एक कप नारळाचे तेल (घट्ट)
एक कप कोको पावडर (unsweetened)
अर्धा कप मध
१. चाळलेली कोको पावडर, नारळाचे तेल व मध पूर्णपणे एकजीव होईपर्यंत घोटाळायचे. मिश्रणाची चव घ्या आणि आवश्यकता असल्यास त्यात अजुन मध घालावे
२. तयार मिश्रण मोल्ड किंवा डिशमध्ये (पुसटसा तेलाचा हात लावलेल्या ) ओता.
३. २० मिनिटे डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. नंतर सुरीने त्याचे छोटे तुकडे करा.
४. रुम टेंम्परेचरला चॉकलेट वितळत असल्याने फ्रीजमध्ये ठेवावे.
१. मापात कमी जास्त झाले तरीही तयार चॉकलेट छानच लागते. (सुरवातीला मोजुन मापुन करायचे. नंतर ज्या वेगाने चॉकलेट फस्त होते होती त्यामुळे आता अंदाजे सगळं घेते )
२. नारळाचे तेल ओतीव नसेल याची काळजी घ्या नाहीतर सेट होताना नारळाचे तेल आणि कोको पावडर वेगळे होतील. म्हणुन मुलायम चॉकलेट हवे असल्यास घट्ट किंवा मऊ तेल घ्यावे.
३. अमेरीकेमध्ये मिळणारे नारळाचे तेल तुपासारखे कणीदार(भरपुर गुठळ्या असणारे) असते. यामुळे चांगल्याप्रकारे घोटून मिक्स करावे.
४. ही बेसीक कृती वापरुन वेगवेगळी चॉकलेटस बनवु शकतो.
मधाचे प्रमाण कमी जास्त करुन कमी गोड, डार्क चॉकलेट बनवता येईल.
नारळाची पावडर / मिल्क पावडर/ बदामाची पावडर , बदामाचे तुकडे / ड्रायफ्रुटस हवे ते घालु शकतो.
मी मनुका, खजुर (बारीक कापुन) घालुन केलेली चॉकलेटस घरात आवडत असल्याने रेझीन चॉकलेट करते. मैत्रीणीने बदामाची पुड घालुन दिले होते तेही खुप छान लागते.
छान आणि सोपी रेसिपी
छान आणि सोपी रेसिपी
छान आहे हा प्रकार... पण नारळ
छान आहे हा प्रकार... पण नारळ तेल वापरले तर चॉकलेटला नारळाचा वास येत असेल ना... मी चॉकलेट बार व व्हाईट बार वापरुन घरी चॉकलेट बनवते त्यात साखर घालावी लागत नाही. व्हाईट बार गोडसर असतो तेवढा गोडपणा पुरतो.
मी बाजारात हल्लीच घट्ट नारळ तेल बघितले. त्याचा असा उपयोग करता येतो हे आजच कळले.
नारळाचं तेल - पॅराशुट वा
नारळाचं तेल - पॅराशुट वा तत्सम चालेल का?
राखी, यशस्विनी धन्यवाद
राखी, यशस्विनी धन्यवाद
यशस्विनी .... ईथे खास खाण्यासाठी नारळाचे तेल मिळते. वास नाही येत.(खरेतर येतो पण खुप छान येतो ग :))
दुकानामध्ये विकल्या जाणार्या बारमध्ये साखर असेल म्हणुन गोडपणासाठी काही घालायची गरज नसेल पडत. मला साखर नकोच आहे..म्हणुन ही रेसीपी.
तुला व्हाईट बार घरी करायचा असेल तर कोको बटर मिळते ते वापरुन करु शकतेस. मी अजुन व्हाईट बार केला नाहिये.
घट्ट नारळ तेल >>बरोबर तेच. बरेच ठिकाणी वापरता येते. जेवणात, बेकिंग मध्ये कुठेही.
विजय देशमुख ... पॅराशुट नाही. खास नारळाचं तेल खाण्यासाठी मिळते. edible लिहिले असेल तेच वापरावे.
ओके माहितीबद्दल धन्यवाद केशर
ओके माहितीबद्दल धन्यवाद केशर
केशर खूपच छान दिसत आहेत
केशर खूपच छान दिसत आहेत चॉकलेटस.
पॅराशुटवर एडीबल वाचल आहे पण ते नका वापरु. केपीलच ना. ते. कुकींगसाठी वापरु शकता.
