Submitted by नलिनी on 24 February, 2014 - 09:29

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
कोबी
हिरवी मिरची/ लाल तिखट
मिठ
जिरे
हळद
लसूण
लिंबूरस
आले
बेसन पिठ
क्रमवार पाककृती:
साधरण मध्यम आकाराचा भरीव कोबी घ्यायचा. तो खिसणे शक्य नसेल तर मग बारीक चिरायचा. मी फुडप्रोसेसरवर खिसून घेतला. मग त्यात मिक्सरमध्ये वाटलेले वाटण( हिरवी मिरची, जिरे, लसुण, अद्रक, मिठ, हळद) घालायचे. थोडासा लिंबूरस घालायचा. त्यात मावेल तेवढे बेसन घालून चित्रात दिसतेय तसे पिठ भिजवायचे. ह्यात वरुन पाणी घालायची गरज नसते पण जर कोबी चिरून घेतला तर जरासे पाणी घालावे लागेल. मग ह्या पिठाचे कोथिंबीरीच्या वडीला करतो तसे मुटकुळे करून ते कुकरमध्ये उकडून घ्यायचे. उकडल्यानंतर त्याच्या वड्या कापुन तव्यावर तेल घालून खरपूस परतायच्या.
प्रमाण: मी सगळेच अंदाजे घेतले होते. आवडीनुसार तिखट कमी जास्त करता येतील.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नलिनी, तुझी मुटकुळ्यांची कृती
नलिनी, तुझी मुटकुळ्यांची कृती नव्या मायबोलीत आण की.>>>> आणली.
अरे वा! धन्यवाद
अरे वा! धन्यवाद
wow !!! सही दिसत आहेत
wow !!!
सही दिसत आहेत
मस्त व सोपी.
मस्त व सोपी.
ब्यूटीफुल. दिसायला तरी मस्त
ब्यूटीफुल.
दिसायला तरी मस्त दिसतंय.
पद्धतशीर फोटू काढलेत. स्वयंपाकी व फोटोग्राफर वेगळे दिसतात.
(बाकी कोबी मला कच्चा वा सिझलर सोडून इतर प्रकारांनी फारसा आवडत नाही. पण कांदे महाग होण्याच्या काळात हॉटेलात कांदाभजी मागवलीत तर त्यात भरपूर कोबी असे. याची चव साधारण तशी वा त्यापेक्षा थोडी जास्त छाण लागेल असे वाटते. ऑन दॅट नोट, कोबीसोबत थोडा कांदा मिक्स केला तर चालेल का?)
घरात कोबी आहेच. आज नक्की करुन
घरात कोबी आहेच. आज नक्की करुन बघते.
धन्यवाद! स्वयंपाकी व
धन्यवाद!
स्वयंपाकी व फोटोग्राफर वेगळे दिसतात.>>> वेगळे नाही एकच.
कोबीसोबत थोडा कांदा मिक्स केला तर चालेल का?>> करून पहायला हरकत नाही पण ह्या वड्या अश्याच खायला छान लागतात. ह्यात कोबी आहे हे सांगितल्याशिवाय खाणार्याला कळत नाही शक्यतो, त्यामुळे तुम्हाला कांदा घालावासाच वाटणार नाही.
स्वयंपाकी व फोटोग्राफर वेगळे
स्वयंपाकी व फोटोग्राफर वेगळे दिसतात.>>> वेगळे नाही एकच.
<<
अरे वा!
मग दोन्ही कलांत वाकबगार आहात असेच म्हणावे लागेल!
मी कोलस्लो मिक्स वापरून करते.
मी कोलस्लो मिक्स वापरून करते. का माहित नाही पण ज्या मैत्रिणीकडून शिकले ती बेकिंग सोडा घालते म्हणून मी पण घालते.
पण तुम्ही केलेलं फारच छान दिसतय. पुढच्या वेळी बिना बेकिंग सोडा करून बघेन.
झकास पाककृती. फोटोपण मस्तं
झकास पाककृती. फोटोपण मस्तं आलेत. शेवटल्या फोटोतल्या वड्या कसल्या खमंग तळल्या आहेत.
या वड्या चपातीत घालायच्या. त्या आधी चपातीला कोथिंबीर्-मिर्च्यांची चटणी फासायची. त्यात घट्ट दह्यातली कांदा-टोमॅटो कोशिंबीर घालून गुंडाळी करून खायचं. भन्नाट लागतात. फलाफल रोलसारखा पोटभरीचा पदार्थ होतो.
मृण्मयी, मस्तच की.
मृण्मयी, मस्तच की.
मस्तच आहे.
मस्तच आहे.
मस्त फोटो. मृ, तुझी आयडिया
मस्त फोटो. मृ, तुझी आयडिया एकदम वन डिश मिलच होईल की.
