||जय श्री राम||
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा|
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मयेन श्री गुरुवेनम: ||
श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सचितानंद सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य महाराज की जय
दि. २७ डिसेंबर२०१३ रोज शुक्रवार ह्या दिवशी प.पु. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांची १०० वी पुण्य तिथी आहे त्या निमित्ताने त्यांच्या पावन चरणांवर कोटी कोटी प्रणाम .महाराजांनी आपले आयुष्य फक्त नामाचा महिमा सांगून अनेक उत्तमोत्तम शिष्य तर तयार केलेच पण असंख्य नास्तिकांना हि राम भक्ती कडे वळवले .त्यांच्या १०० व्या पुण्य तिथीच्या अतिपवित्र अशा निमित्ताने त्यांनी सांगितलेला नामाचा महिमा त्यांच्याच शब्दात आपण पुन्हा अवलोकन करून नामस्मरणाने या जीवनाचा परमानंद लुटण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू या.
जय श्री राम
*आज सुख देण्यासाठी इतकी तंत्रज्ञाने विकसित होऊन देखील माणसाच्या दुखाला सीमा नाही. जगातील संपूर्ण ज्ञान-विज्ञानाचे ध्येय माणसाला सुख देणे हे आहे. मग ते मिळते का?.सध्याचे वातावरण फार दुषित झाले आहे. काळ फार कठीण आला आहे. माणसाच्या जिविताची काही शाश्वती नाही. अशा वेळी आपल्या जन्माचे सार्थक सद्वर्तन आणि नामानेच होईल! इतर साधनानी जे साधते ते तात्पुरते असते. वाचनाने बुद्धी तल्लख होते. पण नुसते बुद्धीने कळून उपयोग नाही. वृत्ती सुधारली पाहिजे. विद्या ही काहीवेळा माणसाला भगवंता पासून दूर नेते. वारकरी अडाणी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणत त्याला ओळखतात. पण विद्वानाना तो कळत नाही! हरी नाम आणि विशुद्ध प्रेमाच्या रंगात जो रंगून जाईल, त्याच्या आयुष्याचा कधीही बेरंग ना होता सर्वाना तो त्या रंगात रंगवेल.
अशावेळी आपले विचार अन आचरण शुद्ध ठेवण्यास भगवंताचे अणुसंधान हाच उपाय आहे! जीवनात दुख: सोसण्याची कला लवकर साधेल. पण सुख, त्याची उत्तेजना पचवणे कठीण. तेव्हा नामा ने आपली वृत्ती स्थिर बनवा!
शेताची मशागत केल्यावर केव्हा तरी पाऊस पडून सर्व सार्थक होते. तसे सतत नाम घेतल्यास केव्हातरी भगवत प्रेम येईलच! नामाने थोडा वेळ लागेल, पण कायमचे साधेल. कारण नामने मुळापासून सुधारणा होते.
प्रत्येक अवतारात भगवंत अन त्याचे नाम प्रसिद्धीस आले. कलियुगात सदेह अवतार नसला तरी नामवतार आहे.तोच खरा तारक आहे.सध्या त्याचा 'नामवतार' आहे. जो नाम घेईल, त्याला तो हमखास दर्शन आणि मुक्ती देईल! भगवंत प्रत्येकात आहे. परंतु प्रत्येक जण भगवंतात नाही. म्हणून तर एवढा त्रास आहे. परमात्मा सर्वत्र आहे हा भाव आपल्याला केव्हा तरी येतो पण ती वृत्ती कायम राहून तसे आचरण होत नाही, नामा ने आपण हा त्रास दूर करू शकतो! आपल्या प्रत्येकात परमात्मा आहेच. परंतु तो प्रगट होण्यासाठी अंत:करण शुद्ध असायला हवे. आणि हे शुद्धिकरण नामा ने होते! माणसे उपवास, यात्रा, कर्मकांड या अवघड गोष्टी करतात. पण घर बसल्या (पैसे खर्च ना करता) नाम घेणे होत नाही, हे अजब आहे! सर्व साधना मध्ये नामस्मरण हा सर्वात सोपा, सहज मार्ग आहे. पण गंमत अशी आहे की तो सोपा आहे म्हणून कुणीच करीत नाही! नामाबद्दल सुरुवातीला सर्वांचीच वृत्ती साशंक असते. पण नाम सतत घेत राहिल्यास विकल्प कमी होऊन अनुभव येऊ लागतात.
नाम हा नुसता शब्द समुह नसून संतानी सिद्ध केलेली भगवंताची स्पंदंशील प्रतिमा आहे. त्यात सद्गुरू अन ईश्वर स्पर्श असतो नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरते. त्या मुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ,आणि घट देश-काल निमित्ताच्या मर्यादा, इत्यादि कोणतेही विकार नाहीत . म्हणून नाम हे पूर्वी होते, आज आहे, आणि पुढेही तसेच
राहील. नाम हे सतस्वरूप आहे नामातून अनेक रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यामध्येच ती लीन होतात.शुद्ध .परमात्म स्वरूपाच्या अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच होय .म्हणून नाम घेतल्यावर भगवंत आपल्या जवळ असल्यासारखाच आहे .आपण ज्याचे नाम घेतो तो खरा आहे, त्याच्या सत्तेने सर्व मंगल घडते ही जाणीव जागी राहावी यालाच नामस्मरण असे म्हणतात.