आरती धन्यवाद ... क्वॉलीटी
आरती धन्यवाद ... क्वॉलीटी चांगली नसते का? मी एडीबल कुठल्या तरी कंपनीचे भारतात बघितले होते.(ग्राहक संघात मिळते. नाव नाही लक्शात)
रेसिपी मस्त आहे पण नारळाचे
रेसिपी मस्त आहे पण
नारळाचे तेल ओतीव नसेल याची काळजी घ्या
म्हणजे नारळाचे तुप पाहिजे असे पुढच्या टीपांवरुन वाटतेय. खायचे तेल आणुन फ्रिजात ठेवले किंवा सध्याच्या दिवसात बाहेर ठेवले तरी त्याचे तुप बनेल. ते येईल वापरता.
पॅरॅशुटवर एडिबल छापलेले असते ते केवळ नियमांमध्ये अडकु नये यासाठी. ते खाणे योग्य नाही असे मलाही वाटते.
छान आणि सोपी रेसिपी >>++१११
छान आणि सोपी रेसिपी >>++१११
केशर, कोकम तेल वापरुन नक्की
केशर, कोकम तेल वापरुन नक्की करेन. ते घट्टच असत. धन्स मस्त सोपी रेसिपी दिली त्याबद्द्ल.
पॅराशुट तेल खाण्या लायक नसत. आई कुकिंगसाठी केपील वापरते जर घरच ना.ते. संपल असेल तर.
साधना, सृष्टी धन्यवाद साधना
साधना, सृष्टी धन्यवाद
साधना ..तसेच म्हण हव तर. फोटो टाकलाय बघ मी तुपासारखेच दिसते फक्त पांढरे.
तु म्हणतेय तसेही होईल. मी पण हाच विचार केला भारतात तेल मिळते ते ओतीव असेल तर काही मिनीट फ्रिज/फ्रिझर्मध्ये ठेऊन जमु शकेल. सांग मला केलेस तर
अच्छा मीही कधी पॅरॅशुट वापरले नाहिये. त्यावर एडिबल छापलेले असते हेही नवीनच आहे मला.
आरती धन्यवाद. माहितीत भर
आरती धन्यवाद. माहितीत भर टाकलीस माझ्या. कोकम तेल कुठल्या ब्रँडचे वापरतेस?
लोणी,कोको बटर पण वापरु शकतो.
मला केपील बद्दल माहीत नव्हते. मुंबईत मिळते का ह्या ब्रँडचे कुणास ठाऊक.
कल्पक प्रकार आहे. ज्यांना
कल्पक प्रकार आहे.
ज्यांना साखर चालत नाही त्यांना मधही चालणार नाही.
मस्तच.
मस्तच.
केशर, मुंबईत मिळते केपील
केशर, मुंबईत मिळते केपील ब्रॅड. केरळा शॉपस जिथे असेल तिथे मिळत आणि मांटूगा, वाशी, सानपाडा येथे आहे.
कोकम तेल गावावरुन येत.
लोणी वापरु शकतो तर तुप नाहि
लोणी वापरु शकतो तर तुप नाहि का चालणार? कि वास आणि चव बदलेल?
दिनेश, जागू, आरती, अन्जलि .
दिनेश, जागू, आरती, अन्जलि . धन्यवाद
दिनेशदा .. साखर शरीराला वाईट म्हणुन बंद केली. पण मुलीला चॉकलेटला नाही म्हणणे (स्वतःलापण :P) कठीण जात होते. मैत्रिणीशी बोलता बोलता विषय निघाला की चॉकलेट मिस करतो आम्ही. ती पण साखर नाही खात असे कळले आणी तिने मला ५मिनीटात चॉकलेट बनवुन दिले. ते एवढे सुंदर होते की मग बाजारातील चॉकलेटस खावीशीच नाही वाटत. सध्या घरीच केले जाते.
अन्जलि चालेल... वास न चव बदलेल पण चांगलेच लागेल की. तु केलेस तर सांग नक्की.
नारळाचे तेल घट्ट नसेल ना तर घरच्या घरी कोकोनट बटर बनवुन पण वापरता येईल. मिक्स करा आणी सेट करायला ठेवले की झाले
केशर, मस्तच! फोटोतले चॉकलेट
केशर, मस्तच!
फोटोतले चॉकलेट पटकन उचलून घ्यावेसे वाटतेय.
नलिनी धन्यवाद
नलिनी धन्यवाद
वाह केशर! छानच पाककृती आहे.
वाह केशर! छानच पाककृती आहे. आणि खूपच सोपी.
घरच्या घरी कोकोनट बटर बनवुन
घरच्या घरी कोकोनट बटर बनवुन पण वापरता येईल>>>>>>>> हे कसे करायचे सांगतेस का??