राशिभविष्य
मार्च २०१४
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
मेष : नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने मेष राशीच्या लोकांना हा महिना उत्तम आहे. ह्या महिन्यात आर्थिक प्राप्तीचे ही उत्तम योग आहेत. मुलांचा अभ्यास आणि वैयक्तिक प्रगती पण समाधान कारक राहील. व्यवसायात प्रमोशनच्या चांगल्या संधी आहेत. प्रकृतीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, विशेष करून उष्णतेच्या विकारांची संभावना आहे. जोडीदाराशी जरा सांभाळून वागावे, थोडेफार खटके उडण्याची शक्यता आहे. मंगळ पुढे सरकल्यामुळे दुसऱ्या पंधरवड्यात उष्णतेचे विकार बरेच कमी होतील. तसेच आर्थिक दृष्ट्या देखील दुसरा पंधरवडा तितकाच चांगला आहे. काही लोकांच्या बाबतीत शेअर द्वारे आर्थिक प्राप्तीचे योग आहेत. प्रेक्षणीय स्थळांना भेटी आणि मनोरंजन ह्या हेतूने छोटे-मोठे प्रवास घडतील. एकंदरीत मार्च महिना सुखावह राहील.
वृषभ : वृषभ राशीला आर्थिक प्राप्ती दृष्ट्या. आवक चांगली राहील, पण तेवढाच खर्च देखील होईल. थोडक्यात जमा-खर्च बघता बाकी शून्य राहील...अशी चिन्हे दिसत आहेत. खर्च मुख्यत्वे आजारपणाबाबत होईल असे दिसते, तरी स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या प्रकृतीची योग्य आणि आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. नोकरी-व्यवसाय दृष्ट्यात हा महिना चांगलाच राहील. मुलांची प्रगती समाधान कारक राहील असे दिसते. काही लोकांना धार्मिक स्थळांच्या भेटीचा योग आहे. गृह सौख्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील, मुख्यत्वे चांगला राहील. ज्या लोकांचा टुरीझमचा व्यवसाय आहे त्यांना बराच फायदा होण्याची शक्यता आहे. ज्यांना जुने वाहन विकून नवीन घ्यायचे आहे, त्यांना जुन्या वाहनाची चांगली किंमत मिळण्याच्या दृष्टीने हा काळ उत्तम आहे.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना मार्च महिना गृह सौख्याच्या दृष्टीने उत्तम आहे. सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील असे दिसते. प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना चांगलाच जाईल. आजारासंबंधी कोणत्याच तक्रारी राहणार नाहीत. (दारासिंग किंवा किंग कॉंगला आवाहन द्यायला हरकत नाही!!) मुलांची प्रगती देखील समाधान कारक राहील. नोकरीमध्ये विशेष घडामोडी दिसत नाहीत. आर्थिकदृष्ट्या जैसे थे परिस्थिती राहील असे दिसते, विशेष वाढ इ. संभाव्य नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात अतिरिक्त धनलाभाचा योग दिसत आहे. एकंदरीत, ह्या राशीच्या लोकांचा कल धार्मिक बाबींकडे जास्त राहील.
कर्क : कर्क राशीच्या लोकांना गृह सौख्याच्या दृष्टीने हा महिना अतिशय चांगला जाईल असे दिसते. ह्या राशीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा काळ समाधान कारक जाईल. ज्यांचा व्यवसाय भागीदारीत आहे अश्या लोकांना ह्या महिन्यात बऱ्यापैकी लाभ होण्याची शक्यता आहे. काहींना व्यवसायानिमित्त प्रवासाचा योग देखील आहे. ज्यांचा व्यवसाय फिरतीचा आहे अश्या लोकांना हा प्रवास जास्त लाभदायक ठरेल. मुला-बाळांच्या दृष्टीने हा महिना समाधान कारक राहील असे दिसते. महिन्याच्या सुरुवातीला अचानक प्रकृतीची काहीतरी तक्रार येण्याची शक्यता आहे, पण नंतर मात्र प्रकृती उत्तम राहील. वाहन अगर प्रवास ह्या दोन्ही बाबतीत विशेष सावधगिरी बाळगावी. ह्या राशीच्या लोकांना ह्या महिन्यात धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा योग आहे.
