Br Ba

Submitted by तृप्ती आवटी on 5 December, 2013 - 10:46

If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices!

Braking-Bad--620x400.jpg

"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्‍या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!

ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch

ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm

ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad

http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki

साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music

गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/

http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0

ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

brba.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायदवे, वॉल्टची जी पार्टी असते त्यात ज्युनिअरला व्हिस्की प्यायला लावतो वॉल्ट.. त्यात वॉल्ट अचानक विचित्र का वागतो!? हँकवर पण किती चिडतो.. मला काहीझेपलच नाही.. >> मला पण ते काही कळलच नाही....
नी स्कायलर चं टेड बरोबरचं प्रकरण...ते पण नाही कळलं.

काल सीझन २ संपला. आज रात्री सीझन ३ ची सुरुवात !

अभिनंदन Happy

चमन, एक शॉट मार त्यानिमित्त Wink

बेबी सिटिंगची अतिरिक्त जबाबदारी आल्याने आमचं कुकिंग जरा थंडावलं आहे गेले दोन-तीन दिवस. तरी लंच आवरमध्ये संशोधन कार्य आणि एरवी प्रचार-प्रसार जोरात सुरू आहे Happy

मी सिझन ३ एपिसोड दोन..
प्लेन क्रॅश आणि ते वॉल्टचं भाषण कैच्याकै वाटलं .. उगीच ओढूनताणून..
तो एक डोळ्याचा बाहुला डोक्यात जायला लागला होता तेचढ्यात त्याची मिस्टरी सुटली..
स्कायलर ते पेपर्स देते त्यानंतर वॉल्ट तीन सिझनमध्ये पहिल्यांदाच्गाणी गात गाडी चालवताना दाखवला. आधी खूप विअर्ड वाटलं पण नंतर लक्षात आले की सिक्रेट्सचा भार कमी झाल्याने असं होऊ शकेल..

एकंदरीत मानवी नातेसंबंध व प्रत्येकाच्या रिअ‍ॅक्शन्सवर विचार केलेला दिसतो..

बस्के, तू नी मी - एकदम बरोबर बरोबर! मी पण सिझन ३ एपिसोड दोन...

ते दोन जुळे वाटणारे टकले कसले कॉमेडीच वाटले...

हॅड टू बाऊन्स फॉर अ व्हाइल.. यो

तिसरा सीझन चाचपडत गेलाय (पात्रं दिशाहीन आहेत, त्यात 'Fly' सारखा बॉटल एपिसोड - ओव्हरबजेट गेल्याने दोनच मुख्य पात्रं आणि एक कृत्रिम माशी Lol - वगैरे एकूणच चल, पुढे चल, ढकल असं आहे [काहींना तो जाम आवडला]) , तिसर्याच्या शेवटी थोडीशी वात पेटली आहे. चौथा सुरू होतो यथातथाच, बिल्डअप होत होत Salud ला मेजर ठिणग्या दिसतात आणि मग पाचवा! पाचव्यात दिशा निश्चित झाल्यामुळे खर्या अर्थानं रायटर्सना सूर गवसलेला वाटतो.

शेवटचे सात भाग - थरार असावा तर असा - मी अगोदर लिहिल्याप्रमाणे the show has redeemed itself in the 5th season.

*** स्पॉयलर ***

सिरीज संपवलेल्यांकरता फक्त. फॉ ऑ य डेथलवर्स... 'टिज २७२ -

http://www.youtube.com/watch?v=BAy3Z6VFGMk

काल दीड बाघ बघितले. चौथा अर्धा आणि पाचवा. लेटेश्ट लॅब बघितली आणि डोळ्याचं पारणं फिटलं Happy

लेटेश्ट लॅब बघितली आणि डोळ्याचं पारणं फिटलं ---- हाहा!

स्वाती,
अगदी बरोबर, क्षणाक्षणाला श्वास अजूनच रोखला जातो. प्रत्येक आकड्याला काटा येतो. गेलचा चेहरा बघवत नाही. मी त्याच्या या परफॉरम्न्स चा फॅन. गेलकरता प्लीज!

तो माशीवाला एपिसोड मलाही आवडला पण जरासा ताणल्यासारखा वाटला. जेसी प्रत्येक वेळी मि. व्हाईट म्हणतांना त्याचा आवेश किती वेगवेगळा असतो. सिरीज पहिल्याने बघतांना, ज्यावेळी जेसीच्या पात्राची खोली माहित नव्हती त्यावेळी, जेसी सीनमध्ये असला की ३०० चा पाठलाग करतांना तेंडूलकर आऊट होण्याची जशी भिती वाटत राहते, तशीच अँग्झाईटी कायम पाठलाग करते.

माझ्या हेट लिस्ट मध्ये सगळ्यात वरती (अगदी टुको,डॉन सालामंका, टॉडच्याही) कोणी असेल तर लिडिया.
सॉल म्हणजे एंटरटेनमेंट २४*७, पण सॉल सारखी माणसं खरंच असतात?

