नल माखल्या साफ करुन त्या गोल कापा. ( हे काम शक्यतो कोळणीवरच सोपवायचे) त्या आधीच पाईपप्रमाणे असल्यामुळे गोल कापयला जास्त कलाकुसर करावी लागत नाहीत. म्हणजे व्हेज मधल्या पडवळासारखे.
ह्या रिंग्ज स्वच्छ धुवून त्याला हिरवी पेस्ट लावा, मिठ लावा.
ह्या रिग्ज आता कुकरमध्ये १५ मिनीटे शिजवून घ्या.
आता हळद, मसाला, लिंबूरस चोळूण घ्या.
एका भांड्यात बेसनचे पिठ किंवा कॉर्नफ्लॉवर भजीप्रमाणे भिजवून घ्या. ह्यात दुसरे काही टाकण्याची आवश्यकता नसते. वाटल्यास चिमुटभर मिठ आणि मसाला टाका. (मी बेसन घेतले आहे.)
आता रिंग्ज ह्या मिश्रणात डुबवून तापलेल्या तेलात डिप फ्राय करुन घ्या.
झाल्या तय्यार माखली च्या रिंग्ज.
नाव इंग्लिश मराठी मिच केल आहे. बर वाटत वाचायला. स्क्विड्स रिंग्ज वाचल की बाहेरच्या देशातली डिश वाटते.
मोठ्या माखलीच्या पण अशा रिंग्ज होऊ शकतात. पण कुकर मध्ये आधी चांगल्या शिजवून घ्यायच्या.
ह्या रिंग्ज अगदी चिकन क्रिस्पीच्या तुकड्यांसारख्या लागतात. मला शंका आहे की हॉटेलमध्ये चिकन ऐवजी माखलीच वापरत असतील.
साईड डिश म्हणूनही जेवणात खपून जाते.
मस्त दिसतेय.. मी हा मासा
मस्त दिसतेय.. मी हा मासा कित्येकदा पाहिलाय पण घ्याय्चे धाडस कधी केले नाही.... आता रिंग्स क्रुन पाहिन एक्दा.
आधी शिजवुन घेणे जरुरीचे आहे का गं? तळताना पण शिजवणे होणारच आहे म्हणुन विचारते.
जागू , हे जपानात टेम्पूरा
जागू , हे जपानात टेम्पूरा म्हणून खातात.म्फार मस्त लागतात.
इथे कोणीतरी टाकलेली याची
इथे कोणीतरी टाकलेली याची रेसिपी... पण ती फ्रोझन रिंग्स वगैरे वापरुन अशी होती बहुतेक.
साधना माकुळला मटणाइतकाच वेळ
साधना माकुळला मटणाइतकाच वेळ शिजायला लागतो. डियरेक्ट शिजवताना मग जे कोटींग आहे ते करपेल आणि वेळही खुप लागेल.
इन्ना
मस्त. हा अशक्य भारी प्रकार
मस्त. हा अशक्य भारी प्रकार गोव्यात कलमारी म्हणून मिळतो. ब्राझिलमधे लूला. पुण्यात पण मिळतो, नाव वेगळच आहे.
आधी उकडून करतात माहिती नव्हते. त्यामुळे चिवट व्हायचे.
जागू मस्तच. तुझ्यामुळेच मी
जागू मस्तच. तुझ्यामुळेच मी माखलं खायला लागले. आता हे पण करून बघेन.
माझ्या साबा लसुन ठेचुन, लिंबु
माझ्या साबा लसुन ठेचुन, लिंबु व लाल तिखट लावुन ठेवतात थोडा वेळ. मग तेल न टाकता माखलि frying pan मधे टाकुन थोडे पाणि टाकुन झाकण ठेवुन मंद गॅस वर ठेवतात. त्यामुळे आधि शिजवुन नाहि घेत. चिवट पण नाहि होत.
हा प्रकार विरार जवळ बोळिन्ज
हा प्रकार विरार जवळ बोळिन्ज येथिल एम एम होटेल मधे कादेलि चिल्लि ह्या नावने प्रसिध्ध आहे.
आणि खूप टेस्टि असतो फक्त बेसन ऐवजि कोर्न्फ्लोवर वापरत असावेत तेथे.
जागु रेसिपि छान आहे.
अन्जली असे नुसते कालवण किंवा
अन्जली असे नुसते कालवण किंवा सुके शिजवताना नो प्रॉब्लेम पण आपण केलेले बेसनचे किंवा कॉर्नफ्लॉवरचे कव्हर जास्त शिजवल्याने जळू नये म्हणून आधी शिजवून घेतले.
निलुदा बाहेर कॉर्नफ्लॉवरच वापरतात.
जागू ऊंहू ये इतना अच्छा नही
जागू ऊंहू ये इतना अच्छा नही लगा
दक्षे नजरेने नको तोंडाने खाऊन
दक्षे नजरेने नको तोंडाने खाऊन सांग.