आपल्यात दोषाचे बीज असल्या शिवाय दुसरयात दोष दिसत नाही. बिजा चे झाड होण्यास परनिंदा हे खत पाणी आहे. नामने ते बीज जाळावे! नामत प्रेम का येत नाही? तर आपण नाम घेत नाही म्हणून. तेव्हा आपण नामला सुरूवात करूया. प्रेमाचा झरा लवकरच वाहू लागेल!.नामातच नामाचे प्रेम आहे. ताकातील लोणी ताक घुसळल्यावर वर येते. तसे नाम घेत राहिल्यास त्याचे प्रेम आपोआप वर येते! देहभान असेपर्यंत नामस्मरणाला परिस्थितीचे बंधन जाणवते. म्हणून नाम कधी छान जमते तर कधी नाही! हेतूची शुद्धता नसेल तर बाहेरून पवित्र भासणारे कार्य हे पुण्यकर्म ठरत नाही. ही बुद्धीची शुद्धता नामस्मरणाने येते!
आहे त्या अवस्थेत आपले समाधान टिकत नाही अन पाहिजे ते मिळाले तरी आपण पूर्ण सुखी होत नाही.मन शांत असल्याशिवाय साधन होत नाही. आणि साधना वीना मन शांत होत नाही. अशा वेळी नामात राहावे. मग दोन्ही साधले जाते! समाधान ही भगवंताची देणगी त्याच्या स्मरणाने मिळते! सत्संगती आणी नामाचा महिमा अलौकिक आहे. वाल्या कोळीला नारदा ची संगती थोडा वेळ मिळाली आणि नामा त राहून तो वाल्मिकी बनला! विश्वामित्र, जमदग्नी हे तपस्वी साधक पण वासनेत किंवा क्रोधात अडकले. मग आपण किती सावध राहायला हवे? यासाठी नाम घ्यावे! आपल्याकडून कायीक, वाचिक, मानसिक चुक ना घडण्यासाठी विवेक जागृत करावा. आणि हा विवेक जागृत करण्यासाठी नामात राहावे.नामत राहणाऱ्या ने आपल्या सद्गुरू जवळ काळजीचे गाठोडे ठेवून कर्म करावे. त्यामुळे सुख दुख: न बाधता आपले समाधान टिकेल नाम घेताना एवढे तादात्म् असावे कि मी नाम घेत आहे हेसुद्धा विसरून जावे.
"नाम घ्या" असे संत सतत सांगतात. तेव्हा आपण एकदा मनापासून नाम घेऊन तर पहा. त्याने नुकसान नाही, पण समाधान मात्र मिळेल! मी ला समजू शकणारे नामा शिवाय शब्दाशिवाय असे तुमच्यात कोणते ज्ञान आहे ? सर्वांत आतला केंद्र जेथे आहे त्यात स्व:तला हरवून टाका आणी मी च्या ज्ञानाचे साक्षीदार व्हा.
नामस्मरण म्हणजे नाम घेताना भगवंत मला पाहतो, तो माझ्या जवळ आहे, याचे स्मरण मनाला देणे. ही खरी नाम साधना होय.त्यामुळे जप किती केला त्या पेक्षा जपात किती लक्ष होते आणि किती वेळ अलक्ष होतो हे महत्वाचे.द्रौपदि ने जगाची अशा सोडून कळकळीने भगवंताला हाक दिली तेव्हा तो धावून आला. नाम घेताना अशी निरासक्ती आणी तळमळ हवी! द्रोपदी च्या हाके सारखी तळमळ नाम घेताना असावी. नाम घेत असताना भगवंताचे स्मरण होत नसेल तर , नाम घेणे हि केवळ एक औपचारिक क्रिया झाली ,ते खरे नामस्मरण नाही. मारुतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाची आठवण झाली , त्या प्रमाणे नाम घेताना आपल्याला त्यांची आठवण झाली पाहिजे! नाम हे नित्य, शाश्वत अन थेट रामा पर्यंत नेणारे, किंबहुना रामालच आपल्याकडे खेचून आणणारे सर्वात प्रभावी साधन आहे! व मुख्य म्हणजे नाम देवाला आवडते म्हणून घ्यावे आपल्या मागण्यासाठी नव्हे .
. *नाम कसे घेऊ विचारणे, पेढा कसा खाऊ असे विचारण्यासारखे आहे. पेढा कसाही खा, गोड लागेल तसे नाम कसेही घ्या, काम होईल! नाम स्मरण हे आपल्या आवडीनुसार करावे मन एकाग्र होण्यासाठी वेग वाढवावा जसे एखादा खिळा ठोकताना कधी कधी जोराचा ठोका कामी येतो तसेच नाम मनात खोल मुरण्यासाठी काही दिवस वेगात घ्यावे त्याने आवड निर्माण होईलच आणी ते हळूवार ,गोडीने घेण्याकडे मनाचा कल होऊ लागेल.
*नामस्मरणच निर्धार अन त्यावरील निष्ठा दृढ होण्यासाठी साधकाने दासबोधतील नामस्मरण भक्ति समास जरूर वाचावा! आणि असे नाम ,
.आपल्या खालील मागण्या नकळत पूर्ण करण्यास निश्चितच कारणीभूत ठरेलच
. (१) मनाची चंचलता जाऊन बुद्धी स्थिर होते . सावधानता,शहाणपण,प्रसंगाचे वेळीच नसतो मात्र जो नामात राहतो त्याची चित्त बुद्धी स्थिर होते.मना ची अस्वस्थता परमार्थनेच दूर होइल असे वाटल्यास तळमळ निर्माण होऊन साधना सुरू होते. अन नाम स्मरण हा त्याचा पाया आहे.आपले मन उनाड आहे त्याला एके ठिकाणी स्वस्थ बसवलेच पाहिजे त्याला थोडी बळजबरी करून हि सवय लावावी लागतेच.
