भारतीय प्रजासत्ताक ६५व्या वर्षात पदार्पण करतआहे.२६जानेवारी१९५०रोजी भारतीय घटना हि अमलात आणली गेली.नि भारत हा एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. ह्यापूर्वी आपला हा देश एकसंघ नव्हता. ह्या देशाच्या तुकड्या तुकड्यावर अनेक राजे राज्य करत होते त्यांची जि संस्थाने होती ती सार्वभौम होती. हि संस्थाने म्हणजे वेगळे देशच होते. त्यांच्या सतत आपापसात लढाया होत दुसर्याचे राज्य बळकावून आपले राज्य मोठे कसे करता येईल ह्या दृष्टीने ते प्रयत्न करत. इंग्रजांनी ह्या साऱ्या राजांना हरवून आपला एकछत्री अंमल सुरु केला तेव्हा त्याला एका अखंड देशाचे स्वरूप आले.
१९४७साली जेव्हा स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात आले. देश लोकशाहीच्या दिशेने चालू लागला तेव्हा देशातील जवळपास ५६१संस्थानातील राजघराणी हि अस्वस्थ झाली . स्वतंत्र भारताशी त्यांना काही घेणे देणे नव्हते. इंग्रज निघून गेल्यावर आपले संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र होणार ह्याच स्वप्नात ते होते. परंतु संस्थानातील बहुसंख्य जनतेला आता राजेशाही नको होती तर हवी होती लोकशाही. पुढे हि संस्थाने भारतीय संघराज्यात
सामील झाली.
देशाची घटना अमलात आणून आज ६५ वर्षे झाली आपल्या देशाने बरीचशी प्रगती केली काही आघाड्यांवर तो मागेही राहिला. परंतु देशाची लोकशाही मात्र एकसंघ राहिली. अनेक स्वातंत्रसैनिकांचे बलिदान ह्यातून आपला देश उभा राहिला आहे.. आपण विकासाच्या दृष्टीने बराच पल्ला गाठला आहे.लोकशाही बळकट असणे हे देशाच्या दृष्टीने महत्वाचेअसते.
भारतासारखे निरनिराळे धर्म, भाषा, जवळपास ६००० जाती असलेल्या देशात लोकशाही टिकून राहणे हि खरोखरच एक अदभूत गोष्ट आहे.ह्याचे श्रेय आपल्या घटनेला नि राज्यकर्त्यांना जाते हे निर्विवाद सत्य आहे. लोकशाही विरोधी प्रवृत्ती ह्या कितीही ताकतवर भासत असल्या तरी त्यावर मात करून आपली लोकशाही हि जगातली सर्वोत्कृष्ट लोकशाही म्हणून चिरायू होवो हीच सदिच्छा.
तमाम भारतीयांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा नि हे प्रजासत्ताक निर्माण करण्यास झटणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींना विनम्र अभिवादन .
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..
माम भारतीयांना
माम भारतीयांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा नि हे प्रजासत्ताक निर्माण करण्यास झटणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींना विनम्र अभिवादन .
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..>>.. भरपूर अनुमोदन.
६४ व्या गणराज्यदिनानिमित्त
६४ व्या गणराज्यदिनानिमित्त सर्व भारतीयांचे अभिनंदन. भारतीय जनतेने बरीच प्रगति केली आहे. इतर कोणत्याहि देशाने इतक्या थोड्या काळात इतकी प्रगति केली नाही. भारतीय जनतेचे अभिनंदन.
भारतासारखे निरनिराळे धर्म, भाषा, जवळपास ६००० जाती असलेल्या देशात लोकशाही टिकून राहणे हि खरोखरच एक अदभूत गोष्ट आहे.
१०० टक्के अनुमोदन. ही लोकशाही टिकवणे ही भारतीय जनतेसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
प्रजासत्ताकदिनाच्या
प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा!
प्रजासत्ताकदिन चिरायु होवो की भारतीय प्रजासत्ताक चिरायु होवो?
भारतीय प्रजासत्ताक चिरायु
भारतीय प्रजासत्ताक चिरायु होवो.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो.
तमाम भारतीयांना
तमाम भारतीयांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा नि हे प्रजासत्ताक निर्माण करण्यास झटणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींना विनम्र अभिवादन .>>> सहमत!
भारतीय प्रजासत्ताक चिरायु
भारतीय प्रजासत्ताक चिरायु होवो!
लोकहो, भारतीय प्रजासत्ताक
लोकहो,
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो. लेखाशी बर्यापैकी सहमत आहे. असहमती सांगतो :
>> इंग्रजांनी ह्या साऱ्या राजांना हरवून आपला एकछत्री अंमल सुरु केला तेव्हा त्याला एका अखंड देशाचे
>> स्वरूप आले.
भारतातले मोठे संस्थांनी प्रदेश स्वतंत्र राज्ये होती. इंग्रजी अंमल असलेल्या प्रदेशास ब्रिटीश इंडिया अर्थात खालसा म्हणत.
भारताचे १/३ क्षेत्रफळ आणि १/४ जनता संस्थांनी प्रदेशांत मोडत असे. त्यामुळे इंग्रजी अंमल हा एकछत्री नाही.
आ.न.,
गा.पै.
भारतीय प्रजासत्ताक चिरायु
भारतीय प्रजासत्ताक चिरायु होवो.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो.
>>+१ जय हिंद!
>>भारतासारखे निरनिराळे धर्म,
>>भारतासारखे निरनिराळे धर्म, भाषा, जवळपास ६००० जाती असलेल्या देशात लोकशाही टिकून राहणे हि खरोखरच एक अदभूत गोष्ट आहे.ह्याचे श्रेय आपल्या घटनेला नि राज्यकर्त्यांना जाते हे निर्विवाद सत्य आहे.<<
अगदी सहमत आहे.एवढ्या विविधतेतून एकतेच प्रदर्शन ही गोष्ट सोपी नाही.
भारतीय प्रजासत्ताक चिरायु
भारतीय प्रजासत्ताक चिरायु होवो
६५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या
६५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!