मैदा - १५० ग्रॅम
साखर - १५० ग्रॅम
बटर - १५० ग्रॅम
अंडी - ३
बेकिंग पावडर - १/२ छोटा चमचा
व्हॅनिला इसेन्स - १/२ चमचा
मिक्स ड्राय फ्रुट्स - १/४ वाटी
मिठ चिमुटभर
१. एका भांड्यामधे मैदा, मिठ व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे.
२. दुसर्या भांड्यामधे बटर व साखर फेटुन घ्यावे.
३. साखर निट मिक्स झाल्यावर त्यात १-१ अंडे टाकुन फेटुन घ्यावे.
४. ह्यात मैदा व ड्राय फ्रुट्स टाकुन एकत्र करावे.
५. एका बेकिंग ट्रे ला बटर लावावे व त्यावर मैदा भुरभुरावा. त्यामुळे केक भांद्यास चिटकत नाही.
६. हे सर्व करताना ओव्हन १८० degree celcius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा.
७. Preheat झालेल्या ओव्ह्न मधे केक टेवुन १५-२० मिनिट बेक करुन घ्यावा.
८. १५-२० मिनिटात केक तयार झाला असेल.
९. केकचा ट्रे बाहेर काढुन १ तास थंड होउन द्यावा.
१०. केक पुर्ण थंड झाल्यावर त्याचे १ सेमीचे तुकडे करुन घ्यावेत.
११. हे सर्व एका ट्रे मधे ठेवुन ओव्हन मधे १५० degree celcius ला १५ मिनिटे परत बेक करावे. १५ मिनिटांनी ओव्ह्न बंद करावा व तो ट्रे ओव्ह्न मधेच १० मिनिटे ठेवावा.
१२. १० मिनिटांनी ट्रे बाहेर काढल्यावर केक रस्क तयार झाले असतील.
१३. हे केक रस्क वाफाळत्या चहा सोबत किंवा नुसतेच सुद्धा खुप छान लागतात.
मस्त दिसताएत!! छान फोटो!
मस्त दिसताएत!! छान फोटो!
यम्मी! आताच दूध घेवून खायला
यम्मी! आताच दूध घेवून खायला बसावे असे वाटतेय.
मला लहानपणी हे खूप खूप आवडायचे. एका वेळी चार ते पाच केक रस्क घेवून एक कपच दूधात बुडवून बुडवून खायचे. आमच्या जवळच्या बेकरीत इतका घमघमाट सुटायचा सकाळी ७ व दुपारी ४ वाजता.
ट्युशन वरून दुपारी घरी येताना घेवून यायचे व हादडायचे.
मध्ये केले होते इंटरनेटवरचीच अशीच सेम रेसीपी पाहून.(मला वाटते बाजियास कूकींगची रेसीपी).
(पण हाये रे कर्मा, वाढते वव बघून बंद केलय... लहानपण देगा देवा... )![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त दिसतायतं!
मस्त दिसतायतं!
मस्तं. रस्क ला आम्ही टोस्ट
मस्तं.
रस्क ला आम्ही टोस्ट म्हणतो.
आमच्या गावी 'टोस , बटर, खारेय' करत एक टोपलीवाला भैया यायचा.
मी पण वाढते 'वव' - वय व वजन
बघून हे खायचे बंद केलेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'वव' शब्दाचा कॉपीराईट झंपीकडे.
वव ची पर्वा मी नाही करत. आणा
वव ची पर्वा मी नाही करत.:डोमा: आणा इकडे, आत्ताच खाते. मस्त! अहाहा! मृणाल धन्यवाद.:स्मित:
वाह मस्त
वाह
मस्त
छान दिसताहेत. मस्त जमलेत. (एक
छान दिसताहेत. मस्त जमलेत.
(एक सेमीचे तुकडे हवेत ना ?)
सगळ्यांचे धन्यवाद. हो
सगळ्यांचे धन्यवाद. हो दिनेशदा. १ सेमी चे तुकडे हवेत किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त जाद देखिल करु शकता. पण जास्त जाड केल्यास ते एवढे क्रिस्पी नाही होणार. (मी चुकुन १ इंचाचे लिहले होते. आता चुक सुधारले आहे.)
मस्त दिसताहेत.
मस्त दिसताहेत.
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
वॉव काय सुंदर दिसताहेत.. लगेच
वॉव काय सुंदर दिसताहेत.. लगेच खावेसे वाटताहेत.. फोटो मस्त!
