Submitted by आरती. on 28 February, 2014 - 05:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
दोन कप मैदा
अर्धा कप बटर
दीड कप पिठीसाखर
पाऊण कप दही
अर्धा कप पाणी
अडीच टी स्पून बेकिंग पावडर
एक टी स्पून व्हॅनिला इसेन्स
पाव टी स्पून मीठ
क्रमवार पाककृती:
१. मैदा, बे.पा. चाळून घ्या.
२. एका पातेल्यात बटर, साखर, मीठ, मैदा आणि बे.पा. घालून मिक्स करून घ्या.
३. वरील मिश्रणात पाणी, इसेन्स, दही घालून हॅन्ड मिक्सरने दोन मिनिट फिरवून घ्या.
४. १२ पेपर कप्स ना बटर लावून त्यावर मैदा भुरभुरवा. १ टे.स्पून मिश्रण प्रत्येक पेपर कपमध्ये भरा.
५. प्री हीट ओव्हनमध्ये १६०°C ला १५ - २० मिनिट बेक करा. किंवा तुमच्या ओव्हनच्या सेटींगप्रमाणे बेक करा.
वाढणी/प्रमाण:
खाणार्यावर अवलंबून आहे. :)
अधिक टिपा:
वरील प्रमाणात १२ मफिन्स तयार होतात.
व्हॅनीलाऐवजी पायनॅपल इसेन्स वापरु शकता.
माहितीचा स्रोत:
मैत्रीण
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहा! मस्त दिसतायत. खूप छान
अहा! मस्त दिसतायत.:स्मित: खूप छान क्रिमी कलर आलाय. लगेच उचलुन तोन्डात टाकावेसे वाटतायत. धन्यवाद आरती.:स्मित:
छान दिसताहेत मफिन्स
छान दिसताहेत मफिन्स
मस्तच रेसिपी आहे. अंड्याचा
मस्तच रेसिपी आहे. अंड्याचा वास न येणारे मफीन्स खायला आवडेल.
मस्तच रेसिपी आहे. अंड्याचा
मस्तच रेसिपी आहे. अंड्याचा वास न येणारे मफीन्स खायला आवडेल.
मस्तच ..............
मस्तच ..............
धन्यवाद रश्मी.., मंजूडी,
धन्यवाद रश्मी.., मंजूडी, सृष्टी
नक्की करून पहा आणि ईथे फोटो दया.
गेहना अंड्याचा वास आम्हालापण नाही आवडत.
मस्त!
मस्त!
मस्त दिसतायेत. Texture हि
मस्त दिसतायेत. Texture हि भारि आले आहे.....
छान दिसतायत मफिन्स.
छान दिसतायत मफिन्स.
मैद्याएवजी काय वापरता येइल?
मैद्याएवजी काय वापरता येइल?
मस्त आहे.
मस्त आहे.
चनस, गोपिका, Chaitrali, अन्जू
चनस, गोपिका, Chaitrali, अन्जू धन्यवाद.
मैद्याएवजी काय वापरता येइल? <<< वसुधा एस, ह्या रेसिपीत मैदाच वापरावा लागेल. व्हाईट मफिन्स आहेत. तुम्हाला हव तर कणिक किंवा नाचणीच पीठ वापरून ट्राय करा पण नाव व्हाईट मफिन्स नका देऊ.
दह्याऐवजी काय वापरता येईल?
दह्याऐवजी काय वापरता येईल? थोडा बेकिंग सोडा वापरला तर चालेल?
गायू, ट्राय करून पहा. पण
गायू, ट्राय करून पहा. पण दह्याने छान टेक्सचर येते. दह्याएवजी अंड वापरु शकता.
मस्त
मस्त