प्रिय मित्रांनो , स्नेहालय परीवारातफे शुभेच्छा . आपण स्नेहालय परिवाराचे निकट सदस्य आहात. त्यामुळे एक महत्वाची विनंती आपणास करीत आहे. स्नेहालय सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. आपल्या संस्थेचे बहुतांश प्रकल्प लहान, वैयक्तिक देणगीदारांच्या समर्थनावर काम करत आहेत. परंतु आपली गंगाजळी रिकामी झाल्याने दरमहा खर्चाचे सुमारे १२ लाख रुपये आपल्याला कष्टपूर्वक गोळा करावे लागतात. सध्या एड्स बाधितांचे रुग्णालय, हिमातग्राम, स्नेहधार, रेदिओनगर ९०.४ F.M. , पुणे स्नेहधार प्रकल्प, बालभवन प्रकल्प, अनामप्रेम, स्नेहालय ई- विद्यालय, अशा प्रकल्पांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुनर्वसन संकुलातील २०० बालकांच्या पालन पोषणासाठी कोणतेही निश्चित दाते उपलब्ध नाहीत. स्नेहालायाचे काम मनापासून आणि प्रामाणिकपणे आपण सर्व करतो. त्याची समाज दाद देतो. पण आपल्या अडचणी मांडताना स्नेहालय परिवाराला नेहमीच संकोच वाटत आला. त्यामुळे कामासोबतच अडचणी खूप वाढल्या. त्यात शौचालय , कर्मचारी निवास , वस्तू विक्री केंद्र, पुणे येथील स्नेहाधार प्रकल्प समाविष्ट आहे. मागील ३ महिन्यात पगार देण्यातही बराच उशीर झाला. या वरून संकटाची कल्पना आपणास येईल. तुम्हाला एक विनंती करतो. आपण आपल्या मित्र आणि नातेवाइकांना विनंती करा. स्नेहालय मधील स्त्रिया आणि मुलांचे एक वेळ अन्न आपण आपला जन्मदिन, स्मृतिदिन, शुभेच्चा भोजन अश्या स्वरुपात देण्याचे त्यांना सुचवा. त्यासाठी रुपये 7500/ - त्यांनी स्नेहालय , अहमदनगर या नावे चेक द्वारे अथवा ई - हस्तांतरण करून द्यावेत. आपले काही मित्र कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कॉर्पोरेट्स, मोठ्या कंपन्या स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत देतात. त्यांना आयकर कायद्याच्या कलम 80 जी अंतर्गत आयकरात सवलत मिळते. त्यांना आपण स्नेहालय च्या मदतीसाठीचा प्रस्ताव द्यावा. गरज असल्यास आम्ही देखील तपशीलवर माहिती आणि प्रस्ताव सदर करू शकतो. अनेक व्यक्ती देखील दान देतात आणि आयकर सवलत मिळवितात. स्नेहालय अशा देणगीदारांना 80 जी प्रमाणपत्रासह पावती देते. आपण केवळ सुचविले तरी अनेकजण आनंदाने मदत करतात. तसेच हा देण्यातील आनंद मिळून दिल्याबदल आपले क्रुतज्ञ राहतात. आम्ही ईमेलद्वारे स्नेहालयची संपूर्ण माहिती देऊ शकतो. तसेच www.snehalaya.org / www.snehankur.org या वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध आहेच. आमच्या स्थानिक टीम सदस्य जा आणि अहमदनगर , पुणे , मुंबई , औरंगाबाद , नवी मुंबई , जळगाव , नाशिक , ठाणे , नागपूर , बीड , चंद्रपूर , परभणी , अमरावती , बेळगाव , सातारा , कोल्हापूर , गोवा , बंगळूर अशा ठिकाणी आपले कार्यकर्ते देणगीदारांना समक्ष भेटू शकतात. अंबादास चव्हाण 9011020171 किंवा रोहित परदेशी 9850128678 यांना अधिक माहितीसाठी आपण संपर्क करावा. ते आवश्यक प्रस्ताव सादर करतील आणि पावती दात्यापर्यंत पोहोचती करण्याची जवाबदारी त्याची आहे.
सोबत ई बँकिंगसाठीची माहिती देत आहे.
Bank Name HDFC Bank Branch name - Market Yard Branch (Ahmednagar) Savings Account Number 01811000053339 Name of Account (Cheques to be made payable to) Snehalaya (Donations in Indian currency only)
MICR - 414002001 RTGS/IFSC Code HDFC 0000181 मदतीच्या विनातीसह धन्यवाद ,
आपला नम्र,
डॉ गिरीश कुलकर्णी ,
girish@snehalaya.org
स्नेहालयास मदत
Submitted by विक्रम देशमुख on 5 February, 2014 - 06:17
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
डॉ. गिरीश कुलकर्णी, ११
डॉ. गिरीश कुलकर्णी,
११ फेब्रुवारी २०१४ रोजी मी यथाशक्ती रक्कम आपल्याला पाठवू इच्छित आहे.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
बेफिकीर.... तुमचे मनापासून
बेफिकीर.... तुमचे मनापासून अभिनंदन.....फार आनंद झाला मला तुमची वरील प्रतिक्रिया वाचून.
