी फ्लिपकार्ट स्वतः विक्रेते होते. तेंव्हा डोळे झाकून खरेदी करता यायची. पण आता ते फक्त मध्यस्त आहेत (बहुतेक वेळा). त्यामुळे थोडी खबरदारी घेतलेली बरी. घेताना विक्रेत्याचे रेटींग बघ. ८०% च्या वर असले तर महागाच्या इलेक्ट्रॉनीक वस्तू घ्यायला हरकत नाही. त्याउपर शंका वाटली तर cash on delivery हा पर्याय निवडता येतो.

स्नॅपडील पण चांगले आहे. पण डिलीव्हरी खूप उशीरा देतात (फ्लिपकार्टशी तुलना करता). बाकीच्या साईट्सचा अनुभव नाहीये.

मी माझा Canvas HD फ्लिपकार्ट वरूनच घेतलाय २ महिन्यापूर्वी. काही प्रॉब्लेम नाही.
पूर्वी फार भिती असायची ebay आल्यावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ऑनलाइन कशा घ्यायच्या.. पण फ्लिपकार्ट मुळे ऑनलाइन शॉपिंगची भिती गेली Wink

आणि माधवने लिहिल्याप्रमाणे >>पूर्वी फ्लिपकार्ट स्वतः विक्रेते होते. तेंव्हा डोळे झाकून खरेदी करता यायची. पण आता ते फक्त मध्यस्त आहेत (बहुतेक वेळा). त्यामुळे थोडी खबरदारी घेतलेली बरी. घेताना विक्रेत्याचे रेटींग बघ. ८०% च्या वर असले तर महागाच्या इलेक्ट्रॉनीक वस्तू घ्यायला हरकत नाही. त्याउपर शंका वाटली तर cash on delivery हा पर्याय निवडता येतो.<< +१

-1GB RAM
-more than 8 mp camera
-Android
-under 10,000
-branded

असा घ्यायचा ठरवलंय. एनी सजेशन्स????

१० दिवस वाट बघीतल्यावर अखेर मोटो-जी मिळाला Happy लूक मस्त आहे, ४.५ " चा डिस्प्ले असुन देखिल कॉम्पॅक्ट आहे. एका हाताने देखिल ऑपरेट करताना येतो. युट्युब वर जरी वॉटरप्रूफ असल्याचे विडीओ अपलोड झालेत तरी मॅन्युअल बुकलेट मधे लिक्वीड पासून दुर ठेवण्याचा सल्ला दिलाय. पण ऑपरेटींग टेम्परेचर रेन्ज ० ते ६० deg. सांगितलेय, म्हणजे सिमलामधे फोन नेण्यास हारकत नाही. मोटो-जीच्या काही फोरम्स मधे युझर्सनी त्याचां मोबाईल, बॅटरी १००% ड्रेन करण्यासाठी फ्रिझर मधे ठेवल्याचे सांगितलेय :फिदी:. मेमरी कार्ड स्लॉट नाही पण OTG केबल वापरून पेनड्राईव, कार्डरिडर एक्सेस करता येतो. मी तर वायरलेस माउस देखिल वापरून बघीतला. बॅटरी बॅकअप मस्त आहे. सुरवातीला ९८% चार्ज केल्यानंतर, ३६ तासानीं देखिल बॅटरी लेवल ८% होती, ते देखिल जवळपास १८-२० तास वायफाय वर अपडेट डाऊनलोड होत असताना.
कॅमेरा काही खास नाही वाटला, नाईट फोटोग्राप्स तर वर्स्ट येतात. कदाचीत स्टॉक कॅमेरापेक्षा ईतर कॅमेरा अ‍ॅप्लिकेशन वापरल्यास परफॉरमन्स सुधारेल.
ज्यानां पॉवरफुल मोबाईल डिसेन्ट साईज आणि किंमतीमधे मधे, हवा असेल त्यानीं जरूर घ्यावा

तीन महिन्यातच माझ्या कॅन्वास HD सारखा रिस्टार्ट होत आहे २ आठवड्यांपासून Sad
उद्या सर्विस सेंटरला जातोय. ऑनलाइन घेतल्याने वॉरंटी पिरिअड सर्विस बद्द्ल शंका आहे!
====

प्रसिक मोटोG चा अनुभव कसा आहे?

Micromax Canvas Phablet 3G Android,3000 mAh Battery- Juice A77 चा अनुभव कसा आहे

प्रसिक मोटोG चा अनुभव कसा आहे?>>>>>>>>>> मस्त फोन, १४०००/- ला व्हॅल्यु फॉर मनी. गेम्स, सर्फींग, सोशल नेटवर्कींगसाठी डिसेंट वापर करून देखिल दोन दिवस बॅटरी अरामात पुरते.

