Br Ba

Submitted by तृप्ती आवटी on 5 December, 2013 - 10:46

If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices!

Braking-Bad--620x400.jpg

"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्‍या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!

ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch

ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm

ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad

http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki

साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music

गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/

http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0

ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

brba.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉल मला आवडलाय. आय वुड लाइक टु नो अ गाय हू नोज अ गाय हू नोज अ गाय. Proud

लिडिया जे उद्योग करते त्यामानाने प्रत्यक्ष भेटींमधे सतत घाबरल्यासारखी किती दिसते! तिचा नऑयन्स मायनर आहे आणि वॉल्ट तिला जे करतो ते बघून मला नाही म्हटलं तरी जरा बरंच वाटलं होतं. Proud

माइक हेही एक चांगलं कॅरेक्टर आहे. त्याचं काय होणार याचा अंदाज नात वगैरे दाखवली तेव्हाच आला होता, तरीही अशा लोकांशिवाय गस गस असू शकणार नाही.

चमनला सॉल बद्दल विशेष जिव्हाळा आहे का?

मला ते पात्र आवडतं. असे लोकं- इलिगल कामं पण हसतखेळत खंत न वाटु देता करणारे- मला आवडतात. त्यांना दु:ख, चिंता सतावत नसाव्यात असं मला उगीच वाटतं.

हो, आणि तो प्रथमदर्शनी चक्रम (क्लाउन) वाटला तरी ही नोज हिज जॉब. एकदम रिसोर्सफुल आहे. त्याचे डायलॉग्जपण फनी, येट सेन्सिबल आहेत सगळे.

सॉलचं काम भारी आहे. लिडीया समहाऊ त्या रोलमध्ये फार कंफर्टेबल वाटत नाही. जरा बावळटच वाटली मलातरी.

लिडिया आणि माइक अजून आले नाहीत. माइक माझं आवडतं नाव असल्याने ज्या शिरेलीत माइक असतो ती मला आवडतेच Happy

सॉल ईज सो हिलॅरिअस!!! सगळ्या गोष्टींसाठे पर्फेक्ट कवर अप स्ट्रॅटेजी आहे त्याच्याकडे.
पहिल्या सीझनमधला तो 'पुट अ डॉलर ईन माय पॉकेट' वाला सीन सो फनी.
त्याच्या सेंस ऑफ ह्यूमर अगदी टेन्स प्रसंगातही हरवत नाही आणि तरी नॅच्युरल वाटतो.

सॉलचे डायलॉग्ज वरचा क्लास आहेत. बॉब ओडनकर्क खुद्द एक रायटर (तो कोननचा खूप चांगला मित्र आहे, SNL चे रायटर्स होते दोघंजण) - अशी भूमिका मिळणं, वठवणं, त्याच्यावरून स्पिन-ऑफ शो मिळणं, सर्वच छान! बॉब/सॉल इज द मॅन!

सॉलचे काही वरचा क्लास quotes -

*********
जेसीला हॉस्पिटलमध्ये वॉल्ट भेटायला जातो त्यावेळी तो वॉल्टला म्हणतो -

You’re now officially the cute one of the group. Paul, meet Ringo. Ringo, meet Paul. Lol लय हसलो.

*********

If you're committed enough, you can make any story work. I once told a woman I was Kevin Costner, and it worked because I believed it. Lol

*********

Did you not plan for this contingency? I mean the Starship Enterprise had a self-destruct button. I'm just saying.

*********

स्कायलरला पहिल्यांदा भेटतो तेव्हा

Hello. Welcome. What a pleasure it is to have you. Just gonna call you Skyler if that's okay. It's a lovely name. It reminds me of the big, beautiful sky. Walter always told me how lucky he was, prior to recent unfortunate events. Clearly his taste in women is the same as his taste in lawyers: only the very best with just the right amount of dirty. Lol

*********

सगळे:
http://www.quotefully.com/tvshow/Breaking%20Bad/Saul%20Goodman/1/

सॉलचे सगळेच डायलॉग धमाल Biggrin तो डॉलरवाला सीन पण भारी.

काल दोन तास कुकिंग केलं. तुमचा कवीमनाचा गेल आला. पुन्हा एकदा सांगते नवी लॅब ऑस्सम आहे.

