तळलेले द्राक्ष घड

Submitted by _प्राची_ on 15 April, 2013 - 10:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गव्हाच्या कुरड्या किंवा तांदुळाच्या पळीपापड्या किंवा साबुदाण्याच्या चिकोड्या करताना उरलेला आणि जरा घट्ट झालेला चिक - वाटीभर
हिरवा रंग
द्राक्ष खाल्यावर ऊरणार्‍या काड्या (घडाचा सांगाडा)
आवड

क्रमवार पाककृती: 

आपण (किंवा आई किंवा सासुबाई) जेव्हा गव्हाच्या कुरड्या किंवा तांदुळाच्या पळीपापड्या किंवा साबुदाण्याच्या चिकोड्या करतो तेव्हा त्या करता करता शेवटी थोडा चिक उरतो. जो बर्‍यापैकी घट्ट होतो. तसा १ वाटी घ्यावा. त्यात हिरवा रंग मिसळून घ्यावा.
द्राक्षाच्या काड्यांवर द्राक्षाच्या जागी याचे छोटे छोटे गोळे करून लावावे.
उन्हात मस्त २-३ दिवस वाळू द्यावेत.
खास दिवशी तळावेत.
ओला घड
DR3.jpg

वाळल्यावर
DR4.jpg

तळल्यावर
DR2.jpg

पानात वाढल्यावर
DR1.jpg

वाढणी/प्रमाण: 
एकास एक !
अधिक टिपा: 

रुखवतावर ठेवायला पण हा प्रकार छान दिसतो.

माहितीचा स्रोत: 
नक्की आठ्वत नाही पण बहुदा मंगला बर्वेंच पुस्तक. आई कडे हे फार वर्षांपूर्वी होतं.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट आहात तुम्ही.
मी तर स्वप्नात सुद्धा हे करायचा विचाऱ करू शकत नाही .

पाककृतीची पुस्तकं ही 'विरंगुळा' या सदराखाली मोडतात असं मला मायबोलीवर येईपर्यंत वाटायचं. म्हणजे नेहमीच्या पुस्तकांपेक्षा जरा वेगळा रुचीपालट म्हणून वाचायची. मनातल्या मनात आनंद घ्यायचा आणि छानपैकी विसरून जायचं. इथे आल्यावर स्वयंपाकघरातली 'करणसार' लोकं पाहून डोळेच दिपले होते.. + ११११

घाबरत घाबरतच हा धागा उघडला. द्राक्षाला तळायचं ही नुसती कल्पनाच कसनुसं करते! Biggrin
फोटो मस्त आहेत! पाहून डोळे निवले.

भार्री पाककृती...

आणि क्रमवार पाककृती मधल्या पहिल्याच वाक्यातल्या कंसातल्या खुलाश्यासाठी एजोटाझापा...:)

मीही बर्वेबाईंच्य पुस्तकात वाचलीय ही रेसिपी. पण प्रत्यक्षात कोणी करेल असे वाटले नव्हते.
आणि
पाककृतीची पुस्तकं ही 'विरंगुळा' या सदराखाली मोडतात असं मला मायबोलीवर येईपर्यंत वाटायचं.

ही दोनही वाक्ये भन्नाट ....:)

पाकसिद्धी नाव असावे त्या पुस्तकाचे. माझ्या आईकडे बरीच पुस्तके आहेत अशी जुनी. ल़़क्ष्मीबाई धुरंधरांचेही एक असावे असे वाटते. त्यातली, "एक लंगडी घ्यावी", "काहील घ्यावी", तांदूळ वैरावे, तव्यावर वरून खालून निखारे ठेवावेत अशी वर्णने वाचायला मजा येते.

Pages