दुधी भोपळा किसून (साधारण अर्धा दुधी), तेल,लसूण, हिंग, हळद, धने जिरे पूड, गरम/गोडा मसाला,मीठ, गूळ, कणिक.
मायबोलीवर दुधी भोपळा स्पेशल बर्याच पाककृती पाहिल्या पण हि कुठे दिसली नाही म्हणून हा एक नवा प्रकार तुमच्यासाठी...
साधारण अर्धा दुधी भोपळा (अर्धा पाउण किलो वजनाचा) किसून घ्यावा. कढईत ४-५ टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात लसूण किसून/ठेचून परतावा. नंतर किसलेला दुधी भोपळा त्याला सुटलेल्या पाण्यासाहित कढईवर झाकण ठेऊन शिजवून घ्यावा. थोडा रंग बदलल्यानंतर त्यात आपण फोडणीला घालतो तेवढेच हिंग हळद घालावे. अजून परतून धने जिरे पूड, मीठ,गूळ आणि मसाला घालावा आणि गॅस बंद करून १० मिनिटे झाकून ठेवावे. गार झाल्यावर त्यात बसेल एवढेच गव्हाचे पीठ किंवा पाउण भाग गव्हाचे पीठ आणि पाव भाग ज्वारीचे पीठ घालून मळून घ्यावे. नाव जरी थालीपीठ असले हे थापून किंवा लाटून देखील हे करता येते..
नंतर प्लास्टिक ची जाड पिशवी (दुधाची किंवा तेलाची असते त्या जाडीची) घेऊन छोटा गोळा घेऊन थालीपीठ थापावे. आणि तव्यावर भाजून घ्यावे. किंवा थोडे घट्ट भिजवून लाटून भाजून घ्यावे. तेलात परतल्यामुळे वरून खूप तेल लावण्याची गरज पडत नाही. गरम गरम थालीपीठ घट्ट तुपाबरोबर, दह्याबरोबर, लोणच्याबरोबर किंवा लसणाच्या चटणीबरोबर खायला मस्त लागते.
सॉस बरोबर खाल्लं तर सॉसचीच चव लागते म्हणून सॉस नको!
अजून एक टीप: आवडत असेल तर पीठ
अजून एक टीप: आवडत असेल तर पीठ मळताना कोथिंबीर चिरून टाकली तरी मस्त लागते! (आमच्याकडे सासूबाईंना कोथिंबीर विशेष आवडत नाही आणि मला ज्यात त्यात आवडते, मग आलटून पालटून घालतो)
वाह गायत्री छान आहे रेसिपी.
वाह गायत्री छान आहे रेसिपी. पुढच्या वेळी फोटो नक्की टाक.
नक्की दक्षिणा! आज मायबोली वर
नक्की दक्षिणा! आज मायबोली वर वेगवेगळ्या रेसिपीज पाहताना हि लिहिली..आता परत करेन तेंव्हा फोटो नक्की!
वा, छान गुजराथी प्रकार !
वा, छान गुजराथी प्रकार !
दुधी भोपळा न शिजवता कच्चाच
दुधी भोपळा न शिजवता कच्चाच ठेवला तरी छान लागतं, असच कोबी किसून पण छान खुसखुशीत होतात.
मस्त वाटते हि
मस्त वाटते हि रेसिपि....
आमच्याकडे सासूबाईंना कोथिंबीर विशेष आवडत नाही आणि मला ज्यात त्यात आवडते, मग आलटून पालटून घालतो>>>> तुम्हा दोघिंच कौतुक, एकमेकिंचा आवडि इतक छान जोपासता
धन्यवाद दिनेशदा. पण खरं तर हि
धन्यवाद दिनेशदा. पण खरं तर हि गुजराथी रेसिपी नाहीये सासूबाईंनी स्वतःच तयार केलीये!
राजसी- कधी कच्च्या दुधीचे
राजसी- कधी कच्च्या दुधीचे केले नाहीत, प्रयोग खातर नक्की करेन! कोबीची भाजी करून स्टफ्ड पराठे केलेत..मस्त लागतात..