गेलबद्दल लिहू का? आता सिंडी काय स्पॉइलर्सना घाबरत नाही तेव्हा लिहितेच! Proud
त्याच्यासारखा आयडियल पार्टनर वॉल्टला नको होतो त्यावरून त्याचा ईगो प्रॉब्लेम आणि टीम प्लेयर नसणं आणखीनच अन्डरलाइन होतं. गेलबद्दल वाईट वाटतं, पण शेवटी त्याला पोएटिक का होईना जस्टिस मिळतो असं वाटलं. Happy

त्या एपिसोडबद्दल मला एक शंका आहे, पण ती नंतर विचारते. Happy

त्याच्यासारखा आयडियल पार्टनर वॉल्टला नको होतो त्यावरून त्याचा ईगो प्रॉब्लेम आणि टीम प्लेयर नसणं आणखीनच अन्डरलाइन होतं. गेलबद्दल वाईट वाटतं, पण शेवटी त्याला पोएटिक का होईना जस्टिस मिळतो असं वाटलं. >>> स्वाती त्याच्याही ऊप्पर, त्याला जेसी पाहिजे असतो म्हणून तो सगळं कुभांड रचतो. जेसी त्याच्याशिवाय सोडून किती वल्नरेबल हे तो ओळखून असतो आणि म्हणून त्याला जेसीला नजरेआड होऊ द्यायचे नसते. पुन्हा जेसी स्वतःचे कुकींग मार्केटमध्ये आणणार असतो तर गस त्याला सोडणार नाही हेही वॉल्टला माहित असते. पुन्हा, गेलला ट्रेन करून आपलेच मरण ओढवून घेऊ हे कळणे पण ओघाने आलेच.

बॅजर आणि स्किनी पीट पात्र पण केवढे अस्सल जंकी वठवलेत.
स्टार कास्टला पुन्हा हॅट्स ऑफ.

चमन, जेसीला पुन्हा पार्टनर करून घेतो ते XXला वाचवण्यासाठी ना? (फुल्ल्यांचा हिशोब करू नका. मुद्दाम दिशाभूल करायला चुकीची संख्या टाकलेली असू शकते. :P)

आणि गेलला ट्रेन करायचं नसतं हे बरोबर, पण अनॉयपण अगदी व्हिजिबली होतो. Lol

आता थिंकिंग ऑफ इट, मला गेल प्रकरणात दोन शंका आहेत. Proud

देवनागरीत दोन फुल्या म्हंटल्यावर मला एकच शब्द आठवला पण ते व्यक्तीचं नाव होउ शकत नाही Proud

रच्याकने, साडेतीन सीझन झाल्यावर सुद्धा मला स्कायलरच्या फुल्यांचा हिशेब लागलेला नाही. अजून किती वाट बघायची?

अगं, स्कायलरच्या फुल्ल्या म्हणजे 'अफेअर'! ते तुझं ऑलरेडी बघून झालं होतं मी लिहिलं तेव्हा बहुतेक. आय वॉज ओव्हरली कॉशस. Proud

चमन, जेसीला पुन्हा पार्टनर करून घेतो ते XXला वाचवण्यासाठी ना>> मला तरी कुठे तो नाईलाजाने जेसीला पार्टनर करून घेतो असं वाटत नाही. त्याला पहिल्यापासून, शेवटपर्यंत जेसी हवाच असतो.
तुझं नि माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना असं काहितरी. मज्जेशीर नातं आहे त्यांचं.

काय शंका आहेत?

माझ्या हेट लिस्ट मध्ये सगळ्यात वरती (अगदी टुको,डॉन सालामंका, टॉडच्याही) कोणी असेल तर लिडिया ---- Happy ती येईपर्यंत 'मरी' होती. जोकिंग!

बॅजर आणि स्किनी पीट पात्र पण केवढे अस्सल जंकी वठवलेत - १००%

जेसीला पुन्हा पार्टनर करून घेतो ते XXला वाचवण्यासाठी ना? ---- मला वाटतं फुल्या बरोबर आहेत, दोन पर्याय आहेत पण शब्दसंख्या तीच. Happy हॉस्पिटलमधल्या सीननंतर, करेक्ट?

.

विजिगिषु, जळ्ळं मेलं लक्षण ते! Proud
हो, हॉस्पिटलमधल्या सीननंतर.

स्कायलर माझं सर्वात नावडतं कॅरेक्टर आहे. एक नंबरची संधीसाधू बाई!

चमन, शंका सांगितल्या तर स्पॉइलर होईल, म्हणून नंतर लिहिते म्हटलं.

Happy त्यानंतरच 'कुभांड'. पहिल्यावेळी वॉल्ट एकदम प्रभावित असतो. कविता, कॉफी इ.

स्कायलर माझं सर्वात नावडतं कॅरेक्टर आहे >>> +१

स्वतः काही न करता स्वतःचं राज्य चालवायचं आहे तिला. नवरा मेथ बनवतो कळाल्यावर लगेच त्याला त्याच्याच घरातून हाकलला. मग लगेच त्या टेडसोबत अफेयर. नंतर पैसे पण वापरते म्हणे ना? एकुणात तिचं सगळ्यांवर कंडीशनल प्रेम आहे.

स्कायलर खरंच अ‍ॅनॉईंग आहे, मरी ईरिटेटिंग अ‍ॅट टाईम्स, पण लिडिया शी मेक्स माय ब्लड बॉईल.

श्या तुम्ही लोक सॉल बद्दल का काही लिहित नाहीत. Sad

Pages