४ ब्रेडचे स्लाईस त्रिकोणी कापून
500 ML दूध
१/२ कप कंडेन्स मिल्क (sweetened)
१ कप साखर (पाकसाठी)
२ टेस्पून साखर रबडी साठी
१ टेस्पून पिस्त्याचे, बदामाचे काप
१ टिस्पून वेलचीपूड
चिमूटभर केशर
तळण्यासाठी तूप
पाकासाठी १ कप साखर आणि १ कप पाणी घालून एका भांड्यात मंद आचेवर शिजवत ठेवावे आणि पाक बनवून घ्यावा
१) दूध मध्यम आचेवर उकळत ठेवावे. आटवून अर्धे करावे. कंडेन्स मिल्क घालून ५ मिनीटे उकळवावे. २ टेस्पून साखर घालावी. गरजेनुसार साखर कमी किंवा जास्त करावी. यात वेलचीपूड आणि केशर घालावे आणि रबडी बनवून घ्यावी
२) ब्रेड स्लाईसच्या कडा काढून टाकाव्यात. ब्रेडचे त्रिकोणी किंवा आवडत्या आकारात तुकडे करावे. तुपात तळून किंवा मंद आचेवर शालो फ्राय करून घ्यावेत. ब्रेडचे स्लाईस कुरकूरीत आणि बाहेरून थोडे ब्राउन करून घ्यावेत आणि साखरेच्या पाकातून काढून घ्यावेत
३) सर्व्हींग प्लेटमध्ये ब्रेडचे स्लाईस ठेवावेत त्यावर रबडी घालावी वरून पिस्त्याचे, बदामाचे काप घालून सजवावे. आणि फ्रिजमध्ये थंड करत ठेवावेत. हे शाही टुकडे २-३ दिवस फ्रीज मध्ये राहतात
नेहमीच्या स्वीट डिश पेक्षा थोडीशी वेगळी रेसिपी सगळ्यांना नक्कीच आवडेल
१. पाक पातळ राहिल्यास ब्रेड चा कुरकुरीतपणा राहणार नाही म्हणून पाक थोडा घट्ट ठेवावा
२. रबडी एकदम पातळ किवा घट्ट बनवू नये
पाक पण , कंडेन्स मिल्क पण आणि
पाक पण , कंडेन्स मिल्क पण आणि वरून त्यात साखर पण ...बापरे
नक्कीच चविष्ट असणार पण … इतका
नक्कीच चविष्ट असणार पण … इतका गोडवा पाहून करावा कि नको प्रश्न पडला.
पाक पण , कंडेन्स मिल्क पण आणि
पाक पण , कंडेन्स मिल्क पण आणि वरून त्यात साखर पण ...बापरे >>शाही टुकडा आहे ना ...;)
:
कंडेन्स मिल्क optional आहे
कंडेन्स मिल्क optional आहे
शाही टुकडा हे प्रकरण ज्यांना
शाही टुकडा हे प्रकरण ज्यांना अतिगोडमिट्ट खाणं शक्य आहे त्यांच्याचसाठी असतं. मला एक ते दोन चमच्यावर खाववत नाही, पण जर व्यवस्थित बनवलेला असेल तर हा प्रकार खूप नजाकतदार आणि चविष्ट बनतो. करायला अगदी सोपं काम असल्याने आमच्याकडे दोन तीन महिन्यातू एकदा बन्वला जातोच (आणि मग कॅलरीज सगळंच गणित कोलमडतं)
मला बनवुन द्यावे.........मला
मला बनवुन द्यावे.........मला गोड आवडते..........मी गोड खातो.....आणि मला मधुमेह देखील नाही आहे आणि नाही होणार आहे
मस्त. मस्त...
मस्त. मस्त...
शाही टुकडा हे प्रकरण ज्यांना
शाही टुकडा हे प्रकरण ज्यांना अतिगोडमिट्ट खाणं शक्य आहे त्यांच्याचसाठी असतं. मला एक ते दोन चमच्यावर खाववत नाही, पण जर व्यवस्थित बनवलेला असेल तर हा प्रकार खूप नजाकतदार आणि चविष्ट बनतो. करायला अगदी सोपं काम असल्याने आमच्याकडे दोन तीन महिन्यातू एकदा बन्वला जातोच (आणि मग कॅलरीज सगळंच गणित कोलमडतं)>>>>>>>> अगदि
मला बनवुन द्यावे.........मला
मला बनवुन द्यावे.........मला गोड आवडते..........मी गोड खातो.....आणि मला मधुमेह देखील नाही आहे आणि नाही होणार आहे >>>>>>>>>>>>>> परत बनवले कि नक्की courier करते
आमच्या कडेही बनतो बर्याचदा..
आमच्या कडेही बनतो बर्याचदा.. साबांचा फेवरेट.
डबल का मीठा असे हैद्राबादकु
डबल का मीठा असे हैद्राबादकु मिल्ता है वो येच क्या?
नाही! तो ब्रेड चा शिरा,हलवा
नाही! तो ब्रेड चा शिरा,हलवा असतो...तोही खतरनाक गोड असतो..
मस्त. मस्त...
मस्त. मस्त...