मस्त मस्त
मस्त मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारीच!
भारीच!
मस्त आहेत. लहानपण आठवले.
मस्त आहेत. लहानपण आठवले.
मस्त दिसताहेत रस्क. सगळे फोटो
मस्त दिसताहेत रस्क. सगळे फोटो पण आवडले.
मस्त रेसिपी . शेवटचा फोटो तर
मस्त रेसिपी .
शेवटचा फोटो तर लाजवाब!
शेवटचा फोटो तर लाजवाब! >>>
शेवटचा फोटो तर लाजवाब! >>> +१.
व्वा .. मस्तच..आताच खावेसे
व्वा .. मस्तच..आताच खावेसे वाटत आहे..
:
वाह! तोंडाला जाम पाणी सुटलं
वाह! तोंडाला जाम पाणी सुटलं फोटो पाहूनच.
सगळ्यांचे आभार. फोटोंचे सगळे
सगळ्यांचे आभार. फोटोंचे सगळे श्रेय माझ्या नवर्याला जाते. मी फक्त रस्क बनवले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रस्क म्हणजे टोस्ट हे माहीत
रस्क म्हणजे टोस्ट हे माहीत नव्हतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मस्त दिसतायेत.
पण यात तर अंडं आहे
खारी वाल्याकडे असतात त्यात पण अंडं असतं का?
@रिया खर तर हे रस्क मी भारतात
@रिया
खर तर हे रस्क मी भारतात कधि खाल्ले नाहियेत. आपल्याकडे मिळतात ते नॉर्मल टोस्ट असतात. जे ब्रेड पासुन बनवलेले असतात. हे रस्क माझ्या मते पाकिस्तान मधे वैगरे जास्त खाल्ले जातात. भारतातही मिळत असतील, पण मी नाही खाल्ले कधी. हे रस्क गोड असतात आणि केक पासुन बनवलेले असतात. त्यामुळे हे चवील गोड आणि थोडे हेवी सुद्धा असतात आपल्या टोस्ट पेक्षा.
अंडी न घालता करता येईल का
अंडी न घालता करता येईल का ?
बाकी फोटो खुप छान आलेत फोटो पाहुन करावेसे वाटत आहेत......
हो नक्कीच. पण मी पण कधी अजुन
हो नक्कीच. पण मी पण कधी अजुन बिन अंड्याचा केक नाही करुन बघितलाय. त्यामुळे पाकृ नाही देवु शकणार. पण तुम्हाला जर बिनअंड्याच्या केकची पाकॄ माहित असेल, तर त्या पद्धतीने केक बनवुन, त्याचे स्लाईस करुन ओव्ह्न मधे बेक केल्यास त्याचे सुद्धा रस्क छान होतील.
याला रस्क म्हणतात ते अलीकडेच
याला रस्क म्हणतात ते अलीकडेच कळले.(आम्ही टोस्टच म्हणायचो.);ब्रिटानियाचे रस्क बाजारात पाहिल्यापासून. त्याची जाहिरातही टीव्हीवर असते. ब्रिटानियाचे रस्क एगलेस आहेत; गोड आहेत; त्यात वेलचीचे दाणेही असतात
.
भरत+१०००० . मला आवडतात
भरत+१०००० .
मला आवडतात ब्रिटानीया रस्क..
केक रस्क मध्ये सहसा अंडे
केक रस्क मध्ये सहसा अंडे असतेच. साध्या रस्कमध्ये नसते. ब्रिटानियाच्या रस्कची चव आणि केकरस्क ची चव यात जमिन अस्मानाचा फरक आहे.
केकरस्क अक्षरशः विरघळतो जिभेवर.
मला कॉलेजात असताना बिहारी-पंजाबी मैत्रिणींकडून कळालं होतं टोस्टला उत्तर भारतात रस्क म्हणतात म्हणून.
छान दिसत आहेत रस्क. अगदी बाजारात मिळणार्या केकरस्क सारखे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अल्पना, ब्रँडेड केकरस्क
अल्पना, ब्रँडेड केकरस्क मिळतात का? की बेकरीच धुंडाळावी लागेल?
ओह! इन शॉर्ट मी हा प्रकार
ओह! इन शॉर्ट मी हा प्रकार कधीच खाल्ला नाहीये म्हणजे![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
ब्रँडेड नाही खाल्ले कधी.
ब्रँडेड नाही खाल्ले कधी. बेकरीचेच खाल्लेत.
Pages