(२) नित्य आनंद
दिवसाचा आनंद सकाळपासून, वर्षाचा आनंद पाडव्या पासून होतो. तसे परमर्थाला नामस्मरणाने सुरूवात केल्यास नित्य आनंद मिळेल. देहाचे सुख दुख: हे माझेच सुख दुख: आहे, ही भावना माणसाला आनंदा पासून दूर नेते. पण नामाने देहबुद्धी जाऊन पुर्णानंद मिळतो. मी करता- नसल्यास घटना प्रारब्धानुसार घडतील पण त्याचे सुख दु:ख वाटणार नाही.यासाठी नाम घ्यावे . नामा मध्ये मन रमणे हि मोठी भाग्याची गोष्ट आहे . नामाची एकदा का चटक लागली कि आनंदाचा निखळ झराच वाहू लागतो !! मला हवे ते मिळाले म्हणजे राम-कृपा आहे, नसता कृपा नाही, असे वाटणे योग्य नाही. नामा त राहिल्याने अखंड कृपेची जाणीव होते! समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे. ती मिळवण्याचा उपाय म्हणजे निष्ठा पूर्वक नामस्मरण होय. तुकोबा, समर्थ हे भीक्षेकरी. पण जगाने लोटांगण घालावे असे त्यांचे समाधान होते. आपणदेखील नामने ते साध्य करू शकतो! *आत्मशांती हा परमार्थाचा प्राण आहे. त्याचा विकास करण्याचा अभ्यास म्हणजे आनन्दसाधना . ही साधना सदाचरण, नामाने पूर्ण होते!
*आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद हवा असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. नामा त राहून सत्करम केल्याने अशी वृत्ती बनते!
(३) मन स्वाधीन होण्यासाठी . नाम हे मना च्या उलट आहे. याचा अर्थ असा की नाम घेणे म्हणजे मनाची विषयातील ओढ उलटी (भगवंता कडे)फिरवणे होय!
*येणारा भोग अगोदर बुद्धीवर परिणाम करतो. बुद्धी आवरण्याची युक्ती साधल्यास त्याचा जोर कमी होतो. त्यासाठी नाम हाच उपाय आहे!
*चंचल मन सतत विचार करते, तो पर्यंत माणसाला समाधान नाही. नाम स्मरणाने ही चांचलता जाऊन वृत्ती समाधानी बनते! आपल्या मनातील वृत्ती केवळ दाबून दबणार नाही. तिचा उद्रेक केव्हा तरी होईल. ती समुळ नष्ट करण्यासाठी नामची शक्ति वापरावी! सर्व सुख दुखचे केन्द्र मन आहे. आणि हे मन नामाशी केंद्रित केले की मनुष्य सुख दुखच्या पलीकडे, समाधाना कडे जातो! मनात वाईट विचार येणे एकवेळ आपल्या हातात नाही. पण त्यांच्या मागे न जाणे आपल्या हातात आहे. नामस्मरणाने हा विवेक जागृत होतो.मनात वाईट विचार आले तरी ते कृतीत न येऊ देणे शक्य आहे. नामात राहिल्यास मनावर नियंत्रण येऊन दूर्विचार अन दुष्करम टळेल!
*इद्रीय भोग अन वासनेत अडकल्यावर परमार्थ, भक्ति या जगात मन रमेल तरी कसे? अशा वेळी चिकाटीने नाम घेऊन शुद्ध व्हावे! आपला जन्म वासनेत झाल्यामुळे अनेकदा वृत्ती विषयाकडे ओढली जाऊन अनावर होते. ती सुधारणे यात कर्तबगारी आहे. ही कर्तबगारी नामा ने येते.माणसाचे माणूसपण वासनेवर ठरते. कारण जशी वासना तसे संकल्प अन तसे त्याचे आचार विचार . वासना ही काळजी ची आई आहे. भगवंताचे स्मरण करीत राहिल्यास त्या आई अन मुलीचा म्हणजे वासना अन काळजी चा मृत्यू बरोबर घडून येतो! वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कबुल असूनही वासनेचा जोर इतका विलक्षण आहे की ती शेवटपर्यंत जात नाही. पण ती नामा ने समुळ जाते.माणसाच्या मनातील वासना कधीच तृप्त होत नाही. कारण ती सूक्ष्म आहे. तिचा काटा काढायला सूक्ष्मच अस्त्र पाहिजे. ते म्हणजे नाम! दुष्ट वासनेला नामा ने जाळावे. वासना ही लाडावलेल्या कुत्र्या सारखी आहे. नुसते हाड म्हणून ती बाजूला जात नाही. तेव्हा, तिच्या मारण्या साठी देवाचे स्मरण पाहिजे! वासना मोठी शक्ति आहे. त्यातून वृत्ती आणि पुढे कृती होऊन सुख-दुख: मिळते. तेव्हा अखंड सुखासाठी ही वासना नामाशी जोडावी! वासनेतून येणार्या वृत्तीला सतत काही खायला हवे असते. तिला पाहिजे ते ना देता नाम खाऊ घातल्यास ती शांत होईल!
तोंड आल्यावर भूक असूनही खाता येत नाही किंवा अन्न गोड लागत नाही. तसे विषयासक्ती असल्यामुळे आपल्याला नामची गोडी लागत नाही! ज्याने आपले मन भगवांतकडे लावले त्याला सर्व परिस्थितीत समाधान लाभते. त्याकरता भगवंताच्या नामाचे अनुसंधान हे एकच साधन आहे
(४) प्रपंच्यातून परमार्थ साधण्यासाठी .