सिंह : सिंह राशीच्या लोकांना गृह सौख्याच्या बाबतीत थोड्याफार कुरबुरीला तोंड द्यावे लागेल असे दिसते. द्वितीयातील मंगळ, राहू ह्यामुळे मुलांच्या बाबतीत बराच खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक प्राप्ती बाबत हा महिना सर्वसामान्य राहील, कदाचित मिळकतीपेक्षा खर्चाचा आकडा जास्त राहण्याची शक्यता दिसते. काही लोकांना नोकरी मध्ये बदली होण्याची शक्यता दिसते. ह्या महिन्यात रविचे भ्रमण षष्ठ आणि सप्तम स्थानातून होत असल्यामुळे ज्यांना हृदय विकाराचा त्रास आहे अश्या लोकांनी काळजी करणे आवश्यक आहे. तसेच डोळ्याची देखील विशेष काळजी घ्यावी! मार्चच्या पहिल्या आठवड्यात अचानक धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग आहेत. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
कन्या : तीन ग्रह तुमच्या द्वितीय स्थानी असल्याने अनेक मार्गाने धन प्राप्तीची शक्यता दिसत आहे. गृह्सौख्याच्या बाबत हा महिना अतिशय चांगला आहे. नोकरीमध्ये देखील उत्तम संधी मिळतील, काहींना प्रमोशन अगर पगारवाढ मिळण्याची देखील शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने हा महिना समाधान कारक राहील. ह्या महिन्यातील चंद्राचे भ्रमण ह्या राशीच्या लोकांना उत्तम फलदायी आहे. प्रकृती सर्व साधारणपणे चांगली राहली, मात्र दीर्घ कालीन आजार असणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
तूळ : तूळ राशीच्या लोकांचे नातेवाईकांमधले स्थान उत्तम राहली. तसेच घरासंबंधी घडामोडींबद्दल तुमचा विशेष आस्थेने सहभाग राहील. ह्या महिन्यात प्रामुख्याने तुमची अध्यात्मिक प्रगती जास्त होऊ शकते आणि सत्संगामध्ये भाग घेतल्यास ऊर्जेचा स्रोत जास्त प्रवाही होऊ शकेल. प्रकृतीसंबंधी थोड्याफार कुरबुरी राहतील. मुलांची प्रगती देखील समाधान कारक राहील. काहींना धार्मिक स्थळांना भेटी देण्याची संधी प्राप्त होईल. २२ मार्च नंतर अनपेक्षित धन प्राप्तीचे योग आहेत. वैवाहिक जोडीदाराशी सर्व साधारणपणे सामंजस्याचे संबंध राहतील. नोकरी अगर व्यवसायात सर्वकाही सुरळीत राहली, चिंता करण्याचे कारण नाही.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांना ह्या महिन्यात प्रवासाचे योग आहेत, भरपूर प्रवास घडतील असे दिसते. गृह्सौख्याच्या दृष्टीने थोड्याफार कुरबुरी होतील असे दिसते, विशेषत: घरासंबंधी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात ताणतणाव जाणवतील. काहींच्या बाबतीत मात्र नोकरीत बदलीची शक्यता आहे....पण नको असलेल्या शहरात होऊ शकते. काहींच्या बाबतीत नोकरीत बदल होण्याची पण शक्यता आहे. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे, मात्र सर्व बाजूंनी थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे. ह्या राशीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतील. ह्या महिन्यात अनेक चढ-उतार होण्याची शक्यता आहे. प्रकृतीबाबत अधिक सावधगिरी बाळगावी.