@ डॉक्टर गिरीश कुलकर्णी....
"स्नेहालय" आवाहन वाचले. मी सेवानिवृत्त व्यक्ती असल्याने आवाहनात उल्लेख केल्यानुसारची रक्कम तात्काळ देवू शकत नाही....तरीही या क्षणी फूल ना फुलाची पाकळी म्हणून रुपये एक हजार देऊ शकतो, तर इतकी रक्कम स्वीकारली जाईल का ? जात असल्यास मला कोल्हापूरातील संपर्क मोबाईल क्रमांक दिल्यास मी संबंधितांशी लागलीच संपर्क साधेन.
आणखीन् एक : मागे आमीर खान प्रस्तुत "सत्यमेव जयते" कार्यक्रमाच्या शेवटी तो अशाच सेवासंस्थांना आर्थिक मदतीचे आवाहन करीत असल्याचे दाखविले जात असे. एका कार्यक्रमाच्या वेळी त्याने "स्नेहालय" चा उल्लेख केला होता.....ते "स्नेहालय" आणि आपल्या आवाहनातील "स्नेहालय" या दोन्ही संस्था एकच आहेत का ?
विक्रम तुम्ही इथे मदती साठी
विक्रम तुम्ही इथे मदती साठी पोस्ट टाकली , त्या बद्दल धन्यवाद. स्नेहालय बद्दल लोकसत्ता मध्ये वाचले होते पण त्या वेळेस पत्ता / माहिती लिहून ठेवायचे राहिले होते.
मी पुढच्या आठवड्यात थोडे पैसे पाठवेन. इथे परदेशी , मराठी मित्र मंडळला मेल केले आहे या बद्दल. यामुळे काही आर्थिक मदत झाली तर चांगले आहे.
विक्रम तुम्ही इथे मदती साठी
विक्रम तुम्ही इथे मदती साठी पोस्ट टाकली , त्या बद्दल धन्यवाद.>>>>+१
मीही पुढच्या आठवड्यात थोडे पैसे पाठवेन
बेफिकीरजी, अशोकजी, गुलमोहोरजी
बेफिकीरजी, अशोकजी, गुलमोहोरजी व स्नेहनिलजी,
आपल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
>>>>>> आमीर खान प्रस्तुत "सत्यमेव जयते" कार्यक्रमाच्या शेवटी तो अशाच सेवासंस्थांना आर्थिक मदतीचे आवाहन करीत असल्याचे दाखविले जात असे. एका कार्यक्रमाच्या वेळी त्याने "स्नेहालय" चा उल्लेख केला होता.....ते "स्नेहालय" आणि आपल्या आवाहनातील "स्नेहालय" या दोन्ही संस्था एकच आहेत का ? <<
- होय या दोन्ही संस्था एकच आहेत.
अशोकजी,
रक्कम किती हे महत्वाचे नसून आपली भावना जास्त महत्वाची.
कोल्हापुर मधिल स्नेहालयच्या प्रतिनिधिचा मोबाईल क्रमांक मिळताच
आपल्याला तसेच त्या प्रतिनिधिला कळवेन. आपणही आपला मोबाईल क्रमांक मला कळवल्यास उत्तम. माझा मोबाईल क्रमांक # ९८५०९३३६५४.
आपण सर्वान्नी स्नेहालयास आवश्य भेट द्यावी आमचा हुरुप
वाढवावा ही विनन्ति.
मित्रमंडळींना कळवत आहे.
मित्रमंडळींना कळवत आहे. माहितीबद्दल धन्यवाद विक्रम.
विक्रम..... "...रक्कम किती हे
विक्रम.....
"...रक्कम किती हे महत्वाचे नसून आपली भावना जास्त महत्वाची...." ~ हे मला आवडले, कारण तुम्ही माझी परिस्थिती समजून घेतली हे महत्वाचे.
माझा मोबाईल : ९८६०९४४०८८
देशाबाह्रेर राहणार्या ज्या
देशाबाह्रेर राहणार्या ज्या मायबोलीकरांना आर्थिक मदत करायची आहे त्यांच्यासाठी:
- Arpan Foundation is a registered charitable organization under section 501(C)3. Federal Tax ID# 20-5593243. Arpan collects funds for Snehalaya as a suported project. Every dollar donated to Arpan towards Snehalaya, Ahmednagar project is transferred to us. We thank Arpan for helping us in our mission
स्नेहालयच्या संकेतस्थळावर पे-पाल (कोणतेही क्रेडीट कार्ड) वापरुन डोनेशन करता येउ शकते.
अमेरीकेतील कायद्यानुसार हे डोनेशन करमुक्त आहे.
http://www.snehalaya.org/get-involved.html
अशोकजी, आपली मदत पोहोचली.