(अ ) प्रपंच गोड होण्यासाठी भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेऊन नामात असावे. *परमार्थ सुलभ साध्य आहे, कष्ट साध्य नाही. पण ही सहजता येण्यासाठी आपण मन आवरायला शिकले पाहिजे. अन हा अभ्यास नामाने होतो! *राजाचे वैभव मिळाले तर भोगावेच पण गरीबी आली तर डोळ्यात पाणी येऊ नये. ही निरासक्ती येण्या साठी नाम हा सिद्ध उपाय आहे!*घर, गाडी, पैसा सर्व असूनही आपल्याला काळजी का असते हे कळत नाही. त्याचे निदान होऊन उपाय करण्यासाठी नामाची गरज आहे! आपली बुद्धी सतत भविष्याची चिंता करत असल्याने समाधान मिळत नाही. तेव्हा बुद्धी स्थिर झाली पाहिजे. अन हे नामने साधते. माणसाला कसे वागावे, कसे वागू नये हे कळते. पण त्याचे मन आवरत नाही. याला उपाय म्हणजे सद्वीचार, सत्संगती आणि नामस्मरण! *अनेकदा कळत असूनही माणूस इँद्रियांच्या इतका अधीन होतो की विवेक विसरून जातो. पण नामा ने हा सुप्त विवेक नेहमी जागृत राहतो . *माझी काळजी घेणारा, मला संभाळणारा, तो भगवंत आहे, असे मानने अन तसे वागणे ही भगवंता बद्दल आस्तित्व बुद्धी नामने वाढते! नामत राहून नितीधर्माने आचरण करावे, प्रेमाने लोकना मदत करावी. यालाच परमार्थ म्हणतात. तो प्रत्येकाने मनापासून करावा.
(ब) नाम हे सर्व सत्कारमाचे लोणी आहे. ज्या घरात सद्भावनेने अखंड नामस्मरण चालते तेथे भगवंत रमतो अन ते घर गोकुळ बनते! आपल्या घरात इतके प्रेम असावे की येथून जाणार्याला मी पुन्हा केव्हा तिथे जातो, असे वाटवे. प्रेमात राम रमतो आणि नामत प्रेम रहाते ! नामा ने आपल्या प्रपंचीक अडचणी दूर होतीलच असे नाही. पण सर्व परिस्थितीत आपली वृत्ती विचलित न होता समाधानी मात्र राहील! *प्रपंच्या तील प्रतिकूल परिस्थितीचा झटका आपल्या हितासाठीच असतो. त्या परिस्थितीत नाम अन त्यावरील निष्ठा दोन्ही टिकले पाहिजे! *आपण प्रपंच्या साठी देव करतो, अन संत भगवंता साठी प्रपंच करतात. अखंड नामात राहिल्याने प्रपंच भगवत स्वरूप होतो! नामा ने आपल्या प्रपंचीक अडचणी दूर होतीलच असे नाही. पण सर्व परिस्थितीत आपली वृत्ती विचलित न होता समाधानी मात्र राहील! आपण भगवंताला प्रपंच्यात आणतो. त्या ऐवजी प्रपंच परमेश्वर रूप बनवणे, हा परमार्थ यासाठी नित्यकर्म नामाशी जोडावे! प्रपंचाला जितके जरूरी त्यापेक्षा अधिक मिळावे ही वासना म्हणजे लोभ. तोच इतर विकारांना आमंत्रण देतो. तेव्हा नामाने तो जाळावा! एखादी वाईट वृत्ती आली तर ती लगेच बुद्धीत विचार सुरू करते. अन माणूस दुष्कृत्यास प्रवृत्त होतो. ही वृत्ती नामने रोखावी! आपण नामत राहावे.म्हणजे ज्या तोंडाने पवित्र नाम घेतो त्याने अभद्र शब्द बोलणे योग्य नाही, असे वाटून विचार, वाणी सुधारेल!
(क) लोकजीवन उत्तम चलावे या धारणेने केलेले कर्म म्हणजे धर्म. नामस्मरणात या धर्म पालनाचे अन लोक कल्याण्या चे बीज आहे. माणसातील शक्ति, युक्ती भगवंता वाचून व्यर्थ आहे. कारण ती वेळेवर आठवली तर पाहिजे. आणि त्यासाठी नाम आहे! भगवत प्राप्ती साठी काही नवीन मिळवायचे असे नाही. फक्त आहे ते म्हणजे अहमपणा, वासना घालवायची असते. आणि ते काम नामा ने होते! एकीकडे मनावर संयम अन दुसरीकडे भक्तीचा जोर असेल तर परमार्थ लवकर साधतो. आणि यासाठी नामस्मरण हा सिद्ध मार्ग आहे! मंदिरातील देवत्व नाम अन अन्नदानाने दृढ होते. तसे नामात राहून आल्या गेल्याला जेऊ घालून प्रपंचातील परमार्थ दृढ करावा. भगवंताला उपासना प्रिय आहे. म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्या पेक्षा दगड मातीच्या मंदिरातच उत्तम उपासना, नाम वाढवावे! केवळ पूजा पाठाने , तीर्थस्नानाने परमार्थ होत नाही. वृत्ती रामाला चिकटली पाहिजे. तेव्हा, प्रत्येक कर्माशी नाम जोडणे हा परमार्थ!
(ड)नामसाधने साठी संसार धंदा त्याग, पैसा किंवा कुणाची मदत लागत नाही. आपली सद्बुद्धी लागते. आणि ती प्रत्येका जवळ आहे. व्यवसायात आपण पैसा का घालतो? अधिक पैसा मिळवण्यासाठी. तसे स्वत:ला नामत का घालावे? तर नामाचे प्रेम मिळवण्यासाठी.. व्यवहार करताना थोडे तरी नाम घ्यावे, फरक जाणवेल!.नोकरी सचोटिने करावी. नामत राहून, सर्वामधील राम ओळखून प्रेमाने वागावे. म्हणजे ऐहिक अन परमार्थीक दोन्ही सुख मिळेल. कामा शीवाय पगार घेणे जसे, तसे नामस्मरणा शिवाय प्रपंच करणे आहे.