हाऑकाचा जानेवारी मध्ये नवीन सीझन येणार आहे. तोवर ब्रेबॅ संपवून हाऑकाचा पहिला सीझन संपवावा लागणार. प्रचंड मोठा डोंगर कवर करायचा आहे. वेळ वाया घालवू नका सुट्यांचा वेळ कारणी लावा. Proud

१४ फेब ला आहे का? मग अजून जरा वेळ आहे सिंडीकडे. हुश्श्य!! म्युझिक अल्बम बनविण्यासाठी कुकींग जॉबचं रिझिगनेशन लेटर गेल ने गसला पाठवलं असतं तर वॉल्ट्ला जसं हायसं वाटलं असतं तसं Proud

पूर्वी २४ चे दोन सीझन्स बघितले पण मग त्यात त्या जॅक बावरच्या मुलीचा आणि मिसेस पाल्मरचा मूर्खपणा असह्य आणि त्यांचा अभिनय ईरिटेट झाल्याने सोडून दिलं. पुढचे बघावे का विचार करतोय.

गेम ऑफ थ्रोन्स आहे का नेटफ्लिक्स स्ट्रीमींग वर?

चमन, २४ बघ. भयंकर इन्टेन्स होत जातं. जॅक बावर भारी आहे. त्याची मुलगी जरा इम्मॅच्युअरच दाखवली आहे.

येक टाईम पे येकच देख रहे हम लोगां. मधेच शिरेली, त्यात पिक्चरची आमिषं अशी तारेवरची कसरत सुरू आहे सुट्टीची.

टिवो आणि बोसचं होम थिएटर असं डेडली कॉम्बिनेशन थँक्स गिविंगला घरात आल्याने शिरेलींचा फडश्या पाडण्याचा भस्म्या रोग झाल्यासारखं झालंय.

कृपया मेथशी संबंधित पोस्टीच इथे टाकाव्यात >> बरं.

त्यांची आरवी स्क्रॅप करतांनाचं बॅकग्राऊंड मधलं गाणं अतिशय दर्दभरं आहे. त्यात जेसीचा करूण, रडवेला आणि वॉल्टचा दु:खी चेहरा.. सगळं एकदम हृदयद्रावक वगैरे.

यो मै Happy

मी आज मिळालेल्या एकांतवासाचा फायदा घेऊन तीन भाग एकामागून एक बघितले. तिसरा सीझन जवळ जवळ संपला. तो फ्लाय वाला एपिसोड आवरा आहे. झोप लागली बघताना. बाकी टुमास (?) आणि बॉक्स कटर एकदम प्रेडिक्टेबल. आपल्याला आधीच १००% अंदाज येतो नक्की काय होणार. फक्त कशाप्रकारे होतं तेवढाच काय तो सस्पेन्स.

तिसर्‍या सीझनच्या कॅमेरामनला अर्धा चेहरा अंधारात ठेवायला खूपच आवडतं बहुतेक. खूप सीन्स असे आहेत. एक बदललेली गोष्ट म्हणजे सुरुवातीला जे स्निपेट दाखवतात ते पहिल्या आणि दुसर्‍या सीझनमध्ये भविष्यातल्या घटनांशी संबंधित आहेत. तिसर्‍या सीझनमध्ये मात्र होउन गेलेल्या घटनांचे दुवे आहेत. अगदी पहिल्या सीझनमधल्या सुद्धा काही घटनांचे संदर्भ पुन्हा येतात.

गस हॉस्पिटलमध्ये (सगळ्यांसाठी लंच घेऊन) येऊन गेल्यावर त्याची आणि वॉल्टची मीटिंग होते त्या सीनमध्ये दोघांची बॉडी लँग्वेज काय जबरी आहे. दोघांच्या मनात काय चालले आहे त्याचं पर्र्फेक्ट रिफ्लेक्शन.

रच्याकने, what's the deal with आपल्या त्या ह्यांचा आवडता ड्रेस? स्कायलर वॉल्टच्या घरात शोधाशोध करते तेव्हा पण तिच्या हातात पहिला कपडा तोच Uhoh Proud

Pages