मस्त रेसीपी नलिनी. १-२वेळा
मस्त रेसीपी नलिनी. १-२वेळा केले आहे तुझ्या रेसीपीनुसार. नंतर मुटके करा, उकडा च्या ऐवजी
थालिपीठासारखे तव्यावर थापते. ते पण छान लागते.
आमच्याकडे याचे भानोले नावाचा
आमच्याकडे याचे भानोले नावाचा प्रकार करतात. मिश्रण हेच पण ते थेट लंगडीत घालून मंद विस्तवावर भाजायचे.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
ओह!!!!!! धन्यवाद धन्यवाद
ओह!!!!!! धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!!!
मस्त फोटो...
मस्त फोटो...
मस्त फोटो! तोंपासु.
मस्त फोटो! तोंपासु.
वा मस्तच.. सहज साधी कृती..
वा मस्तच.. सहज साधी कृती..:)
छान .. कोबीच्या जागी किसलेला
छान ..

कोबीच्या जागी किसलेला दुधी भोपळा घेतला की तयार होतील दुध्याचे मुटके.. शेजारच्या भाभीची सेम रेसिपी आहे
पण कांदे महाग होण्याच्या
पण कांदे महाग होण्याच्या काळात हॉटेलात कांदाभजी मागवलीत तर त्यात भरपूर कोबी असे. याची चव साधारण तशी वा त्यापेक्षा थोडी जास्त छाण लागेल असे वाटते. ऑन दॅट नोट, कोबीसोबत थोडा कांदा मिक्स केला तर चालेल का>>>> माझ्या एका जैन कलिग्ने सा.न्गितल की ती पावभाजीमध्ये कोबी भरपूर हिन्गावर परतते .
पण कांदे महाग होण्याच्या
पण कांदे महाग होण्याच्या काळात हॉटेलात कांदाभजी मागवलीत तर त्यात भरपूर कोबी असे. याची चव साधारण तशी वा त्यापेक्षा थोडी जास्त छाण लागेल असे वाटते. ऑन दॅट नोट, कोबीसोबत थोडा कांदा मिक्स केला तर चालेल का>>>> माझ्या एका जैन कलिग्ने सा.न्गितल की ती पावभाजीमध्ये कोबी भरपूर हिन्गावर परतते .
वाह! नलिनी अतिशय सुरेख.
वाह! नलिनी अतिशय सुरेख.
ते थेट लंगडीत घालून मंद
ते थेट लंगडीत घालून मंद विस्तवावर भाजायचे.
<<<
फोटो नं. ३ व ४ पाहून शिग कबाब आठवले
रेसिपी मस्तच … विशेष म्हणजे
रेसिपी मस्तच … विशेष म्हणजे तेल कमी लागतंय म्हणून
मी किसलेल्या कोबीत ओवा, तिखट, मीठ, हळद आणि बेसन ऐवजी कणीक पीठ घालून. (कणिक फार नाही घालायची कोबी ला पकड म्हणून फक्त घालायची कोबीच जास्त दिसायला हवी) हे सगळं हाताने छान एकत्र करून घ्यायचे. नंतर हातावर थापून खरपूस तळून घ्यायचे. अगदी लालसर होईपर्यंत. कुठल्याही चटणीसोबत खायला द्यायचे. अतिशय चविष्ट असा पदार्थ तयार होतो
मस्त फोटो आणि रेसीपी. भाज्या
मस्त फोटो आणि रेसीपी. भाज्या किसून , गव्हाचे पीठ+बेसन+ज्वारीचे पीठामध्ये मिक्स करून त्याचे असे मुटकुळे बनवितो आम्ही. आता हे करून बघायला हवे.
मामी, तुझी आयडीया आवडली. मी कोबीचे पकोडे करते त्या ऐवजी हे करुन बघेन आता.
छान. फोटो व रेसिपी. असेच
छान. फोटो व रेसिपी.
असेच दुध्याचेही छान।होतात.
मी बेसन ऐवजी थालिपीठ भाजणी, लिंबाऐवजी चिंच गूळ घालते.
आणि फोडणीत/ डायरेक्ट मिक्श्चरमधेच थोडे तीळ.
फोडणीत घातल्यास दिसतेही छान आणि थोडं दाताखाली क्रन्च.
सही दिसताहेत मुटकुळे
सही दिसताहेत मुटकुळे
ही पाकृ शोधून काढून केली आज.
ही पाकृ शोधून काढून केली आज. (बेसनाबरोबर थोडे तांदळाचे पीठ घातले.) खूप खुसखुशीत वड्या झाल्या. एरवी कोबी नाही खाणाऱ्यांनी पण आवडीने खाल्या.
धन्यवाद नलिनी.