(इ)रोग्याने कुपथ्य टाळून पथ्य पळावे आणि औषध घ्यावे. तसे प्रपंचिकाने अवगुण टाळून सदाचार पाळावा आणि नामाचे औषध घ्यावे! नामाचे औषध थेंब थेंब पोटात घेत राहावे. इतर साधनानी वेळ लागेल. पण नाम लगेच रक्तात मिसळते अन परिणाम दाखवते! आपला अहंकार परमर्तात अडचण आणतो. तो नष्ट होण्यासाठी लीनतेसारखे साधन नाही. म्हणून नामस्मरणाला लिनतेची जोड द्यावी.
(फ) आईची खूप सेवा करूनही मुलगा तिला आई म्हणून हाक मारीत नाही. पण आईला ती हाकच आवडते. तसे परमेश्वराला नाम आवडते! जो नाम घेतो त्याच्यावर संत विशेष प्रेम करतात. त्यायोगे प्रथम त्याची नैतिकता सुधारते. अन मग त्याला पूर्ण समाधान मिळते. साधकाने दुसरा काय करतो, हे ना पाहता आपण काय करायला पाहिजे, याचा विचार करावा आणि नामात राहून आपले कर्तव्य पार पडावे. विद्वान हे उंचावर चढलेल्या माणसांसारखे आहेत. त्याना पडण्याचा धोका असतो. तेव्हा ज्ञानासोबत विवेक हवा. हे काम नामाने होते. नामाचा जोर इतका जबरदस्त आहे की जो त्याला चिकटला त्याला परमार्थिंक अनुभव येतोच. त्यासाठी आपण निष्ठापूर्वक नाम घ्यावे!
*:कर्तव्यच्या मर्यादा सांभाळून विषयातील वृत्ती भगवांतकडे लावणे, हेच खरे सिमोल्लघन. त्यासाठी नामा ची कास धरावी!
नाम नुसते घेतल्याने काम होईल; पण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल
. *रोज निजताना , आज मी भगवंतासाठी काय केले आणि दुसर्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढां वाचल्यास चित्तशुद्धी होईल.प्रपंचातून निवृत्ती घेण्या पेक्षा प्रवृत्ती आवरणे अन वैराग्य धारण करण्यापेक्षा विषय वृत्ती जाळणे , हे नामाने साधते! *मृत्यू पुर्वी एक क्षण जिवाला जागृती येते. तो क्षण सद्गुरू कृपा, राम स्मरण होण्याचा असतो. त्यासाठी आत्तापासून नामात राहावे ..*मी मेल्यावर घर -दार ,पैसा ,मान -सन्मान इथेच राहणार असे स्मरण राहिले , तर नामस्मरण उत्तम चालते हे एक रहस्य आहे ..
नाम परब्रम्हांच्या सीमेवर आहे पुढे परब्रम्ह च आहे....समुद्र.
(५) दोष निर्मुलन व दु:ख परिहार .अनेकदा आपल्याला आपले दोष कळतात. ते साधनेच्या आड येत आहेत हेही कळते. पण इलाज नसतो. अशावेळी ते दोष बीज काढून तेथे नामबीज पेरावे! पुष्कळ वेळा साधन करताना त्याचा अभिमान चढू लागतो. त्यामुळे सर्व साधन व्यर्थ जाते. म्हणून नामस्मरण हे अभिमान टाकून करावे! रोगी माणसाने औषध तर घ्यावेच पण पथ्य पाळून कुपथ्य टाळावे . तसे भवरोग्याने नाम तर घ्यावेच पण सदाचार पाळून दूराचार टळावा! आहे त्या परिस्थिती मधे चैन पडू ना देणे हेच मायेचे लक्षण आहे. नाम स्मरणाने हे लक्षण नाहीसे होते. लोक समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण नाही. भगवंताचे अधिष्ठां आणि नामा ने वासनेला खात्रिने जिंकता येईल. आपल्यातील विषयाचे विष उतरले नसल्यामुळे नामाचे अमृत आपल्याला गोड लागत नाही. त्यासाठी नाम घेत राहणे हाच उपाय आहे.भगवंता ने चुकीबद्दल शिक्षा केल्यास आपण शिल्लक उरणार नाही. तो दयाळू आहे. तेव्हा आपण दुष्कर्म टाळून अखंड नामत राहावे! भगवंत बुद्धी बदलत नाही. रामाने रावणाची, कैकइ ची बुद्धी पालटली का? ती आपणच बदलली पाहिजे. नामा ने हे साध्य होते! नाम हे आयुर्वेदा सारखे आहे. वेळ लागेल, पण रोग समुळ जाईल. इतर साधने केवळ दु;खा ची जाणीव कमी करणारे इंजेक्षन आहेत! सुख हे क्षणिक आणी दुख; दीर्घ कालीन आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत टिकू शकते ते समाधान. नामा ने वृत्ती समाधानी बनते! नामस्मरण हा माणसाची देहबुद्धी आणी वासना जाळणारा अग्नी आहे. या अग्निने आचार, विचार आणि उच्चारची शुद्धी हमखास होते! दुख करण्या सारखी वस्तूच जगात निर्माण झाली नाही. नामाचा विसर हेच दुख मानावे. आपण मात्र नको त्या गोष्टीसाठी दुख करतो! परमार्थात अनेक साधने असली तरी आपल्या दोषांची जाणीव होणे ही पहिली पायरी आहे. नामत राहिल्याने ही जाणीव होऊन शुद्धी होते! हलाहल विषांचा दाह कमी करण्यासाठी शंकरा ने जे रामनाम कंठी धारण केले ते आपण विषयाचा दाह कमी करण्यासाठी घ्यावे!