अशोकजी,
आपली मदत पोहोचली. लवकरच पावती पाठवत आहे.
धन्यवाद!
धन्यवाद विक्रम..... तुमच्या
धन्यवाद विक्रम.....
तुमच्या प्रतिनिधीशी [पुण्यातील तसेच कोल्हापूरातील] प्रत्यक्ष बोलून फार आनंद झाला. कोल्हापूर प्रतिनिधी यानी "स्नेहालय" च्या कार्याविषयी खूप माहिती दिली.
पावतीची काही गडबड नाही....अगदी तुम्हाला सवड होईल त्यावेळी पाठविली तरी चालेल.
हा धागा डोळ्यांसमोरून
हा धागा डोळ्यांसमोरून गेल्याने ११ तारखेला लक्षात राहिले नाही, क्षमस्व! आज किंवा सोमवारी पाठवत आहे.
माहितीबद्दल धन्यवाद.
माहितीबद्दल धन्यवाद.
सचिन मदने येऊन गेले. धन्यवाद!
सचिन मदने येऊन गेले. धन्यवाद!
-'बेफिकीर'!
बेफिकीरजी, आपण केलेल्या
बेफिकीरजी,
आपण केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद!
यथाशक्ति रक्कम स्नेहालयाच्या
यथाशक्ति रक्कम स्नेहालयाच्या बँक खात्यात NEFT द्वारा वळती केलेली आहे. रिमार्क्स मध्ये माझा इमेल आयडी टाकला आहे.
स्नेहालयाबद्दल लोकप्रभात आलेला हा लेख
लोकसत्ताच्या "सर्वकार्येषु सर्वदा" या उपक्रमात स्नेहालयाचा समावेश करून घेणे शक्य होईल का?
अशोकराव व मयेकर, सादर स्नेह!
अशोकराव व मयेकर,
सादर स्नेह!
धन्यवाद मयेकरजी!
धन्यवाद मयेकरजी!
Net banking द्वारा पैसे
Net banking द्वारा पैसे पाठवले आहेत.
धन्यवाद अनघाताई!
धन्यवाद अनघाताई!
Transferred through paypal..
Transferred through paypal.. will schedule recurring transaction in every interval.. Thanks.
मी पण पेपाल वरुन देणगी दिली
मी पण पेपाल वरुन देणगी दिली आहे.
ash11: तुमची कंपनी matching contribution करत असेल तर अर्पण फाउंडेशन कडुन पावती मागुन घ्यावी लागेल. मला २० दिवस झाले तरी पावती मिळाली नाही. दोनदा विचारणा केल्यावर ह्या आठवड्यात पाठवण्यात येईल असे सांगितले गेले.
विक्रम, नेट बँकीन्गच्या
विक्रम, नेट बँकीन्गच्या माध्यमातुन काही रक्कम स्नेहालयाच्या खात्यात पाठवली आहे.
गिरिश कुलकर्णींना एक मेल पाठवित आहे त्या मदतीच्या माहिती आणि पावती संदर्भात.
तुम्हाला सीसी करायची असेल तर मेल आयडी कळवू शकाल का ?
महेशजी, प्रसादजी ( महागुरु ),
महेशजी, प्रसादजी ( महागुरु ), अश्विनीताई (Ash11),
धन्यवाद.
महेशजी मला मेल पाठवण्याची आवश्यकता नाही.
विक्रम, गिरिशजींचे उत्तर
विक्रम, गिरिशजींचे उत्तर (पावतीसह) आले आहे.
धन्यवाद, येथे हे आवाहन प्रसिद्ध केलेत त्याबद्दल.
महागुरु - probably my company
महागुरु - probably my company won't match as this is American company in US. Anyone knows if we will get any benefit if we give charity to Snehalaya as this is operated from out of US. Anyway if we get benefit then well and good but satisfaction is well enough...
Ash11: तुम्ही देणगी कशी
Ash11: तुम्ही देणगी कशी दिलीत? पेपाल वरुन USD मधे की भारतात रुपयांमधे?
पेपाल वरुन दिली असेल तर सगळ्या देणग्यांचे नियोजन अर्पण फायंडेशन मार्फत होते. तुम्हाला पावती पण अर्पण फाउंदेशन कडुन येईल. ती देणगी पावती वापरुन तुम्हाला टॅक्स मधे सुट तर मिळेलच पण कंपन्या सुद्धा मॅचिंग डोनेशन देतील.
महागुरु मी पेपाल वरुन USD
महागुरु मी पेपाल वरुन USD मध्ये देणगी दिली. तर पावती कशी मिळेल ? आणि मी Turbotax मधुन tax file करते..तिथुन मी हे claim करु शकते का?
विक्रमजी, स्नेहालयास आत्ता
विक्रमजी, स्नेहालयास आत्ता मदतिची गरज अस्ल्यास क्रुपया इथे सान्गाल का?
धन्यवाद.