मित्राने घेतलेला 'Nokia x' हाताळून बघीतला, पुर्णपणे अपेक्षाभंग. अजिबात ईंप्रेसीव्ह नाही. अ‍ॅप्लिकेशन्स डायरेक्ट प्लेस्टोअर वरून डाऊनलोड करता येत नाहीत. त्यासाठी फोन रूट करावा लागेल. अन्यथा APK डाऊनलोड करून अ‍ॅप्स ईन्स्टाल करावे लागतात. थोडक्यात मायक्रोसॉफ्टने 'गुगल प्ले स्टोअर' चे बारा वाजवण्यासाठी हा मोबाईल बनवल्याचे वाटले.

बापरे प्रसिक मी ह्याच आठवड्यात Nokia X घेणार होते. Thanks. पण मोबाईल घ्यायचा गुंता अजुनच वाढवलास. आता तुम्हीच सुचवा एखादा चांगला फोन.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
10.
बजेट फक्त 8,000/-

बजेट फक्त 8,000/->>>> @ स्नेहनिल, मोटो जी हातात आल्यापासुन मी मोबाईल्सचे मॉडेल बघणे बंद केलेय. तसेपण गॅलेक्सी ग्रॅन्ड आणि M-J वापरल्यानंतर मला सगळे अ‍ॅन्ड्रॉईड सारखेच वाटतात, पण बजेटच्या आसपास हवा असल्यास सॅमसंग चा S Duos -2 चेक करा.

प्रसिक S Duos 2 तर १०,०००/- च्या रेंज मध्ये आहे. माझे बजेट फक्त ८,०००/- आहे. अ‍ॅन्ड्रॉईड फोन पहिल्यांदाच वापरत आहे त्यामुळे कमी बजेट्चा हवाय.

लिनोवो अजिबात बघु नका.........अत्यंत भंगार फिचर्स आहेत.... टच सुध्दा चायना मेड वाटतो..

माझा एक मित्र "कान्वास ए ७७" वापरतोय. मस्त फोन आहे.
आतली जागा कमी आहे. पण मग मी त्याला फोन रूट करून एस-डी कार्ड स्वाप करून दिला. मग ठीक झाला.

टग्या धन्यवाद .

एस-डी कार्ड स्वाप कसा करायचा दुकान्दार करुन दे ईल का? कारन

Micromax Canvas A77 घ्यायचा मी ठरवलंय. याचे reveiw पण चन्गले आहेत अता घेऊनच टाकते. स्वत

न मस्त्॑ Wink स्नेहनिल तुम्हीही हा फोन घेउ शकता तु म्हच्या बजेट मधे आहे.

@कनन:
तुम्हाला आधी फोन रूट करावा लागेल
http://forum.xda-developers.com/showpost.php?p=49018829&postcount=2

मग आतली साठवायची जागा बाहेरच्या साठवायच्या बरोबर बदला
http://forum.xda-developers.com/showpost.php?p=49019218&postcount=6

कुठलाही दुकानदार हे तुम्हाला करून देणार नाही.
हे उपद्व्याप केल्याने तुमच्या फोनची वारंटी नष्ट होईल हे ध्यानात ठेवा

samsung Grand II आवडलाय ... पण grand .. hang होतो असं ऐकलंय ..कुणाला अनुभव आहे का ?

ग्रँड-२ बायकोसाठी घेतलाय. १ महिना पण झाला नाही, पण अधून मधून हँग होतो.
कॅमेरा चांगला आहे आणि टच पण, बॅटरी बॅकअप पण समाधान कारक आहे.

पेरु... वाच माझं मोबाईल पुराण -

आयफोन ४ गेल्या विकांताला बदलला. तो देऊन सोनी एक्स्पीरीया एसपी घेतला (१ जीबी रॅम, १.७ ड्युअलकोअर, ४.७ एच्डी स्क्रीन). पण काही केल्या ते अ‍ॅन्ड्रॉईड प्रकरण नाहीच जमलं. फोन होता स्मूथ अन छान रिस्पॉन्सिव; पण काही केल्या त्याला आयओएस्ची सर नवतीच.

काही जास्त अ‍ॅप्स मी वापरत नाही. थोपु, ट्वीटर, वॉट्सॅप, लिंक्डीन (सगळे ऑलवेज ऑन) ४ ईमेल अ‍ॅड्रेसेस + १ ऑफीस चा एक्स्चेंज चा ईमेल (सगळ्यापैकी ३ पुश सर्वीस) अन कधीतरी गेम. एवढं वापरून बॅटरी अर्धा दिवस्भरही नाहीच टिकायची!

बर्‍याच ठिकाणी टॅप + होल्ड करून मग ऑप्शन आहेत. त्यात परत सोनी चे अ‍ॅप्स वेगळे अन सिमिलर गुगलचेही. नसता गोंधळ. बॅटरी भसाभसा संपते(च); का माहीती नाही.