हे असं अजुन किती छळायचं
हे असं अजुन किती छळायचं ठरवलयसं तु जागु???????????????ते म्हणतात नं की "सहन होत नाही आणि सांगनाही येत नाही" एक्झॅक्ट्ली तशी परीस्थीती करुन ठेवतेस तु. ईकडे माकलं मिळत नाहीत आणि त्यातुन तुझे असे कातिल फोटो . तुझा त्रिवार नाही अनेक वार निषेध!!
मस्त वाटतेय गं!! करुन बघ्णार
मस्त वाटतेय गं!! करुन बघ्णार नक्की
जागु मि कालच मनात आठवण
जागु मि कालच मनात आठवण काढ़लि.;)... खुप दिवस रेसिपि नाहि आलि... पन हे मासे आमच्या कडे नाहि आणत.
जागू, गोव्यातल्या हॉटेलातही
जागू, गोव्यातल्या हॉटेलातही ही फेमस डिश आहे.
वॉव! महामस्त दिसताहेत. पण हे
वॉव! महामस्त दिसताहेत.
पण हे ऑक्टोपस नाहीत. हे स्क्वीड. माहिमच्या फ्रेश कॅचमध्ये खाल्लेय याची प्रिपरेशन.
खूपद पाहिलेत हे मासे. पण कसे
खूपद पाहिलेत हे मासे. पण कसे कराय्चे माहित नव्हते. आता आणून नक्के करून पाहिन.
ho me khalay he
ho me khalay he ...कलमारी...crispy khup chan lagatat.....
जागू मामी इज राईट. ते स्क्वीड
जागू मामी इज राईट. ते स्क्वीड आहेत. नवरा खातो म्हणून मला माहीत.
जाग्वे, एक नंबर वगैरे टाकलायच
जाग्वे, एक नंबर वगैरे टाकलायच तो ?
आम्हीपण शाकाहारी स्टार्टर्स म्हणून मालिका सुरू करावी काय ?
दक्षु दी...अग हे बाकी कशाही
दक्षु दी...अग हे बाकी कशाही पेक्षा अप्रतीम लागतं.......बघुन नाही खाउन सांग....जागु दी कडे नाहीतर माझ्याकडे ये....मी तुझ्या न कळत तुला खाउ घालेन....आवडेल तुला....:)
जागु दी नेहेमीप्रमाणेच चुम्मेश्वरी रेसिपी आहे ही......मम्मी बनवते ना हे तेव्हा मी पुरवुन पुरवुन खाते....
माकुल असं काय तसं काय कसही छानच लागते...
जागु दी....सुकलेल्या माकलीच्या आंबट तिखट कालवणाची रेसिपी टाक ना.....आणि प्लीज त्यात खोबरं नको...चिंचेच्या कोळाचं कालवण.....यम्मी....
तोंपासू
तोंपासू
भारी फोटो. शाकाहारींनी
भारी फोटो. शाकाहारींनी पडवळाच्या कराव्यात असं सुचवते आहेस का?
तोंपासु ! . इथे कलामारी
तोंपासु ! . इथे कलामारी रिंग्ज, किंवा कलामारी फ्रिटी या नावाने बर्याच रेस्टॉमधे मिळतात. चिल्लर पार्टीची आवडती डिश आहे पण घरी कधी केली नाही.
कुकरमधून आधी शिजवून घ्यायची आयडीया भारी आहे. पुढच्या वेळेस एशियन मार्केटला गेले की नक्की आणेन स्क्विड्स.
अंधेरी इस्टला महाराजा नावाचे रेस्टॉ आहे. त्यांच्याकडे चिली वंडा म्हणून स्टर फ्राय स्क्विड्स मिळतात. तो प्रकारसुद्धा भारी लागतो.
मेधा आणतेस? आण बापडी साफ
मेधा आणतेस? आण बापडी साफ करायला खूप वेळ लागतो (साफ करणार्^याचं मत)
मागे एकदाच आणले आता नवरा मुकाट्याने कलामारी रिंग्जच मागवतो..
जागू, तू गुणाची बाय आहेस झालं...मस्त साग्रसंगीत टाकलीस रेसिपी....अन्नदाता सुखी भव...
आमच्या इथल्या दुकानात साफ
आमच्या इथल्या दुकानात साफ करून रिंगा करुन मिळतात. कधी कधी तयार पॅक्स पण असतात - पण मी शक्यतो असे पॅकबंद सीफूड घेत नाही.
तोंडाला पाणी!
तोंडाला पाणी!
वॉव.. कालामारी...
वॉव.. कालामारी... स्लर्पी!!!!!
बदल केला. आभारि आहे.
बदल केला.
आभारि आहे.
जागुले ...अगं काय काय
जागुले ...अगं काय काय करतेस?
नल दमयंती माहिती होती गं! मज अदन्यानी पामरास वाट्लं ़ बहुतेक टायपो असावा.......:फिदी:). खरंच गं????
नल माखला काय झेपलं नाय.......असो...... पदार्थ चांगलाच. असावा.
Pages