धन्यवाद गोपिका, त्या म्हणतात
धन्यवाद गोपिका, त्या म्हणतात "माझी आवड मी विसरलीये इतके वर्षात" निदान नावड माहितीये तर ती तरी टाळावी
वा मस्त! आता करुन बघेन असे
वा मस्त! आता करुन बघेन असे थालीपीठ
त्या म्हणतात "माझी आवड मी
त्या म्हणतात "माझी आवड मी विसरलीये इतके वर्षात" निदान नावड माहितीये तर ती तरी टाळावी >> सकाळी सकाळी या वाक्यामुळे मस्तच वाटले.
माझी आवड मी विसरलीये इतके
माझी आवड मी विसरलीये इतके वर्षात, निदान नावड माहितीये तर ती तरी टाळावी - हे आवडलच !
रेसिपी पन छानच आहे. करून बघणार
त्या म्हणतात "माझी आवड मी
त्या म्हणतात "माझी आवड मी विसरलीये इतके वर्षात" निदान नावड माहितीये तर ती तरी टाळावी ...
रेसिपी मस्तच आहे... करून बघेनच कधी जमेल तेव्हा... पण ह्या वरच्या वाक्यासाठी मानलं...
खूप सहज आणि छान आहे विचार.
माझी आवड मी विसरलीये इतके
माझी आवड मी विसरलीये इतके वर्षात, निदान नावड माहितीये तर ती तरी टाळावी - हे मला पण आवडल !
मस्त रेसिपी, असेच दुधीचे मुठीये पण मस्त होतात.
ओरिजिनल दुधीचे थालिपीठ म्हणजे
ओरिजिनल दुधीचे थालिपीठ म्हणजे किसलेला कच्चा दुधी, जबरी मोठा चमचा लसूण पेस्ट, हळद, ओवा, तिखट, कोथिंबीर व थालिपीठ भाजणी (बसेल एवढे)
पण ही व्हरायटी पण छान आहे.
त्या म्हणतात "माझी आवड मी
त्या म्हणतात "माझी आवड मी विसरलीये इतके वर्षात" निदान नावड माहितीये तर ती तरी टाळावी ...
रेसिपी मस्तच आहे... करून बघेनच कधी जमेल तेव्हा... पण ह्या वरच्या वाक्यासाठी मानलं...
खूप सहज आणि छान आहे विचार.>+१
त्या म्हणतात "माझी आवड मी
त्या म्हणतात "माझी आवड मी विसरलीये
इतके वर्षात" निदान नावड माहितीये तर
ती तरी टाळावी ...
रेसिपी मस्तच आहे... करून बघेनच कधी जमेल
तेव्हा... पण
ह्या वरच्या वाक्यासाठी मानलं...
खूप सहज आणि छान आहे विचार.>+१
वा मस्त नविन प्रकार आहे.
वा मस्त नविन प्रकार आहे.
ते थालीपीठ राहिले बाजूला,
ते थालीपीठ राहिले बाजूला, त्याच्यावर प्रतीक्रिया यायच्या ऐवजी सासुबाईनाच दाद दिली जातेय.:खोखो::दिवा:
गायत्री मस्त रेसेपी आहे, निदान त्याच त्याच पाककृती ऐवजी नवीन कृती मिळालीय. धन्यवाद.:स्मित:
धन्यवाद वर्षा प्राची दाद सामी
धन्यवाद वर्षा प्राची दाद सामी रावी जाई जागू!
विनिता, असं पण करून बघेन!
धन्यवाद रश्मी, आणि बरं का,माझ्या सासूबाईंचं नाव पण रश्मी च आहे! आणि त्या म्हणाल्या..माझी आवड विसरलीये!! म्हणून मी विचार केला, आवड सोडा, निदान नावड माहितीये तर ती तरी टाळावी! एक नक्की,पाककृती एवढंच हिट गेलंय हे वाक्य!
छान आहे की
छान आहे की