धनु : धनु राशीच्या लोकांची ह्या महिन्यात आर्थिक स्थिती अतिशय उत्तम राहली, पण आर्थिक लाभ घडवणारे ग्रह वक्री असल्याने प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी सामंजस्यपूर्ण संबंध राहतील, पण जोडीदारासाठी तेवढाच खर्च देखील होईल. ह्या महिन्याचे चंद्र भ्रमण संमिश्र स्वरुपाची फळे देणार आहे. नोकरी-व्यवसायात कामाचा ताण जाणवेल आणि त्याबरोबरच त्याचा फायदा देखील मिळेल. तुमचे नोकरी-व्यवसायातील स्थान अबाधित राहील. सौंदर्य प्रसाधानासंबंधी व्यवसाय असणाऱ्यांना देखील हा काळ अतिशय उत्तम जाईल. हवेतील बदलामुळे प्रकृतीमध्ये थोडे चढ-उतार राहतील, पण विशेष काळजी करण्याचे कारण नाही.
मकर : मकर राशीच्या लोकांना ह्या महिन्यात आर्थिक प्राप्ती बरीच चांगली होईल. ऑफिस मधील त्यांच्या कामाची प्रशंसा होईल. थोडक्यात, नोकरी-व्यवसाय दृष्ट्याो प्रगती कारक महिना आहे. ज्यांचा व्यवसाय आहे अश्या लोकांच्या नव्या गाठी-भेटी होतील आणि त्यातून फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना देखील हा महिना समाधान कारक राहील. पालक विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष देतील असे दिसते. प्रकृती दृष्ट्याम देखील हा महिना चांगला राहील, काळजी करण्याचे कारण नाही. गृह सौख्याच्या दृष्टीने हा महिना विशेष घडामोडी न होता संमिश्र स्वरुपाचा राहील.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांच्या तीन आणि नऊ ह्या स्थानी अनेक ग्रह असल्याने बरेच प्रवास घडण्याची शक्यता आहे. काहींना ऑफिसच्या कामानिमित्त परदेशवारी करण्याची देखील संधी प्राप्त होईल. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने देखील हा महिना समाधान कारक राहील. प्रकृती दृष्ट्याव हा महिना उत्तम आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा महिना समाधान कारक राहील. गृह सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे.....नांदा सौख्य भरे!! धार्मिक स्थळांना भेटी देण्याच्या निमित्ताने देखील बराच प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांसाठी देखील हा महिना अनुकूल आहे, मनातील गोष्टी बोलून टाकण्याची उत्तम संधी दवडू नये!! ज्यांना अध्यात्मिक विषयात रस आहे, अश्या लोकांसाठी हा महिना आत्मोन्नती घडवून आणणारा आहे. ज्यांच्या लग्नी कुंभ रास आहे, त्यांना हा महिना जास्त फायदे कारक आहे. काही बाबतीत विलंब झाला तरी एकंदरीत कुंभ राशीच्या लोकांना हा महिना उत्तम आहे.
मीन : ह्या महिन्याच्या उत्तरार्धात रवि मीन राशीतच असल्याने उरलेला महिना सर्व बाबतीत चढती कमानच राहील. वाहन चालवताना थोडी खबरदारी बाळगणे जरुरी आहे. काहींना घराच्या विक्रीतून अपेक्षित लाभ होण्याची बरीच शक्यता आहे. प्रेमिजनांच्या बाबतीत देखील हा महिना चांगला आहे. कदाचित त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊन लग्न देखील होईल असे दिसते. व्यावसायिक दृष्ट्याय, ज्यांचा व्यवसाय इंजिनिअरींग किंवा अभिनयाशी निगडीत आहे, अश्या लोकांना उत्तम आणि लाभदायक काळ आहे. गृह सौख्याच्या दृष्टीने देखील हा महिना उत्तम आहे. सर्व गोष्टी मतभेद न होता, घरातील लोकांच्या एकमताने पार पडतील. प्रकृतीच्या काही तक्रारी राहणार नाहीत. मुलांची प्रगती समाधान कारक राहील.