*आपल्या जीवनात मंगल अमंगल गोष्टी घडत असतात. त्यांचा आघात मनावर होतो. पण नामात राहिल्यास तो आघात भावनेवर होत नाही. एकाला लोकांचे देण्याची काळजी, दुसर्याला लोकांकडून येण्याची काळजी. ही काळजी आपल्याला जितकी मारते तितकेच नाम आपल्याला तारते. *नामची सत्ता फार बलवत्तर आहे. कोणतेही पाप नामासमोर राहू शकत नाही. मी दूराचारण न करता नामात राहीन असा निर्धार करावा .
(६) मनातील भीती नष्ट करण्यासाठी. ज्या भगवंताने आजवर आपल्याला सांभाळले तो पुढे सुद्धा सांभाळील असे म्हंटल्यावर भीती नाहीच . हि निर्भयता नामाने येते . विचार अशी शक्ति आहे ज्यातुन चिंता अन दुख येते, किंवा निर्भयता अन पुढे आनंद निर्माण होतो. सुविचारासाठी नाम घ्यावे!
(७) एक उत्कृष्ठ नेम. *आपल्याला जेवढे साधन समजले तेवढे आधी मनापासून करावे. पुढील मार्ग आपोआप मिळेल. आणि नाम हे सर्वोत्तम साधन आहे! नेहमी भगवंताचे नाम घेणे हाच सर्वोत्तम नियम . मग आणखी निराळा नियम कशाला हवा ? तेवढा नियम पाळला तर राम भेटेल.. भगवंताचा नियम पाळताना त्याच्या कृपेची याचना मनापासून करावी . तेथे मी -पण नसावा . प्रेमपूर्वक नामाने हे साध्य होते
सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने फार. नामस्मरण हे सर्वात मोठे सत्कर्म . यात चिकाटी असेल तर सर्व अडचणी आपोआप दूर होतील! भगवंत, नाम आणि भक्त हा त्रिवेणी संगम आहे. हा साधण्यासाठी आपला 'मी' भक्त व्हावा अन नामत राहून सर्वत्र भगवंत पाहावा! आपल्याकडे कोणी आले तर नाही म्हणू नये,नाही आले तर यावेसे वाटू नये, नामासाठी एकांत लागतो. सतत नामात राहिल्यास एकांतच आहे.
(८) उत्कृष्ठ भक्त बनणे .आपण स्वत :पेक्षा भगवंतावर अधिक प्रेम करू लागलो म्हणजे आपण खरे भक्त बनलो . हि अवस्था नाम स्मरणाने येते.भगवंत करता आहे ही जाणीव निर्माण करणे, हे उपासनेचे ध्येय आहे. सप्रेम नाम स्मरणाने ही जाणीव आणि उपासना दृढ बनते. भगवंताला दृष्टी आड न होऊ देणे याचे नाव अनुसंधान. हे अनुसंधान प्रेम पूर्वक नाम स्मरणाने साधते.*नामाने माणसाच्या देहात बदल होत नसून त्याचे अंतरंग सुधारते. पुढे तो व्यक्ती बाहेरून प्रपंची आणि आतून भक्त व योगी बनतो!समर्थांसारखे संत शिरोमणीच देवाला देवाची आन् घालून उद्धार करा हे सांगू शकतात. ही भक्तीची परमावधी नामा ने येते! तीर्थास तीर्थपण , देवास देवपण आपण भावनेने देतो. भाव ठेऊन कार्य केले तर लवकर होते. अन हा भाव नाम स्मरणाने उत्पन्न होतो! केवळ नाम घेतल्याने राम भेटेल? होय. जो नाम घेतो, तो दुष्कर्मा पासून निवृत्त आणि सत्कार्या साठी प्रवृत्त होतो. अनुभव घ्या! उपासक उपासना करताना देहाला विसरला की त्या उपास्य मुर्तिमध्ये जिवंतपणा अनुभवास येईल. नामस्मरणाने ही अनुभूती येते! नाम घेताना त्यात आपण एक लय निर्माण करावी. असा कुणी नामत रंगला की तो देहाला विसरतो. आणि यालाच समाधी अवस्था म्हणतात!
*आपण आज जे नाम घेतो, तेच नाम शेवट पर्यंत कायम राहते. पण देहबुद्धी जशी कमी होईल तसे ते अधिकच व्यापक बनत जाते.नामस्मरणाने देह आणि मन शुद्ध होतात.तसेच नामा च्या सामर्थ्याचा प्रत्यय येऊन वासना जाळून जातात अन पुण्य संचय होतो. नाम, भक्त आणि भगवंत तिन्ही एकरूप आहेत. जेथे नाम तेथे खरा भक्त तयार होतो. आणि तेथेच भगवंताचे अधिष्ठांन असते! भगवंत, नाम आणि भक्त हा त्रिवेणी संगम आहे. हा साधण्यासाठी आपला 'मी' भक्त व्हावा अन नामत राहून सर्वत्र भगवंत पाहावा! तुलसीदासानी रामोपसना अशी केली की स्व:त रामरुप बनले. रामरुप होण्यासाठी रामा सारखे निस्वारथी बनले पाहिजे. नामने हे साधते!