मग मित्रांनी सांगितल्या प्रमाणे नको असलेले अ‍ॅप्स डिसेबल केलेत. बॅटरी लाईफ सुधारली पण तरी संध्याकाळी ऑफिसात चार्ज करावीच लागायची. अन ते सारखं सारखं डेटा + वायफाय बंद करण मला तरी काही पटत + झेपत नाही. का म्हणून करायचं तस? बॅटरी री-चार्ज व्हायलाही वेळ लागतो.

मेसेज डिलिट करायला त्याला टॅप + होल्ड केल्यावरच पुढचे ऑप्शन्स येत. वईताग.
नोटिफिकेशन सेंटर काही खूप खास नाही. फोन अन्लॉक केल्यावरच ते अ‍ॅक्सेस होणार. स्वाईप करून अ‍ॅक्शन फार कमी ठिकाणी आहे.
विडिओ कमी जास्त स्पीड्ने फॉरवरफॉ/ बॅक करण्याची सोय नाही. विडिओ शूटिंग करतांना झूम करता येत नाही.

शेवटी काढला त्यास. अन पुन्हा अ‍ॅपलच घेतला. हा मात्र मस्त आहे. वर दिलेलं सगळ वापरूनही बॅटरी मस्त पुरते. फास्ट आहेच. स्क्रीन रेझोल्यूशन सुप्पर + ब्राईट्नेस कमी जास्त नाही करावा लागत बॅटरी टिकवायला.

स्वस्त मिळतो (S7582 Duos 2)परंतु क्वॉलकॉम प्रसेसर नाही ,ब्रॉडकॉम आहे .अगोदरचा Duos S7562 जुन्यात आहे पण त्यात अॅँडरॉईड ४.० होती .आणि दोन्हीँची फोन मेमरी ४जीबी खोटी आहे (खरी १.८ च आहे) .

मोटो जी फक्त फ्लिपकार्टवरच मिळतो का? मुंबईत कुठेच ऑटलेट नाही विकत घ्यायला? >> अजुनपर्यंत तरी इतरत्र उपलब्ध नाही.. मी कालच बुक केलाय !

हा बाफ वाचतेय (अजून पूर्ण वाचला नाहीये), पण ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगला स्मार्टफोन सांगू शकाल का? त्यांना पदोपदी मदत करायला कुणी नसेल, त्यामुळे सहज जमतील असा युआय असावा, ही अपेक्षा आहे. स्मार्टफोन यासाठी कारण त्यात कॅमेरा/पेडोमिटर/जीपीएस किंवा तत्सम सुविधा एकत्र मिळतील. त्यांना सूट झाला तर स्काईप वगैरे पण शिकवता येईल.

सॅमसंग माझा आवडता ब्रँड होता. पण परवाच सॅमसंग ऑम्निआ ७ चा डिस्प्ले अचानक बंद पडला. सर्विस सेंटरला गेल्यावर कळलं की हे मॉडेल भारतात विकत नसल्यामुळे इथं दुरूस्त होउ शकणार नाही. बाहेर चौकशी केल्यावर साडेसहा हजार सांगितले म्हणून प्रयत्न सोडून दिले आणि सॅमसंग ब्ल्याक लिस्टात टाकलं.
नोकियाचा द्युअल सीम एक्स घेउन आलो. अतिशय भंकस फोन. दोन-चार मिनिटं हातात घेउन बघित्ल्यावर वॅल्यु फ्वार मनी की काय वाटतं पण कॉन्सः
१. ब्याक कवर टोअदार असल्यामुळे कानाला लावून धरल्यावर टोचतं
२. अतिशय अन्स्टेबल सॉफ्टवेअर. सारखं ह्यांग होतं. इंटरफेस इंट्युटीव नाही
३. अतिशय स्लो प्रोसेसर. २जी-३जी चालू असताना खूप स्लो होतो.

प्रोजः
१. आवाज चांगला
२. ब्याटरी लाइफ छान
३. पीशीला लावल्यावर सरळ युयसबी ड्राइव्ह सारखा उघडतो. विंडोज सारखी झून वगैरे भानगड नाही.

samsung grand 2 कोणी घेतला आहे का ?? कसा आहे?

फ्लिपकार्ट वर Rs. 20250 दाखवत आहे ..

20250 दाखवत आहे . >>>>>>> डिलर कडे बघ अजुन कमी मिळेल >> २११०० ला आहे .

आज ऑफिसात एकानी मोटो जी घेतला १४/१४.५ मध्ये. अमेझि़ग फोन. जरूर पहाच. एक्सलंट फिचर्स आहेत. १४के मध्ये २२/२४ के चे फिचर्स, अ‍ॅन्ड्रॉईड किट्कॅट (स्टॉक अ‍ॅन्ड्रॉईड) मस्त स्क्रीन अन सॉलिड फोन. हातात घेतल्याबरोबर एकदम प्रिमिअम फील आहे!

samsung grand - छान आहे ३ महिन्यापुर्वि २१५००/- घेत ला होता,>> hang होतो का ??

Pages