धन्यवाद
धन्यवाद
बेफि, हवीशी भविष्यवाक्ये
बेफि, हवीशी भविष्यवाक्ये आलेली दिसतात
जन्मरास म्हणजे चंद्र रास?
जन्मरास म्हणजे चंद्र रास?
गेले तीन महिने मी माझं भविष्य
गेले तीन महिने मी माझं भविष्य वाचते just for fun! तुम्ही म्हणता म्हणून चंद्र रास आणि लग्न रास दोन्हीचा मेळ घालायचा प्रयत्न करते! पण दर वेळी त्यात exactly opposite statements असतात! माझी चंद्र रास मिथुन आणि लग्न रास वृश्चिक आहे!
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना मार्च महिना गृह सौख्याच्या दृष्टीने उत्तम आहे. सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील असे दिसते. प्रकृतीच्या दृष्टीने हा महिना चांगलाच जाईल. आजारासंबंधी कोणत्याच तक्रारी राहणार नाहीत. (दारासिंग किंवा किंग कॉंगला आवाहन द्यायला हरकत नाही!!) मुलांची प्रगती देखील समाधान कारक राहील. नोकरीमध्ये विशेष घडामोडी दिसत नाहीत. आर्थिकदृष्ट्या जैसे थे परिस्थिती राहील असे दिसते, विशेष वाढ इ. संभाव्य नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात अतिरिक्त धनलाभाचा योग दिसत आहे. एकंदरीत, ह्या राशीच्या लोकांचा कल धार्मिक बाबींकडे जास्त राहील.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांना ह्या महिन्यात प्रवासाचे योग आहेत, भरपूर प्रवास घडतील असे दिसते. गृह्सौख्याच्या दृष्टीने थोड्याफार कुरबुरी होतील असे दिसते, विशेषत: घरासंबंधी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात ताणतणाव जाणवतील. काहींच्या बाबतीत मात्र नोकरीत बदलीची शक्यता आहे....पण नको असलेल्या शहरात होऊ शकते. काहींच्या बाबतीत नोकरीत बदल होण्याची पण शक्यता आहे. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे, मात्र सर्व बाजूंनी थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे. ह्या राशीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतील. ह्या महिन्यात अनेक चढ-उतार होण्याची शक्यता आहे. प्रकृतीबाबत अधिक सावधगिरी बाळगावी.
How do you explain this discrepancy? आणि ह्या दोन्ही पैकी काहीच खरं होतं नाही ही सगळ्यात मोठी गम्मत आहे! असो!
जिज्ञासा ,तुम्ही नेहमी कर्क
जिज्ञासा ,तुम्ही नेहमी कर्क राशीचं भविष्य (कुठेही)श्रध्देने(!) वाचा .कारण भाग्यात कर्क रास येते .
चंद्र रास मिथून आहे ना .काहीतरी सारखे वाचायचे आणि त्यावर चिकित्सा आणि घोळ घालत बसायचे हा मिथून राशीचा स्वभाव जाणार नाही .पटलं नाहीतर द्या सोडून आणखी घोळ नको .
Srd, Okay! घोडा मैदान समोरच
Srd, Okay! घोडा मैदान समोरच आहे! ये भी आजमाके देखते हैं!
पशुपति, दरमहिन्याला तुम्ही
पशुपति, दरमहिन्याला तुम्ही राशिभविष्य लिहित आहात त्याबद्दल धन्यवाद !
ह्या योगे एकंदर गोचर ग्रहांचा अंदाज येतो .
जिज्ञासा , मला वाटते कि ज्यांची जन्म रास व लग्न रास ह्या षडाष्टक योगात आहेत . त्यांनी साधारण पणे बर्याच वेळा संमिश्र फळे मिळतात . तसेही राशिभविष्यात तुमच्या पत्रिकेतील इतर ग्रहांचा विचार केलेला नसतो . त्यामुळे अचूकता येणे तसेही शक्य नाही पण थोडाफार अंदाज येऊ शकतो .