(९ )इच्छित मनोकामना आपल्या हातून काय होणार हे ठरलेले आहे. पण मिपणा घालवण्यास, आपल्या करमाला योग्य दिशा देऊन इप्सित साधण्यास नाम आवश्यक आहे! मोठ्या यशाने, सम्मानाने हुरळून न जाणे, तसेच दुखा:चा डोंगर कोसळल्यावर न डगमगणे ही स्थितप्रज्ञता नामाने येते! सतत नामत राहिल्यास अशी स्थिती येते की नामस्मरण करावे लागत नाही, ते 'होऊ' लागते. यालाच आजपाजप म्हणतात! योगमार्गात इद्रियावर ताबा मिळवून मन ताब्यात आणतात. भक्तीमार्गात नामाने मन ताब्यात आणून इन्द्रिय विजय मिळवता येतो! नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात
*अखंड नाम घेणे ही काही सोपी गोष्ट नाही. आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो, तेवढा सगळा नामा त घालवण्याचा प्रयत्न करा *
*पुष्कळ नाम घ्यावे असे अनेकान वाटते. या इच्छेला शक्तीची जोड मिळाली की संकल्प होतो. ज्याचा संकल्प झला तो मार्गाला लागला *जोपर्यंत मी करता आहे असे वाटते तोपर्यंत नामस्मरण करीत राहावे. नंतर सर्व त्याच्यावर सोपवले की नामस्मरण तोच करेल. अशा रीतीने जप- करताना एक स्थिती अशी येते कि जप करावा लागत नाही,तो होऊ लागतो,तो तिन्ही अवस्थे मध्ये टिकतो.
समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे. ती मिळवण्याचा उपाय म्हणजे निष्ठा पूर्वक नामस्मरण होय!
*एवढ्या सगळ्या गोष्टी नामाने होतात तर मग मागणे काय रहाते ?...........
मागण्या साठी महाराज म्हणतात ................................................
*माणसाला काही हवे वाटणे स्वाभाविक, पवित्र्याचे आहे. पण ते रामाच्या इच्छेने मिळणे अधिक पवित्र. कल्याणाचे असेल तेच तो देईल! भूक लागली की आई जवळ खायला मागावे, चोरी करू नये. तसे जगण्या पुरते भगवंता जवळ मागणे चुक नाही, पण जास्त मागू नये! प्रपंचीक माणसाची अशी वृत्ती असावी की भगवंता, मी काही मागणार नाही, माझे कल्याण ज्यात आहे तेच तू करशील! भगवंता जवळ असे मागवे की आणखी काही मागवे लागणार नाही, ते म्हणजे समाधान. हे मागण्याची बुद्धी अन पात्रता नामने येते!
साधकने आज सद्गुरू चरणाजवळ एक नांम जप संकल्प करून त्यांच्याकडे अढळ समाधान मागवे. हेच या पर्वकाळाचे सार
महाराजांनी साधकांना दिलेली आशासने
*नाम सदा बोलावे, गावे भावे जानासी सांगावे; हाची सुबोध गुरुंचा, नामापरते ना सत्य मानावे! नामत राहा, राम कल्याण करेल!
- (१) भक्तांचे कर्ते पण मेले की त्याची मला काळजी लागते .
-(२) मी तुमचा सांगाती आहे , सावलीसारखा तुमच्या बरोबर आहे , ही भावना ठेवून घ्या . वाटेतील अडचणी येऊन जातील , त्या कळणार सुद्धा नाहीत .
- (३)नामाचे अनुसंधान टिकेल अशीच उपाधी (उद्योग /व्यवसाय ) बाळगावी. उपाधीची हौस (खूप वेळ /शक्ती देणे ) नसावी. उपाधीने शक्ती झिरपते. (दमायला होतं ).
-(४) "मी नाम घेतो " हा सुद्धा एक संकलपच आहे . तो नाहीसा करावा ..नाम सुद्धा थांबून जावे . या संकल्प रहित अवस्थेत (निर्विकल्प ) सद्गुरशी अनन्य होऊन आपण आपला आनंद भोगावा . त्या स्थितीत सद्गुरच शिष्याचे नामसमरण करतात , शिष्य स्व:स्थ आरामात राहातो .
-(५) नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे होय .
-(६) जेथे नाम आहे तिथे मी आहे .
-(७) "परमात्मा सर्व करतो " ही भावना ठेवावी
-(८) नाम घेताना मला धरुन ठेवा . माझे मन तुमच्या मनाची जागा घेईल . मग तुम्ही माझ्या सारखे व्हाल .
-(९) जो नुसता नामात राहील तयाला मी अखेरपयरत सांभाळीन . त्याची अंगलट माझ्या सारखी होईल तयाची कामे आपोआप होतील .
-(१०)डोळे उघडून जग नाहीसे होईल तर ते नामानेच होईल हा माझा अनुभव तुम्ही घ्या . मला लुटून न्या .
-(११)माझ्या पाशी आनंदा शिवाय दुसरे काही नाही .
-(१२) माझ्या कडून नाम आलेल्या साधकाला रंग आणी नाद असले दृशयमय अनुभव किंचित येतील . तो एकदम आनंदाला झोबेल . पण त्याला वेळ लागेल .
-(१३)चोवीस तास माझा सहवास होण्यास नामच एक उपाय आहे .
-(१४) माझ्या माणसाने उगीच काळजी करु नये. मी त्याची हमी घेतली आहे . त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी व नाम घ्यावे.
-(१५) नाम सुक्ष्मावर (सूक्ष्म देह व कारण देह जिथे वासनांचे बीज असते ) परिणाम करते . तो लवकर दिसत नाही .
-(१६) मी तुमचा भार घेतलेला आहे . तुमच्या जीवाची मूर्ती घडवणयाचे माझे काम सतत चालू आहे .
-(१७) मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा , तुम्ही रामरूप व्हाल .
-(१८) तुमची देहबुद्धी क्षीण करणे हे माझे काम आहे . ते करताना जीवाला सूक्ष्म कष्ट होणारच . पण मी सांगाती आहे . त्या कष्टाची जाणीव कमी केल्याशिवाय मी राहणार नाही , मुळीच घाबरु नये .
-(१९) नामा मध्ये प्राण ओतून ते घ्या म्हणजे पुढील अवस्था आपोआप येतील , त्या येण्याचे काम माझ्या कडे लागले .
-(२०) अखंड नामस्मरण आणी भगवंताचे अनुसंधान या शिवाय मला काहीही प्रिय नाही . नामाची ज्योत जळती ठेवा . तुमच्या स्वाधीन होऊन मी राहीन , नव्हे तुमचा मी ऋणी होईन .