तुम्हाला अथवा कुणाला नाराज
तुम्हाला अथवा कुणाला नाराज करायचा हेतू नाही पण एका मोठ्या जनसमुदायाकरिता एकच भविष्य या कोनातून विचार केल्यास थोडे विनोदी पध्दतीने स्विकारल्यास सुसह्य होते .
एकदा जानेवारी २०१३मध्ये एका पेपरात कन्या राशीसाठी "किचकट वाटणारे प्रश्न झटकन सुटतील "वाचून आमच्या ८४ वयाच्या सासूबाई साठी आधारचा फॉम सकाळी दिला .त्यांनी सांगितले तीन वाजता आणा .सवातीनला काम फत्ते !दोन महिन्यांनी कार्ड घरी .त्यावेळी मोठया रांगा लागत असतांना आश्र्चर्याची गोष्ट वाटली .
काही जणांच्या बाबतीत भाग्यरास महतवाची असते .
दुसरा एक पर्याय निरनिराळे ठिकाणचे आडाखे पाहाणे आणि ज्याचे पटते त्याचेच नेहमी पाहाणे .सामान्यांसाठी हाच चांगला मार्ग आहे .
थोडे अवांतर झाले .
आताच वर Anvita यांचाही मुद्दा बरोबर आहे .
त्यावेळी मोठया रांगा लागत
त्यावेळी मोठया रांगा लागत असतांना आश्र्चर्याची गोष्ट वाटली .>>>> त्यांचे वय बघता त्यांचे काम अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळात झाले असते तरच आश्चर्य वाटले असते! त्यासाठी पेपरमधल्या भविष्याची काय गरज? असो.
ज्यांच्या दोन्ही राशी : जन्म
ज्यांच्या दोन्ही राशी : जन्म रास व लग्न रास एकंच आहेत त्यांनी काय करावे ?
आभार !
आभार !
दिव्यश्री , एकच लग्न रास व
दिव्यश्री , एकच लग्न रास व चंद्र रास असेल तर राशिभविष्य वाचणे जास्त सोपे कारण फक्त एकाच राशीचे वाचायला लागते . अशावेळेस गोचर ग्रह जास्त apply होतात . तरीही यात तुमच्या मूळ पत्रिकेचा सहभाग नसतोच त्यामुळे लिहिलेले सगळे अगदी तसेच होईल असे नाही .
वत्सला ,काम फक्त पंधरा
वत्सला ,काम फक्त पंधरा मिनीटात झाले .सासूला सकाळी नेलेच नव्हते .केंद्रावर कळले की रोज पन्नास जणांना बोलावतो परंतु बरेच येत नाहीत .काही दुपारी चार नंतर येतात .दुपारी तीनला कोणीच नव्हते .सासूबाईं च्या दरबारात जावईबापूंचे वजन वाढले हेही नसे थोडके .पेपरातल्या दोन ओळींच्या भविष्याने एक दिवस तर आनंदात गेला .
धन्यवाद... Anvita ... गोचर
धन्यवाद... Anvita ... गोचर वगैरे कळत नाही ... इच्छा होतेय शिकायची , माहेरी जाऊन पुस्तकांचा खनिज लुटावा लागेल आता .
>>>> वेळी मोठया रांगा लागत
>>>> वेळी मोठया रांगा लागत असतांना आश्र्चर्याची गोष्ट वाटली .>>>> त्यांचे वय बघता त्यांचे काम अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळात झाले असते तरच आश्चर्य वाटले असते! त्यासाठी पेपरमधल्या भविष्याची काय गरज <<<<<
अहो वय /लिन्ग वगैरे बघुन सरकारी बाबू वा त्यान्चे नेमलेले नोकर हलत असतील, तर लोक देवालाही विसरुन जातिल.
अन आधारकार्डबाबत तर विचारुच नका...... देवाचीच कृपा झाली तर होऊन जाते काम, अगदी मतदार नोंदणीप्रमाणेच आहे ते देखिल
बायदिवे तुम्ही युरोपअमेरिकेत वगैरे रहाता का? तिकडे असल्या अपेक्षा ठीक आहेत.
असो.