-(२१) देहाचे भोगांना मी कधी कंटाळलो नाही . तुम्ही माझे म्हणवताना देहाचे भोग शांतपणे भोगण्यात मी आहे .
-(२२) रामाला साक्ष ठेवून सांगतो की माझ्याशी आपलेपणा ठेवा . मला आवडते म्हणून नाम घ्या . तुमच्या पापाचा भार मी घेतला अशी खात्री बाळगा . ते पाप पुनः करु नका , तुम्हाला रामाचया चरणाशी नेण्याची हमी माझ्या कडे लागली.
-(२३) मनातील हवे -नकोपण नाहीसे कराल तर मी तुमच्या शी बोलू लागेन . माझे बोलणे म्हणजे अशरीर वाणी . ती ऐकायला येणयास हदयात नाम स्थिरावणे जरुरीचे आहे .
-(२४) तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते .
-(२५) तुम्ही नाम घेता महणून मी तुमच्या मागे -पुढे चालतो .
-(२६) भगवंताचा प्रपंच भगवंत बघून घेतो .
- (२७)नामसमरण करताना तुम्ही मला पाहात नसाल पण मी तुम्हाला पाहतो , कारण मी तुमच्या हदयातच आहे .
-(२८) तुमची देहबुधदी कमी होईल तेव्हा मी तुम्हाला कसा आहे ते जाणवेल
-(२९) तुम्हाला नामा ची अत्यंत आवड लागली की माझा आनंद उचंबळून येतो . मग तुमचयासाठी काय करु अन् काय नको असे मला होऊन जाते.
-(३०) माझ्या आशिर्वादा प्रमाणे तुम्ही वागलात तर काळाला देखील दूर साराल .
-(३१)माझ्या माणसाने म्हतारपणाची व अंतकाळची काळजी करु नये .
-(३२) तुम्ही जे नाम घेता ते मीच घेववतो ही भावना ठेवा . त्यात माझी संगत लाभेल . अंतकाळचे कष्ट जाणवणार नाहीत .
-(३३) मन विषयाकार होऊ लागले की माझे समरण करावे .
-(३४) बरयाच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे म्हणजे पुढे पुढे माझी लवकर लवकर आठवण होऊ लागेल . माझे होणे कठीण नाही.
-(३५)सर्व सोडून मला शरण यावे.- मी सांगितलेले समरणात ठेवावे .
-(३६) माझ्या सांगण्यात मी आहे मला दुसरे कोठे पाहू नये
-(३७) तुम्ही नाम तेवढे जतन करावे
-(३८) नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे
-(३९) रात्रंदिवस असे चिंतात आ णावे की "मी तुम्हाला शरण आहे . मला शरण व्हायला शिकवा "
-(४०) शेवटी सांगतो , नामाला शरण जा .
-(४१) मी नामाहून वेगळा नाही .
-(४२) मग तुमच्या अंतकाळी मी उशाशी आहे ...
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
॥जानकी जीवनस्मरण जय जय राम ॥
॥श्री राम समर्थ ॥
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
माणसे उपवास, यात्रा, कर्मकांड
माणसे उपवास, यात्रा, कर्मकांड या अवघड गोष्टी करतात. पण घर बसल्या (पैसे खर्च ना करता) नाम घेणे होत नाही, हे अजब आहे! सर्व साधना मध्ये नामस्मरण हा सर्वात सोपा, सहज मार्ग आहे. पण गंमत अशी आहे की तो सोपा आहे म्हणून कुणीच करीत नाही!
म्हणूनच आज आम्ही समस्यांच्या विळख्यात आहोत हेच खरे
श्रीराम जय राम जय जय राम
खरंय विश्वयशश्री! संतांनी
खरंय विश्वयशश्री! संतांनी वारंवार सांगितलंय की नाम घ्या, पण ऐकतो कोण! अतिपरिचयात् अवज्ञा! 'हँ, साधं नामच तर घ्यायचंय, घेऊ केव्हाही' असं म्हणताम्हणता म्हातारपण येतं. आणि रामराम बोलतांना लामलाम उमटतं तोंडातून. 'मी कधीच मरणार नाही' वा 'मला काय होतंय' ही वृथा समजूत या परिस्थितीच्या मुळाशी आहे.
आ.न.,
-गा.पै.
खुपच छान लेख . सध्या माझ्या
खुपच छान लेख . सध्या माझ्या ब्लॉगवर महाराजांचे प्रत्येक दिवसाचे प्रवचन देत आहे
जय श्री राम
अमोल केळकर
मला इथे भेटा
छान विवेचन, खर तर प्रवचनही
छान विवेचन, खर तर प्रवचनही म्हणता येईल धन्यवाद
|| जय श्रीराम ||
श्री विनायक. दि.पत्की, आपल्या
श्री विनायक. दि.पत्की,
आपल्या प्रत्येक लेखातून आपली प्रचंड मेहनत आणि श्रद्धा दिसते. आपण ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे उत्कृष्ट विचार या लेखात निवडले आहेत. (फोटोही आवडला).
(शीर्षक "गोंदवलेकर महाराजांची १०० वी .." च्या ऐवजी "गोंदवलेकर महाराजांच्या / चे १०० व्या ... " असे जास्त ठीक आहे का?)
तोषवी,विश्वयशश्री,गामा_पैलवान
तोषवी,विश्वयशश्री,गामा_पैलवान,अमोल केळकर,limbutimbu,आकाश नील. जय श्री राम .
आपल्या सर्वांचा प्रतिसाद मोलाचा आहे.
|| नामापरते न सत्य मानावे ||
|| नामापरते न सत्य मानावे || __/\__
छान आहे धागा!